A शिवाजी महाराज मराठी माहिती 2023| Shivaji Maharaj mahiti Punyatithi

आपण ज्या भूमीत राहतो त्या भूमीतील महान व्यक्तींविषयी आपल्याला माहिती असणे अतिशय गरजेचे आहे. या भारत भूमीवरील  एक महान व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर झाला त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले आणि ते जाणते राजे,रयतेचे राजे झाले.आजच्या लेखातून आपण शिवाजी महाराज मराठी माहिती 2023 पाहणार आहोत.
शिवाजी महाराज मराठी माहिती 2023
शिवाजी महाराज मराठी माहिती 2023

शिवाजी महाराजांचे बालपण | Shivaji Rajanche  Balpan 

          छत्रपती शिवाजी महराज यांचे बालपन  पुणे प्रांतात  गेले. या ठिकाणी त्यांनी युद्ध व राज्यकारभार यांचे धडे घेतले. माता जिजाऊ यांनी त्याना लहानपणापासून राम,लक्ष्मण यासरख्या देवा दिकांच्या गोष्टी सांगितल्या यातून  त्यांच्यावर संस्कार होत गेले.हिंदवी स्वराज्य उभे रहावे असी मनोभूमिका जिजाऊ आई यांच्यामुळे शिवाजी महाराजांमध्ये आली.रयतेचे दुख व मुगल फौजा समान्य माणसाना  कसे छळतात ते जिजाऊ आईनी  महराजांच्या लक्षात आणून दिले. शिवाजी महाराज रयतेचे हे दुःख पाहून उद्विग्न झाले व त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे ठरवले . तर आज आपण रुढ पद्धतीने त्यांचा  जन्म त्यांनी कोणत्या  किल्यावर  कधी झाला ? राज्याभिषेक कधी झाला ? तारखा यांच्या खोलात जाणार नाही तर शिवाजी महाराज का ग्रेट होते. अश्या कोणत्या बाबी होत्या? की ते बलाढ्य हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकले यावर प्रकाश टाकणार आहोत. आज आपण पाहतो महान व्यक्ती तिला आपल्या जातीवरून ,धर्मावरून आमची आमची  म्हणत असतात  पण शिवबा एकमेव असे होते की ते सर्वांचे होते. यातून आजच्या धर्मकारण  करणाऱ्या राजकारणी लोकानी यातून कायतरी  शोध बोध  घ्यावा. तर चला तर महाराजांच्या अंगच्या काही गुणांचा परिचय करून घेऊन त्यांचे ते रूप आठवून शब्द सुमनांनी  त्याना  अभिवादन करूया. 
 

छ. शिवाजी महाराज यांच्यामधील अलौकिक गुण | Chatrpti Shivaji Maharaj gun quality in marathi  

  १. समयसूचकता | Samaysuchkta  

    शिवाजी राजांचे संपूर्ण जीवन पहिले की आपल्या ध्यानात येते की , त्यांच्याजवळ एक गुण होता तो म्हणजे समयसूचकता. कोणत्या वेळी काय करावे ? कोणता निर्णय घ्यावा? हे त्यांना माहीत होते.उदाहरण द्यायचे  झाले तर औरंगजेबाने त्याना आग्रा येथे नजर कैदेत ठेवले असताना तिथून सही सलामत बाहेर पडण्यासाठी फळांच्या पेठाऱ्यातून  बसून बाहेर पडणे असेल किंवा आपल सैन्यबळ कमी पडतेय त्यावेळी सैन्य जीव वाचवण्यासाठी तह करण्याची त्यांची नीती यातुण ती समयसूचकता आपल्याला येते. 
 

२. धाडसीपणा| Prchand Dhadas   

               महाराज प्रचंड धाडसी होते. बलाढ्य अफजल खानला भेटायला जाणे किंवा दिल्ली दरबारी औरंगजेबाची अपमानास्पद वागणूक पाहून त्याला त्याच्या दरबारी जाऊन विरोध करणे यात त्यांचे धाडस आपल्याला पहायला मिळते. 
 

३. स्वतची युद्ध नीती    |  Swa Yudha Niti 

                    महाराज यांनी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी  फौज किंवा मावळे घेऊन गनिमी कावा या युद्धनीती चा  उपयोग करून मुगल फौजाना हैराण करून सोडले. अनेक किल्ले त्यांनी या युद्ध नितीच्या जोरावर जिंकून घेतले. 
 

