A जागतिक साक्षरता दिन कविता मराठी | jagtik sakshrta din kavita marathi

8 सप्टेंबर हा दिवस युनेस्कोने जाहीर केल्यानुसार जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. या जागतिक साक्षरता दिनाच्या निमित्ताने आज आपण जागतिक साक्षरता दिन कविता मराठी पाहणार आहोत. या साक्षरता दिन कवितेतून साक्षरतेचे महत्व शब्दांमधून चित्रित झालेला आहे. आमची ही जागतिक साक्षरता दिन कविता समाजातील अजूनही जे शिक्षणापासून वंचित लोक आहेत त्यांना शिक्षणाचे महत्व कळावे यासाठी त्यांच्या प्रति अर्पण करीत आहोत.

जागतिक साक्षरता दिन कविता मराठी
जागतिक साक्षरता दिन कविता मराठी

जो न देखे रवी। 

वह देखे कवी।

 

अगदी याच पद्धतीने आज संगणकाच्या युगामध्ये आज अजून देखील अनेक व्यक्ती निरक्षर असल्याचा दिसते, म्हणूनच साक्षरता दिनाचे महत्त्व सांगणारे स्वरचित कविता जागतिक साक्षरता दिन मी आपणापुढे सादर करीत आहे चला तर मग साक्षरतेचे महत्व पटवून देणारी कविता पाहूया.

 

कविता – जागतिक साक्षरता दिन 

 

हो तू साक्षर,करूनी घे अक्षराशी मैत्री,

उद्या असतील- नसतील सखेसोबती,

पण हात सोडणार नाहीत,

ही  ज्ञानाची अशी गंगोत्री.

 

धन,संपत्ती  क्षणिक सुख देती,

ज्ञानाची दोन अक्षरे गिरव पाटीवरती,

वाढेल विवेक,सदाचार आणि होईल बुध्दी मोठी

शिकव थोड लेकीलाही,

नको करूस दुजाभाव.

 

कुलदीपक शिकेल स्वत:पुरता,

ज्ञानाची प्रभा पसरेल पूर्ण घरात,

जर शिकली फक्त लेक एक,

जोती बापानं अन् सावित्री  मायनं.

 

पेरिल  बीज शिक्षणाचं,

सोसलं घाव रक्त सांडेपर्यंत,

नाही घेतली माघार कुणापुढं,

केलं बाया – बापड्यांना जागरुक व्रत शिक्षणाचं, समतेचं.

 

नको समजू ही गोष्ट छोटी,

दाखिव शिकवुनी सचोटी,

चालवू साक्षरतेची मोहीम,

देऊ प्रत्येकास ज्ञानरूपी वसा. 

 

सरस्वती – शारदेला हेच खरे वंदन,

शिकवूनी कर व्यक्तिमत्त्व चंदनासम,

देशहित साध्य करू साक्षरतेतून, 

जाणुनी फुले – सावित्रीचे व्रत.

 

घेऊ ध्यास  निरंतर,

निरक्षरास करू जागरूक शिक्षणाने,

देऊ त्याला अमृत ज्ञानाचे,

देऊ हाती कागद लेखणी.

 

नको अंगठ्याची निशाणी,

वाढवू भारतभूमीचा सन्मान,

नको भेद नर – नारीचा, 

चला करू साक्षरतेची तयारी.

दरवळू दे ज्ञानाचा सुगंध सर्वत्र,

 

कोणीही नको आता अज्ञानी गलितगात्र,

होऊ दे तुझ्या स्पर्शाने,

 लोखंडरूपी अज्ञान सोन्यासारखे,

असा कर परीसस्पर्श.

 

 

साक्षरतेचे महत्व सांगणारी आमची कविता

 आपल्याला नक्कीच आवडेल आमची ही साक्षरता दिन कविता मराठी आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट करा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!

Leave a Comment