A ख्रिसमस नाताळ निबंध मराठी | christmas natal nibandh marathi

ज्ञानयोगी डॉट कॉमच्या माध्यमातून आपण नवनवीन माहिती पाहत असतो. आजच्या लेखामध्ये आपण ख्रिस्ती बांधवांचा पवित्र सण ख्रिसमस नाताळ निबंध मराठी माहिती पाहणार आहोत.

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी
ख्रिसमस नाताळ निबंध मराठी

भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. हे सर्व लोक एकोप्याने राहतात. एवढेच नव्हे तर एकमेकांचे सण-उत्सव देखील साजरे करतात हिंदू धर्मियांचे दिवाळी दसरा मुस्लिम बांधवांचे ईद रमजान यासारखे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात अगदी त्याच पद्धतीने ख्रिस्ती बांधवांचा ख्रिसमस म्हणजे नाताळ सण देखील मिळून मिसळून साजरा केला जातो. अलीकडे तर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून लोक कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता एकमेकांना शुभेच्छा देतात. सणांच्या दिवशी एकमेकांच्या घरी जातात जणू काही विविधतेत एकता खऱ्या अर्थाने आता संपूर्ण भारतभर पाहायला मिळते म्हणूनच आज आपण ख्रिस्ती धर्मियांचा नाताळ म्हणजे ख्रिसमस या विषयी निबंध पाहणार आहोत. नाताळाविषयचा हा मराठी निबंध वाचल्यानंतर आपल्याला हा नाताळ सण कशा पद्धतीने साजरा केला जातो. याची माहिती मिळेल.

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी | christmas natal nibandh marathi |christmas essay in marathi  

डिसेंबर महिन्यामध्ये 25 डिसेंबरला येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून नाताळ सण साजरा केला जातो. भारतामध्ये 25 डिसेंबरला आपण ख्रिसमस नाताळ साजरा करतो. परंतु काही देशांमध्ये नाताळ हा सण 6 जानेवारीला साजरा केला जातो, परंतु मोठ्या प्रमाणात 25 डिसेंबरला ख्रिसमस म्हणजेच नाताळ सण साजरा केला जातो.

नाताळ सणाला सुरुवात 

नाताळ हा सण नेमका कधीपासून साजरा केला जातो ?तर चौथ्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये रोम राज्यामध्ये नाताळ सण साजरा केल्या विषयीच्या नोंदी आपल्याला सापडतात. ख्रिस्ती बांधव नाताळ सण अतिशय उत्साहात साजरा करतात. कारण या दिवशी परमेश्वराने मानव रूप धारण केले आणि तो दिवस म्हणजे नाताळ होय. म्हणूनच ज्या महिन्यात येशू ख्रिस्तांचा जन्म झाला. तो महिना किंवा पवित्र दिवस म्हणून त्या दिवसाला ख्रिसमस म्हणून ओळखले जाऊ लागले.

नाताळ सणाच सोहळा

ख्रिसमस हा 25 डिसेंबरला येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जात असला तरी या सणाचा उत्सव साजरा करण्यासाठी ख्रिस्ती बांधव 24 डिसेंबरला संध्याकाळच्या वेळी चर्चमध्ये एकत्र जमतात.या दिवसाला ख्रिसमस ईव्ह म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधीची संध्याकाळ म्हटले जाते. 24 डिसेंबर रोजी संध्याकाळी सर्वजण चर्च मध्ये एकत्र येऊन चर्च रंगबिरंगी फुलांनी सजवतात. त्याचबरोबर विद्युत रोषणाई देखील केली जाते. चर्चमध्ये सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. 24 तारखेला रात्री बाराच्या दरम्यान म्हणजेच 25 डिसेंबरला सुरुवात होताच रात्री120नंतर चर्चमध्ये मोठमोठ्याने घंटानात केला जातो. या घंठानादाच्या गजरामध्ये येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस साजरा केला जातो. या घंटानानंतर ख्रिसमस कॅरोल्स म्हणजेच येशू ख्रिस्तांचा गौरव करणारी भक्ती गीते गायले जातात.

नाताळ सण आणि ख्रिसमस ट्री

रात्री घंटा नादामध्ये येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस साजरा झाल्यानंतर, या नाताळाच्या शुभेच्छा देण्यासाठी चर्च मधून लहान मुले, मोठी माणसे स्त्री-पुरुष आबाल वृद्ध एकमेकांना चर्चमध्ये तसेच प्रत्येकाच्या घरी जाऊन शुभेच्छा देतात. नाताळाच्या रात्री घरांमध्ये तसेच चर्चमध्ये ख्रिसमस ट्री सुंदर पद्धतीने सजवला जातो.  विद्युत रोषणाई केली जाते.ख्रिसमस ट्री हा बारा महिने हिरवागार म्हणजे सदाहरित असतो.अगदी त्याच पद्धतीने येशू ख्रिस्तांचा या भुतालावरती जन्म झाल्यानंतर सर्वांचे जीवन सुजलाम सुफलाम होणार आहे.याचेच प्रतीक म्हणून ख्रिसमस ट्रीची पूजा मनोभावे केली जाते. वृक्ष आपले मित्र आहेत अशी चांगली शिकवण देखील या ख्रिसमस ट्री च्या पूजेतून व्यक्त झाल्यासारखे दिसते. सोळाव्या शतकामध्ये मार्टिन ल्युथरने सर्वप्रथम ख्रिसमस ट्री ची पूजा केली आणि तेव्हापासूनच अगदी आतापर्यंत ख्रिसमस ट्री ची सजावट करून पूजा केली जाते.

