A राजमाता जिजाऊ कविता चारोळी शुभेच्छा संदेश | rajmata jijau kavita charoli shubhechha sandesh

राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करत असताना शाळा महाविद्यालये,कॉलेज ,सहकारी कार्यालये यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात या कार्यक्रमात जिजाऊ यांचा गौरव करताना काहीजण कवितेतून त्यांची थोरवी वर्णन करतात.आपण देखील आज राजमाता जिजाऊ कविता या लेखातून जिजाऊ यांच्या राजमाता जीवनावर प्रकाश टाकणारं आहोत.या कविता आपल्याला नक्की आवडतील.या लेखात संकलित राजमाता जिजाऊ कविता,चारोळी शुभेच्छा संदेश आहेत कविता रचणाऱ्या कवींचे व इतर रचनाकार यांचे विशेष आभार.

राजमाता जिजाऊ कविता चारोळी शुभेच्छा संदेश
राजमाता जिजाऊ कविता चारोळी शुभेच्छा संदेश

 

राजमाता जिजाऊ कविता चारोळी शुभेच्छा संदेश | rajmata jijau kavita charoli shubhechha sandesh 

सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांचे वर्णन करणाऱ्या कविता पाहू.

राजमाता जिजाऊ कविता क्रमांक १ |rajmata jijau kavita १

 

मुजरा माझा त्या माँ जिजाऊला 
 
घडविले तिने त्या शूर शिवबाला ! 
 
साक्षात होती ती आई भवानी
 
जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी ! 
 
मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा
 
तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा ! 
 
सांभाळीले तिने सर्वांना प्रेमान
 
घडले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने!  
 
तिच्या मायेच्या छायेत नव्हता जाती धर्म 
 
सर्व धर्म समभाव हे एकच तीचे कर्म !  
 
तिच्याच राज्यात होती सुखी सारी प्रजा 
 
धन्य धन्य जिजाऊ माता . 
 
 

राजमाता जिजाऊ मराठी कविता २ | rajmata jijau kavita २

 
जिजाऊ हि केवळ माता नव्हती
 
तर होती ती राजमाता
 
राजमाता कसली जिने स्वराज्य निर्माण करण्याची ठिणगी
 
पुत्र शिवबा मध्ये गरबा मध्येच लावली होती
 
हिंदवी स्वराज्य निर्माण झाले पाहिजे ही जिची जिद्द होती
 
ती महाराष्ट्राची कन्या जिजाऊ होती
 
मोगलांच्या अमानुष वागण्याची जिला भारी चीड होती
 
वेळप्रसंगी हातामध्ये तलवार घेण्याचीही तयारी  होती .
 

राजमाता जिजाऊ कविता ३  |rajmata jijau kavita ३

 
जिजाऊ वंदना जिजा माऊली गे तुला वंदितो मी,
जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥
तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव-स्वामी॥
तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला,
तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;
तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥
तुझी सावली सर्व काळी असू दे,
कुठे दुःख कोणास काही नसू दे;
नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥
तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा ,
तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;
घडो अंत तो शांत साफल्यगामी ॥
जय जय जिजाऊ ऽऽऽ- जय जिजाऊ .
थोर मातेस विनम्र अभिवादन .

राजमाता जिजाऊ चारोळी शायरी  शुभेच्छा|Rajmata Jijau Charoli Shayri shubhechha

               1. जिजाऊ होत्या म्हणून शिवराय घडले, 
 
                  शिवराय होते म्हणून स्वराज्य घडले, 
 
                  स्वराज्य घडले म्हणून नंदनवन काय हे
 कळले, 
 
                अहो पण हे सर्व जिजाऊ मुळेच घडले.
 
 
    2. जिजाऊ केवळ शिवबाची माता नव्हती,
 
                तर ती स्वराज्याची राजमाता होती, 
 
                अहो ! अखिल भारत खंडाची राष्ट्रमाता होती,
 
                स्वातंत्र्याची वाट दावणारी एक पहाट होती.
 
 

राजमाता जिजाऊ चारोळी |Rajmata Jijau Charoli

 
              3.तुम्ही होतात म्हणून शिवबा घडला,
 
              तुम्ही होतात म्हणून स्वाभिमान वाढला,
 
             तुम्ही होतात म्हणून सह्याद्री आशेने पाहू लागला, 
 
             माता जिजाउमूळेच मराठी माणूस उभा राहिला.  
 
आजच्या या लेखातून आपण राजमाता जिजाऊ कविता चारोळी शुभेच्छा संदेश पाहिले आपण जिजाऊ जयंती साजरी करत असताना हे आपले मित्र मंडळी यांना शेअर करा. धन्यवाद !
 

Leave a Comment