A राजमाता जिजाऊ जयंती माहिती कविता निबंध चारोळी भाषण शायरी |Rajmata Jijau Mahiti Kavita Nibandh Charoli Bhashan

      आजच्या लेखात आपण राजमाता जिजाऊ जयंती यांची माहिती पाहणार आहोत,तसेच जिजाऊ यांच्यावर आधारित कविता,निबंध,चारोळी व भाषण आणि अलीकडे सर्व वाचकांना आवडणारा प्रकार शेरो शायरी ही देखील पाहणार आहोत.ही माहिती आपल्याला राजमाता जिजाबाई यांच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रमाच्या वेळी विविध कार्यक्रम तसेच सूत्रसंचालन करत असताना उपयोगी पडणार आहे. एवढेच नाही तर लहानांपासून  थोरापर्यंत ही माहिती उपयोगी पडणारी आहे. चला तर मग राजमाता जिजाऊ जयंती  माहिती कविता निबंध चारोळी भाषण शायरी पाहूया.
राजमाता जिजाऊ माहिती कविता निबंध चारोळी भाषण शायरी
राजमाता जिजाऊ माहिती कविता निबंध चारोळी भाषण शायरी

राजमाता जिजाऊ यांची माहिती | Rajmata jijau Mahiti |जिजाबाई संपूर्ण माहिती |jijabai sampurn mahiti

         राजमाता जिजाऊ यांची माहिती पाहत असताना ती जर आपल्या मराठीत असेल तर वाचायला देखील किती छान वाटते.Rajmata Jijau Inforamtion in Marathi वाचल्यानंतर खरोखर तुम्हाला एक आदर्श माता म्हणजे जिजाऊ/ जिजाबाई याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही.राजमाता जिजाऊ यांची जयंती १२जानेवारी ला मोठ्या धूम धडाक्यात साजरी केली जाते 
 

राजमाता जिजाऊ निबंध   | Rajmata Jijau /jijabai Nibandh  

 

जिजाबाई यांचे बालपण|jijai yanche balpan

 
                  राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महराजांवर केलेल्या संस्कारमुळेच हिंदवी स्वराज्य निर्माण झाले.यातूनच त्या एक आदर्श माता होत्या याची कल्पना येते,म्हणूनच त्यांना काही जिजाबाई यांना अभ्यासक राष्ट्रमाता जिजाऊ म्हणतात.राजमाता जिजाऊ म्हणजेच जिजाबाई.जिजाऊ यांची माहिती पाहत असताना त्यांच्या जन्माविषयी व बालपण याविषयी माहिती आपण पाहूया.
 

जिजाबाई यांची कौटुंबिक माहिती | jijabai koutumbik mahiti

 जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड या  ठिकाणी 12 जानेवारी 1598 रोजी झाला.त्यांचे वडील सरदार लखुजी जाधव अतिशय पराक्रमी होते.लहान वयातच जिजाऊ यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्यासोबत झाला.विवाह झाल्यानंतर त्या सासरी आल्या.पती शहाजीराजे कायम विविध मोहिमांवर असत. परंतु राजमाता जिजाऊ एक स्त्री असून देखील कायम त्यांना त्यांच्या कामात मदत करत असत. जिजाऊनचे पती शहाजीराजे भोसले आदिलशहाच्या दरबारात एका मोठ्या पदावर कार्यरत होते. 
 

जिजाबाई आणि शहाजी यांचा विवाह | jijai ani raje shahji vivah 

 
       शहाजीराजे यांनी अनेक लढायांमध्ये त्यांनी आदिलशाहीला विजय मिळवून दिला होता. या पराक्रमामुळे आदिलशहाकडून त्यांना अनेक जहागिऱ्या भेट मिळाल्या होत्या. या पैकीच पुणे ही एक जहागिरी .ज्यावेळी शहाजीराजे परमुलखात मोहिमेवर असत त्यावेळी त्यांच्या जहागीऱ्यातील कारभार पाहण्याची जबाबदारी राजमाता जिजाऊ शहाजीराजे यांच्या अनेक विश्वासू लोकांच्या मदतीने कारभार पाहत असत.वडिलांचा जास्त सहवास मिळत नसलेल्या पुत्र बाल  शिवबा वर देखील लहान वयातच त्यांना थोरामोठ्यांच्या गोष्टी सांगून त्यांच्यावरती योग्य असे संस्कार करण्याचे काम केले. मुगल इथल्या गोरगरीब जनतेला कशा पद्धतीने छळत आहेत याची जाणीव जिजाऊ यांनी करून दिली. म्हणूनच स्वराज्य स्थापनेची ठिणगी शिवाजी महाराजांमध्ये चेतवण्याचे काम जिजाबाई यांनी केले असे म्हटले तरी वावगे होणार नाही.म्हणूनच  त्या एक आदर्श माता,राजमाता, राष्ट्रमाता म्हणून ओळखल्या जातात. 

