A मराठी भाषा गौरव दिन बातमी लेखन | marathi bhasha gaurav din batmi lekhan

बातमी लेखन ही एक कला आहे. बातमी लेखन किंवा वृत्तांतलेखन हे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागावे यासाठी जाणीवपूर्वक अभ्यासक्रमामध्ये बातमी लेखन या घटकावर प्रश्न विचारला जातो. या लेखाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र भाषा गौरव दिन बातमी लेखन पाहणार आहोत. 

मराठी भाषा गौरव दिन बातमी लेखन
मराठी भाषा गौरव दिन बातमी लेखन

बातमी लेखन कसे करावे | batmi lekhan kase karave 

बातमी लेखन करत असताना ते बातमी लेखन कसे करावे? असा अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो. खाली दिलेले काही मुद्दे विचारात घेतले की आपल्याला बातमी लेखन कसे करावे याची काही एक कल्पना येईल.

बातमी लेखन महत्वाच्या बाबी 

१.बातमीचा मथळा | news headline

सर्वप्रथम कोणतीही बातमी देत असताना आपल्याला त्या बातमीचा मथळा म्हणजे शीर्षक लिहावे लागते. ते वाचकांचे लक्ष आकर्षित करून घेणारे असावे.

हा बातमीचा मताळा वाचून शेतकरी देखील ही बातमी तेवढीच आवडीने वाचतील कारण आपलाही मुलगा अशा पद्धतीने कलेक्टर बनू शकतो. नोकरदार वर्ग देखील ही बातमी वाचतील कारण जर शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर बनू शकतो तर माझा का नाही. अशा पद्धतीने वाचक वर्गाला आकर्षित करेल असा बातमीचा मताळा असावा.

2. बातमीचा स्त्रोत| batamicha strot

मथळा लिहिल्यानंतर त्याखाली आपल्याला ती बातमी विश्वसनीय वाटावी यासाठी त्या बातमीचा साक्षीदार कोण आहे हे कळण्यासाठी आमच्या वार्ताहर कडून किंवा प्रतिनिधीकडून असा उल्लेख करावा.

3. बातमीचे ठिकाण तारीख 

कोणतेही घटना घडल्यानंतर ती घटना दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये येते. हे बातमी लेखन करत असताना सर्वप्रथम लक्षात ठेवावे.

उदा. आपल्याला जर शिक्षक दिनाची बातमी तयार करायची असेल तर शिक्षक दिन पाच सप्टेंबरला असतो म्हणून आपली ही बातमी वर्तमानपत्रांमध्ये सहा सप्टेंबरला येईल.

 

4. प्रत्यक्ष बातमी लेखन

आपण प्रत्यक्ष बातमी लेखनाला सुरुवात करू त्यावेळी अगदी सुरुवातीच्या परिच्छेदात ठळक घटना लिहा.

दुसऱ्या परिच्छेदात तपशिलामध्ये सर्व माहिती द्या.सविस्तर वर्णन करा.

मराठी भाषा गौरव दिनाच्या बातमीसाठी माहिती | marathi gaurav dinachya batamisathi mahiti | मराठी गौरव दिन वृतांत लेखन | marathi gaurav din vrutanat lekhan 

जर मराठी भाषा गौरव दिनाची बातमी तयार करत असाल तर आपल्याला मराठी भाषा गौरव दिन का आणि कशासाठी साजरा केला जातो याविषयीची सर्व माहिती हवी. भाषा गौरव दिन नेमका कधीपासून सुरू झाला तो सुरू करण्यामागे काय परियोजन आहे याची तोटक स्वरूपातील माहिती तरी बातमी लेखन करणारा हवी. थोडक्यात बातमी लेखन करण्यासाठी विद्यार्थ्यांचे वाचन हवे. चला तर मग मराठी भाषा गौरव दिन बातमी लेखन एक नमुना पाहूया.

 

मराठी भाषा गौरव दिन बातमी लेखन | marathi bhasha gaurav din batmi lekhan 

मराठी भाषा गौरव दिन यावर जर आपल्याला बातमी लेखन आले तर ते कशा पद्धतीने येते तो प्रश्न सर्वप्रथम पाहूया.

प्रश्न तुमच्या शाळेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा झाला या विषयावर बातमी लेखन करा अर्थात (marathi bhasha gaurav din batmi tayar Kara.) 

अशोक नगर मनपा शाळेत त मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 

28फेब्रुवारी: कांदिवली,मुंबई  (आमच्या वार्ताहरकडून) 

मराठी साहित्यातील लेखक कवी कादंबरीकार नाटककार कुसुमाग्रज तथा वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. यावर्षी 27 फेब्रुवारीला अशोक नगर मनपा माध्यमिक शाळा कांदिवली या शाळेमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अशोकनगर मनपा माध्यमिक शाळेमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा काव्यवाचन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईमधील प्रसिद्ध लेखक राजा परांजपे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्वप्रथम कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी सुमधुर आवाजात स्वागत गीत साजरे करून कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच इतर मान्यवर यांना मंत्रमुग्ध केले.

मुख्य कार्यक्रमांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले त्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिकेत त्याचबरोबर मराठी भाषेचा ठेवा अखंड त्यांच्याजवळ राहावा म्हणून मराठीतील काही महान लेखकांची पुस्तके त्यांना बक्षीस स्वरूपात देण्यात आली. आपल्या मातृभाषेचा आपल्याला अभिमान हवा आपण जाणीवपूर्वक या पद्धतीने इतर भाषा बोलतो त्या पद्धतीने मनःपूर्वक मराठी देखील संभाषणामध्ये वापरली पाहिजे याविषयी प्रमुख पाहुणे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील वरिष्ठ शिक्षक अजय कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

Leave a Comment