A उत्तमलक्षण मुद्द्यांच्या आधारे कृती | uttamlakshan muddyanchya aadhare kruti

या लेखा मध्ये आपण इयत्ता दहावी उत्तमलक्षण या कवितेवर आधारित मुद्द्यांच्या आधारे ज्या कृती  विचारल्या जातात याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

उत्तमलक्षण मुद्द्यांच्या आधारे कृती
उत्तमलक्षण मुद्द्यांच्या आधारे कृती

त्तक्षण मुद्दे व कृती | uttamlakshan mudde v kruti 

१)  प्रस्तुत(उत्तमलक्षण)कवितेचे कवी 

– या कवितेचे कवी   संत रामदास आहेत.

२) कवितेचा(उत्तमलक्षण) रचनाप्रकार –

 साडेतीन चरणी ओवी आहे किंवा हे  संतकाव्य आहे असे लिहिले तरी चालेल.

३)  कवितेचा काव्यसंग्रह – 

श्रीदासबोध या ग्रंथातून ही कविता घेतलेली आहे.

४) उत्तमलक्षण  कवितेचा विषय – 

आदर्श व्यक्तीची लक्षणे उत्तमलक्षण या कवितेत सांगितली आहेत.

५) उत्तमलक्षण कवितेतून व्यक्त होणारा भाव

 (स्थायीभाव) – शांतरस 

६) उत्तमलक्षण कवितेच्या कवीची लेखन वैशिष्टये 

– सामाजिक जाणिव हे
रामदासांच्या काव्यलेखनाचे ठळक वैशिष्टय आहे. तसेच एक वैचारिक बैठक देखील आहे.समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्न्तीविषयी
अखंड जागरुकता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या  काव्यात आढळते.

७)  उत्तमलक्षण कवितेची मध्यवर्ती कल्पना –

 आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट
करताना त्यांनी सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी या आदर्श
गोष्टी कराव्यात. तर ज्या त्याज्य गोष्टी आहेत त्या करु नयेत असे सांगितले आहे. उत्तम माणूस म्हणून जगत असताना आपल्याकडे कोणते गुण हवेत यावर ही कविता भाष्य करते.

८)   उत्तमलक्षण कवितेतून व्यक्त होणारा विचार

 आदर्श व्यक्तीने ‘काय
करावे’ नि ‘काय करु नये’ हे सांगितले आहे.थोडक्यात उत्तम जीवन जगण्यासाठी कोणते गुण हवेत याची छान मांडणी संत रामदास यांनी केली आहे.

९) उत्तमलक्षण  कवितेतील आवडलेली ओळ –

(यामधे आपण कोणतीही ओळ लिहू शकता मी एक नमुना दिला आहे.)

सत्य मार्ग
सांडू नये! असत्य पंथे जाऊं नये! कदा अभिमान घेऊं नये! असत्याचा!!
 

 यामध्ये रामदासांनी सांगितले आहे की, आदर्श व्यक्तीने सत्याचा मार्ग
स्वीकारावा व असत्याच्या मार्गाने जाऊ नये असे सांगितले आहे.थोडक्यात उत्तमत काय असते याची कल्पना उतमलक्षन  या कवितेतून येते 

१०)  उत्तमलक्षण कविता आवडण्याची
वा न आवडण्याची कारणे – 

उत्तमलक्षण ही कविता मला खूप आवडली .(हे एक वाक्य आपणास १ गुण मिळवून देईल)

            प्रस्तुत कवितेत संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची उत्तम  लक्षणे सांगितली आहेत. आदर्श समाजरचनेसाठी आज आदर्श गुणांच्या व्यक्तींची समाजाला
फार गरज आहे. नको आणि अशीच रचना संत रामदास यांनी आपल्या उत्तम लक्षण या कवितेतून केल्यामुळे खरोखरच आज जीवन जगत असताना या कवितेतील शब्दांना शब्द आपल्या उपयोगी पडणार आहे आणि भविष्यात देखील उपयोगी पडेल म्हणूनच म् ही रचना(कविता) फार आवडते.

१२ .उत्तमलक्षण कवितेतून
मिळणारा संदेश –

 सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, किर्ती वाढवावी असा संदेश
या कवितेतून मिळतो.

Leave a Comment