शिवाजी महाराज यांच्यावर संस्कार करणाऱ्या जिजाबाई | shivajiavr sanskar karnarya jijabai 

  छत्रपती शिवाजी महाराजांना अगदी लहान वयातच राजकारणाचे धडे त्यांनी दिले. शिवाजी महाराजांवर जाणीवपूर्वक अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या आणि याचाच परिणाम म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये  मोगलांच्या कचाट्यातून रयतेची मुक्तता केली पाहिजे भावना दृढ झाली याचे सर्व श्रेय माता जिजाऊ यांना द्यावे लागते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या या मोहिमेसाठी ते कित्येक महीने बाहेर असताना माता जिजाऊ जातीने राज्यकारभारायमध्ये लक्ष देत होत्या.

शिवाजी महाराज यांना कारभारात मदत |jijabai shivaji maharaj yana karbharat madat 

अफजलखानाचा वध असेल, छत्रपती शिवाजी महाराज आग्रा मध्ये बंदी असताना राज्यकारभार पाहण्याची जबाबदारी असेल त्या सर्व अतिशय खंबीरपणे सांभाळत होत्या.अशा या महान मातेचा ,रयतेप्रती काळजी असणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचा पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकानंतर अवघ्या काही दिवसातच 17 जून  1674 रोजी रायगडाच्या पायथ्याशी मृत्यू झाला. 17 जून हा दिवस राजमाता जिजाऊ यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो.

     असा छान राजमाता जिजाबाई  निबंध लिहून त्यांचा जीवन परिचय करू शकता यात खालील माहितीची भर घातल्यास तो अधिक छान होईल.
राष्ट्रमाता जिजाऊ यांचे श्रेष्ठत्व जाणून घेण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही गुण आपण अभ्यासूया यातून  त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अजूनच सखोल दर्शन होईल.
 

राजमाता जिजाबाई यांची संपूर्ण माहिती | rajmata jajai yanchi sampurn mahiti 

 
ही माहिती पाहत असताना आपण त्यांच्या अंगी असणाऱ्या गुनातून त्यांचे व्यक्तिमत्त्व आपल्याला जाणवून येईल.

राजमाता जिजाऊ यांच्या अंगी असलेले गुण |jijabai Yanche Gun 

 

1. जिजाऊ आदर्श माता | Jiaju Aadrash Mata 

           वरील सर्व विवेचन पाहिल्यानंतर आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची केलेली  जडणघडण  यावरून त्या  एक आदर्श माता होत्या याची कल्पना आपल्याला आलीच असेल.अगदी लहान वयात त्यांनी शिवाजी महाराजांवर  संस्कार केले. शिवबाला राम -लक्ष्मण यांच्या गोष्टीच्या रूपाने तू देखील असे रामराज्य आणले पाहिजे अशी जाणीव करून दिली. छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ यांच्या गर्भामध्ये वाढत  असताना असं म्हणतात की त्यावेळी जिजाबाई यांना डोहाळे लागले होते. या डोहाळ्यामध्ये जिजाऊ यांना पर्वतावर चढावे, हत्तीच्या पाठीवर बसावे, हातात तलवार घेऊन लढावे असे वाटत होते थोडक्यात काय तर जिजाऊ एक आदर्श माता होत्या.
 

2. जिजाऊ आणि राजनीती | ijau mhnje Rajnitichi Jaan  

                             राजमाता जिजाऊ यांना राजनीती ची सखोल जाण होती. ज्यावेळी पती शहाजीराजे विविध मोहिमांवर असत  त्यावेळी अंतर्गत बंडाळी कशी मोडून काढायची ? हे त्यांना चांगलेच माहिती होते. त्याचबरोबर अफजलखानाच्या  वधावेळी अफजलखानाला pratpgad  पायथ्याशी कसे बोलवायचे याची कल्पना जिजाऊ यांना होती. आपला मुलगा शिवबा शत्रुच्या कैदेत असताना हार न मानता राज्यकारभार चालू ठेवणे आणि त्या जोडीला शिवाजी महाराजांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणे यातून त्यांना राजनीतीची खूपच जाण होती हे आपल्या लक्षात येते.
 

