A जागतिक साक्षरता दिन मराठी माहिती निबंध | jagtik sakshrta din marathi mahiti nibandh

आजच्या लेखात आपण जागतिक साक्षरता दिन मराठी माहिती व निबंध पाहणार आहोत.

जगातील अज्ञान नाहिशे व्हावे सर्व लोक साक्षर व्हावेत यासाठी 8 सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिन किंवा दिवस म्हणून साजरा केला जातो.जागतिक साक्षरता माहिती पाहण्या अगोदर साक्षर म्हणजे काय? ते पाहूया.

जागतिक साक्षरता दिन मराठी  माहिती निबंध
जागतिक साक्षरता दिन मराठी  माहिती निबंध

साक्षर म्हणजे काय? | sakshar mhanje kay

साक्षर म्हणजे ‘ स + अक्षर ‘. म्हणजेच किमान अक्षराची ओळख असणे.होय.

साक्षरतेचे महत्व | sakshrteche mhatv

‘ साक्षरता ‘ ही आजच्या काळाची गरज आहे.कारण प्रत्येक व्यक्ती ही देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे.अर्थशास्त्राचेही जर आपण किमान  मूलभूत किंवा आवश्यक घटक पाहिले तर असे लक्ष्यात येते की कुशल मनुष्यबळ असणे,हे प्रत्येक राष्ट्राच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलते.त्यामुळे  अविकसित आणि विकसनशील राष्ट्रासाठी साक्षरतेचे महत्त्व जास्त आहे.

साक्षरता दिनाची सुरुवात संकल्पना |sakshrta din sanklpna

 साक्षरतेची जनजागृती करण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी (UNESCO) युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पुढाकारातून ‘ ८ सप्टेंबर ‘ हा दिवस  ‘ जागतिक साक्षरता दिवस’ ( International Literacy Day) म्हणून साजरा केला जातो.थोडक्यात युनेस्को ने साक्षरता दिनाची संकल्पना जगासमोर मांडली.

भारतातील साक्षरता | bhartatil sakshrta

आपल्या भारत देशाने नुकताच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला,परंतु आजही आपल्या देशात साक्षरतेची स्थिती समाधानकारक  नाही.

आपण जर या असाक्षरतेचे प्रमाण काढले तर असे दिसेल की आपल्या देशात असाक्षरता तरुणांमध्ये दिसते.प्रत्येक ५ तरुणामागे १ युवक असाक्षर दिसतो.महिलांची स्थिती तर अधिक गंभीर आहे.आधीच स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात दुय्यम स्थान दिले जाते.त्यातच  एका महिलेला साक्षर करणे हे  आर्थिक – सामाजिक दृष्ट्या आजही खूपच जिकिरीचे दिसते. एका महिलेला साधी अक्षरओळखही दिसत नाही.दोन तृतीयांश महिला या निरक्षर आहेत.ही खरच चिंतेची बाब आहे.कारण प्रत्येक देशाच्या लोकसंख्येत जवळपास निम्मा भाग हा स्त्रिया  किंवा महिला (woman) नी व्यापलेला आहे.त्यामुळे एक स्त्री साक्षर असणे ही खरच अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.

भारतात साक्षरता /शिक्षणासाठी प्रयत्न | bharatat sakshrta shikshnasathi prayatn

भारतात महात्मा फुले आणि त्यांची सुविद्य पत्नी सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणाचे बीज रोवले.किती खडतर परिस्थितीत त्यांनी बहुजन समाज आणि स्त्रिया यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले,हे आता अवघे विश्व जाणते.फुल्यांचे समकालीन डॉ.विश्राम रामजी घोले यांच्या लहान मुलीला शिकते म्हणून काचांचा चुरा असलेला लाडू खायला दिला. त्यातच त्या चिमुरडीचा मृत्यू झाला.स्त्री शिक्षणाची ही  पहिली बळी ठरली. ही घटना पुण्यासारख्या प्रगत राज्यात तेव्हा घडली.मग बाकी राज्यातील परिस्थिती कशी भयानक असू शकते याची कल्पना येते.आपल्या भारत देशात स्त्री शिक्षणासाठी अनेक थोर व्यक्तींनी आयुष्य पणाला लावलेले दिसते.त्यात राजाराम मोहन रॉय,महात्मा  फुले,सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे,पंडिता रमाबाई,गोपाळ आगरकर,रमाबाई रानडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या ठळक विभूती आपल्या डोळ्यांसमोर येतात.या व्यक्तींनी जे दिव्य केले,त्यामुळेच आज भारतात  शिक्षणाची स्थिती थोडीफार सुधारलेली दिसते,अन्यथा इतर मागास राष्ट्रांसारखीच आपलीही स्थिती असती.महात्मा फुल्यांनी शिक्षणाचे महत्त्व अतिशय मार्मिक शब्दांत वर्णन केले आहे.

साक्षरतेचे महत्व कविता | sakshrta mhatav kavita

 

” विद्येविना मती गेली,

मतिविना नीती गेली,

नीतिविना गती गेली,

गतिविना वित्त गेले,

वित्ताविना शूद्र खचले,

इतके अनर्थ एका अविद्येने केले.”

