A ख्रिसमस नाताळ मराठी माहिती | christmas natal marathi mahiti

ज्ञानयोगी डॉट कॉम निमित्त नाताळ सणाचे.या सणाचे औचित्य साधून आज आपण ख्रिसमस म्हणजेच नाताळ या सणाची माहिती पाहणार आहोत.

ख्रिसमस नाताळ मराठी माहिती
ख्रिसमस नाताळ मराठी माहिती

ख्रिश्चन बांधवांचा सर्वात पवित्र सण म्हणजे नाताळ होय. या सणाच्या दिवशी ख्रिस्ती बांधव अगदी घरातील लहान थोर अबाल वृद्ध अतिशय आनंद असतात. कारण त्या दिवशी प्रभू येशूंचा जन्म झाला म्हणूनच या दिवसाला विशेष  महत्व आहे. मराठीमध्ये ख्रिसमस ला नाताळ म्हणतात चला तर मग या नाताळ शब्दाचा अर्थ पाहूया.

नता म्हणजे काय ?what is meaning of natal 

नाताळ हा जरी मराठी शब्द असला तरी हा शब्द नातुस (natus) या लॅटिन शब्दापासून बनलेला आहे. नातूस म्हणजे जन्म. ज्या दिवशी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला तो दिवस म्हणजे नाताळ होय. या नाताळ शब्दालाच इंग्रजीमध्ये क्रिसमस किंवा ख्रिसमस असे देखील म्हटले जाते.

 

क्रिसमस/ ख्रिसमस म्हणजे काय? What is meaning chirstmas 

Missa या शब्दावरून chirstmas हा शब्द पुढे आलेला आहे. ख्रिसमस मध्ये तीन मिसा केल्या जातात. या मिस्सा म्हणजेच विधी किंवा महायज्ञ या नावाने आपल्याला ही संकल्पना समजून घेता येईल. येशू ख्रिस्तांच्या जन्मोत्सवाच्या वेळी तीन मिसा झाल्या आजही ख्रिसमसच्या वेळी किंवा नाताळामध्ये या तीन मिसा अगदी मनोभावे केल्या जातात.

 

ख्रिसमस मधील तीन मिस्सा chirstmas three missa 

येशू ख्रिस्तांचा जन्म 25 डिसेंबरला झाला. 24 तारखेला रात्री म्हणजेच 25 तारीख रात्री बारा वाजताच्या सुमारास सुरू होणार त्यावेळी म्हणजेच रात्रीच्या वेळी येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या शुभमुहूर्तावर पहिली प्रार्थना किंवा महायज्ञ केला जातो. त्यानंतर लोक एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा देतात. आणि पुन्हा एकदा पाठीच्या वेळी चर्चमध्ये एकत्र जमतात आणि त्यावेळी दुसरा महायज्ञ किंवा मिस्सा केली जाते. व ख्रिसमसच्या दिवशी साधारणपणे दुपारच्या नंतर चार पाच वाजता तिसरी मिस्सा केली जाते. या येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या वेळी इजराइल मधील बेथलहेम या ठिकाणी पहिली मिस्सा झाली व त्या ठिकाणाहून येशू ख्रिस्तांना दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले त्यावेळी दुसरी मिस्सा व 25 तारखेला तिसरी मिस्सा झाली. आजही या मिस्सा ख्रिस्ती बांधव मनोभावे करताना दिसतात.

 

नाताळ आणि 25डिसेंबर |chirstmad and 25december 

क्रिसमस म्हणजेच नाताळ व 25 डिसेंबर यांचा काय संबंध आहे असा एखाद्याला प्रश्न पडू शकतो. प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म ज्या तारखेला झाला ती तारीख म्हणजे 25 डिसेंबर. थोडक्यात 25 डिसेंबरला येशू ख्रिस्तांचा जन्म झाला म्हणून तो दिवस क्रिसमस किंवा नाताळ म्हणून साजरा केला जातो.

 

ख्रिसमस साजरा करण्याची पद्धत | chirstmas sajra kantachi padhat |how to celebrate chirtmas 

नाताळ म्हणजे ख्रिसमस हा सण कशा पद्धतीने साजरा करतात तर आपण वरती पाहिलेच ते 25 डिसेंबरला रात्रीच्या वेळी येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस साजरा केला जातो. त्यानंतर तीन मिसा कशा पद्धतीने साजरा होतात यांची माहिती आपण वरती पाहिली. ख्रिसमस साजरा करण्यासाठी ख्रिश्चन बांधव 24 तारखेला रात्रीच्या वेळी चर्चमध्ये एकत्र जमतात. रात्रीच्या बाराच्या ठोक्याला चर्चमधील घंटा नादामध्ये येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा करतात. जन्मोत्सव साजरा करत असताना ख्रिस्ती बांधव मोठमोठ्याने क्रिसमस कॅरोल्स म्हणत असतात म्हणजेच काय तर येशू ख्रिस्तांना आळवणारी भक्ती गीते म्हटले जातात. त्यानंतर ख्रिस्ती बांधव रात्रीच्या वेळी एकमेकांच्या घरी जातात व पहाटे चार पर्यंत एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा देत असतात. ख्रिस्ती बांधव एकमेकांना नाताळाची भेट कार्ड देतात. शुभेच्छा देतात.

