A शिक्षक दिन डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस मराठी माहिती |shikshak din sarvepalli radhakrishnan janm divas marathi mahiti

आजच्या लेखात आपण 5 सप्टेंबर शिक्षक दिन सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो याविषयी सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत.

शिक्षक दिन  डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस मराठी माहिती

शिक्षक दिन  डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस मराठी माहिती

शिक्षक दिन मराठी माहिती | shikshak din marathi mahiti

5 सप्टेंबर हा आपण ‘ शिक्षक दिन ‘ म्हणून साजरा करतो. या दिवशी संपूर्ण भारतभर एक वेगळाच उत्साह असतो आपल्या गुरुविषयी आदरभाव व्यक्त करण्याचा हा दिवस होय.

5 सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली  राधाकृष्णन यांचा जन्मदिवस मराठी माहिती | 5 sepetmber doctor sarvepalli radhakrishnan janm divas marathi mahiti

 5 सप्टेंबर या दिवशी थोर तत्त्वज्ञ, विचारवंत, चिंतनशील- विचारशील व्यक्तिमत्त्व, राजनीतिज्ञ, पंडित, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व अशी आणखी काही बिरूदे लावता येतील, अशा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर रोजी झाला. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील तिरुत्तनी या ठिकाणी इ. स.१८८८ रोजी झाला.

डॉ.राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते.पण त्याचबरोबर अनेक मानाची पदेही त्यांनी भूषविलेली दिसतात.भारतातील आणि परदेशातील विविध महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये प्राध्यापक – कुलगुरू भूषविणारे हे महान व्यक्तिमत्त्व होते.राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी,रशियात राजदूत अशा अनेक गौरवशाली पदांवर ते विराजमान झाले.पण त्यांना गर्वाचा लवलेशही नव्हता.ते सतत ज्ञानमग्न असत.प्रखर बुद्धिमानी असूनही त्यांनी नीतीमूल्यांना अतिशय महत्त्व दिले.

 राधाकृष्णन यांची मराठी माहिती | radhakrishanan yanchi marathi mahiti

1.राधाकृष्णन एक तत्त्वज्ञ – 

भारतातील एक महान तत्त्वज्ञ म्हणून त्यांना ओळखले जाते.धार्मिक किंवा आध्यात्मिक  क्षेत्रात संत ज्ञानेश्वर यांनी जो चिद्विलासावाद मांडला होता.तो भारतीयांना परिचित आहे.परंतु तसाच आधुनिक काळात  पाश्चात्यांना भारतीय चिद्वाद आणि इतर तत्त्वचिंतन याची सर्वप्रथम ओळख राधाकृष्णन यांनी करून दिली.’ इंडियन फिलॉसॉफी ‘,  ‘ आयडियालिस्ट व्ह्यू ऑफ लाईफ ‘,  ‘ ईस्टर्न रिलिजन्स अँड वेस्टर्न थॉट ‘,  ‘कल्की ऑर् द फ्युचर ऑफ सिव्हिलायझेशन ‘,  ‘ भगवद्गीता ‘  , ‘ ब्रह्मसूत्रे ‘,  ‘ उपनिषदे ‘, ‘ धम्मपद ‘ हे त्यांचे ग्रंथ त्यांच्यातील थोर तत्त्वचिंतकाची साक्ष देतात.

2.राधाकृष्णन उत्तम राजकारणी

ते राजकारणात होते,पण राजकारणी नव्हते;तर उत्तम प्रशासक होते.

3.राधाकृष्णन भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार

 म्हणून ब्रिटिशांच्या काळात ते ओळखले जाऊ लागले,त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने  त्यांच्या नावाने ‘  ‘ राधाकृष्णन मेमोरियल बिकवेस्ट ‘ हा पुरस्कार ठेवला. अशा प्रकारे संपूर्ण जगाला त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचे योगदान दिले.

