A टोमॅटो फ्लूची लक्षणे आणि उपाय | tometo flu lakshane ani upay

आजच्या लेखांमधून आपण कोरोना त्या पाठोपाठ आलेला मंकीपॉक्स आणि आता ओडिशा, केरळ राज्यात हात पाय पसरू पाहत असलेला टोमॅटो फ्लू या विषयी माहिती पाहणार आहोत व टोमॅटो फ्लू (ताप)ची लक्षणे आणि त्यापासून काळजी कशी घ्यावी हे पाहणार आहोत.

टोमॅटो फ्लूची लक्षणे आणि उपाय
टोमॅटो फ्लूची लक्षणे आणि उपाय

टोमॅटो फ्लू (ताप)कोणाला धोका | tometo flu konala dhoka

टोमॅटो फ्लू हा ताप साधारणपणे पाच वर्षाखालील मुलांना होतो.या तापाला टोमॅटो फ्लो असे नाव का देण्यात आले? तर या तापामध्ये अंगावरती मोठमोठे पुरळ येतात .ते खूप मोठे होतात,म्हणून याला टोमॅटो फ्लो असे नाव देण्यात आलेले आहे. या आजाराचा धोका मोठ्या व्यक्तींसाठी कमी आहे परंतु पाच वर्षापेक्षा तज्यांचे  वय कमी आहे, त्यांना मात्र याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ शकतो  म्हणून लहान मुलांची काळजी घेणे हा सर्वात मोठा प्रतिबंधात्मक उपाय आहे. कारण या टोमॅटो फ्लू मुळे प्रचंड थकवा जाणवतो असे डॉक्टर सांगत आहेत.

टोमॅटो फ्लूची/ तापाची लक्षणे| tometo flu lakshne

1.यामध्ये प्रामुख्याने व्यक्तीला अंगात ताप भरून येतो.

2. शरीरामध्ये प्रचंड थकवा जाणवतो.

3. ताप आल्यानंतर अंगावरती छोटे छोटे पुरळ यायला सुरुवात होते ,आणि पुरळ लालसर आकाराचे असतात आणि ते थोडे वाढत जातात म्हणून याला टोमॅटो असे म्हटले आहे.

4. काही रुग्णांच्या बाबतीमध्ये अंगाला थोडेफार सूज येणे असे देखील लक्षण दिसत आहे.

5. ज्यांना टोमॅटो फ्लूची बाधा झाली आहे त्या मुलांच्या अंगाला खाज सुटल्यासारखे होते.

6. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा संसर्गजन्य आजार आहे,तो एकाला झाल्यानंतर त्याच्या संपर्कात येणाऱ्या इतर मुलांना देखील होऊ शकतो म्हणूनच याविषयी थोडी भीती वाढली आहे.

टोमॅटो फ्लू कोणाला होतोय | tometo flu konala hotoy

टोमॅटो फ्लू 5 वर्षा खालील मुलाना होत असल्यामुळे पालक वर्ग चिंतीत आहे, पण घाबरून जाऊ नये साधे सरळ उपाय करा ज्यातून रुग्णाला बरे वाटेल,

टोमॅटो फ्लू वर उपाययोजना/दक्षता  |tometo flu upaay  kinva dakshtaa

टोमॅटो फ्लू झाल्यानंतर घाबरून जाऊ नका, तर खालील काळजी घ्या तसा तो इतका भयावह नाही हे नक्की.

1.बाळाला पाणी प्यायला द्या,कारण ताप असल्याने तहान जास्त लागत असते.

2.ताप आणि अंगावर पुरळ असल्यास तात्काळ डॉक्टरांना भेटा.अंगावर दुखणे काढू नका.

3.अंगावर आलेल्या फोड्यामुळे संसर्ग सर्व शरीरावर वाढू शकतो म्हणून स्वछता ठेवा.

4.हात स्वच्छ ठेवा,संपूर्ण शरीरभर हात लावू नका.

5.नखाने फोड्या फोडू नका नाहीतर इन्फेकॅशन वाढू शकते.

6.जास्तीत जास्त विश्रांती घ्या.

7.अंगात ताप असल्याने बाहेर जाणे टाळा.

8.शरीराला खाज म्हणजे कंड सुटणार नाही याची काळजी घ्या.

अशा पद्धतीने आपण जर काळजी घेतली तर आपल्याला टोमॅटो फलूत लहान मुलांना  बऱ्यापैकी आराम मिळू शकतो. हा आजार संसर्गजन्य आहे मात्र जीवघेणा नाही म्हणून घाबरून जाऊ नये.

आरोग्य सदरातील आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा. घाबरू नका मुलांची योग्य ती काळजी घ्या. आपल्याला सजग करणे ही आमची जबाबदारी आहे.ही माहिती इतरांना देखील पाठवा.

Leave a Comment