नफा मिळवून देणारे शेअर्स 2022 | Nafa Milvun Denare Shears 2022

 आजच्या लेखामध्ये आपण आपण जर शेअर बाजारात नवीन असू आणि आपल्याला लॉन्ग टर्म किंवा दीर्घकाळ गुंतवणूक करून नफा मिळवायचा आहे तर कोणते शेअर्स किंवा स्टॉक घ्यावेत? किंवा नफा मिळवून देणारे शेअर्स कोणते? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा या लेखातून प्रयत्न केलेला आहे.

     आर्थिक साक्षरता एक काळाची गरज बनली आहे. व्यक्ती केवळ साक्षर असून उपयोग नाही. तंत्रज्ञानाचे ज्ञान असून देखील उपयोग नाही तर व्यक्तीने आर्थिकदृष्ट्या साक्षर असले पाहिजे.मागील अनेक लेखमाला मध्ये आपण पाहिलं की आर्थिक साक्षरता असणे म्हणजे केवळ पैशाने पैसा वाढवणे एवढेच अपेक्षित नाही तर आपल्या जवळ असणाऱ्या पैशाचे सुयोग्य नियोजन करणे, काटकसर करणे आणि यातून आर्थिक दृष्ट्या सक्षम बनणे या सर्व बाबी अपेक्षित आहेत.काटकसर करून आपण तोच पैसा शेअरबाजारात गुंतवला तर आपण करोडपती बनू शकतो आणि याच दिशेने आपली वाटचाल देखील सुरू झालेली आहे.अनेकांना प्रश्न पडतो की मला शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे? परंतु मला शेअर बाजारातील स्टॉक किंवा शेअर्स बद्दल तितकीशी माहिती नाही.तर मला नफा मिळवून देणारे शेअर्स कोणते ?थोडक्यात काय तर फंडामेंटली  स्ट्रॉंग असलेल्या शेरची माहिती मिळाली तर त्या कंपनीचे शेअर्स विकत घेऊन मी काही वर्षे गुंतवणूक करून नफा मिळू शकतो. तर आजच्या लेखात अशाच काही कंपन्यांची माहिती आपण पाहणार आहोत. ती माहिती पाहत असताना त्या कंपन्यांचा व्यवसाय कोणता आहे./buisnes model काय आहे. त्या क्षेत्रामध्ये त्या शेअर्स स्थान काय आहे? कालानुरूप त्यांच्या व्यवसायात बदल घडत आहेत का? अशाच शेअर्सची किंवा कंपन्यांची शिफारस येथे करण्यात आलेली आहे. आपल्याला केवळ शेअर्स कसे निवडावेत? या उद्देशाने हा लेख लिहिला आहे. याच कंपन्यांचे शेअर्स खरेदी करावेत असा दावा या लेखातून करण्यात आलेला नाही. कारण का तर हा शेअर बाजार पैशाच्या आधीन आहे. तुम्हाला आर्थिक साक्षर बनवणे हाच या ब्लॉगचा उद्देश आहे चला तर मग सुरवात करूया नफा मिळवून देणारे शेअर्स कोणते या विषयाला.

नफा मिळवून देणारे शेअर्स 2022
नफा मिळवून देणारे शेअर्स 2022

नफा मिळवून देणारे शेअर्स(toc) | Nafa Milvun Denare Shears

     कोणताही शेअर्स केवळ नफाच  मिळवून देईल असे आपण खात्रीशीरपणे सांगू शकत नाही.असे असले तरी काही शेअर्स असेअसतात की  ते त्या क्षेत्रातील डॉन असतात. म्हणजेच शेअर बाजारात कोणत्याही उलट-सुलट घटना घडो. त्याचा त्या शेअर्सवर तितकासा परिणाम होत नाही. साहजिकच आपण केलेली गुंतवणूक नफ्याची होऊ शकते झालाच तोटा तर तो अगदी अल्प असू शकतो.चला तर अशा काही शेअर्स किंवा स्टॉक ची माहिती पाहूया…….

1. रिलायन्स इंडस्ट्रीज | Relaince Industries

     रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी कंपनी आहे.या कंपनीने जवळजवळ पन्नास टक्के भागभांडवल सार्वजनिकरित्या शेअर मार्केटच्या माध्यमातून उभे केलेले आहे. रिलायन्स इंडस्ट्री मध्ये खनिज तेल, नैसर्गिक वायू, पेट्रोकेमिकल, कापड सोलार एनर्जी यासारखे व्यवसाय येतात. शेअर बाजारात जी व्यक्ती नवीन आहे  त्या व्यक्तीने ह्या लार्ज कॅप कंपनी मध्ये शेअर्स घ्यायला हरकत नाही. खनिज तेलाची मागणी भविष्यकाळात देखील वाढणारच आहे या साध्या तर्क क्षमतेवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीज चे असलेले मॅनेजमेंट आणि भारतातील सर्वात मोठी निर्यातदार कंपनी यावरून Relaince Industries चे महत्त्व आपल्या लक्षात येते. म्हणून नफ्याचे शेअर मार्केट करत असताना आपल्या पोर्टफोलिओ मध्ये किमान 15 टक्के रक्कम या शेअर्समध्ये गुंतवायला हरकत नाही.

