आजच्या लेखात आपण वस्तू कवितेवरील मुद्यांच्या आधारे कृती अभ्यासणार आहोत.
वस्तू कवितेवरील मुद्यांच्या आधारे कृती |
वस्तू कवितेवरीलमुद्दे |vastu kavitevaril mudde
१) वस्तू कवितेचे कवी –
२) वस्तू कवितेचा रचनाप्रकार –
मुक्तछंद /भावकाव्य
३) वस्तू कवितेचा काव्यसंग्रह –
भरुन आलेले आकाश
४) वस्तू कवितेचा विषय –
सामाजिक जाणिवेची कविता.
५) वस्तू कवितेतून व्यक्त होणारा भाव (स्थायीभाव)
– दु:ख, आनंद,
तिरस्कार
६) वस्तू कवितेच्या कवीची लेखन वैशिष्टये –
भावोत्कटता, चिंतनशील
व प्रांजळपणा यांमुळे त्यांची कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करते. सामाजिक तणावांमुळे
आलेली अस्वस्थता व्यक्त् करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील
संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्टये आहेत.
७) वस्तू कवितेची मध्यर्वी कल्पना –
कोणत्याही निर्जीव वस्तूशी
मनाला भवना जोडली गेली, की ती वस्तू अनमोल ठरते. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात.
व्यक्ती आणि वस्तू त्यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते. वस्तूंनाही भावना असतात.
हे समजून वस्तू वापराव्यात. वस्तूंशी निगडित स्नेह जपावा.
८) वस्तू कवितेतून व्यक्त होणारा विचार –
वस्तू निर्जिव असल्या
तरी वस्तूशी भावना जोडली गेली. की त्या अनमोल ठरतात व व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये
एक अतूट नाते निर्माण होते. थोर व्यक्तींच्या मृत्युनंतर त्यांच्या वापरातल्या वस्तू
संग्रहालयात जतन करुन ठेवल्या जातात हा कृतज्ञतेचा वस्तूंचा हक्क जतन करुन ठेवावा हाही
विचार व्यक्त केलेला आहे.
९) वस्तू कवितेतील आवडलेली ओळ –
‘वस्तूंना मनही नसेल कदाचित,
पण ते असल्यासाररखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात’ या ओळी आवडलेल्या ओळी आहेत. कारण इथे निर्जीव वस्तूंवर
मानवी गुणांचा आरोप केला आहे व छान चेतनगुणोक्ती अलंकार साधलेला आहे. वस्तूंना मन असल्यासारखे
वागले तर वस्तू प्रचंड सुखावतात ही कल्पना आवडली.
१०) वस्तू कविता आवडण्याची
वा न आवडण्याची कारणे –
प्रस्तुत कविता फार आवडली कारण वस्तू निर्जीव असल्यातरी त्यांना
मन असल्यासारखे वागूया, त्या सेवक असल्या तरी त्यांना बरोबरीचा मान देऊया, त्यांना
स्वच्छ ठेवूया, त्यांच्या मानलेल्या जागेवरच ठेवूया, कारण त्याच आपला स्नेह जपणार आहेत.
या सर्व कल्पना आवडल्या.म्हणून मला ही कविता आवडली.
११) वस्तू कवितेतून
मिळणारा संदेश –
प्रस्तुत कवितेत कवीचे वस्तूंना मन असल्यासारखे वागलो तर त्याही सुखावतात.
म्हणून वस्तूंशी असेच वागा, त्यांना बरोबरीचा मान द्या, स्वतंत्र खोलीत ठेवायला नको,
कारण पुढे त्याच आपला स्नेह जपणार आहेत. वस्तू आणि वयोवृध्द माणसाशी कसे वागायला पाहिजे
हेच जणू सांगितले आहे.
अशा पद्धतीने आपण जर वस्तू कवितेवरील सर्व कृषी चा अभ्यास केला तर आपल्याला वस्तू कविता समजेल त्याचबरोबर वस्तू कवितेवर येणारे रसग्रहण देखील तुम्ही सोडवू शकता त्यामुळे वस्तू कवितेवरील वर दिलेले मुद्दे किंवा वस्तू कवितेवरील कृती नीट समजून घ्या आणि ते आपल्याकडे नोंदवून घ्या.
आमचा आजचा हा वस्तू कवितेवरील कृती हा लेख आपणास कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.