A महापरिनिर्वाण दिन माहिती भाषण निबंध | mahaprinirvan din mahiti bhashan nibandh

नमस्कार! महापरिनिर्वाणदिनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आजच्या लेकाला सुरुवात करतो. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आजच्या लेखामध्ये आपण  महापरिनिर्वाण दिन माहिती भाषण व निबंध यांची माहिती पाहणार आहोत.

6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन माहिती भाषण निबंध
6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन माहिती भाषण निबंध

महापरिनिर्वाण म्हणजे काय ? तर ज्या दिवशी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या जगाचा निरोप घेतला तो दिवस म्हणजे महापरिनिर्वाण दिन. तो दिवस म्हणजे सहा डिसेंबर 1956 होय. महापरिनिर्वाण दिनाची माहिती पाहण्या अगोदर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची थोडक्यात माहिती पाहूया.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी माहिती | doctor babasaheb ambedkar marathi mahiti 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक वादळ होते. या वादळाने हजारो वर्षांपासून चालत आलेल्या जातिव्यवस्थेला विरोध केला. माणसाची पारख त्याच्या जातीवरून न होता, त्याच्या मधील गुणवत्तेवरून व्हावी यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कामी लावले. वकिलीचे शिक्षण घेतलेले बाबासाहेब त्याचबरोबर परदेशात जाऊन अर्थशास्त्रासारख्या किचकट विषयातील डॉक्टर पदवी मिळवणारे पहिले भारतीय होत.  अर्थशास्त्रातील एक ख्यातनाम प्राध्यापक, एक अर्थशास्त्रज्ञ, एक लेखक,विचारवंत, पत्रकार की ज्यांनी लेखणीच्या माध्यमातून बहुजन समाजावर अन्याय,अत्याचार  करणाऱ्या या वर्णव्यवस्थेचा जातीव्यवस्थेचा कडाडून विरोध केला.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी सांगावे तेवढे कमीच आहे, परंतु भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार दलितांचे उद्धारक व मी  दलितांमध्ये केवळ अमुक समाजासाठीच मी काम करणार असे नव्हते. तर जे जे शोषित आहेत, पीडित आहेत, व्यवस्थेने ज्यांना नाकारलेले आहे अशा दीन दलीत सर्वांमध्ये स्वाभिमानाचे ज्योत निर्माण करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्याकाळी धर्माच्या, वर्णव्यवस्था,जातिव्यवस्था यांच्या नावाखाली वर्षानुवर्षे अन्याय आणि अत्याचार केले जात होते.त्या लोकांना अगदी सुरुवातीच्या काळात संघटित करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रचंड अडचणी आल्या, तरी देखील त्यांनी माणसाला माणसासारखी वागणूक मिळाली पाहिजे यासाठी अनेक सभा घेतल्या वर्तमानपत्रातून लेखन केले. दलित वर्गाला शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. असा मोलाचा संदेश दिला. खरंतर आजचा लेख हा आपला महापरिनिर्वाण दिन माहिती,निबंध व भाषण असा  लेख असल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती सांगत बसलो तर महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय ? महापरिनिर्वाण दिनाची माहिती, महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाषण आणि निबंध चांगल्या पद्धतीने लिहिता यावा यासाठी हा लेख प्रायोजित असल्यामुळे आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. चला तर मग महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय? ते थोडक्यात पाहूया.

महापरिनिर्वाण दिन माहिती | mahaprinirvan din mahiti 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था यांचे चटके स्वतःही अनुभवले.त्याचबरोबर हजारो वर्षांपासून अनेक लोक या व्यवस्थेमुळे पिळले जात आहेत अशा लोकांना या दलदलीतून बाहेर काढायचे असेल तर त्यांना या हिंदू धर्माचा त्याग करावा लागेल. या भूमिकेतूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला कारण तो भेदाभेद मानत नाही व मानवतेची शिकवण देतो या विचारातून आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. या बौद्ध धर्मातीलच निर्वाण या शब्दावरून महापरिनिर्वाण दिन शब्दाची उकल आपल्याला करता येईल. महापरिनिर्वाण म्हणजे मृत्यूनंतरचे निर्वाण होय. आपल्या संसारातील अनेक इच्छा, आकांक्षा, विषय वासना यांच्यापासून मुक्त होणे म्हणजे महानिर्वाण होय.

