A महापरिनिर्वाण दिन मराठी कविता चारोळी | mahaprinirvan din marathi kavita charoli

आजच्या लेखात आपण महापरिनिर्वाण दिन मराठी कविता व चारोळी पाहणार आहोत. हा मापनिर्वाण दिन सहा डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

महापरिनिर्वाण दिन मराठी कविता चारोळी
महापरिनिर्वाण दिन मराठी कविता चारोळी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महामानव दलितांचे कैवारी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार थोर विचारवंत लेखक पत्रकार शास्त्रज्ञ अशी स्वतःची ओळख ज्ञानाच्या जोरावर करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्वाण म्हणजेच हे विश्व सोडून कायमचे निघून जाण्याचा दिवस किंवा त्यांची पुण्यतिथी म्हणजे महापरिनिर्वाण दिन होय. महापरिनिर्वाण दिन म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा देण्याचे काम या दिवशी केले जाते आपण देखील आज महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी कवितेच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करणार आहोत चला तर मग महापरिनिर्वाण दिन मराठी कविता आणि काही चारोळ्या पाहूया.

महापरिनिर्वाण दिन मराठी कविता चारोळी | mahaprinirvan din marathi kavita charoli 

त्याच्या या कवितेतून महापरिनिर्वाण दिन व त्यादिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आपल्याला येत असलेली आठवण या कवितेमध्ये शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणूनच या कवितेला नाव देखील महापरिनिर्वाण दिन कविता असेच दिलेले आहे.
महापरिनिर्वाण  दिन कविता |
Mahaprinirvan din kavita
सहा डिसेंबर काळरात्र आली
 
माझ्या भिमरायाला घेऊन गेली
 
बाबासाहेब तुम्हीच जागवला आमच्यातील स्वाभिमान 
 
या जगात तुमच्यामुळेच माणसाला मिळू लागला मान सन्मान 
 
 
 
तुम्ही नसता तर आज आम्ही देखील नसतो
 
यदाकदाचित असतो तरी माणूस म्हणून नसतो
 
कोणत्यातरी खिनपटीला कितपत पडलो असतो
 
या व्यवस्थेमध्ये पक्के गाडले गेलो असतो
 
 
 
अहो जिथे माणसालाच माणूस शिवत नव्हता
 
काय सांगू असा भेदभाव प्राण्यांमध्ये पण नव्हता
 
आम्हाला कशाचाच हव्यास नव्हता
 
स्वाभिमान काय असतो याचा मागमुस देखील आम्हाला नव्हता 
 
 
ज्ञानापुढे सर्वजण झुकतात 
 
भल्या भल्यांच्या माना ज्ञाना पुढे तुकतात 
 
आज दिल दलितांची पोरे शिकतात 
 
स्वकर्तुत्वाने देशाचे नाव राखतात
 
 
 
पण आज म्हणावसं वाटतं बाबासाहेब आज सगळं बदलत  चाललय
 
एक माणूस दुसऱ्या माणसाचा नाही तर स्वतःचाच विचार करतोय 
 
ते तरी बाबासाहेब आपल्या संघटनाचा विचार आता मागे पडतोय 
 
सर्वच क्षेत्रात आता खजील होऊन सांगावसं वाटतंय स्वार्थ आडवा पडतोय
 
 
 
बाबासाहेब आज गरज आहे आपल्या शिकवणीची
 
आपण सांगितलेल्या संघटनाची
 
आता गरज आहे सर्वांना आत्मपरीक्षणाची 
 
एकत्र येऊन या विखारी शक्तीशी लढण्याची 
 
 
सहा डिसेंबर रोजी आपण गेलात 
 
पण आजही कार्यरूपाने अमर झालात 
 
दलितांसाठी आपण कैवारी म्हणून आलात 
 
देशासाठी राज्यघटना रूपाने नवी दृष्टी देऊन गेलात 
 
 
 
बघताय काय मित्रांनो पुढे येऊया 
 
आपल्या बांधवांना एकत्र आणुया 
 
बाबासाहेबांचे समतेचे गीत असं आसमंतात गाऊया 
 
आज महापरिनिर्वाण दिनी बाबसाहेबाना त्रिवार वंदन करुया.
 
 
अशा पद्धतीने सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी कवितेच्या माध्यमातून विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिन कवितेच्या माध्यमातून त्रिवार वंदन.
आमचीही महापरिनिर्वाण दिन कविता आपणास कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment