A शिवजयंती सूत्रसंचालन 2023 | shiv jayanti sutrsanchalan marathi 2023

शिवजयंती म्हटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो जल्लोष असतो त्या जल्लोषाविषयी वेगळे काही सांगायलाच नको. शिवजयंती निमित्त शाळा,महाविद्यालये,कॉलेज याचबरोबर अनेक सहकारी संस्था, सेवाभावी संस्था शिवजयंती निमित्त रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,भाषण स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करत असतात. स्पर्धा कोणत्याही असो किंवा कार्यक्रम कोणताही असो त्या ठिकाणी सूत्रसंचालन अतिशय गरजेचे असते. शिवजयंती चे  मराठी सूत्रसंचालन 2023 कशा पद्धतीने आपण अप्रतिमरित्या करू शकता यासाठी आम्ही आजच्या लेखातून शिवजयंती सूत्रसंचालन 2023 आपणासाठी घेऊन आलो आहोत.

शिवजयंती सूत्रसंचालन 2023
शिवजयंती सूत्रसंचालन 2023

शिवा जयंती सूत्रसंचालन क्रम  |  sutrasnchalan step 

सूत्रसंचालन म्हटल्यानंतर आपल्याला कार्यक्रम नेमका कोणत्या दिशेने पुढे घेऊन जायचं आहे.याची काही एक कल्पना कार्यक्रमाच्या आयोजकांकडून घेणे हे पहिले सूत्रसंचालकाचे काम आहे. नंतर आपला कार्यक्रम नेमका किती वेळ चालणार आहे याचा देखील अंदाज सूत्रसंचालन करत असताना सूत्रसंचालकाने सूत्रसंचालनाचे नियोजन करत असताना हे सर्व बारकावे ध्यानात ठेवले पाहिजेत. आणि आपला कार्यक्रम कशा पद्धतीने पुढे जाणार आहे याच्या नोंदी सूत्रसंचालकाकडे हव्यात. ज्या पद्धतीने इंजिनियर एखाद्या इमारतीचे बांधकाम करीत असताना आराखडा अगोदर आकत असतो आणि त्या आराखड्याप्रमाणे किंवा स्ट्रक्चर प्रमाणे इमारतीचे बांधकाम अतिशय नाविन्यपूर्ण रीतीने आकारास आणत असतो. भूमिका सूत्रसंचालन करत असताना सूत्रसंचालकाने ठेवावी. शिवजयंती सूत्रसंचालन करीत असताना साधारणपणे आपल्याला खालील प्रमाणे संचालनाचा एक क्रम डोक्यामध्ये ठेवता येईल. चला तर मग शिवजयंती सूत्रसंचालन आराखडा पाहूया. 

शिवजयंती सूत्रसंचालन आराखडा| shivajaynti sutrsanchalan arakhada  | Shiv jayanti anchoring script sample 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे सूत्रसंचालन करीत असताना 

अध्यक्ष स्थान भूषवण्याची विनंती 

दीपप्रज्वलन 

मान्यवरांचे स्वागत 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक 

मुख्य कार्यक्रम 

प्रमुख अतिथी अध्यक्ष यांचे मार्गदर्शन 

आभार प्रदर्शन 

या पद्धतीने आपल्याला एक कच्चा आराखडा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असताना आपल्याला बनवावे लागेल. साधारणपणे यावरील मुद्द्यांमध्ये कोणकोणत्या बाबी असायला हव्यात याविषयी थोडक्यात प्रकाश टाकूया.

शिवजयंती सूत्रसंचालन स्क्रिप्ट पूर्वतयारी | shiv jayanti sutrsanchaln basic preparation 

आपल्याला शिवजयंतीचा भव्य दिव्य कार्यक्रम करीत असताना सर्वात अगोदर जी गोष्ट करायचे आहे की त्याशिवाय आपला कार्यक्रम नाही ती बाब म्हणजे कार्यक्रमाची रूपरेषा. ही रूपरेषा सांगत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी थोडक्यात माहिती सांगावी. नंतर मग कार्यक्रम हळूहळू पुढे न्यावा.

१. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान 

कार्यक्रमाची रूपरेषा सांगितल्यानंतर सूत्रसंचालकाने कार्यक्रमाला जे कोणी अध्यक्ष असतील ते अध्यक्षांना अध्यक्षस्थान भूषवण्याची विनंती करावी आणि त्यांच्या परवानगीने आपला कार्यक्रम सुरू करावा.

२. दीप प्रज्वलन इशस्तवण 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवल्यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना दीप प्रज्वलन करण्यासाठी आमंत्रित करावे.

३. मान्यवरांचे स्वागत 

आपण ज्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहोत त्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी अध्यक्ष तसेच व्यासपीठावरील इतर व्यक्ती या सर्वांचे स्वागत आणि त्याचे योग्य नियोजन सूत्रसंचालकाने करावे.

४. कार्यक्रमाचे प्रास्ताविक 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये आजचा कार्यक्रम आपला कशा पद्धतीने पुढे जाणार आहे.आपण आज कोणत्या कार्यक्रमासाठी एकत्र जमलो आहोत. या कार्यक्रमाची पायाभरणी कशा पद्धतीने होत गेली आणि आज कार्यक्रम आकारास आला अशी सर्व इत्यंभूत माहिती कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये द्यावी.

५. मुख्य कार्यक्रम 

आपला कार्यक्रम नेमका कोणत्या स्वरूपाचा आहे रांगोळी स्पर्धा असेल तर बक्षीस वितरण, भाषण स्पर्धा असेल तर भाषणाची सुरुवात अशी आपल्या नेमके कार्यक्रमाचे स्वरूप कसे आहे यावरून मुख्य कार्यक्रम याचे सूत्रसंचालन सूत्रसंचालकाने करायचे आहे. सूत्रसंचालन करीत असताना एका कार्यक्रमानंतर दुसरा कार्यक्रम किंवा सादरीकरण यामधला दुवा सूत्रसंचालक असल्याने तो व्यवस्थित रित्या जोडण्यासाठी काही कोटेशन तयार ठेवावीत. असे केल्याने कार्यक्रम छान होतो.

६. अतिथी तथा मान्यवरांची भाषणे 

आपला मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर सूत्रसंचालकाने आजच्या कार्यक्रमासाठी आलेले मुख्य अतिथी आणि मान्यवर यांची भाषणे करण्याची विनंती त्यांना करावी. एका मार्गदर्शक आणि मार्गदर्शन केल्यानंतर दुसऱ्या मान्यवरांना बोलवण्याअगोदर अगोदरच्या मान्यवरांनी काय सांगितले याचा सांधा जोडण्याचे काम सूत्रसंचालक यांनी करावे.

६. आभार प्रदर्शन 

कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सूत्रसंचालकाने आभार प्रदर्शन करण्यासाठी ज्या व्यक्तीला जबाबदारी दिलेल्या असेल त्या व्यक्तीला व्यासपीठावर आमंत्रित करावे. छोटखाणी असेल तर सूत्रसंचालकाने स्वतः सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे.

७.कार्यक्रम समारोप 

कार्यक्रमाच्या शेवटी समारोप म्हणून राष्ट्रगीत किंवा पसायदान यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचा शेवट गोड करू शकतो.

अशा पद्धतीने शिवजयंतीच्या सूत्रसंचालन करीत असताना आपण काही एक आराखडा आपल्या डोक्यामध्ये ठेवण्यात अतिशय गरजेचे आहे.

सूत्रसंचालन एककला |sutrsanchalan is skill

सूत्रसंचालन ही एक कला आहे आपण जर काही मान्यवर सूत्रसंचालक किंवा सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये ज्यांचा हातखंड आहे अशा सूत्रसंचालकांचे सूत्रसंचालन पाहिले तर मात्र आपण नक्कीच हे शिवधनुष्य पेलू शकता. आपल्या माहितीस्तव आम्ही काही मान्यवर मंडळींची सूत्रसंचालन आपणासाठी देत आहोत.ही सूत्रसंचालन पीडीएफ स्वरूपात असल्यामुळे आपल्याला याची नक्कीच मदत होईल.

शिवजयंती सूत्रसंचालन 2023 नमुने | shiv jaynti sutrasanchalan 2023 sample 

 

१.गिरीश दारूंटे शिवजयंती सूत्रसंचालन  | girish darunte sir shiv jayanti sutrsanchalan namuan

संचालकांमध्ये नावाजलेले नाव म्हणून गिरीश दारुंटे सर त्यांची एक आगळीवेगळी ओळख आहे. शिवजयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यासाठी आपण त्यांनी केलेला सूत्रसंचालन नमुना संदर्भासाठी वापरू शकता.

 

.आशिष देशपांडे सरांचे शिवजयंती सूत्रसंचालन  | ashiash deshpande shiv jayanti sutrsanchalan namuan

सूत्रसंचालनामध्ये असा कोणता कार्यक्रम नाही की ज्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किंवा त्याची स्क्रिप्ट आशिष देशपांडे सरांकडे नाही. आज आम्ही शिवजयंती सूत्रसंचालन मार्गदर्शन पर लेखात आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन जे पीडीएफ स्वरूपात आहे ते आपल्यासाठी देत आहोत. आशिष देशपांडे सरांच्या सूत्रसंचालन मालिकेतील ४७ व ४८ या क्रमांकावर शिवजयंती सूत्रसंचालन उपलब्ध आहे ते आपण पाहू शकता.

शिवजयंती सूत्रसंचालन व्हिडिओ | shiv jayanti sutrsanchalan video |Shiv jayanti anchoring script in marathi vedeo

आपल्याला  शिवजयंती सूत्रसंचालन याची लिखित माहिती पाहिल्यानंतर नेमक्या सादरीकरणात आवाजाची लकब कशी असावी मांडणी कशी असावी यासाठी आम्ही शिवजयंती सूत्रसंचालन अप्रतिम व्हिडिओ देखील देत आहोत.

 

अशा पद्धतीने जर आपण शिवजयंती सूत्रसंचालन 2023 केले तर आम्हाला खात्री आहे आपण कोणताही कार्यक्रम गाजवू शकता. आजच्या लेखाच्या माध्यमातून शिवजयंती सूत्रसंचालन आराखडा कशा पद्धतीने असावा त्याचबरोबर नामवंत व्यक्तींची दोन सूत्रसंचालन नमुने आपणासाठी देत आहोत. हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद!

Leave a Comment