Pगुढीपाडवा सणाची माहिती मराठी 2023| Gudhipadvaa sanachi mahiti marathi 2023

गुढीपाडवा सणाची माहिती मराठी 2023| Gudhipadvaa sanachi mahiti marathi 2023 

कोणत्याही जाती धर्मात सण उत्सव यांना प्रचंड महत्व दिले गेले आहे.सण उत्सवामुळे लोक एकत्र येतात.आपल्या संस्कृतीचे जतन करतात.असाच एक भारतीय सण म्हणजे गुढीपाडवा की जो चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. आजच्या लेखामध्ये आपण गुढीपाडवा सणाची माहिती मराठी 2023 पाहणार आहोत ही माहिती पाहिल्यानंतर आपल्याला गुढीपाडवा सणाचे महत्व नक्कीच समजेल. हे पाहण्या अगोदर मानवी जीवनामध्ये सणांचे महत्त्व समजून घेऊया तदनंतर गुढीपाडवा सणाची माहिती पाहूया.

मानवी जीवनात गुढीपाडवा सणाचे महत्त्व | manavi jivnat Sananche Mhatav 

  प्रत्येक जाती धर्मात वेगवेगळे सण ,उत्सव साजरे केले जातात.हे सण उत्सव एक वेगळाच आनंद नि मनाला उभारी देऊन जातात. घरातील वातावरण प्रसन्न करतात. घरातील सर्व मंडळी हेवेदावे विसरून सण साजरा करतात. थोडक्यात सण, उत्सव आपल्या दैनंदिन जीवनात एक वेगळी चेतना आणण्याचे काम करतात. आपण 1 जानेवारी इंग्रजी नव वर्ष  दिन मोठ्या धूम धडाक्यात  साजरा करतो पण हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच हिंदू नववर्ष की ज्या सणाची माहिती आज जाणून घेणार आहोत तो सण म्हणजे गुढीपाडवा.
गुढीपाडवा सणाची माहिती मराठी 2023

 

 
गुढीपाडवा सणाची मराठी  माहिती(toc)

गुढीपाडवा सणाविषयी माहिती कथा | gudhi padava San sajara ka karto yamagil katha

  १. सृष्टी निर्मिती दिन | Srusti Nirmiti Din 

पाडवा हा सण नेमका का साजरा केला जातो याविषयी एक अख्यायिका सांगितली जाते की,या ज्यावेळी या सृष्टीवर एकही जीव नव्हता  त्यावेळी  ब्रह्मा , विष्णु व महेश हे तीन जीव प्रथम भूमीवर अवतरले. हे एकमेकांशी चर्चा करू लागले. आपण या भुतालावर नवीन जीवसृष्टी तयार करायचे आहे या चर्चेत तिघांनी  कामांची विभागणी केली त्यानुसार की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करावी. विष्णू देवाने सर्वांचे पालन पोषण करावे तर महेश म्हणजे शंकर देवाने संहार करण्याचे ठरले . या कथेनुसार ज्या दिवशी ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली  तो दिवस म्हणजे हा गुढीपाडव्याचा दिवस होय. म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. थोडक्यात ब्रह्मा विष्णू महेश यांनी सृष्टी निर्मितीला ज्या दिवशी सुरुवात केली तो दिवस होता तो म्हणजे गुढीपाडवा.

२. प्रभू रामांचे वनवसातून आयोध्येत आगमन | Ramanche Aayodhet Agamn 

 मर्यादा पुरुषोत्तम एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून प्रभू श्रीराम यांना संपूर्ण भारतभर मान्यता आहे अशा प्रभू राम यांना एक बानी एक वचनी एक पत्नी अशी कितीतरी विशेषण लावले जातात. अशा प्रभू श्री राम यांना माता काही काही यांनी मागितलेली आहे का वरानुसार 14 वर्षे वनवासाला जावे लागले. 14 वर्षांचा खडतर वनवास पूर्ण करून प्रभु श्रीराम वनवासातून आयोध्या नगरीमध्ये पुन्हा आले त्या आगमनाचा दिवस म्हणून लोकांनी आपल्या घरावरती गुढ्या उभारल्या आणि त्या दिवसापासून तो दिवस हिंदू धर्मामध्ये किंवा अखिल भारत वर्षामध्ये पुन्हा एकदा नव्याने सुरुवात म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जाऊ लागला. प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव आपण रामनवमी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो.