महापरिनिर्वाण म्हणजे काय याविषयी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मृत्यूनंतर होणारे निर्वाण होय. थोडक्यात काय तर महापरिनिर्वाण दिन म्हणजे हा भवसागर सोडून , या जगाचा निरोप घेणे होय. सोप्या भाषेत तर ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला देह ठेवला. तो दिवस म्हणजे महापरिनिर्वाण दिन होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. दलितांना आशेचा किरण दाखवणारे, स्वाभिमानाने जगण्याचा संदेश देणारे आशेचा किरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होत. त्यांनी ज्या दिवशी या जगाचा निरोप घेतला तो दिवस म्हणजे महापरिनिर्वाण होय.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अंत्यसंस्कार | doctor babsaheb ambekdkar yanche antya sanskar 

बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झाले.त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी झाले ते ठिकाण म्हणजे मुंबईमधील दादर चौपाटी होय. लाखोंच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  की ज्यांना दिन दलितांचे कैवारी म्हणून  मानवंदना देतात. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला किती वर्षे लोटून देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी या स्थळाला आजही भेट देतात हे स्थळ चैत्यभूमी म्हणून ओळखले जाते. थोडक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधी स्थळ कोणते तर मुंबईमधील दादर या ठिकाणी असलेली चैत्यभूमी व त्यांचे समाधी स्थळ आहे. ते आपण या ठिकाणाला भेट दिल्यानंतर खरोखरच या महामानवाचे कार्य किती अघात होते याची आपल्याला कल्पना येते.

महापरिनिर्वाण दीन अभिवादन कार्यक्रम |mahaprinirvan din abhivadan karykram

 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी ते केवळ दलितच आहेत असे नाही तर सर्व जाती धर्मातील लोक जे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानतात, त्याच बरोबर ज्या दलित वर्गाला स्वाभिमानाने जगा,शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा मोलाचा संदेश देणारे  की ज्यांच्यामुळे दलित वर्गातील लोक आज माणसासारखे जीवन जगत आहोत. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सोडून ज्या दिवशी निघून गेले. तो दिवस म्हणजे सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन. बौद्ध धर्मातील निर्वाण यावरून महानिर्वाण हा शब्द उपयोगात आला आहे.

या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर अनेक नेतेमंडळी दलित कार्यकर्ते,तसेच सर्वसामान्य लोक देखील अगदी सकाळपासूनच चैत्यभूमी वरती येत असतात. गावागावातून , वाड्यातून लोक मुंबईच्या दिशेने धाव घेत असतात.ट्रेनच्या ट्रेन खचाखच भरून येत असतात. सर्वजण महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी चैत्यभूमीला भेट देतात. या महामानवाला आदरांजली अर्पण करतात. सर्वात विशेष म्हणजे या महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगणारी हजारो पुस्तके चैत्यभूमी वरती आज विक्रीसाठी उपलब्ध असतात. बहुजन,दलित  वर्ग ही पुस्तके विकत घेतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या मध्ये विचारांनी राहिले पाहिजेत यासाठी संकल्प करतो. की बाबसाहेब यांचे हे विचार आम्ही प्रसारित करू. या महापरिनिर्वाणदिनी शाळा महाविद्यालय, कॉलेजेस यामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले जाते. या अभिवादनाच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला जातो.यावेळी आपल्याला महापरिनिर्वाण दिनाचे भाषण किंवा विचार मांडण्यासाठी वरील माहिती उपयोगी येईलच, परंतु जे विद्यार्थी आहेत. अशा विद्यार्थ्यांना छोटेखानी कार्यक्रमांमध्ये महापरिनिर्वाण दिन भाषण मराठीमध्ये देता यावे एक नमुना जो आपल्याला महापरिनिर्वाण दिन भाषण देण्यासाठी किंवा mahaprinirvan din speech in Marathi देत असताना अतिशय उपयोगी येईल. 

