A मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा 2023| makar sankranti best wishesh in marathi 2023

नमस्कार! नवीन वर्षाचे कॅलेंडर हातामध्ये घेताच प्रत्येकाला उत्सुकता असते, ती  म्हणजे या वर्षाच्या पहिल्या महिन्यांमध्ये कोणता सण आहे हे पाहण्याची. आपण 2023 चे कॅलेंडर उघडल्यानंतर सर्वप्रथम आपल्यासमोर नवीन वर्षातील पहिला सण दिसतो तो म्हणजे मकर संक्रांति. आजच्या लेखाच्या माध्यमातून या नवीन वर्षातील पहिल्या सणाच्या म्हणजे मकर संक्रांतीच्या सुंदर सुंदर शुभेच्छा आपले मित्र ,नातेवाईक यांना देता याव्यात. यासाठी एक से बढकर एक मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 2023 आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत.

मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा 2023
मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा 2023

आपण makar sankranti best wishesh in marathi 2023 व्हाट्सअप फेसबुक, इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून मकर संक्रांति सणाच्या सदिच्छा एकमेकांना पाठवून संक्रांतीचा सण अगदी आनंदात साजरा करावा. यासाठीच आम्ही मकर संक्रांतीच्या नवीन शुभेच्छा 2023 आपणासाठी देत आहोत. परंपरेने चालत आलेल्या शुभेच्छा न देता आजच्या परिस्थितीला लागू होतील अशा काही शुभेच्छा ज्या आम्ही खास बनवल्या आहेत त्या आपण पाहूया.

मकर संक्रांती शुभच्छा संदेश मराठी | makar sankranti shubechha sandesh marathi 

 

 

तिळगुळ घ्या ! गोड गोड बोला !

मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 

तिळाला गोडवा गुळामुळे 

जगण्याची मजा अनुभवतोय ती तुमच्यामुळेच.

आपणास मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 

 

मकर संक्रांती मराठमोळ्या शुभेच्छा 2023| makar sankranti marathmolya shubhechha 2023

 

मकर संक्रातीला पतंगाचा दोर हाती पकडू 

आता नका कोणी नका आकडू बिकडू 

आधी करा तोंड गोड 

खा आमचे तिळाचे लाडू 

आमच्याशी नका भांडू 

तिळगुळ घ्या गोड गोड बोला

मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा! 

 

मकर संक्रांती व्हॉट्स ॲप स्टेटस मराठी | makar sankranti whats app status in marathi 

 

मकर संक्रांतीच्या दिनी गळ्यामध्ये घालून हलव्यांचे दागिने 

आता कशाला भांडण,तंटा वागू की जरा अदबीने 

मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा! 

Happy makar sankranti wishesh in marathi |makar sankranti 2023 साठी शुभेच्छा 

 

जसे तीळ आणि गूळ येतात एकत्र 

तसे आपण देखील एकत्र येऊ

सगळे भांडण तंटे विसरून जाऊ 

एक दिवस नाही कायम गोड बोलू

मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा! 

 

मकर संक्रांती मराठी  एसएमएस | makar sankranti  marathi sms 

 

येणारी संक्रांत आपल्या जीवनामध्ये

 केवळ नि केवळ आनंद घेऊन येवो 

तिळगुळ घ्या गोड गोड बोला 

मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा

 

हा सण आहे गोडवा वाढवण्याचा 

नात्यात पडलेली गाठ विसरून जाण्याचा

सगळीकडे आनंदी आनंद पाहण्याचा 

आपणाला व आपल्या परिवाराला मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 

मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला

वंदू त्या माता माऊलीला 

विसरू न पडो कर्तव्याला 

हाच संकल्प मकर संक्रांतीला 

मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा! 

 

तिळाचा गुळामुळे वाढतो गोडवा

आपण देखील एकमेकांशी प्रेम व आपुलकी वाढवा 

संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

 

नवीन वर्षाचा पहिला सण आहे मकर संक्रांति

आपल्या जीवनात देखील हो सद विचारांची क्रांती 

हेच मागणे मकर संक्रांतीच्या पवित्र दिनी

कायम गोड शब्द पडो आपुले आमच्या कानी 

मकर संक्रांतीच्या खूप खूप खूप खूप शुभेच्छा!

 

गुळातील गोडवा ओठावर दिसू द्या

हृदयात असेल थोडा कडवटपणा त्याला बाहेर पडू द्या 

गोड गोड सणाच्या गोड शुभेच्छा 

आता वर्षभर गोड गोड राहू 

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!  

मकर संक्रांती अप्रतिम शुभेच्छा मराठी व्हिडिओ | makar sankranti bes wishesh in marati 

Leave a Comment