३. शंकर पार्वती विवाह बोलणी | Shankar Parvti Lgnachi Bolni 

 एका कथेनुसार  याच पवित्र दिनी शंकर व पार्वती यांच्या विवाहाची बोलणी झाली व सगळीकडे आंनदी आनंद असे वातावरण निर्माण झाले. म्हणून शिव पार्वती भक्त या दिवसाला खूप पवित्र मानतात.शिव आणि शक्ति यांच्यापुढे नतमस्तक होण्याचा हा दिवस होय. थोडक्यात सांगायचे म्हटले तर राम भक्त शिवभक्त अशा सर्वांसाठी एक आनंदाचा दिवस म्हणून गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो हे नक्की.

४. इंद्र देवाकडून उपरिचर राजास भेट | Uprichar Rajas Indrakdun Bhet 

    उपरिचर हा एक पराक्रमी राजा होता . या राजाला अनेकदा इंद्र देवाने मदत केली . एके दिवशी इंद्र देवाने एक बांबूची काठी उपरिचरास भेट दिली. ती काठी एकडे तिकडे न ठेवता इंद्र देवाचा आदर म्हणून उपरिचराने ती काठी एका पाठावर उभी करून तिला एक शेला बांधला. आज देखील काही लोक उपरणे किंवा केशरी शेला  गुढीला बांधतात या मागील इतिहास हा आहे. मैत्रीचे प्रतीक म्हणून गुढीपाडवा सणाकडे आपल्याला या इंद्रदेव आणि उपरिचर राजाच्या भेटीवरून मैत्रीचे गुणगौरव करण्याचा दिवस म्हणजे देखील गुढीपाडवा.

५.शालिवाहन राजाने शकांचा पराभव | Shkanacha Parabhav Din 

    शालिवाहन राजाने सामान्य लोकांवर अन्याय करणाऱ्या शकांचा पराभव याच दिवशी केला तो दिवस म्हणजे गुढीपाडवा . या दिवसंपासून शालिवाहन राजाने आपल्या नावाने कालगणना सुरू केली ती म्हणजे शालिवाहन शक होय. एप्रिल २०२२ मध्ये शालिवाहन शके १९४३ संपून १९४४ शालिवाहन शक सुरू झाले. थोडक्यात इंग्रजी कॅलेंडर व मराठी कॅलेंडर यात ७८ वर्षांचे अंतर आपल्याला पाह्यला मिळते. भारतीय पंचांग,जोतिष शास्त्र शालिवाहन शकानुसार मुहूर्त ,तिथी पाहत असतात. आजही कोणताही समारंभ ,मुंज विवाह यासाठी काही मंडळी हे पाहताना  दिसतात.थोडक्यात हिंदू धर्मात शालिवाहन शकाला विशेष महत्त्व आहे. 

गुढीपाडवा सणातून शिकवण | gudhi padava sanatun shikavan bodh 

 आपण पहिले की गुढीपाडवा हाच तो दिवस ज्या दिवशी या विश्वाची निर्मिती झाली आणि आपण भाग्यवान की आपल्याला नरदेह म्हणजे मानवाचा देह मिळाला.म्हणून त्या ईश्वराचे मनोमन आभार मानण्याचा हा दिवस. प्रभू राम वनवसातून परत आले याचा अर्थ मानवी जीवनात सुख आहे त्या जोडीला दुख देखील आहे याचा स्वीकार करणे, असत्यावर सत्याचा विजय. रावण आज नाही पण आपल्यातील वाईट प्रवृत्तीना तिलांजलि देण्याचा हा दिवस  म्हणजे गुढीपाडवा. एका मित्राने दिलेली काठी तिला शेला बांधून आदर  झाला तो हा दिवस. मग आपल्याला जे मित्र भेटले त्याना केवळ शुभेच्छा न देता प्रत्यक्ष भेटून किंवा विचारपूस करून त्याने आपल्यावर केलेल्या ऋणातून मुक्त होण्याचा दिवस. 
 
 अशी या सणांची माहिती जमवून त्याचे महत्त्व  जाणून आजची जी नवीन पिढी केवळ मोबाईल नि कार्टून मध्ये अडकळत चालली आहे तिला ही आपली महान संस्कृती समजवली पाहिजे. व आपण देखील समजावून घेतली पाहिजे. 

गुढीची उभारणी कशी करावी | Gudhichi Ubharni kashi karavi 

  गुढीपाडवा सणाच्या दिवशी सकाळी दिवस उगवण्याच्या सुमारास  एक बांबूची किंवा वेताची काठी धुवून घेतात.त्या काठीला कोण नवी साडी ,शेला किंवा घरातील नवीन कपडा,एक छोटासा फुलांचा हार व एक कडूनिंबाची डहाळी व साखरेची घाटी बांधतात व एक तांब्याचा तांब्या किंवा स्टील ग्लास त्या काठीवर पालथा ठेवतात . ती काठी पाठावर उभी करतात किंवा कशाच्या आधाराने बांधून  ठेवतात. तिच्या बाजूला छान छान रांगोळी काढली जाते . 
 