महाविद्यालयात असतानाच  त्यांना तत्त्वज्ञान हा विषय निवडला. वेदान्त या विषयावरील त्यांचा प्रबंध होता.तसेच पुढे त्यांनी नीतिशास्त्र या विषयावरही संशोधन केले,परंतु असे असले तरी त्यांचा वैज्ञानिक आणि चिकित्सक दृष्टिकोनाचा कधी बाऊ केला नाही.उलट आध्यात्मिकता आणि आधुनिकता यांचा समन्वय कसा साधता येईल,आणि त्याचा संपूर्ण मानव जातीसाठी कसा विधायक रीतीने उपयोग करता येईल,असा मानव जातीच्या उद्धराचाच ते सदैव विचार करत होते.

4.  राधाकृष्णन एक यशस्वी प्राध्यापक

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ‘ प्राध्यापक ‘ व्हावयाचे ठरविले.भारतातील मद्रास कॉलेज,म्हैसूर विद्यापीठ आणि नंतर इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे त्यांनी प्राध्यापक म्हणूनच काम केले.

5.राधाकृष्णन कुलगुरू जबाबदारी

कोलकाता विद्यापीठ,आंध्र विद्यापीठ आणि बनारस विद्यापीठ येथे त्यांनी ‘ कुलगुरू ‘ म्हणून आपले कार्य केले,पण आपल्या शिक्षकी पेशापासून ते कधीच निवृत्त झाले नाहीत. येथील विद्यापीठातही त्यांचे अध्यापनाचे व्रत चालूच होते.

6.राधाकृष्णन एक आदर्श शिक्षक

शिक्षणाबद्दल त्यांना अतोनात प्रेम होत.त्यांचा पिंडच मुळी खऱ्या शिक्षकाचा होता.देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण हे किती महत्त्वाचे आहे,हे त्यांच्यातील शिक्षकाने ओळखले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वामी विवेकनंद यांना ते गुरू मानत.

7. अभ्यासू व्यक्तिमत्व

राधाकृष्णन यांना शिकायला खूप आवडत होते.त्यांनी भारतीय संस्कृतातील ग्रंथ, पाश्चात्य तत्त्वज्ञान , इंग्रजी साहित्यातील अनेक कवी –  साहित्यिक या सगळ्यांचा त्यांच्या अंगोपांगासह सखोल पण सौंदर्याग्राही दृष्टीने अभ्यास केला.संपूर्ण जगाचे डोळे त्यांनी दिपावले.

सततची अभ्यासू आणि व्यासंगी वृत्ती,मुलांना शिकविण्याची आवड, देशप्रेम,ज्ञानलालसा या सगळ्या गुणांमुळे त्यांना पूर्ण विश्व ” आदर्श शिक्षक ”  म्हणू लागले.

सगळ्या शिक्षक वर्गासाठी ते प्रेरणास्रोत ठरले

 

8.राधाकृष्णन  पुरस्कार 

 १६ वेळा त्यांना जागतिक पातळीवरील नोबेल पुरस्कारसाठी नामांकन मिळाले होते.

१९५४ रोजी भारतातील सर्वोच्च किताब ‘ भारतरत्न ‘ त्यांना बहाल करण्यात आले.

 

शिक्षक दिन  डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस मराठी माहिती |shikshak din sarvepalli radhakrishnan janm divas marathi mahiti 

 

५ सप्टेंबर या दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय पातळीवरचे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रातील ‘ आदर्श शिक्षक पुरस्कार ‘ गुरुजनांना देऊन प्राचीन भारतीय परंपरेतील गुरू – शिष्य नात्याला उजाळा दिला जातो.

” शिक्षकाचं मन नेहमी नितळ, सुंदर, स्वच्छ असायला हवे “, असे खुद्द राधाकृष्णन यांनीच म्हणून ठेवले आहे.

थोडक्यात काय तर भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आणि शिक्षक दिन याबद्दल सर्व माहिती पाहिल्यानंतर आपल्या ध्यानात आले असेल की राधाकृष्णन यांना शिक्षकांविषयी किती प्रेम होते आणि म्हणूनच त्यांनी त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा असे जाहीर केले.

अशा लोबस व्यक्तिमत्त्वाचा १७ एप्रिल, १९७५ या दिवशी सर्वपल्लींनी आपल्या जगाचा निरोप घेतला.

अशाप्रकारे आमचा आजचा हा 5 सप्टेंबर शिक्षक दिन व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन मराठी माहिती हा लेख आपणास कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!

Leave a Comment