 महापरिनिर्वाण दीन भाषण | mahaprinirvan din marathi bhashan 

आपल्याला भाषण करत असताना भाषणाच्या काही आचारसंहिता माहिती हव्यात. महापरिनिर्वाण दिन भाषणाचा विचार आपण जर केला तर या भाषणाची सुरुवात करत असताना ,आपल्याला याची कल्पना हवी की महापरिनिर्वाण म्हणजे या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. साहजिकच आपल्याला इतर भाषणांप्रमाणे अतिशय आवेशात भाषणाची सुरुवात न करता सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना द्यावी लागेल. कधी कधी विद्यार्थी नेहमीच्या सवयीप्रमाणे अतिशय आवेशात भाषणाची सुरुवात करतात, परंतु असे न करता अतिशय विनम्रपणे आपल्याला 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाचे भाषण करावे लागेल.मी आपणाला एक भाषणाचा नमुना देत आहे. तो भाषणाचा नमुना आपल्याला नक्कीच दिशादर्शक ठरेल. आपण देखील याच पद्धतीने भाषण केले पाहिजे असे नाही,परंतु यातून काही कल्पना विषयाची मांडणी कशी असावी? महापरिनिर्वाण दिनाचे मराठी भाषण कसे असावे किंवा आदर्श भाषण कसे असावे. या सर्वांचा परिचय आपल्याला या लेखातून येईल. चला तर मग महापरिनिर्वाण दिन  भाषण  सुरु करूया.

महापरिनिर्वाण दिन मराठी भाषण |mahaprinirvan din speech in Marathi|mahaprinirvan din marathi bhashan 

नमस्कार! इथे जमलेल्या माझ्या मित्र – मैत्रिणी,गुरुजन वर्ग व आदरणीय मान्यवर अतिथी या सर्वांचे माझ्या भाषणाला सुरुवात करण्याआधी शब्दसुमानांनी मी अबक आपले  स्वागत करतो. आज सहा डिसेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण म्हणजे निधन झाले. तो दिवस किंवा त्यांची पुण्यतिथी म्हणून हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मी आज दोन शब्द मांडण्या अगोदर सर्वप्रथम महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी बाबासाहेब आंबेडकर, राज्यघटनेचे शिल्पकार, महामानवाला आदरांजली अर्पण करतो. महापरिनिर्वाण दिनाचे माझे हे तोकडे बोल आपण शांत चित्ताने ऐकावेत ही नम्र विनंती.

डोळ्यातील आसवांना आज मुभा आहे,

बाबासाहेब आपल्यामुळेच हा,

बहुजन समाज स्वाभिमानाने उभा आहे.

अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दलित घरांमध्ये झाला.अगदी लहानपणापासूनच त्यांना अस्पृश्यतेचे चटक्यानी होरपळून काढले.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यावर होणारे वर्णव्यवस्थेचे व जातीव्यवस्थेचे चाबकासारखे होणारे वार स्वतः देखील अनुभवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बुद्धिमत्ता अतिशय प्रखर होती. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात जाऊन अर्थशास्त्राची डॉक्टररेट मिळवू शकले, एक अर्थशास्त्रज्ञ, विचारवंत, लेखक पत्रकार, वकील त्याचबरोबर अशा असंख्य डिग्र्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर आहेत. सांगण्याचा मुद्दा हा की वर्णव्यवस्था आपल्याला गुलामीत ठेवायचा प्रयत्न करत असेल, तर त्यावर मात करायची असेल तर आपल्याजवळ ज्ञान हवे. आपल्याजवळ ज्ञान असेल तर जगाला देखील आपल्याला नव्हे आपल्या ज्ञानाला सलाम करावा लागेल. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या अघात ज्ञानाला सलाम करण्यासाठीच की काय भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आले असावे. राज्यघटन म्हणजे काय ? तर हा देश स्वतंत्र झाल्यानंतर कशा पद्धतीने चालणार? याविषयीचे नियमावली म्हणजे भारतीय राज्यघटना होय.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड मेहनतीने इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून त्याचबरोबर भारतातील वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, बहुभाषिकता,धर्म व्यवस्था या सर्वांचा अभ्यास करून या सर्वांना एकत्र बांधून ठेवेल अगदी तळागाळातील लोकांना देखील न्याय मिळवून देईल. अशी राज्यघटना तयार केली म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते.

