A युवक दिन बातमी लेखन | yuvak din batmi lekhan

बातमी लेखन हे एक कौशल्य आहे. या कौशल्याचा विकास करण्यासाठी साधारणपणे नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांमध्ये बातमी लेखन यावर प्रश्न विचारला जातो.  ज्याला आपण रिपोर्ट रायटिंग म्हणतो (report writing) या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण युवक दिनाची बातमी तयार करणार आहोत. Yuvak din batmi /yuva din batmi तयार करीत असताना असताना कोणकोणत्या बाबींची दक्षता घेतली पाहिजे हे आपण पाहूया. 

युवक दिन बातमी लेखन
युवक दिन बातमी लेखन

बातमी लेखन करताना ही काळजी घ्या

१. बातमीचा मथळा 

बातमीचा मथळा याचा अर्थ आपण बातमीला देत असलेले शीर्षक हे शीर्षक देत असताना योग्य शब्दांची निवड करा.बातमीचे शीर्षक (heading) हे वाचकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या असले पाहिजे. मी प्रत्येक वाचकाला आपली वाटायला हवी.

उदा.

शेतकऱ्याचा मुलगा झाला कलेक्टर

 

बातमी प्रत्येक शेतकऱ्याला वाचावीशी वाटेल, शेतकऱ्याच्या मुलाला वाचावीशी वाटेल बरोबर शहरी भागातील व्यक्तीही जर खेडेगावातील मुले कलेक्टर होतात तर आपली का नाही या भावनेतून ही बातमी वाचेल. सांगण्याचे तात्पर्य बातमीचा मथळा व्यवस्थित बनवा.

 

२. बातमीचा दिनांक व स्थळ

आपण देत असलेली बातमी कोणत्या तारखेला देत आहोत हे व्यवस्थित लिहा.

उदा. प्रजासत्ताक दिनाची बातमी आपल्याला बनवायला सांगितल्यानंतर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो तर मग आपली बातमी वर्तमानपत्रामध्ये 27 जानेवारी ला जायला हवी. त्यात दिनांक लिहित असताना सारासार विचार करून लिहा. बातमी कोणत्या ठिकाणाहून जात आहे स्त्रोत लिहायला विसरू नका.

उदा. मुंबई

 

३. बातमीचे परिच्छेद

बातमी तयार करत असताना पहिल्या परिच्छेदात घटनेच्या ठळक बाबी लिहा.

दुसऱ्या परिच्छेदात तो कार्यक्रम कशा पद्धतीने पार पडला त्याचा तपशील द्या.

तिसऱ्या परिच्छेदामध्ये कार्यक्रमाची सांगता. थोडक्यात लिहा.

अशा पद्धतीने बातमी लेखन करीत असताना काही खबरदारी घेतल्यानंतर आपण अतिशय सुंदर बातमी देऊ शकतो.आपल्या मुख्य  विषयाकडे वळूया.

 

स्वामी विवेकानंद जयंती युवक दिन बातमी लेखन |yuvak din batmi lekhan |vivekanadana jayanti batmi lekhan |yuva din batmi |युवा दिनाची बातमी

 आपल्याला स्वामी  विवेकानंद जयंती बातमी लेखन म्हणजेच युवक दिन साजरा झाल्याबाबत बातमी लेखन तयार करायचे आहे. परीक्षेत युवक दिन यावर बातमीचा प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो ते आपण पाहूया.

 

१. तुमच्या शाळेमध्ये 12 जानेवारीला युवक दिन साजरा झाला आहे यासंदर्भात सुंदर बातमी तयार करा.

 

२. तुमच्या महाविद्यालयामध्ये स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात पार पडली याची बातमी तयार करा.

 

आपल्याला वर  जरी दोन प्रश्न दिसत असले, तरी त्याचा अर्थ मात्र एकच आहे आहे. कारण आपण 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंती ही युवक दिन म्हणून साजरी करतो. या संदर्भात आपल्याला बातमीचे लेखन करायचे आहे.चला तर मग युवक दिन बातमी लेखन  करीत असताना  वर दिलेल्या सर्व बाबी विचारात घेऊन swami vivekananda jaynti batmi lekhan करूया.

युवक दिन बातमी लेखन |स्वामी विवेकानंद जयंती बातमी |yuvak din batmi lekhan |swami vivekananda jayanti batmi lekhan news writing 

युवक दिनाच्या बातमीचा एक नमुना आपणासाठी देत आहोत. यामधे आपण हा कार्यक्रम कसा साजरा झाला यानुसार मांडणी करावी.
 

अशोक नगर मनपा शाळेमध्ये युवक दिन उत्साहात साजरा

१३ जानेवारी:कांदिवली,मुंबई.(आमच्या वार्ताहराकडून)

संपूर्ण भारतामध्ये स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारीला युवक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारी मुळे कोणत्याही सण उत्सव जयंती उत्साहात साजरा करता आल्या नाहीत. परंतु यावेळी कोरोना संकट नसल्यामुळे अशोक नगर मनपा माध्यमिक शाळा कांदिवली पूर्व या ठिकाणी स्वामी विवेकानंद जयंती तथा युवक दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृतीचे मोठेपण अवघ्या जगाला समजावून दिले. त्याचबरोबर त्यांनी संपूर्ण आयुष्यभर भारतातल्या तरुणांनी कशा पद्धतीने राष्ट्राच्या उभारणीत पुढे आले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून अशोकनगर मनपा शाळेमध्ये युवक दिन साजरा करत असताना विविध क्रीडा स्पर्धांच्या आयोजन करण्यात आले होते.त्याच बरोबर वक्तृत्व स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी हजेरी लावली. प्रथम क्रीडा स्पर्धा होणार असल्यामुळे महापौरांच्या हस्ते कबड्डीच्या सामन्याला सुरुवात झाली. नंतर इतर देखील स्पर्धा पार पडल्या.

युवक दिनाच्या दिवशी क्रीडा स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा यामध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव महापौर यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या जीवनामध्ये खेळाचे महत्व याविषयी आपल्या भाषणात महापौर यांनी अतिशय अनमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अशोक नगर शाळेमध्ये अतिशय उत्साहामध्ये स्वामी विवेकानंद जयंती तथा युवक दिन पार पडला. या कार्यक्रमाच्या सरते शेवटी पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली. अशोक नगर मनपा शाळेने अतिशय दिमागदार असा योग दिन साजरा केला.

अशा पद्धतीने आपण युवक दिनाची बातमी तयार करू शकता. बातमी लेखन करीत असताना त्या घटनेतील किंवा कार्यक्रमातील ठळक ठळक बाबी लिहायच्या असतात हे लक्षात ठेवा.

आजचा युवक दिन बातमी लेखन हा लेख आपल्याला कसा वाटला. हे आम्हाला नक्की कळवा. दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये बातमी लेखनावरती हमखास प्रश्न विचारला जातो.हा आम्ही दिलेला स्वामी विवेकानंद जयंती बातमी लेखन हा विषय आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा.पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद !

Leave a Comment