A येशू ख्रिस्त मराठी माहिती निबंध | yeshu christ marathi mahiti nibandh

ज्ञानयोगी डॉट कॉम च्या माध्यमातून नाताळ सण साजरा करीत असताना यांचा जन्मदिवस म्हणून नाताळ किंवा ख्रिसमस साजरा केला जातो ती व्यक्ती म्हणजे येशू ख्रिस्त होय. आज आपण येशू ख्रिस्त यांच्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या माहितीचा म्हणजेच येशू ख्रिस्त मराठी माहितीचा आपण नाताळ,ख्रिसमस हा निबंध लेखन करताना देखील छान पद्धतीने उपयोग करू शकता.

येशू ख्रिस्त मराठी माहिती निबंध
येशू ख्रिस्त मराठी माहिती निबंध

येशू ख्रिस्त मराठी माहिती निबंध | yeshu christ marathi mahiti | yeshu christ marathi information and essay 

येशू ख्रिस्त यांचा जन्म 25 डिसेंबर रोजी झाला. 25 डिसेंबर रोजी प्रभू येशू यांचा जन्म झाल्यामुळे ख्रिस्ती बांधव हा दिवस ख्रिसमस किंवा नाताळ म्हणून साजरा करतात. येशू ख्रिस्तांचा जन्म बेथहेलम व मृत्यू जेरुसलेम या ठिकाणी झाला.

येशू ख्रिस्तांच्या जन्माविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. एकादंत कथेनुसार देव पुरुष येशू यांचा जन्म मेरी नावाच्या कुमारिकेच्या कुठे झाला असे सांगितले जाते. यहुदी धर्मात खूप मोठ्या प्रमाणात धर्माच्या नावाखाली शोषण सुरू होते आणि या शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचे काम प्रभू येशू यांनी केले.

येशू ख्रिस्त यांची शिकवण | yeshu crist yanchi shikvan 

ख्रिस्ती बांधव परमेश्वराचे मानव रूप म्हणून येशू यांना प्रचंड  मानतात. येशू ख्रिस्त यांनी भक्ती, लोकसेवा आणि त्याग या त्रीसूत्रींवर आपले तत्त्वज्ञान मांडले. येशू ख्रिस्त स्वतःला परमेश्वराचा मुलगा मानत होते. ईश्वरी शक्तींवर येशू यांचा प्रचंड विश्वास होता. प्रेमाचा आतंग सागर म्हणजे येशू ख्रिस्त असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

परमेश्वरा आम्हाला फक्त दोन वेळची भाजी भाकरी दे. कोणत्याही मोहाला आम्हाला बळी पडू नको. अमंगल वाईट गोष्टींपासून नेहमी आमचा बचाव कर मागणी परमेश्वराकडे केली पाहिजे अशी शिकवण येशू ख्रिस्ताने दिली आणि पुढे येशू ख्रिस्तांच्या निधनानंतर हीच ख्रिश्चन धर्माची प्रमुख तत्वे बनली. आपण सदाचार म्हणजेच चांगले वागून आपल्यातील वाईट बाबींचा नाश करू शकतो. आपल्यातून काही पाप घडले तर त्या बापाचा आग्रा करा परंतु ज्याच्या हातून ते पाप झाल त्या व्यक्तीला मोठ्या मनाने माफ करून सुधारण्याची संधी द्या. अशी मानवतावादी शिकवण येशू ख्रिस्त यांनी दिली. येशू ख्रिस्ताने भक्तीला महत्व दिले मात्र अंधश्रद्धा त्यांना मान्य नव्हती. माणूस जसा कर्म करतो तसेच फळ त्याला मिळते.

आपण पापी बंधू विश्वासघातकी ढोंगी तसेच अहंकारी माणसांपासून कायम दूर राहिला पाहिजे असे त्यांनी सांगितले. मनाची चंचलता कमी करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केला पाहिजे.

 

येशू ख्रिस्त आणि कृस | yeshu christ aani krus 

येशू ख्रिस्त यांनी जे मानवतावादी तत्त्वज्ञान मांडले. अंधश्रद्धेला विरोध केला. येऊ दे धर्मातील वाईट बाबी दाखवून नेहमी सदाचाराने वागा अशी शिकवण त्यांनी दिली. याचाच परिणाम म्हणून समाजकंटक लोकांनी येशू ख्रिस्त यांना क्रुसावर चढवले. त्यांच्या हाता पायामध्ये खेळ ठोकले. छातीमध्ये देखील लोखंडी खिळ्याने छेद पाडले. एवढा प्रचंड महान वेदना सहन करत येशू ख्रिस्त यांनी मृत्यूला कवटाळले. अशा या वेदनामयी  प्रसंगी देखील येशू ख्रिस्त परमेश्वराकडे एकच प्रार्थना करतात – परमेश्वरा आपण काय करीत आहोत हे या लोकांना कळत नाही. या लोकांना तू क्षमा कर. परमेश्वरा या सर्वांना क्षमा कर. खात्री आहे ईश्वर हा दयाळ असतो आणि तो सर्वांना क्षमा करतो.

अशा पद्धतीने ख्रिस्ती धर्मीय यांना प्रेमाची, त्यागाची व मानवतावादाची शिकवण देणारे येशू ख्रिस्त यांच्या विचारावरच ख्रिस्ती धर्म आज देखील चालत आहे. अशा या प्रेमरूपी सागर किंवा निर्व्याज प्रेमाचा महासागर म्हटले तरी वावगे ठरणार नाही अशा येशू ख्रिस्तांना नाताळ सनानिमित्त कोटी कोटी प्रणाम.

 

येशू ख्रिस्त व नाताळ |yeshu christ v natal christmas 

येशू ख्रिस्त यांचा जन्म 25 डिसेंबर या तारखेला झाला. नाताळ हा शब्द नातूस शब्दापासून तयार झाला. नातूस म्हणजे जन्माला येणे. थोडक्यात येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणजे नाताळ. त्याचबरोबर ख्रिसमस म्हणजे असा महिना की ज्या महिन्यांमध्ये येशू ख्रिस्तांचा जन्म झाला. अशा पद्धतीने येशू ख्रिस्त व नाताळ यांच्या विषयी माहिती सांगता येते.

आमचा आजचा हा येशू ख्रिस्त मराठी माहिती व निबंध हा लेख आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा.

 

Leave a Comment