ख्रिसमस नाताळ व  सांताक्लॉज

या ख्रिसमस सणाविषयी लहान मुलांना प्रचंड उत्सुकता असते, कारण का तर त्या दिवशी मुलांना सांताक्लॉज वेगवेगळ्या भेट वस्तू देतो. नाताळाच्या दिवशी लहान मुले आपण झोपतो त्या पलंगावरती एक पिशवी अडकून ठेवतात आणि त्या रात्री येशू ख्रिस्ताने पाठवलेला एक माणूस म्हणजे सांताक्लॉज हा सर्वांना त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू देत असतो. सकाळी लहान मुले उठल्यानंतर या भेटवस्तू पाहून प्रचंड आनंदी होतात. आपल्या आई-वडिलांना विचारतात सांताक्लॉज कधी आला होता? अन अगदी आनंदाने आपल्याला मिळालेल्या भेटवस्तू आपल्या मित्र मंडळीना दाखवतात. एका छोट्या घटनेने त्या लहान मुलांची ख्रिस्ती धर्मावर श्रद्धा किती कळत नकळतपणे वाढत असते. हा सांताक्लॉज म्हणजे सेंट निकोलस  जो चौथ्या शतकामध्ये मुलांना अशा पद्धतीने वेगवेगळ्या भेटवस्तू देत होता. त्या काळापासूनच ख्रिस्ती धर्मातील व्यक्ती सांताक्लॉजचा वेश धारण करून लहान मुलांना वेगवेगळ्या वस्तू देतात. लहान मुले वर्षभर या नाताळ सणाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात.असा हा नाताळ सण.

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी | christmas natal nibandh marathi 

ज्या पद्धतीने हिंदू धर्मीय दिवाळी सण साजरा करतात.अगदी त्याच पद्धतीने ख्रिस्ती बांधव या सणाच्या वेळी आपल्या घरासमोर पणत्या, दिवे लावतात.तसेच विद्युत रोशनाई देखील करतात. नाताळाला सुंदर सुंदर केक, लाडू, चिवडा यासारखे फराळ देखील बनवले जाते. केक,फराळ खाण्यासाठी लोक एकमेकांच्या घरी जातात. ख्रिस्ती बांधव केवळ आपल्या धर्मियांनाच नव्हे तर आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन बांधवांना देखील आपल्या या पवित्र नाताळ सणाला बोलावतात.आमंत्रित करतात.

अशाप्रकारे नाताळ हा सण अगदी उत्साह आणि आनंदामध्ये संपूर्ण विश्वामध्ये साजरा केला जातो. 

नाताळ आणि गोशाळा

दिवाळीमध्ये शिवाजी महाराजांचा पराक्रम म्हणून किंवा एक संस्कृतीचा भाग म्हणून लहान लहान मुले घरासमोर छान छान किल्ले बनवतात. अगदी त्याच पद्धतीने येशू ख्रिस्तांच्या जन्माची आठवण म्हणून येशू ख्रिस्तांचा जन्म ज्या ठिकाणी झाला.ती जागा किंवा त्याची आठवण म्हणून रंगबिरंगी गोशाळा म्हणजेच गाईंचा गोठे तयार केला जातात.

 

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी | christmas natal nibandh marathi 

 मुले अतिशय मन लावून गोशाळा तयार करत असतात. खरोखरच धर्म कोणताही असो पण त्यातून मिळणारी शिकवण मानवतावादी आहे हे पटते.

नाताळ व नवीन वर्ष

25 डिसेंबरला नाताळ सणाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांनी 1 जानेवारी हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. हे इसवी सन म्हणजेच नवीन वर्षाची कालगणना. येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतर इसवी सन आणि येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या अगोदरचा काळ इसवी सण पूर्व म्हणून ओळखला जातो. थोडक्यात प्रभू येशुंच्या जन्मापासून सुरू झालेली कालगणना आज सर्व जगात मान्य आहे.

 

ख्रिसमस दहा ओळी मराठी निबंध 

आजच्या या ख्रिसमस नाताळ निबंध मराठी लेखाच्या माध्यमातून ख्रिसमस सण कशा पद्धतीने साजरा केला जातो. या क्रिसमस सणाची सुरुवात कधीपासून झाली,ख्रिसमस ट्री अशी सर्व माहिती आजच्या या नाताळाच्या निबंधामध्ये आपण पाहिली. ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. 

FAQ 

1. नाताळ सण कधी साजरा केला जातो?

25डिसेंबर 

2. नाताळ हा सण कोणत्या धर्माचे लोक साजरा करतात?

ख्रिश्चन

Leave a Comment