Pराम नवमी शुभेच्छा मराठी 2023 | ram navami wishesh in marathi 2023

राम नवमी शुभेच्छा मराठी 2023 | ram navami wishesh in marathi 2023 

हिंदू धर्मातील पहिला महिना म्हणजे चैत्र महिना या चैत्र महिन्याची सुरुवात गुढीपाडवा या सणाने होते तर या चैत्र महिन्यातील शुक्लपक्ष नवमी म्हणजेच चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी जो एक मोठा उत्सव साजरा केला जातो तो उत्सव म्हणजे रामनवमी होय. राम नवमी म्हणजे काय ? तर ज्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला तो दिवस आपण रामनवमी म्हणून साजरा करतो. भगवान विष्णू ने या सृष्टीवर येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी विविध अवतार घेतले त्यातील सातवा अवतार म्हणजे प्रभु श्रीरामांचा अवतार होय. प्रभू श्रीराम यांचे वडील राजा दशरथ आणि माता कौशल्या यांच्या पोटी झाला. म्हणूनच आज आपण ज्यांना एक वाणी, एक बानी एक पत्नी अनेक आदर्श पुरुष म्हणून गौरवले जाते अशा प्रभू श्रीराम यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला आपले मित्र नातेवाईक यांना ram navami wishesh in marathi 2023 देता यावेत म्हणूनच आज आम्ही आमच्या लेखाच्या माध्यमातून रामनवमी शुभेच्छा मराठी 2023 घेऊन आलेलो आहोत. या रामनवमी शुभेच्छा आपण श्रीराम नवमी स्टेटस ठेवत असताना देखील वापरू शकता. ram navami shubhechaa in marathi चा संग्रह आपल्याला नक्की आवडेल.आजच्या लेखात राम नवमीच्या शुभेच्छांबरोबर राम नवमी मराठी sms, राम नवमी फोटो,राम नवमीचे गाणे व रामाचा पाळणा देखील देत आहोत.ram navami caption देखील आपल्याला नक्कीच आवडेल.. चला तर मग आजच्या रामनवमी शुभेच्छा मराठी 2023 ला सुरुवात करूया.

 

राम नवमी शुभेच्छा मराठी 2023

 

राम नवमी शुभेच्छा (toc)

राम नवमी शुभेच्छा मराठी 2023 | ram navami shubhechaa marathi 2023

 

ज्यांचे नाव प्रभू राम आहे

ज्यांचे गाव आयोध्या आहे

असे वंदनीय रघुनंदन 

राम यांना कोटी कोटी वंदन.

श्रीराम नवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 

 

 

एक बानी एक वचनी प्रभू श्रीराम आहे 

म्हणून तर कित्येक वर्षे झाली 

श्रीराम सर्वांचा आदर्श आहे 

रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा!

 

 

 

राम नाम घेऊन उपयोग नाही

राम आचरणात यायला हवा

हीच खरी या वर्षीची राम नवमी

रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

 

 

ज्याला बनायचं आहे आदर्श 

त्याला दहा ग्रंथ वाचण्याची गरज नाही 

श्री रामाचा एक जरी गुण त्याच्याजवळ आला 

तरी त्या माणसाच्या जीवनाचे सोने होईल 

रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा ! 

 

 

एक आदर्श पुत्र म्हणजे राम

एक आदर्श भाऊ म्हणजे राम 

एक आदर्श पति म्हणजे राम 

एक आदर्श पिता म्हणजे राम 

उगीच नाही मर्यादा पुरुषोत्तम राम 

रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा! 

 

 

श्रीराम नवमी व्हाट्सअप स्टेटस मराठी | ram navami what’s apps status in marathi

 

रामनवमीच्या दिनी प्रभू रामाने जन्म घेतला 

दृष्ट राक्षसांचा संहार केला 

बोलो प्रभू राम की जय!  

 

 

आजच्या कलियुगात बिघडत चाललेल्या कुटुंब व्यवस्थेला 

कोणा कायद्याची गरज नाही कारण 

कायदा केल्याने माणूस सुधारत नाही  

गरज आहे मनामनात उदात्त विचार पेरण्याची 

ते सामर्थ्य सर्व प्रभूरामांच्या चरित्रात आहे 

अशा प्रभू रामांना रामनवमीनिमित्त कोटी कोटी वंदन.

 

 

प्रभू राम यांना आदर्श माना 

जीवनाची सगळी गुपिते जाना 

राम आचरणात आणा 

राम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा!

 

 

 

राम नवमी फोटो | ram navami image in marathi 

रामनवमी म्हटल्यानंतर प्रभुराम यांना वंदन करण्यासाठी प्रत्येकालाच रामनवमी फोटो  आवडत असतात म्हणूनच आम्ही प्रभू राम यांच्या जीवनाचा परिचय करून देणारे काही फोटो आपणासमोर सादर करीत आहोत.

राम नवमी फोटो
राम नवमी फोटो

 

 

राम नवमी बॅनर मराठी | ram navami banner in marathi 

 
 
राम नवमी बॅनर 2023
राम नवमी बॅनर

 

 
 

आयोध्या नगरीची  महिमा मोठी 

राम यांच्या पावन पद स्पर्शाने 

सर्व जगाची दुःख नाश झाली 

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

 

 

ज्याला छंद नाही राम नामाचा 

तो देह काय कामाचा 

तो तर बिन कामाचा 

म्हणून धावा करा रामाचा 

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

 

 

राम नवमी मराठी greetings| happy ram navami wishesh in marathi 2023

 

संकटे कुणाला चुकत नाहीत 

अगदी रामाला देखील चुकली नाहीत

न डगमगता संकटाना प्रभू राम यांच्यासारखे तोंड द्या 

हीच खरी रामनवमी 

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

 

 

रामनवमीनिमित्त आपल्याला आणि 

आपल्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 

 

 

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी 

हे नाथ नारायण वासुदेव 

श्रीराम नवमीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! 

 

 

जीवन करायचे आहे आनंददायी 

मुखामध्ये असू द्या रामनामे 

रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा! 

 

 

राम नाम बोलायला ना लागतो पैसा 

ना लागतो खूप मोठा खर्च 

नका घालवू जीवन व्यर्थ 

जगायला हवा समर्थ 

राम नामात आहे ते सर्व सामर्थ्य 

रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा!  

 

 

ज्याच्या मुखी रामनाम आहे 

सर्वात सुखी आहे 

राम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा ! 

 

 

राम नवमी शुभेच्छा व्हिडिओ| ram navami apratim shubechha vedeo

 आमचे हे लेख वाचा 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment