A दत्त जयंती मंत्र माहिती | datta jayanti mantra mahiti

दत्तजयंती सप्ताह सुरू आहे….. त्या निमित्ताने सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे.दत्त जयंतीला दत्ताची ध्यानधारणा केली जाते म्हणूनच आज आपण दत्त जयंती मंत्र माहिती पाहणार आहोत.

दत्त जयंती मंत्र माहिती

दत्त जयंती मंत्र माहिती

दत्त जयंती मंत्माहिती अर्थ | datta jayanti mantra mahiti | Datta jayanti mantra arath

दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा” या ध्यान मंत्राविषयी माहिती लिहिली आहे.दिगंबरा हा मंत्र प.पू.वासुदेवानंद सरस्वती यांना ब्रह्मांनद येथे शके १८२५ साली स्फुरलेला  १८अक्षरी मंत्र आहे. या मंत्राच्या रूपाने त्यांना अंतिम सत्याचा साक्षात्कार झाला. या मंत्रामध्ये एकाक्षरी गणेशमंत्र, गणेशबीज समाविष्ट आहे. काही प्रमाणात अग्नीबीजाचाही वापर केला आहे. या महामंत्राचे स्पष्टीकरण एका आरतीमध्ये प.पू.वासुदेवानंद सरस्वतींनी केले आहे.प. पू.श्रीदत्तमहाराज कवीश्वरांनी पुढील प्रमाणे सांगितला. या मंत्रात ” अहं ब्रह्मास्मि” मी ब्रह्म आहे आणि ते तूच आहेस हे सांगितले आहे. यातील पहिल्या दिगंबराचा अर्थ आहे वस्त्र नसलेला म्हणजेच उपाधि नसलेला. हे लक्षात आले म्हणजे आपल्या आतील शुद्ध अहं अर्थात आत्मा सर्वसाक्षी, निर्विकार, अनंत अनादि असून ब्रह्मच आहे. पहिल्या दिगंबरा या शब्दाने साक्षी स्वरूपाचे अनुसंधान आहे.

दिगंबर या शब्दाचा अर्थ म्हंजे. दिगंबराचा अर्थ आहे, दिशांनी वेढलेला. म्हणजे आकाशासारखा सर्वव्यापी त्रिकालाबाधित. विश्व निर्माण करण्याची शक्ती ब्रह्माजवळ आहे, पण शक्ती त्याच्या स्मरणात नाही. हे ईश्वरस्वरूप आहे तेव्हा सर्वव्यापी अशाप्रकारचे जे ब्रह्मस्वरूप आहे ते मी आहे. हे चिंतन दुसऱ्या दिगंबरात आहे. परमात्म्याचे सगुण साकार रूप म्हणजे श्रीपादवल्लभ ब्रह्म रूप धारण करून आपल्या भक्तांचे रक्षण करते.

श्रीपादवल्लभ हे या मंत्रातले तिसरे अक्षर आहे. त्यात श्रीपाद आणि वल्लभ असे दोन शब्द आहेत. “श्रीः पादेयस्य” ज्याच्या चरणाजवळ श्री आहे. लक्ष्मीयुक्त परमात्मा आणि शक्तीयुक्त परमात्म्याचे स्मरण श्रीपाद या शब्दाने होते. सर्वांना संकटातून मुक्त करून कल्याण करणारा असल्याने तो वल्लभ आहे. श्रीपाद वल्लभ या संबोधनात हेच सुचविले आहे.

ईश्वर स्वरूप, ब्रह्म स्वरूप, दत्त स्वरूप आणि गुरूस्वरूप ही सर्व एकच आहेत. त्याचे अनुसंधान दिगंबरा या चौथ्या अक्षराने येथे केले आहे. कामक्रोधांनी त्रस्त झालेल्या मला मुक्त करून आपल्याकडे न्या अशी आर्त प्रार्थना या दिगंबरात दडलेली आहे.

अशा या महामंत्राचा जप करणे ही श्रेष्ठ उपासना आहे. या मंत्रामुळे साधकाची देहशुध्दी आणि चित्तशुध्दी होते. शरीर तेजस्वी होते. साधक दिव्यानुभव ग्रहण करण्यास समर्थ होतो. म्हणून दत्त संप्रदायाचा हा मुख्य मंत्र आहे.

 

दत्त जयंती मंत्र | datta jayntil mantra 

दत्त जयंतीला किंवा एकंदरीतच दत्त भक्त दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मंत्र जप करत असतात.

 

दत्त मंत्र जपाचे फायदे | datta mantra japache fayde 

दत्त मंत्र दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा” याचे ध्यान किंवा जप केल्याने प्रचंड फायदे होतात. या मंत्राने आपले मन स्थिर होते. आपले आरोग्य सुंदर राहते 

या दत्त जयंतीपासून आपण हा दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा” मंत्र जपून मनशांती मिळवूया.दत्त मंत्र जप केल्यावर दत्ताची आरती बोली जाते.

आमचा हा लेख दत्त जयंती मंत्र माहिती किंवा दत्त मंत्राची माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा

 

Leave a Comment