2. एचडीएफसी बँक| Hdfc Bank Limited

     बँकिंग क्षेत्रामध्ये खाजगी बँकांमध्ये सर्वात मोठे भाग भांडवल असलेली बँक म्हणजे एचडीएफसी बँक. निफ्टी फिफ्टी मध्ये या बँकेचा समावेश आहे तसेच Hdfc Bank Limited ही  लार्ज कॅप कम्पनी असल्याने यामधील गुंतवणुक ही नफ्याची आहे. त्यामुळे आपल्या पोर्टफोलिओ  मध्ये किमान 10 टक्के रक्कमHdfc Bank Limited शेअर्स मध्ये गुंतवायचा हरकत नाही.

3. टाटा मोटर्स | Tata Motors

      भारतीय शेअर बाजारात अलीकडे टाटा पंच ,टाटा नेक्सन या गाड्यांच्या प्रचंड मागणी नंतर टाटा मोटर्स मोटर शेअर्स सध्या आघाडीवर जाताना दिसत आहे, म्हणूनच आपल्याला जर शेअर बाजारातून नफा मिळवायचा असेल तर किमान 5 टक्के रक्कम टाटा मोटर्समध्ये गुंतवायला हरकत नाही. Tata Motors ही देखील भाग भांडवलचा विचार करता एक लार्ज कॅप कंपनी आहे.

4. आयटी क्षेत्रातील काही शेअर्स |It Releted Stock

      सध्या जरी आयटी क्षेत्रामध्ये थोडीफार घसरण दिसत असली तरी, कोरोना काळामध्ये किंवा त्या अगोदर देखील या   क्षेत्रामधील शेअर्स ने खूप मोठी उसळी मारल्याचे आपल्याला दिसते .आपल्या  पोर्टफोलियो मध्ये आयटी कंपन्यांमध्ये अनेक कंपन्या आहेत त्यापैकी किमान एक तरी कंपनी आपल्या पोर्टफोलिओ मध्ये असावी.जसे ती इन्फोसिस विप्रो किंवा टीसीएस  यापैकी किमान एक तरी आपल्या पोर्टफोलिओ मध्ये असावा जेणेकरून आयटी क्षेत्रातील तेजीचा फायदा आपल्याला मिळू शकेल.Wipro, Infoysis, tcs या महत्वाच्या कंपन्या आहेत.

Related – What Is Money Mindset

5. बजाज फायनान्स | Bajaj Finance

    फायनान्स क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी म्हणजे Bajaj Financ होय. शिवाय निफ्टी फिफ्टी मध्ये देखील या कंपनीचा समावेश आहे.मागील आकडेवारी  पाहिली तर  Bajaj Finance कायम वरच्या दिशेने जाताना दिसत आहे.त्यामुळे आपल्याला जर नफा मिळवणारे  शेअर्स घ्यायचे असतील तर किमान 5 ते 6 टक्के रक्कम ही बजाज फायनान्स सारख्या कंपणीत गुंतवावी.शेअर्सची किंमत जरी जास्त असली तरी ही गुंतवणूक ही अतिशय खात्रीशीर आहे हे नक्की.

6. जेएसडब्ल्यू स्टील|Jsw Steel

   स्टील क्षेत्रामध्ये अनेक शेअर्स किंवा Stock आहेत.यापैकीच एक म्हणजे जेएसडब्ल्यू स्टील.Jsw Steel ही देखील एक लार्ज कॅप कंपनी असून अलीकडच्या काळात जरी या क्षेत्रात  दर कमी दिसत असले तरी स्टील क्षेत्राची मागणी विचारात घेता आपण आपल्या पोर्टफोलिओ मध्ये काही एक भारांश स्टील सेक्टरला दिला पाहिजे.

7. आय आर सी टी सी | IRCTC 

   आय आर सी टी सी हा एक रेल्वे क्षेत्रातील मोनोपोली शेअर्स आहे तसेच एक लार्ज कॅप कंपनी देखीलआहे. एवढेच नव्हे तर या क्षेत्रात IRCTCला  स्पर्धक नसल्याने या शेअर्स मधील गुंतवणूक ही फायद्याची राहू शकते.रेल्वे रिझर्वेशन, रेल्वे कॅन्टीन तसेच इतर रेल्वेचे ऑनलाईन सुविधा या आयआरसीटीसी,IRCTC कंपनीमार्फत दिल्या जातात. त्यामुळे आपल्या पोर्टफोलिओ मध्ये या कंपनीचा समावेश असावा यावर ज्या लोकांनी या कंपनीमध्ये खूप अगोदरपासून मध्ये पैसे गुंतवले त्यांना खूप चांगले रिटर्न्स आतापर्यंत मिळालेले आहेत.