3.जिजाबाई एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व | Prernadayi Vyktimttv  

       जिजाऊनचे पती शहाजीराजे आणि पुत्र शिवाजी राजे यांचे पराक्रम पहिले की आपल्या लक्षात येते की, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री ही कशी खंबीरपणे उभी असते. आणि हीच खंभीरता राजमाता जिजाऊ यांच्या मध्ये होती, म्हणूनच त्या एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होत्या. माता जिजाऊ यांच्या प्रेरणेमुळे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची स्वप्न पाहू शकले व स्वराज्य निर्माण करू शकले.असं म्हणतात की राजमाता जिजाऊ नसत्या आपल्या महाराष्ट्राला स्वराज्य निर्माण करणारा शिवबा मिळाला नसता आणि ते खरे आहे. थोडक्यात काय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामागे पराक्रमामागे  त्यांची आई राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या सिंहाचा वाटा आहे.
 

4. जिजाऊ एक धाडसी स्त्री | Dhadsi Stree 

             राजमाता जिजाऊ यांचा धाडसीपणा हा देखील एक विशेष केली होता. ज्यावेळी हिंदुस्थानावर शाहिस्तेखान आक्रमण करण्यासाठी आला आणि  त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर सिद्दी जोहरशी  लढा देत होते. अशावेळी जिजाबाई हतश  झाल्या नाहीत तर त्यांनी स्वराज्याचे  गड किल्ले त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वतः स्वीकारली . छत्रपती शिवाजी महाराज लढाईमध्ये गुंतलेले असताना राजगडावरून सर्व कारभार सांभाळण्याची काम त्यांनी केले. किल्लेदार,सैनिकांना योग्य असेल मार्गदर्शन केले एवढेच नव्हे तर पन्हाळ्यामध्ये आपला मुलगा अडकला आहे.अशावेळी त्या नेताजी पालकरांना म्हणतात की मी माझ्या बाळाला स्वता सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.मी स्वत जाऊन जोहराचे मस्तक छाटून आणणार आहे.यातून त्यांचा धाडसी स्वभाव आपल्याला दिसतो.
 

5.जिजाबाई आणि माणुसकी | jijabai yanchi Manuski 

                        राजमाता जिजाऊ यांना केवळ आपल्याच परिवाराची काळजी होती असे नव्हे तर आपली सर्व प्रजा सुखी राहिली पाहिजे. त्या दिन दुबळ्या प्रजेची आपण जबाबदारी स्वीकारली पाहिजे अशी भूमिका त्यांची होती. कोंडाणा किल्ला जिंकताना सरदार तानाजी मालुसरे स्वराज्याच्या कामी आले,त्यावेळी राजमाता जिजाऊ स्वतः त्यांच्या घरी गेल्या एवढेच नव्हे तर रायबाच्या लग्नामध्ये सर्व जबाबदारी स्वतावर घेऊनलग्नाला जातीने हजर राहिल्या म्हणजेच काय तर त्यांच्याकडे प्रचंड माणुसकी होती. 
                  राजमाता जिजाऊ या आदर्श माता,आदर्श पत्नी, आणि एक आदर्श सून म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. त्याचबरोबर आपल्यावर असलेल्या जबाबदारीची जाण,लढाई युद्धनीती यांचे ज्ञान होते. गुणांचा खजिना म्हणजे जिजाऊ. या महान मातेचे गुणगान माझ्या एका स्वरचित कवितेतून करून त्यांना मुजरा करूया ——–
 

 राजमाता जिजाऊ यांच्यावर कविता | Rajmata Yanchyavr Kavita 

      राजमाता जिजाऊ यांचे व्यक्तिमत्त्व नेमके कसे होते? ते कवितेतुन पाहूया.
 
जिजाऊ हि केवळ माता नव्हती
 
तर होती ती राजमाता
 
राजमाता कसली जिने स्वराज्य निर्माण करण्याची ठिणगी
 
पुत्र शिवबा मध्ये गरबा मध्येच लावली होती
 
हिंदवी स्वराज्य निर्माण झाले पाहिजे ही जिची जिद्द होती
 
ती महाराष्ट्राची कन्या जिजाऊ होती
 
मोगलांच्या अमानुष वागण्याची जिला भारी चीड होती
 
वेळप्रसंगी हातामध्ये तलवार घेण्याचीही तयारी  होती
 
 
जिजाऊ ही माता नवीन वीर माता होती
 
स्वराज्यासाठी पुत्राला पणाला लावणारी त्यागमूर्ती होती 
 
जिजाऊ गुणांची खान होती 
 
अखिल भारत वर्षाचा जाज्वल्य अभिमान होती 
 
जिजाऊ ही केवळ माता नव्हती ————
 
             या वरील कवितेतून राजमाता जिजाऊ या जणू काही  स्वराज्य निर्मीतीच्या जबाबदारीनेच या  भुतलावर अवतरल्या होत्या असेच  म्हणावे लागेल.

