A रामाचा पाळणा 2023pdf| ramacha palana 2023 pdf

चत्र महिन्यामध्ये रामनवमी हा दिवस आपण रामाचा जन्मदिन म्हणून साजरा करतो. चैत्र महिन्यातील  नवव्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला , म्हणूनच हा दिवस रामनवमी म्हणून ओळखला जातो. अखंड भारतामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून प्रभू रामयांना अतिशय उच्च कोटीचे स्थान आहे. भगवान श्री विष्णू यांचा सातवा अवतार म्हणजे राम. प्रभू राम यांचा जन्म रामनवमीच्या दिवशी भर दुपारी बारा वाजता झाला. प्रभू राम यांचा जन्मोत्सव गावा गावांमध्ये , मंदिरा मंदिरांमध्ये खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राम भक्त मंडळी रामनवमीच्या दिवशी सकाळपासूनच मंदिरामध्ये गर्दी करतात.लोक राम नवमीच्या एकमेकाना शुभेच्छा देतात  राम नामाचा गजर करतात. रामनवमीच्या उत्सवामध्ये सर्वात आकर्षणाचा भाग असतो तो म्हणजे दुपारी बारा वाजता प्रभू राम यांच्या जन्माचा आनंदोत्सव म्हणून बोलला जाणारा राम जन्माचा पाळणा यालाच रामाचा पाळणा म्हणून देखील ओळखले जाते. बाळा जो जो रे असे म्हणून रामाचा पाळणा अगदी भक्ती भावाने  भक्तजन बोलत असतात. चला तर मग आज आपण यावर्षी आगळावेगळा राम महिमा सांगणारा रामाचा पाळणा 2023 पाहूया.याला राम चरित्र पाळणा असेही म्हणू शकतो.

रामाचा पाळणा 2023 pdf
रामाचा पाळणा 2023 pdf

रामाचा पाळणा  मराठी 2023 PDF|ram janmacha palana pdf  2023 

राम जन्माचे तथा राम जन्माचा महिमा सांगणारे अनेक पाळणे आहेत. मात्र आजचा आपला हा पाळणा प्रभू राम यांचे संपूर्ण चरित्र पाळण्याच्या रूपात सांगत असल्यामुळे हा पाळणा सर्वांना आवडणार आहे.  रामाचे संपूर्ण चरित्र या पाळण्यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर मग राम जन्मोत्सव पाळणा 2023 पाहूया

राम जन्मोत्सव पाळणा 2023 ram janmacha palana ramacha palana 

 

पहिल्या दिवशी बोलली  गंगा

नका बायांनो करू दंगा

दशरथ राजाला जाऊनी सांगा 

प्रभू राम जन्मला

जो बाळा जो जो रे जो ||१||

 

दुसऱ्या दिवशी बोलली भागा

आता  तुम्ही आता चरणाशी लागा

दान चुड्याचे रामाला मागा 

जो बाळा जो जो रे जो  ||२||

 

तिसऱ्या दिवशी बोलली उमा

बाळाच्या रूपाला नाही हो  सीमा

असे बोलली महादेव भीमा

जो बाळा जो जो रे जो ||३ ||

 

चवथ्या  दिवशी बोलली तारा

आला सोनार आपुल्या घरा

धनुष्यबाण रामाला करा

जो बाळा जो जो रे जो ||४ ||

 

पाचव्या दिवशी सखी बोलली

रामाची सीता हो रावणाने नेली

मारुती देवाने लंका जाळली

जो बाळा जो जो रे जो ||५ ||

 

सहाव्या दिवशी सखू बोलली

लक्ष्मणाला शक्ती हो लागली

पर्वत उचलाया गेला मारुती

जो बाळा जो जो रे जो ||६ ||

 

सातव्या दिवशी झाला कल्लोळ 

राम जन्मला रूप सावळे

राम जाहला रावणाचा काळ

जो बाळा जो जो रे जो ||७ ||

 

आठव्या दिवशी लीला बोलली

राजा दशरथा  पुत्र गोड झाला

कौशल्या माईने झोका हो दिला

जो बाळा जो जो रे जो ||८||

 

नवव्या दिवशी नवल बाळाचे 

अशी खुलली कमळाची कळी 

आनंदाला पारावार नाही 

जो बाळा जो जो रे जो ||९||

 

दहाव्या दिवशी निघाला रामराजा

संगे घेऊन वानरांच्या फौजा 

रावणाचा वध  करुनी विभीषण  करविले  राजा 

जो बाळा जो जो रे जो ||१० ||

 

अकराव्या दिवशी अवतार बदलला

पांडवांना पुढे घेऊन निघाला

कंस मामाचा वध केला 

जो बाळा जो जो रे जो ||११ ||

 

रामाचा पाळणा २०२३ अर्थ | ram palana meaniang marathi

पूर्वीपासूनच देव देवतांचे पाळणे बोलण्याची परंपरा हिंदू धर्मामध्ये आहे. आपल्या घरामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर आपण ज्या पद्धतीने बाळासाठी गोडवे गात असतो. अगदी त्याच पद्धतीने या भूतलावर हिंदू धर्मामध्ये झालेल्या देव देवतांचे पाळणे बोलले जातात. रामाच्या पाळण्यामध्ये प्रभू राम यांचा जन्म कोणाच्या पोटी झाला? त्यानंतर प्रभू राम यांनी या सृष्टीवर कोणते कार्य केले? कोणते आदर्श लोकांपुढे ठेवले ? हे या पाळण्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

थोडक्यात कवितेच्या भाषेमध्ये रामाचे चरित्र सांगण्याचा प्रयत्न या पाळण्यामधून झालेला आपल्याला दिसतो. यामध्ये प्रभू श्रीराम यांनी मारुतीच्या मदतीने रावणाशी केलेली युद्ध त्यामध्ये प्रभू राम यांना मिळालेला विजय याचे देखील वर्णन आहे. सृष्टीमध्ये वाईट आहे अस्तित्व जास्त दिवस टिकत नाही म्हणूनच की काय लंकापती रावण याचा नाश करून प्रभू रामाने विभीषण या रावणाच्या विवेकी भावाला लंकेचा राजा केले. थोडक्यात या पाळण्याच्या माध्यमातून प्रभु श्रीराम नेमके कसे होते? हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. रामाच्या पाळण्याचा अर्थ केवळ वाचून उपयोग नाही तर राम आपल्या जीवनामध्ये यायला हवा हीच खरी रामनवमी असेल.

रामाचा पाळणा 2 ramacha palna 2 

रामाचे अनेक पाळणे आहेत हा पाळणा देखील आपल्याला आवडेल. 

                                   रामाचा पाळणा 2 

रामाचा पाळणा पीडीएफ | ramacha palana pdf

रामाचा पाळणा आपल्याकडे पीडीएफ स्वरूपात कायमस्वरूपी रावा यासाठी आम्ही आपल्याला ramacha palana pdf रूपात देत आहोत तो आपण कायमस्वरूपी संग्रहित ठेवावा.

                                       DOWNLOAD 

रामाचा पाळणा मराठी lyric | रामाचा पाळणा गाणे |  ramacha palana marathi song

 

Leave a Comment