लढवय्ये महाराणा प्रतापसिंह | Ladhvayye Maharana Pratapsinh

 आजच्या या लेखामध्ये आपण लढवय्ये महाराणा प्रताप सिंह म्हणजेच महाराणा प्रताप यांच्या लढवय्ये वृत्तीची माहिती पाहणार आहोत. 

   राजस्थान प्रांतातील एक शूर,वीर, महापराक्रमी व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराणा प्रताप.ज्यांनी हिंदुस्तान मध्ये मोगलांची पळता भुई थोडी केली आणि आपला साम्राज्यविस्तार केला. त्यांचा लढवय्येपणा पाहण्या अगोदर  त्यांचा थोडक्यात जीवन परिचय करून घेऊया.

लढवय्ये महाराणा प्रतापसिंह
लढवय्ये महाराणा प्रतापसिंह

लढवय्ये महाराणा प्रताप सिंह यांचा जीवन परिचय Ladhvayye Maharana Prtapsinh Jivan Parichay 

                    महाराणा प्रताप सिंह म्हणजेच महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी राजस्थानातील कुम्बलगड या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव उदयसिंह होते व आईचे नाव जयवंताबाई होते.लहानपणापासूनच पराक्रमी वडील उदयसिंह यांचा त्यांच्यावर ती प्रभाव होता आणि आपण आपल्या वडिलांप्रमाणे काहीतरी पराक्रमी कार्य करावे असे त्यांना मनोमन वाटत होते,म्हणुनच त्यांनी पुढे आपल्या शासन काळात अखिल हिंदुस्तान मध्ये मुगलांचा हस्तक्षेप कमी व्हावा यासाठी मुगलांशी कडवी झुंज दिली म्हणूनच त्यांना लढवय्ये,शूर, वीर पराक्रमी स्वाभिमानी अशा अनेक उपाध्या लावल्या जातात या लेखातून आपण  लढवय्ये महाराणा प्रतापसिंह कसे होते याची माहिती पाहणार आहोत. 

1. महाराणा प्रताप सिंह आणि हल्दीघाटी ची लढाई | Maharana Prtapsinh Ani Haldi Ghatichi Ladhai 

                                           महाराणा प्रताप यांच्या कारकीर्दीतील सर्वात मोठी लढाई म्हणजे मोगल सम्राट अकबराच्या सैन्याच्या बरोबर झालेली हल्दीघाटी की लढाई होय.हल्दीघाटीच्या लढाईमध्ये सम्राट अकबराने या लढाईची सर्व जबाबदारी राजा मानसिंह याच्यावर सोपवली होती. महाराणा प्रतापसिंह यांच्या सैन्यापेक्षा कितीतरी मोठा फौजफाटा राजा मानसिंग यांच्या जवळ अकबराने दिला होता. तरी देखील महाराणा प्रताप यांनी मोगल सैनिकांना सळो की पळो करून सोडले.महाराणा प्रताप यांनी या लढाईत मुगल सेनापतीला ठार करून आपला मोर्चा या लढाईचे नेतृत्व करणाऱ्या मानसिंग याच्याकडे वळवला. मानसिंग  लढाई करत असताना हत्तीवरून लढत   होता.तर महाराणा प्रताप  आपल्या प्रिय चेतक घोड्यावर बसून मानसिंग याचा प्रतिकार करत होते.या लढाईमध्ये मानसिंग हत्तीवर असल्यामुळे खूप उंचावर होते. त्याच्यावरती कशा पद्धतीने वार करायचा या चिंतेमध्ये महाराणा प्रताप सिंह होते मात्र याच वेळी चेतक घोड्याने आपले दोन्ही पाय मानसिंगच्या हत्तीच्या  कपाळावर ठेवले आणि महाराणा प्रताप यांनी आपल्या वजनदार भाल्याने मानसिंगवर वार करणार इतक्यात महाराणा प्रतापचा चेतक घोडा जखमी झाला आणि महाराणा प्रताप यांनी केलेला तो वार मानसिंग याला न लागता हत्तीवर असणाऱ्या माहुताला लागला.मात्र महाराणा प्रतापांचा आणि त्यांच्या घोड्याचा करारीपणा किंवा धाडस  पाहून मानसिंग पुरता घाबरला गेला आणि मानसिंग आपला जीव वाचवण्यासाठी हत्तीवरून उतरून सैनिकांच्या काफील्यामध्ये लपून बसला.  यावरून आपल्या लक्षात येईल की महाराणा प्रतापसिंह किती शूर,वीरआणि लढवय्ये होते. हत्तीवरून असणाऱ्या शत्रूला देखील घोड्यावरून प्रतिकार करणे म्हणावी तेवढी सोपी गोष्ट नाही परंतु ती हिम्मत आणि तो जिगर महाराणा प्रताप यांच्या मध्ये होता.