 

क्रिसमस आणि सांताक्लॉज | chirstmas ani santa close 

लहान मुलांसाठी ख्रिसमस हा सण अतिशय आवडीचा आहे. कारण या दिवशी सांताक्लॉज रात्रीच्या वेळी प्रत्येकाच्या घरी जाऊन लहान मुले झोपेत असतानाच त्यांच्या पलंगावरती वेगवेगळ्या भेटवस्तू ठेवत असतो. आपण ज्या पद्धतीने सत्कर्म करतो त्याचे फळ म्हणून सांता आपल्याला भेटवस्तू देत असतो या प्रेरणेतून मुले अतिशय छानपणे आपले वर्तन करत असतात. ख्रिस्ती बांधव या दिवशी मुलांचे श्रद्धेपोटी सांताक्लॉज च्या वेशात रात्रीच्या वेळी एकमेकांच्या घरी जाऊन छान छान भेटवस्तू देत असतात.

 

नाताळ सणाला बनवले जाणारे खाद्यपदार्थ | chirstmas making  eating food 

ज्या पद्धतीने हिंदू धर्मामध्ये दिवाळीचा सण साजरा केला जातो अगदी त्याच पद्धतीने नाताळ सणाला ख्रिस्ती बांधव दिव्यांनी अंगणामध्ये रोषणाई करतात त्याचबरोबर विद्युत रोषणाई देखील केले जाते.घरासमोर आकाश कंदील लावले जातात. छान छान केक बनवले जातात व ते आपले नातेवाईक मित्र मंडळी यांच्यासोबत त्याचा आस्वाद घेतला जातो. अलीकडच्या काळामध्ये केक बरोबरच लाडू करंज्या चिवडा चकली यासारखे पदार्थ देखील ख्रिस्ती बांधव अगदी आवडीने बनवतात. थोडक्यात ख्रिस्ती बांधवांची दिवाळी म्हणजे ख्रिसमस असे म्हटले तरी वागे ठरू नये.

 

नाताळ आणि क्रिसमस ट्री| christmas and christmas tree 

नाताळ आणि क्रिसमस ट्री यांचा एक जवळचा संबंध आहे. क्रिसमस ट्री म्हणजेच सूचीपर्णी वृक्ष.असा  वृक्ष की जो कधीही सुकत नाही वर्षभर तो सदाहरित असतो भरलेला असतो. ती त्याच पद्धतीने येशू ख्रिस्ताचे या भूमीवर आगमन झाले आणि माणसाचे जीवन सुखमय सदा हरित झाले हा संदेश त्यातून मिळतो. नाताळाच्या दिवशी या क्रिसमस ट्री ला विद्युत रोषणाई केले जाते.त्यावर विविध भेटवस्तू बांधल्या जातात. लहान मुले या भेटवस्तू अतिशय आवडीने पाहत असतात. त्यांना त्या भेटवस्तू घेण्याचा मोह आवरत नाही. अलीकडे तर ख्रिस्ती बांधवच नव्हे तर विविध गृहनिर्माण संस्था, मंडळे नाताळाच्या दिवशी ख्रिसमस ट्री सजवतात आणि नाताळाचा सण अतिशय धुमधडाक्यात साजरा करतात. 

 

ख्रिसमस शुभेच्छा| chirstmas best wishesh 

ख्रिसमसच्या दिवशी ख्रिस्ती बांधव एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतात. या शुभेच्छा देत असताना येशू ख्रिस्ताने दिलेला संदेश आणि उपदेश लक्षात ठेवून पुढील वर्षांमध्ये आपण प्रयाण करायचे आहे. अशा अर्थाचे  ख्रिसमस शुभेच्छा संदेश असतात.

अशा पद्धतीने लेखातून ख्रिसमस नाताळ सणाची मराठी माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. या माहितीच्या मदतीने आपण माझा आवडता सण नाताळ, किंवा नाताळ मराठी निबंध अतिशय छानपणे लिहू शकता.

Leave a Comment