 राजमाता जिजाऊ यांचा स्मृतिदिन |Rajmata Jijau Smrutidin 

             दरवर्षी साधारणपणे 15 जूनच्या दरम्यान शाळा भरत असतात.शाळा भरल्यानंतर अवघ्या 1 ते 2 दिवसांमध्ये 17 जून रोजी राजमाता जिजाऊ यांचा स्मृतिदिन किंवा पुण्यतिथी साजरी केली जाते. शाळा-महाविद्यालयांमध्ये, शासकीय कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले जाते. या अभिवादनाच्या वेळी भाषणाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली जाते. त्यांचा गुण  गौरव केला जातो. चला तर मग विद्यार्थी मित्रांना या स्मृतिदिनानिमित्त किंवा त्यांच्या जयंतीच्या वेळी या नमूना भाषणाची नक्कीच मदत होईल.
 

राजमाता  जिजाऊ भाषण | Rajmata Jijau Bhashan 

 
   अध्यक्ष महाशय, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो !आज मी आपणास राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त / स्मृतिदिनानिमित्त म्हणजेच त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त  आपणास राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माझे विचार भाषण रूपाने आपल्यापुढे  मांडणार आहे. तरी  आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. जिजाऊ कोण होत्या तर —-
 
                एक स्त्री असूनही जिला स्वराज्याची आस होती,
 
                म्हणूनच गर्भामध्ये शिवबा  वाढत असताना,
 
                 जिला तलवारबाजी करण्याची भारी हौस होती.
 
         थोडक्यात काय तर या भूतलावर काही व्यक्ती असामान्य असतात. अशाच असामान्य व्यक्तिमत्त्वातील एक व्यक्तिमत्व म्हणजे राजमाता नव्हे नव्हे राष्ट्रमाता म्हणून ज्याना ओळखले जाते अहो  कोण म्हणून काय विचारता ? अहो ती आहे जिजाऊ,जिजाबाई.जिजाऊंचा जन्म सिंदखेडराजा या बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्या खेडेगावांमध्ये 12 जानेवारी 1598 रोजी झाला.वडील लखुजीराव जाधव हे अतिशय पराक्रमी होते आणि म्हणूनच कि काय ही पराक्रमी वृत्ती जिजाऊ यांच्या मध्ये देखील होती. अगदी लहान वयामध्ये इतर मुली ज्या वेळी सागरगोटे खेळायच्या त्या वेळी जिजाऊ मात्र हातामध्ये तलवार घेऊन तलवारबाजी करण्यामध्ये दंग असायच्या .अगदी लहान वयातच त्यांनी अनेक युद्धकौशल्य अंगीकृत केली होती आणि याचाच फायदा छत्रपती शिवाजी महाराजांना मुगल फौजे  विरुद्ध तयार करताना झालेला जिजाउना झाला. 
 
                 महाराष्ट्र मध्ये मोगलांनी हाहाकार माजवला होता.पती शहाजीराजे कायम मोहिमांवर असत. अशावेळी या महाराष्ट्रातील रयतेला इथल्या आया-बहिणींना सुखी कोण ठेवनार? किती दिवस ज्या रयतेला  कोण वाली नाही अशी रयत अन्याय जुलूम सहन करणार? अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे ? कोणीतरी बंड  केले पाहिजे. ही भावना त्यांच्या मनामध्ये कायम होती.काहीही करून हा मुघल सत्तेची मस्ती उतरवली पाहिजे. याचे उत्तर त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या मुलाला म्हणजे शिवबाला अगदी लहान वयामध्येच परीच्या, भुताच्या गोष्टी न सांगता राम लक्ष्मण, रावण यांच्या गोष्टी सांगून हे रावण  म्हणजे मुघल सत्ता.रायतेला राम राज्य आलेच पाहिजे. अशी जाणीव त्यांनी बाल शिवबा मध्ये निर्माण केली. आपला मुलगा शिवबाच हिंदवी स्वराज्य निर्माण करु शकतो. ही जाणीव त्यांना झाली म्हणूनच लहान वयातच त्यांनी शिवाजी महाराजांवरती अनेक मोठ्या जबाबदाऱ्या टाकायला सुरुवात केली.
 