8. एशियन पेंट्स | Asian Paints

      निफ्टी फिफ्टी मधील एक महत्त्वाची कंपनी असून कलर  क्षेत्रामध्ये सर्वात टॉपची कंपनी आहे. त्यामुळे आपल्या नफ्याच्या पोर्टफोलिओ मध्ये Asian Paintsया शेअरचा समावेश करायला हरकत नाही.या कंपनीचे शेअर्स शेअर बाजार कोसळला तरी त्या तुलनेने खूप कमी कोसळतात यावरूनच या शेअर्सची  गुणवत्ता आपल्या लक्षात येते आणि आज घर सजावट इमारतींची कामे यांचा जर विचार केला तर या क्षेत्राची मागणीही भविष्यकाळात देखील वाढतच राहणार आहे. या सगळ्याचा विचार करता आपल्या नफ्याच्या पोर्टफोलिओ मध्ये विशिष्ट रक्कम या शेअर्समध्ये गुंतवायचा हरकत नाही.

9. ट्रायडेंट|Trident

        ही एक मिडकॅप कंपनी असून टेक्स्टाईल क्षेत्रातील नव्याने प्रगतीपथावर असलेली कंपनी म्हणजे Tridentहोय. मागील काही दिवसांपूर्वी नऊ ते दहा रुपयावर असणारा हा शेअर्स  70 पर्यंत वर गेला होता  यावरूनच या शेअर्सची गुणवत्ता आपल्या लक्षात येते.आपले एकूण गुंतवणूकीपैकी किमान 2 ते 3 टक्के रक्कम ही अशा कंपनीत मध्ये असणे अतिशय गरजेचे आहे कारण Trident सारखे शेअर्स हे कितीतरी पटींनी जास्त परतावा आपल्याला देतात म्हणून अशा स्टॉक चा समावेश आपल्या पोर्टफोलिओ मध्ये आवर्जून करावा.

10.इतर| itr 

     आपल्या पोर्टफोलिओ मध्ये साधारणपणे 10 ते 15 कंपन्यांचेच शेअर्स असावेत. जेणेकरून बाजारामध्ये जर काही चढ उतार आले तर आपल्याला एवरेज Avreg करता येईल व आपला होणारा तोटा नियंत्रित करता येईल किंवा जर शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली तर नफा देखील मिळवता येईल.आपल्याकडे लिमिटेड कंपनीचे शेअर्स असतील तर त्या कंपन्यांचा अभ्यास करणे देखील सोपे असते.अशा सर्व बाबींचा विचार करून वर सुचवले सर्व स्टॉक किंवा शेअर्स नफा मिळवून देणारे आहेत परंतु जर आपल्याला अजून काही वेगळे शेअर्स हवे असतील तर तो देखील आपण विचार करू शकता;कारण का तर लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट कधीच तोट्याची असू शकत नाही.काही कारणास्तव एखादी कंपनी आज जरी तोट्यामध्ये असली तरी ती भविष्यामध्ये नफ्यात येऊ शकते हे शेअर्स बाजाराचा इतिहास  पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते.  इतर कंपन्यांमध्ये titan, Dmart, TCS,Relaxo, Laxmi Organic, Berger Paint,Sbi Bank यासारखेशेअर्स देखील आपण खरेदी करू शकता.

        आजच्या या आर्थिक साक्षरता अंतर्गत लेख मालेमध्ये साधारणपणे आपल्या पोर्टफोलिओ मध्ये  दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कोणते शेअर्स घ्यावेत? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आपली गुंतवणूक करत असताना स्वतः खबरदारी घेऊन शेअर्स घ्यावेत ही विनंती. शेअर्स खरेदी करत असताना एकाच क्षेत्रातील किंवा एकाच कंपनीचे जास्तीत जास्त शेअर्स किंवा Stock न घेता वेगवेगळ्या क्षेत्रातील शेअर्स विकत घ्या.जेणेकरून एखाद्या क्षेत्राला मंदीचा सामना करावा लागला तर आपले खूप मोठे नुकसान होणार नाही.आपल्या पोर्टफोलिओ मध्ये दहा ते पंधरा पेक्षा जास्त कंपन्यांचे शेअर्स ठेवू नका.आपण शेअर्स घेतल्यानंतर एखादा शेअर्स किंवा कंपनी जर वारंवार घसरताना दिसत असेल तर ती वर जाईल या खोट्या आशेने न थांबता तो शेअर्स विकून किंवा Sell करून त्याऐवजी नवीन शेअर्सचा  पोर्टफोलिओ मध्ये समावेश करावा. या काही तत्वांचे पालन केल्यानंतर नक्कीच आपल्याला नफा मिळेल पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद 

Leave a Comment