अशा या महामानवाविषयी बोलावे तेवढे थोडेच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलायचे म्हटले तर संपूर्ण दिवस पुरणार नाही, परंतु महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने एवढेच सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे अनुयायी सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली देतात. ती आदरांजली देत असताना कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेले संघटन कमी पडताना दिसत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संघर्ष केला जेणेकरून दीन दलित शोषित वर्गाला सन्मानाने जगता येईल.परंतु आज कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या जोरावर ज्या पिढ्या शिकल्या सवरल्या ,आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या त्या पिढ्या आपल्या समाजासाठी कार्यकर्त्यांना धजावत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. बाबासाहेब आंबेडकर यांना जे संघटन अपेक्षित होते ते संघटन म्हणजे एक काठी कोणीही मोडू शकते, परंतु जर काट्यांचा जुडगा असेल तर तो कदापि मोडला जाणार नाही. म्हणूनच काय त्यांनी शिका,संघटित व्हा, आणि संघर्ष करा असा सल्ला दिला. हा उपदेश दिन दलित वर्गाला त्यांनी दिला होता. त्यामधील संघटन आता कमी होत आहे. हे संघटन करणे काळाची गरज आहे. अनेक ठिकाणी दिन दलित वर्गातील लोकांवर अन्याय आणि अत्याचार होताना दिसत आहेत, परंतु जेवढा विरोध व्हावा तेवढा विरोध होताना दिसत नाही याचे एकच कारण आहे ते संघटन कमी पडत आहे, म्हणूनच की काय एक कवी आपल्या काव्यात म्हणतात,

आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय

सूर्यफुले तुझा ध्यास घेतायेत,

बिगुल प्रतीक्षा करतोय

चवदार तळ्याचे पाणी,

तेही आता थंड झालय .

दलित कवी ज. वि. पवार यांच्या यांच्या या तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेतील वरील ओळी खूप काही सांगून जातात. ते या कवितेच्या माध्यमातून एवढे सुचवतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संघर्ष केला तो संघर्ष कुठेतरी कमी पडताना दिसत आहे.

चला तर मग या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने संकल्प करूया या महामानवाचे अखिल मानवतेचे स्वप्न साकार करूया.

या समाजातील अगदी शेवटच्या टोकापर्यंत असलेल्या माणसाला माणसासारखी वागणूक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करूया. खूप शिकूया,खूप संघटित होऊया आणि मानव जातीच्या उत्थानासाठी संघर्ष करूया. हीच या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली असेल. 

शोधावया भाकरीला ती भूक आहे,

जन्मताच गरिबी येते ही कुणाची चूक आहे,

भूक लागली की खाने ही प्रकृती आहे,

आपल्या घासातील घास दुसऱ्याला देणे ,

ही माणसाची खरी संस्कृती आहे 

 

या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनमोल विचाराने प्रेरित होऊया सबका मंगल हो!सबका कल्याण हो! या विश्वव्यापक विचारांचे खरे पाईक बनूया.

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला पुढे घेऊन जाण्याचा संकल्प करूया. सारे एकत्र येऊया स्वाभिमानाने जगूया. माणसाशी माणसाप्रमाणे वागूया असे बोलून आजच्या या महापरिनिर्वाण दिनी मला भाषण करण्याची संधी आपण दिली याबद्दल मी आपला आभारी आहे.

आज महापरिनिर्वाणदिनी भाषण करत असताना आपण माझे विचार अगदी शांततेने ऐकून घेतले त्याबद्दल शतशः नमन करतो. व जाता जाता महामानव विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ,कायदेतज्ञ,समाज सुधारक, लेखक, विचारवंत, एक पत्रकार, अर्थशास्त्रज्ञ महान तत्त्वज्ञानी अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी आपली रजा घेतो. जय हिंद !जय भारत!जय भीम.