४. दूरदृष्टी | Durdrushti 

               महाराज असे होते की  ते  आजचा नाही तर वर्तमानच्या दहा वर्षे पुढचा विचार करत होते. म्हणून तर समुद्रातून शत्रू आक्रमण करू शकतो यासाठी त्यांनी अनेक जलदुर्ग बांधण्याचे योजिले होते. जसे की सिंधुदुर्ग  हा किल्ला . त्यांनी शत्रू येणार याची वाट न पाहता अगोदर बांधून घेतला.
 

५. माणसे जोडण्याची कला | Manse Jodnyachi Kala  

                         महाराजणी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी जहागीरदार लोकाना त्यांच्या छत्राखाली येण्याचे आव्हान केले यातून स्वकीय शत्रू उरले नाहीत. व जे ऐकत नव्हते त्यांना वटणीवर आणण्याचे काम महाराजानी  केले येथे त्यांचा माणसे जोडण्याचा गुण आपल्याला पहायला मिळतो. 
 

६. गुणांची पारख | Gunanchi Parakh 

             अस म्हणतात माणूस पाहताच त्याच्या अंगी कोणते गुण आहेत? हे हेरण्याची कला महाराजांजवळ  होती. अनेक लोक त्यांनी हेरून त्यांच्या गुणाला साजेशी जबाबदारी दिली. 
 

७. सर्वधर्म समभाव | Sarv Dharm Sambhav 

                    शिवाजी महाराज यांच्या जवळ चारशे वर्षांपूर्वी जी दृष्टी होती ती आजच्या पिढीकडे ,राजकारणी यांच्याकडे नाही ही खेदाची बाब. महाराजानी  कधी धर्मभेद,जातिभेद केला नाही. एका मुस्लिम व्यक्तीला आपला तोफखाना प्रमुख केले यातून ते माणसाचा धर्म,जात न पाहता त्या व्यक्ती जवळ असणारा गुण पाहत होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 
 

८.रयतेचा वाली | Raytecha Vaali 

                महाराज सामान्य जनता आपल्यामुळे ,आपल्या फौजेमुळे नाराज होणार नाहीत याची कळजी घेत. मोहिमा आखत असताना शेतकरी ,कष्टकरी याना त्रास होणार नाही याची काळजी घ्या अशी तंबी ते आपल्या फौजेला देत होते. मुघल फैजेला जरब बसावी म्हणून महाराजांनी राज्याभिषेक करवून घेतला.
 

९. स्त्री सन्मान | Stree Sanman 

           एका मोहिमेत नजराणा म्हणून मुगल सरदारची सून बंदी करून शिवाजीराजे यांच्यापुढे हजर करण्यात आली. हे पाहून महराज उद्विग्न झाले व त्या स्त्रीला साडी चोळी करून परत आपल्या घरी पाठवून दिले. यातून स्त्री सन्मान हा गुण पहायला मिळतो. 
 

१०.व्यवस्थापकीय  गुरु | World Managmement Guru Olakh 

                         आज परकीय अभ्यासक देखील महाराजांच्या ज्या  गुनाचे कौतुक करतात तो गुण म्हणजे उत्तम नियोजन. आपल्याजवळ  जी साधने आहेत त्यांचा उपयोग व कोणत्यावेळी काय करावे? कोणते काम कोणाला द्यावे हे managment कौशल्य त्यांच्या जवळ होते. आजही परदेशातील विद्यापिठे  यावर काम करीत आहेत. 
 

११. संत महंत  यांचा आदर | Santancha Aadar 

                     संत मंडळी लोकाना आपल्या कीर्तनातून ,भजनातून चांगली शिकवण देतात हे चांगले काम पाहून शिवाजी महाराज संत तुकाराम ,रामदास यांचा आदर तिथ्य केल्याचे आपनास दिसते. थोडक्यात संत मंडळींचा  त्यांना आदर होता हे समजते. 
 