                    या हल्दीघाटीच्या लढाईत मुगल सैनिक पूर्ण घाबरलेले होते परंतु त्यांनी युद्धनीतीचे नियम मोडून महाराणा प्रतापसिंह यांच्या वरती बंदुकीच्या दोन  गोळ्या झाडल्या आणि त्यामध्ये ते जखमी झाले तसेच बाणाने देखील त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. हल्दीघाटीच्या लढाईत महाराणा प्रताप यांच्याबरोबर त्यांचा घोडा चेतक देखील प्रचंड जखमी झाला होता.अशा अवस्थेत जर महाराणा प्रताप शत्रूच्या हाती लागले तर अखिल हिंदुस्तानचे काय होणार? म्हणून राजपूत सरदारांनी या लढाईतून महाराणा प्रतापसिंह यांनी माघार घ्यावी व आपले प्राण वाचवावेत अशी विनंती केली.सुरुवातीला महाराणा प्रताप यासाठी तयार झाले नाहीत परंतु सरदारांनी सांगितले आपण जरी या लढाईतून माघारी गेले नाही तर आम्ही आमची शीर आणि धड वेगळे करू व प्राणत्याग करू आता मात्र महाराणा प्रताप यांना सरदारांचे ऐकण्या शिवाय कोणताच  पर्याय शिल्लक नव्हता. महाराणा प्रताप यांनी  आपल्या डोक्यावर असलेला मुकुट महाराणा प्रताप यांच्या सारखाच दिसणारा मानसिंग या सैन्याला दिला. तो मुकुट घालून जसे काय तेच महाराणा आहेत असे भासवण्यात आले.थोडक्यात काय तर आपल्या राजासाठी प्राणांची आहुती देणारे शूर वीर सैनिक यांच्यामुळेच मोठमोठी साम्राज्ये उभी राहू शकली हे नक्की.पुढे मात्र काही दिवसांनी मानसिंगला  समजले की आपण पकडलेला राजा हा तोतया आहे या घटनेने तो अजूनच घाबरला कारण अकबराला ही बातमी कळली तर तो आपला जीव घेईल ही भीती त्याला वाटत होती. 

2. महाराणा प्रतापसिंह आणि चित्तोडगड ची लढाई | Maharana Pratapsinh Ani Chitodgad Chi Ladhai 