गुढीसाठी प्रसाद |gudhisathi prasad 
 गुढीची पूजा करून कडूनिंबाची पाने व गूळ यांचे एकत्रित मिश्रण केले जाते व हा प्रसाद म्हणून वाटला जातो. घरातील सगळी मंडळी नवी वस्त्रे परिधान करतात. 

गुढी ,नैवेद्य यातील अध्यात्म व आयुर्वेद | Gudhi Aani  Aayurved 

  गुढीला जो गूळ व लिंबाच्या पानांच्या मिश्रणाचा प्रसाद केला जातो तो हेच सांगतो जीवनात सगळे दिवस सारखे नसतात. काही दिवस कडू म्हणजे वाईटही असू शकतात तर कधी गुळाप्रमाणे गोंड देखील असू शकतात. तर आयुर्वेद सांगते हे मिश्रण खाल्याने पित्त,पोटातील व्याधी व त्वचा विकार कमी होतात.म्हणून यांचे सेवन करायला हवे. तर जीवनात कधी खचून न जाता आलेल्या समस्याना तोंड दिले पाहिजे अशी शिकवण अध्यात्म शास्त्र अगदी वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा पाडव्याच्या सणाला देते . मला वाटते वाचकांना  या दिवसाचे महत्त्व नक्कीच पटले असेल. देखील गुढीपाडवा सणाचे विशेष असे महत्त्व आहे ते म्हणजे या दिवशी होणारी मोठी खरेदी.

गुढीपाडवा सणाला नवीन वस्तूंची खरेदी का केली जाते | Gudhipadhva Navin Vastunchi Kharedi 

 हा दिवस साडे तीन मुहूर्ता पैकी एक असल्याने अनेक लोक सोन्याचे दागिने, अलंकार,नाणी तसेच काही लोक टीव्ही ,फ्रीज यासरख्या वस्तु आवर्जून खरेदी करतात.खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार या दिवशी होतात. असे म्हटले तरी चालेल. 

गुढीपाडव्याची शोभायात्रा | Shobhaayatraa Aani Gudhipadva 

आपली हिंदू संस्कृती व  तिची महानता,गौरव करण्याचा हा दिवस. म्हणून अनेक मंडळे ,सेवाभावी संस्था,राजकीय नेते मंडळी हे  शोभायत्रा काढतात.शोभायात्रा  म्हणजे काय तर या  दिवशी अनेक लोक लहान, मुले  विविध देखावे बनवतात ,काही वेगवेगळी वस्त्रे परिधान करून आपले देव देवता,महान व्यक्ती ज्या  या भारत भूमीत जन्माला आल्या  त्यांची रुपे साकारत असतात. जसे राम ,लक्ष्मण  ,शिवाजी महाराज ,आई जिजाऊ असे ज्यातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले जाते. या शोभयात्रेत ढोल,ताशा यांचा कडकडाट असतो. आपण या शोभा यात्रेत सहभागी व्हायला हवे.  शक्य नसल्यास आपल्या मुलांना मुलींना हे पाहण्यासाठी जरूर न्यायला हवे. 

गुढीपाडवा आणि पुरणपोळी | gudhi padava ani puran poli 

   गुढीपाडवा सणाची माहिती सांगताना अजून आवर्जून सांगावेसे वाटते ते म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून घरोघरी गृहिणी मेहनत घेऊन पुरणपोळीचे जेवण बनवतात. गावाकडे तर आवर्जून एकमेकाना एकमेकांच्या घरी जेवायला  बोलावतात. थोडक्यात आनंदी आनंद म्हणजे हा पाडवा. अनेक संत भक्ति मार्गाचे महत्व पटवून देताना गुढीचे दाखले देतात. असा हा सण.  हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा . जाता जाता एवढे म्हणेन
 
चला गुढी उभारू कर्तव्याची  
 
चला गुढी उभारू सत्कर्माची
 
   या पवित्र दिनी एकच  आवाहन  करेन आरोग्य हीच धनसंपदा.  आपल्या खाण्यापिण्याच्या वाईट सवयी सोडा … उत्तम आरोग्याचा संकल्प करा.
         चला तर यावर्षी आरोग्य,अध्यात्म,आयुर्वेद,आर्थिक साक्षरता यांचे दर्शन घडवणाऱ्या या वर्षाचे हसत हसत स्वागत करूया . आमचा आजचा गुढीपाडवा सणाची माहिती मराठी 2023 हा आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.
 
 
आमचे हे लेख वाचा 
 
 
 
      

Leave a Comment