              असे अनेक गुण त्यांच्या अंगी होते . तर आपण त्यांना आज त्यांच्या पुण्यतिथि निमित अभिवादन म्हणून ते छत्रपती का होते? त्यांचे असे कोणते गुण होते?  ज्याच्या जोरावर काहीही नसताना त्यांनी बलाढ्य अश्या हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. अनेक गडकिल्ले मुगलांकडून ताब्यात घेतले. काही किल्ले स्वत बांधून घेतले. कल्पना करा राजे या भूतलावर जन्मास आलेच  नसते तर काय झाले असते

शिवाजी महाराज कार्ये | shivaji maharaj yanchi karye

१. अराजकता | Arajakta 

                    महाराज  नसते तर आपल्याला अराजकता पाह्यला मिळाली असती. येथील जहागीरदार मुगळ शासक याना मिळून सामान्य जनतेवर खूप अन्याय झाले असते. 
 

२. परकीय आक्रमणे | prkiy aakrmnat vadh 

                    महाराजांचा दरारा पाहून इंग्रज,डच हे दचकून असायचे. महाराज व त्यांचे हिंदवी स्वराज्य नसते तर या परकीय शक्तीनी  संपूर्ण भारतात हाहाकार माजवला असतं त्यावर  जरब बसवण्याचे काम महाराजांनी  केले. 
 

३. हिंदवी स्वराज्य केवळ स्वप्न  | Hinadvi Swrajyache Swapn Apurn 

                                        आपले एक हिंदवी स्वराज्य असावे? हे एक केवळ स्वप्न राहिले असते.पण महाराजानी  अठरा पगड जातीचे मावळे एकत्र करून आपले सुराज्य निर्माण केले. 
 

४.धार्मिक अराजकता | Dharmik Arajkta 

                         तो काळ  असा होता की आपले साम्राज्य तर वाढलेच पाहिजे पण धर्म वाढला पाहिजे या विघातक प्रवृत्ती महाराजामुळे  आपले तोंड वर काढत नहवत्या . कालांतराने मात्र या लोकानी खूप मोठ्या प्रमाणात धर्म प्रसार व आपल्या प्रशासनात ढवळा  ढवळ  केली असती. 
 

 शिवाजी महाराज कविता | shivaji maharaj marathi kavita

                          अश्या या महान हिंदवी स्वराज्य निर्माते,रयतेचे राजे ,छत्रपती यांचा  ३ एप्रिल १९८०  रोजी रायगडावर दीर्घ आजाराने निधन झाले . १८३० ला जन्म नंतर कमी वयात हिंदवी स्वराज्याची निर्मिती १८७६ ला राज्याभिषेक नि त्यांनंतर १८८० ला निधन. अवघ्या ५० वर्षाचे आयुष्य पण काम मात्र लाजवाब. त्यांना माझ्या मोडक्या तोंडक्या शब्दांनी अभिवादन – 
 
                                शत्रूही ज्यांना  झोपेत घाबरत होता 
 
                    तो केवळ राजा नव्हता  
 
                        तर  तो होता जाणता राजा
 
                        तो कोणा एकाचा  नव्हता  
 
                सगळ्यांचा होता 
 
                            तो शासक नव्हता  मुळीच 
 
                              तो   होता  जनतेचा  छत्रपती 
 
                      तो शिवबा होता 
 
                      म्हटल तर शिवाही
 
                           जिजाऊ पोटी जन्म घेतलेला छावा होता 
 
                  आजही तो हवा होता 
 
                            आजही तो हवा होता ——— 
 
 
                        खरच आजही महाराज हवे होते जे आपल्या भारत भूमीला अखंड ठेऊ शकले असते आज आपण नकाशावर अखंड आहोत पण येथील राजकारण ,गरीब श्रीमत दरी पाहून ही शकले महाराज असते तर दिसलीच नसती. तर आज त्यांच्या पुण्यतिथि निमित त्यांच्या अंगचे गुण आपल्यात येवोत हेच अभिवादन. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.
आमचा आजचा शिवाजी महाराज मराठी माहिती हा लेख आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा. 
                                 
 
                                  

1 thought on “A शिवाजी महाराज मराठी माहिती 2023| Shivaji Maharaj mahiti Punyatithi”

  1. साम्राज्य उभी राहत असतात आणि कोसळत असतात.
    पण दिर्घकाळ टिकत असतात ती केवळ तत्वे आणि व्यक्तींचा आदर्श.
    बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय स्मृतीदिन विनम्र अभिवादन……!

    Reply

Leave a Comment