 

शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे,असे म्हटले जाते. कारण शिक्षणाशिवाय तरणोपाय कोणालाही नाही,हे सिद्ध झाले आहे.व्यक्ती शिकली,की तिला वाचता येते,चांगल्या – वाईटाची तिला जाण येते, स्वत: चे हक्क – जबाबदाऱ्या तिला समजतात.एक सुजाण व्यक्तिमत्त्व घडते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून बहुजन समाजाला ” शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ” असा मोलाचा संदेश दिला.त्यामुळे समाजात आमूलाग्र क्रांती झाली.संपूर्ण समाज घुसळून निघाला.प्रत्येक वर्गाला मुख्यत: बहुजन वर्गाला आपल्यावरील अन्याय,शोषण,गुलामगिरी इ.ची जाणीव झाली.’ या संपूर्ण समाज व्यवस्थेत माझे स्थान काय? ‘ या प्रश्नाचे उत्तर त्याला फक्त शिक्षणाने मिळाले.त्यामुळे हा पिढ्यानपिढ्या मागासलेला समाज जागृत झाला, वर्षानुवर्षे अंधारात खितपत पडलेल्या समाजाला जाग आली.मग तो शिकून – सवरून मोठा झाला.आपले समाजातील स्थान त्याने स्व – बुद्धीने, बळाने उंचावले. स्वत: चा सर्व प्रकारचा विकास त्याने करून घेतला.पर्यायाने भारतीय समाजानेही कात टाकली.देश प्रगती,आधुनिकता,समृद्धी यांकडे वाटचाल करू लागला.हे केवळ शिक्षणाच्या माध्यमातूनच शक्य होऊ शकले.

आज साक्षर असणे म्हणजे केवळ  अक्षरओळख असणे किंवा स्वत: ची सही करता येणे असे नव्हे.एवढा संकुचित अर्थ साक्षरता या संकल्पनेत मान्य नाही.तर  व्यक्तीने किमान माध्यमिक शाळेपर्यंत शिक्षण घेणे अपेक्षित आहे.भाषा,गणित,भूगोल,इतिहास,नागरिकशास्त्र, यांसारख्या मूलभूत विषयांचे ज्ञान तिला असणे आवश्यक आहे.आजकाल तर या ज्ञानात व्यक्तीला माहिती – तंत्रज्ञानाचीही ओळख असावी असे अपेक्षित आहे.शिक्षणातून व्यक्तीला तर्कशुद्ध ज्ञान मिळणेही अंतर्भूत आहे.शिक्षणाने व्यक्तीचा विकास होतो.म्हणजे ती रोजगार मिळवू शकते.तिचे आरोग्य,समाजातील तिचे स्थान ,राहणीमान उंचावते.पर्यायाने ती देश विकासास हातभार लावते.सुजाण नागरिक हे फक्त देश किंवा राष्ट्र यांच्यापुरतेच मर्यादित नसतात,तर ते अखंड विश्वासाठी हितावह असतात.” वसुधैव कुटुंबकम्|” या संकल्पनेच्या मुळाशी शिक्षणच आहे.

आपल्या भारत देशाच्या संविधानात देखील शिक्षणाला अतिशय महत्त्व दिले आहे.नव्हे,तर शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क ( fundamental right ) मानला गेलेला आहे.

साक्षरतेबाबत कायदेशीर तरतूद | sakshrta kaydeshir tartud 

भारतीय संविधानाच्या कलम २१ अ – अंतर्गत सहा ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

शिक्षणाचा अधिकार किंवा Right to Education हा कायदा २०१० मध्ये भारतामध्ये लागू करण्यात आला,त्याने असा शिक्षणाचा हक्क मान्य करण्याच्या  १३५ देशांच्या यादीत  भारताचे नावही समाविष्ट झाले.

भारताप्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही मानवाधिकार आयोगाने शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

पहिले आणि दुसरे जागतिक महायुद्ध यांची झळ खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण जगाला बसली होती.त्यामुळे जे आर्थिक,सामाजिक किंवा इतर तफावतींमुळे जग पुन्हा अशा कोणत्याच प्रकारच्या तणावाखाली ओढले जाऊ नये.म्हणून ‘ जागतिक साक्षरता दिन ‘ असे उपक्रम राबवून युनेस्को सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था – संघटना ही जागतिक शांतता आणि सुव्यवस्था टिकविण्याचा प्रयत्न करत असतात.

 

जगातील साक्षरता आकडेवारी  | jagatil sakshrta akdevari 

अमेरिका ,युरोप यांसारखी पश्चिमेकडील राष्ट्रे साक्षरतेच्या बाबतीत आघाडीवर दिसतात.तिथे जवळपास १००% साक्षरता आहे.आशिया खंडात ६० -७०% तर आफ्रिका खंडात केवळ २० – २५% .ही तफावत दूर करण्यासाठी असे दिन साजरे केले जातात.

आपणही या दिनाच्या निमित्ताने एका निरक्षराला साक्षर करून खारीचा वाटा उचलूया..

अशा पद्धतीने जागतिक साक्षरता दिन मराठी माहिती व निबंध आपण छान पणे लिहू शकता आमचा आजचा हा विषय जागतिक साक्षरता दिन मराठी माहिती व निबंध आपणास कसा वाटला हे नक्की कमेंट करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!

Leave a Comment