महापरिनिर्वाण दिन निबंध | mahaprinirvan din nibandh 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी ज्या दिवशी साजरी केली जाते. तो दिवस म्हणजे 6 डिसेंबर होय.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. या दिवसाची आठवण म्हणूनच हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी मुंबई मधील दादर चौपाटी या ठिकाणी करण्यात आला. तो दिवस म्हणजे ६ डिसेंबर या दिवसाची आठवण म्हणूनच ज्या ठिकाणी त्यांचे अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणच्या भूमीला चैत्यभूमी  म्हंटले जाते.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाधी स्थळ म्हणून ती आज अवघ्या जगासाठी नावारुपास आलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना दिवशी अनेक मान्यवर मंडळी चैत्यभूमीला भेट देतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहतात,त्याचबरोबर भारतातल्या इतर ठिकाणी देखील शाळा, महाविद्यालय, कॉलेजेस, शासकीय कार्यालय बुद्ध विहार या ठिकाणी देखील या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा दिला जातो.

बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म अस्पृश्य वर्गात झाला, जातीयतेचे चटके त्यांनी स्वतः अनुभवले. परंतु पुढे अतिशय प्रखर बुद्धिमान असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे गमक जाणले आणि या जाती अंतासाठी आपल्याला बुद्धीच्या जोरावरच लोकांना आपली गुणवत्ता दाखवावी लागेल असे त्यांना वाटू लागले . त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन शैक्षणिक, सामाजिक, वैचारिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला. भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचबरोबर दिन दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना माणसाप्रमाणे वागवले गेले पाहिजे यासाठी त्यांनी अनेक चळवळी उभ्या केल्या .दलितांना एकत्र आणले.  त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले.

या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला जातो. मुंबई येथील चैत्यभूमीवर अनेक नेतेमंडळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी या स्थळाला भेटी देतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात. बहुजन समाजाला स्वाभिमान शिकवणारे, शिक्षणाचे महत्व पटवून देणारे,आपला उद्धार करायचा असेल तर वर्णव्यवस्थेमध्ये चिटकून राहू नका तर शिक्षण घ्या,संघटित व्हा, आणि संघर्ष करा अशी शिकवण देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.

बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. या बौद्ध धर्मामध्ये निर्वाण या शब्दाला अतिशय महत्त्व आहे. म्हणजे सर्व इच्छा, आकांक्षा वासना यापासून मुक्ती मिळवणे होय. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी बौद्ध धर्मीय हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करतात. थोडक्यात काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणजे हा महापरिनिर्वाण दीन होय. असे म्हटले तरी वावगे होणार नाही .

या महापरिनिर्वाणदिनी लाखोच्या संख्येने संपूर्ण भारतातून लोक मुंबई येथील चैत्यभूमीवर एकत्र येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी भारावून जातात.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्मरण करून त्या मार्गावर चालण्यासाठी संकल्प करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना  त्यांच्या विचारांना मानणारे अंधभक्त नको होते तर अनुयायी हवे होते. म्हणूनच या चैत्यभूमीवरती या दिवशी हजारोंच्या संख्येने पुस्तकांची विक्री होते, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संघटन कार्य आज देखील सुरूच रहावे. हाच यामागील हेतू आहे. आपण देखील या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तान माणसाशी माणसासारखे वागूय. आज आपल्या समाजातील स्त्री, गरीब, शोषित, दलित वर्ग यांच्यावरती अनेक ठिकाणी अन्याय आणि अत्याचार होताना दिसतायेत. याविरुद्धच्या लढ्यात आपण देखील आवाज उठवूया. असा संकल्प केला तरच खरा  महापरिनिर्वाण दिन साजरा होईल.

अशाप्रकारे महापरिनिर्वाण दिन मराठी निबंध आपल्याला अतिशय छानपणे लिहिता येईल. या महापरिनिर्वाण दिन मराठी निबंध मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी जास्त माहिती न देता महापरिनिर्वाण म्हणजे काय यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.

आमचा आजचा हा लेख 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन माहिती भाषण निबंध आपल्याला कसा वाटला. हे आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद.

 

Leave a Comment