                   मेवाड मध्ये असणारा हा एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे चित्तोडगड होय या किल्ल्याला मोगल सैन्यनी जवळ जवळ चार महिने वेढा दिला आणि आता लढल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आपल्याकडे असणार्‍या मोजक्या सैनिकांच्या जोरावर महाराणा प्रताप यांच्या सेनेने जी लढाई केली ती लढाई म्हणजे चितोडगडची लढाई होय. चार महिने वेढा,अन्नधान्याचा तुटवडा अशा परिस्थितीत महाराणा प्रताप यांच्या सैन्यांनी मुगलांशी संघर्ष केला.मात्र या संघर्षाला यश मिळाले नाही आणि या लढाईमध्ये चित्तोडगढचा किल्ला मोगलांना मिळाला. या लढाईमध्ये अनेक सैनिक मारले गेले आणि त्या किल्ल्यांमध्ये असणार्‍या महिला मोगलांच्या हाती सापडणार अशावेळी तेथील महिलांनी मुगलांच्या हाती लागू नये म्हणून जोहर केला म्हणजेच स्वतःहून आगीमध्ये स्वतःला झोकून देऊन बलिदान दिले. ही इतिहासातील अतिशय मन हेलावणारी घटना असली तरी शत्रूच्या हाती लागायचे नाही हे राजपूत लोकांमध्ये असलेली स्वाभिमानी वृत्ती केवळ पुरुष नव्हे तर महिलांमध्ये देखील दिसते हे विशेष.या चितोडगडच्या निमित्ताने बलिदान,स्वाभिमान व चारित्र्य यांचे महत्त्व अवघ्या जगाला दिसून आले. 

3.माळवा आणि गुजरात प्रांतातील लढाई | Malva Aani Gujrat Prantatil Ladhai 

               महाराणा प्रताप यांनी माळवा आणि गुजरात प्रांत देखील आपले सैन्य पाठवून मुगल सैन्यावर आक्रमण केले या आक्रमणातून खूप मोठी शस्त्रास्त्रे आणि अन्नधान्य यासारख्या बाबी महाराणा प्रताप यांच्या फौजांनी लुटून आणला. 

4. महाराणा प्रताप आणि गनिमी कावा | Maharana Pratap Aani Gnimi Kava 

                     महाराणा प्रताप यांना लढवय्ये म्हटले जाते यामागे अजून एक विशेषता  सांगता येते ती म्हणजे आपल्या जवळ कमी सैनिक असतानादेखील शत्रूवर विजय कसा मिळवावा यासाठी त्यांनी केलेला  गनिमी कावा ही  युद्धनीती अवलंबली. आपल्याकडे उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती त्याचा बारकाव्याने अभ्यास करून शत्रूला खिंडीमध्ये गाठणे आणि त्या परिसराची त्याला माहिती नसल्याचा फायदा करून घेणे या युद्धनिती ला गणीमिकावा म्हणतात.असाच गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील हिंदवी स्वराज्यासाठी वापरला होता.

5. महाराणा प्रताप यांचे छापामार तंत्र | Maharana Pratap Yanche Chapamar Tantr 

        महाराणा प्रताप यांनी ओळखले होते की मुघल सैन्याकडे अन्नधान्य आणि हत्यारे मोठ्या प्रमाणात आहेत परंतु आपल्याकडे ती नाहीत मग त्यासाठी काय करायचे तर योग्य नियोजन करून शत्रूवरती रात्रीच्या वेळी हल्ला करायचा आणि या हल्ल्यामध्ये त्यांच्या जवळ असणारी शस्त्रास्त्रे लुटून आणायची कारण का तर आपल्या जवळ असणारी शस्त्रे लुटली गेली की शत्रूसेना घाबरते  यालाच छापा तंत्र म्हणतात.या छापा तंत्राने महाराणा प्रताप यांनी शत्रूला नउमेद करण्याचे काम केले. 

                   अशा या लढवया राजा महाराणा प्रतापसिन्ह उर्फ महाराणा प्रताप यांचा मृत्यू 29 जानेवारी 1597 रोजी झाला. अखिल हिंदुस्थानात जे  काही पराक्रमी योद्धे झाले.त्यामध्ये ज्यांचे नाव अगदी अग्रस्थानी घेतले जाते असे महाराणा प्रतापसिन्ह यांचा लढवय्येपणा या लेखातून मांडण्याचा मी आज प्रयत्न केला. त्याच्या जयंतीनिमित्त वाचक वर्गाला खूप खूप शुभेचा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!

   

  

Leave a Comment