             स्वराज्य निर्मिन्या जिने मागेपुढे न पाहिले,
 
             स्वराज्याच्या कामी तिने ,
 
             शिवबाच्या रुपाने,
 
            आपले काळीजच वाहिले.
 
 
   मुघल सत्ता किती क्रूर आहे.त्यांच्या विरोधात बंड केल्यानंतर ते कधीही आपल्या मुलाचे बरेवाईट करतील असा संकुचित  विचार न करता एक प्रकारे स्वराज्य निर्मितीसाठी आपली माता,माया, ममता बाजूला ठेवून लहान वयात शिवाजी महाराज यांच्यावरती संस्कार,राजकारणाचे धडे देण्याचे काम जिजाऊ यांनी  केले.स्वराज्याचा कारभार वाढत असताना त्या कारभारामध्ये मदत देखील केली. आग्र्याला शिवाजी महाराज कैद असताना न डगमगता एका बाजूने महाराजांना कशा पद्धतीने सोडवता येईल तर दुसऱ्या बाजूने स्वराज्याची घडी विस्कटता कामा नये यासाठी आपल्या काही विश्वासू लोकांना मदतीला घेऊन राज्यकारभार देखील पाहिला. म्हणूनच ती केवळ माता नव्हती राष्ट्रमाता हे अगदी खरेच आहे. 
         छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यकारभार करत असताना अनेक जाती,धर्मातील लोकांना आपल्या सैन्यामध्ये सामावून घेतले.कधी कोणावर अन्याय केला नाही.परस्त्री माता समान.ही भूमिका ठेवली.हे सर्व  जिजाऊ मातेचे संस्कार होते म्हणून झाले या मातेला माझा मानाचा मुजरा.
        राजमाता जिजाऊ यांच्या विषयी आज  मी जे काही दोन शब्द सांगितले ते आपण शांत चित्ताने ऐकून घेतले त्याबद्दल मी आपला / आपली आभारी आहे.धन्यवाद!
 
          अलिकडे जग खूप गतिमान झाले आहे. लोक घड्याळाच्या काट्यावर धावत असतात त्यांना जे हव ते अगदी थोडक्यात हवे.अशा लोकानी किमान या चरोळ्या जरी वाचल्या तरी माता जिजाऊ काय होत्या हे त्यांना समजेल. 
 

राजमाता जिजाऊ चारोळी ,शायरी | Rajmata Jijau Charoli,Shayri 

 
               1. जिजाऊ होत्या म्हणून शिवराय घडले, 
 
                  शिवराय होते म्हणून स्वराज्य घडले, 
 
                  स्वराज्य घडले म्हणून नंदनवन काय हे
 कळले, 
 
                अहो पण हे सर्व जिजाऊ मुळेच घडले.
 
 
 
            2. जिजाऊ केवळ शिवबाची माता नव्हती,
 
                तर ती स्वराज्याची राजमाता होती, 
 
                अहो ! अखिल भारत खंडाची राष्ट्रमाता होती,
 
                स्वातंत्र्याची वाट दावणारी एक पहाट होती.
 
 
 
              3.तुम्ही होतात म्हणून शिवबा घडला,
 
              तुम्ही होतात म्हणून स्वाभिमान वाढला,
 
             तुम्ही होतात म्हणून सह्याद्री आशेने पाहू लागला, 
 
             माता जिजाउमूळेच मराठी माणूस उभा राहिला. 
 
 
   या जिजाऊ  चरोळ्या खूप काही सांगून जातात. ह्या चरोळ्या आपण  मराठी शायरी म्हणून सादर करू शकता.   आजच्या या लेखातून  Marathi Information Jijau देण्याचा प्रयत्न केला ती देत असताना राजमाता  जिजाऊ माहिती,गुण,कविता, भाषण व निबंध यांच्या माध्यमातून त्यांचे व्यक्तिमत्व कसे होते हे सांगण्याचा प्रयत्न केला. ही माहिती कशी वाटली नक्की कमेन्ट करा. धन्यवाद! 
 

FAQ

१. जिजाबाई यांची जयंती किती तारखेला असते? 
१२ जानेवारी 
 

२.राजमाता जिजाऊ यांना किती भाऊ होते? 

चार 

३.राजमाता जिजाऊ यांची समाधी कोठे आहे? 

रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावी

Leave a Comment