A तू झालास मूक समाजाचा नायक कवितेवरील कृती |tu zalas muk samajacha nayak kavitevaril kruti

या लेखात आपण इयत्ता दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेवरील कृती म्हणजेच यावर विचारले जाणारे मुद्दे यांचा अभ्यास करणार आहोत.

तू झालास मूक समाजाचा नायक कवितेवरील कृती
तू झालास मूक समाजाचा नायक कवितेवरील कृती

आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये कवितेवरील कृतींसाठी चार गुणांचे प्रश्न विचारले जातात यामध्ये एखाद्या कवितेचे नाव दिले जाते व त्या कवितेचा कवी, कवितेचा विषय कवितेतून मिळालेला संदेश कवितेतून मिळालेली शिकवण कवितेची भाषा कविता आवडली की नाही याबाबत प्रश्न विचारले जातात आणि याची चर्चा या लेखांमध्ये आपण करणार आहोत आणि यासाठी आज आपण तू झालास मूक समाजाचा नायक ही कविता घेतलेली आहे.

तू झालास मुक समाजाचा नायक कृती

 

१) तू झालास मूक समाजाचा नायक प्रस्तुत कवितेचे कवी – 

ज. वि.
पवार

 

२)तू झालास मूक समाजाचा नायक कवितेचा रचनाप्रकार – 

मुक्तछंद
/ गौरवगीत

 

३ तू झालास मूक समाजाचा नायक कवितेचा काव्यसंग्रह – 

नाकेबंदी

 

४) तू झालास मूक समाजाचा नायककवितेचा विषय – 

नायकाच्या कार्याचा
गौरव.

 

५) तू झालास मूक समाजाचा नायक कवितेतून व्यक्त होणारा भाव (स्थायीभाव)

 उत्साह, क्रोध, चीड, कर्तूत्व, आनंद, (वीररस)

 

६) तू झालास मूक समाजाचा नायक कवितेच्या कवीची लेखन वैशिष्टये –

 मुक्तछंद लेखन तरीही अंतर्गत लयबध्दता, प्रतिमांच्या माध्यमातून विचार पटवून देयाची
शैली अलंकारिक भाषेचा प्रत्ययकारी वापर.

 

७) तू झालास मूक समाजाचा नायक कवितेची मध्यर्वी कल्पना –

 डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळयाचा जो सत्याग्रह केला. त्या घटनेला ५०
वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांचा गौरव केला आहे. बाबासाहेब जणू सूर्य बनून
अज्ञान, दारिद्रय, अंधश्रध्देच्या काळोखात चाचपडणाऱ्या समाजात प्रकाश पसरवण्यासाठी
प्रयत्नशील होते. तेव्हा त्या समाजानेच त्यांच्याकडे पाठ फिरवली. हे वास्तव कवीने या
कवितेत मांडले आहे. शिवाय ५० वर्षनंतरची स्थिती काय आहे याचेही वर्णन येथे केले आहे.

 

८) तू झालास मूक समाजाचा नायक कवितेतून व्यक्त होणारा विचार
– 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढी, सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण
केली. पण जेव्हा ते रुढीच्या चिखलात खितपत पडलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी निघाले
तेंव्हा तो समाजही त्यांना योग्य प्रतिसाद देत नव्हता. तरीही अशा प्रतिकूल परिस्थितीवर
मात करुन बाबासाहेबांनी त्या समाजाला माणसूपणाचे हक्क मिळवून दिले त्यांच्या कार्याचा
गौरव या गौरवगीतातून केला आहे.

 

९) तू झालास मूक समाजाचा नायक कवितेतील आवडलेली ओळ – 

तू झालास
परिस्थितीवर स्वार
 आणि घडविलास नवा इतिहास

या काव्यपंक्ती फार आवडल्या. कारण
नायक आपल्या समाजाला अज्ञानाच्या अंध:कारातून बाहेर काढण्यासाठी निघाला तेव्हा तो समाज
त्यांच्याकडे पाठ फिरवून बसला होता. अन्याय करणारा वरिष्ठ समाज तोही अधिकच आक्रमक झाला
होता अशा प्रतिकूल परिथ्स्थतीवर स्वार होउुन नवा इतिहास घडविणे. म्हणजेच समाजाला बरोबर
घेऊन आपल्या जातीवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी सज्ज करणे हे कठीण कार्य नायकाने
केले. अगदी कमी शब्दांत खूप मोठे कार्य कवीने सांगितले आहे. म्हणून या ओळी आवडल्या.

 

१०) तू झालास मूक समाजाचा नायक कविता आवडण्याची वा न आवडण्याची
कारणे –

 प्रस्तुत कविता खूपच आवडली. कारण आपल्या समाजासाठी कार्य करणाऱ्या प्रतिकूल
परिस्थितीवर मात करुन समाजबांधवांमध्ये अन्यायाविरूध्द आवाज उठविण्यास सज्ज करणा-या
नायकाला कवितेतून विनम्र अभिवादन केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यासाठी
अनेक समर्पक दाखले, प्रतिमांचा चपखल वापर केला आहे.

 

११) तू झालास मूक समाजाचा नायक कवितेतून मिळणारा संदेश – 

प्रतिकूल
परिस्थितीत काम करताना थोर व्यक्तींना काय त्रास सहन करावा लागतो. तरीही ध्येयप्रेरित
माणसांनी आपलया कार्यापासून विचलित न होता कार्य करीत रहावे. विरोध झाला तरी हाती घेतलेले
कार्य अर्ध्यावर सोडू नये. त्यासाठी नायकाकडे संयम, जिदद, चिकाटी, अगाध ज्ञान, शब्दात
ताकद, असावी लागते. सुरुवातीला विरोधात असणारे आपोआपच महत्त्व पटून बरोबर येतात. हा
संदेश या कविततून मिळतो. 

अशा पद्धतीने तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेवरील कृती म्हणजेच प्रश्न त्यांची वरील मुद्द्यांच्या आधारे आपण तयारी केल्यास आपल्याला तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेवर कोणत्याही कृती किंवा रसग्रहणासारखा प्रश्न आला तरी आपण वरील माहितीच्या आधारे तो चांगल्या पद्धतीने लिहू शकता म्हणून विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या मुद्द्यांचा व्यवस्थित अभ्यास करून या कवितेची तयारी करावी.

आमचा हा तुझा लाच मुका समाजाचा नायक कवितेवरील कृती किंवा मुद्दे हा लेख आपणाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा

  

Leave a Comment