A सावित्रीबाई फुले जयंती मराठी माहिती भाषण निबंध | Savitribai phule jayanti marathi bhashan nibandh

सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रभर बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या लेखामध्ये आपण सावित्रीबाई फुले जयंती निमित्त त्यांच्या संपूर्ण कारकिर्दी वरती प्रकाश टाकणार आहोत.ही माहिती आपल्याला सावित्रीबाई जयंती साजरी करत असताना भाषण व निबंध लेखन करण्यासाठी नक्कीच मदत करेल. 

सावित्रीबाई फुले जयंती मराठी माहिती भाषण निबंध
सावित्रीबाई फुले जयंती मराठी माहिती भाषण निबंध

सावित्रीबाई फुले यांची एका दृष्टीक्षेपात माहिती 

सावित्रीबाई फुले ठळक माहिती
जन्म दिनांक ३ जानेवारी 1831
जन्म ठिकाण सातारा नायगाव
पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले
मृत्यू 10 मार्च 1897
मृत्यू स्थळ पुणे
मुख्य कार्य मुलींचे शिक्षण 
 सावित्रीबाई फुले यांच्या विषयीची वरील माहिती आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की मुलींच्या शिक्षणासाठी भारतामध्ये कार्य करणारी पहिली स्त्री शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका, पहिली महिला समाजसुधारक असे अनेक कितीतरी कार्य सावित्रीबाई फुले यांच्या नावावरती आहे. अशा या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण आज त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. सावित्रीबाई फुले यांची माहिती पाहिल्यानंतर आपल्याला सावित्रीबाई फुले या क्रांतीज्योती कशा होत्या. ही नक्कीच समजेल. savitribai phule bhashan आपण एका विशिष्ट क्रमाने पाहणार आहोत.

सावित्रीबाई फुले यांचा परिचय | savitribai phule yancha parichay 

सावित्रीबाई फुले या भारतामध्ये स्त्री शिक्षणासाठी अग्रेसर असणाऱ्या पहिल्या महिला होत. सावित्रीबाई फुले यांना त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतीवाडी सांभाळत शिक्षण दिले. हा शिक्षणाचा वसा तू घराघरांमध्ये न्यायचा आहे. जणू काही भारतातील महिलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी महात्मा फुले यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरती सोपवली. आपण सावित्रीबाई फुले यांना केवळ मुलींचे शिक्षण एवढे सीमित न ठेवता त्यांनी इतर जी देखील काही कार्य केलेले आहेत. यावर देखील प्रकाश टाकला पाहिजे. सावित्रीबाई फुले यांनी विधवांना पुनर्विवाहाचा हक्क मिळाला पाहिजे, स्त्रीला देखील शिकण्याचा अधिकार हवा. ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यते विरोधात खूप मोठा आवाज उठवला आणि अस्पृश्य समाजाला सर्व हक्क मिळाले पाहिजे त्यासाठी काम केले. अगदी त्याच पद्धतीने महिला शिक्षणाच्या संदर्भात जर कोणी काम केले असेल तर त्या आहेत सावित्रीबाई फुले. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये लिंगाच्या आधारे भेदभाव केला जात होता. मुलींना शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला होता. चुल आणि मूल हेच मुलींच्या बाबतीत मध्ये समीकरण बनवण्यात आले होते. या समीकरणाला छेद देण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. 
 
सावित्रीबाई फुले पहिल्या महिला स्त्री शिक्षिका होत्या, समाजसुधारक होत्या त्याच बरोबर एक उत्कृष्ट साहित्यिका, कवयित्री देखील होत्या. सर्व माहिती पुढील लेखामध्ये येणारच आहे. चला तर मग सावित्रीबाई यांचे बालपण कसे होते त्याचा थोडक्यात परिचय करून घेऊया. Savitribai phule jayanti bhashan v nibandh लेखन करताना आपल्याला आवश्यक आहे तेवढी माहिती घ्या.
 

सावित्रीबाईंचे बालपण किंवा प्रारंभिक जीवन | savitribai yanche balpan |savitribai phule bhashan सुरुवात

सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी १८३१ मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा खेडे गावामध्ये झाला. सावित्रीबाई यांच्या वडिलांचे नाव खंडोजी होते.ते त्या भागातील नामवंत शेतकरी होते. सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मी होते. सावित्रीबाई फुले यांच्या बालपणाविषयी सांगायचे झाले तर सांगण्यासारखे तसे काहीच नाही. कारण वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई फुले यांचे भाग्य म्हणायचे की, त्यांना सुधारणावादी विचारांचे गोरगरिबांसाठी समाजसेवा करू पाहणारे दिन दलितांसाठी आधार देणारे शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार पुढे मांडून शेतकऱ्यांचा आसूड यासारख्या पुस्तकातून आपले म्हणणे सरकारला सांगणारे परखड विचारांचे समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या विवाह नंतर सावित्रीबाई फुले यांनी चार चौकटीमध्ये राहावे अशी भूमिका न घेता सावित्रीबाई फुले यांनी आपले शिक्षण पुढे चालू ठेवावे भूमिका घेतली. सावित्रीबाई फुले यांना साक्षर करण्याचे काम महात्मा फुले यांनी स्वतः घेतले. सावित्रीबाई फुले यांना शिकण्याची आवड निर्माण केली. पुढे स्वतः महात्मा फुले यांनी एका मिशनरी शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांचे चौथ्या वर्गापर्यंतचे शिक्षण पूर्ण करून घेतले. नुसत्या काळाचा विचार केला तर सावित्रीबाई फुले देखील लग्नानंतर शिक्षणासाठी तयार झाल्या हीच एक त्यांच्यातील क्रांती होती म्हणूनच या जोडीला क्रांतीज्योती या नावाने संबोधले जाते.

वित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान | savitribai phule shaikshnik kshetratil yogdan kary

आतापर्यंत आपण वर पाहिलेल्या माहितीतून लक्षात आलेच की सावित्रीबाई फुले यांनी लग्नानंतर आपले सर्व शिक्षण पूर्ण केले परंतु आपले पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या इच्छे खातर त्यांनी समाजातील सर्व महिला साक्षर झाल्या पाहिजेत. शिकल्या पाहिजेत.कारण घरातील स्त्री शिकली तर संपूर्ण घराचा विकास व्हायला वेळ लागत नाही. अशी भूमिका महात्मा फुले यांची होती परंतु ही भूमिका महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना एका महिलेची गरज होती, म्हणूनच त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना मार्गदर्शन करून मुलींच्या शिक्षणासाठी भरघोस कामगिरी करण्यासाठी प्रेरणा आणि बळ दिले.
महात्मा फुले यांनी 1848 आली सर्वप्रथम मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली परंतु त्यांचा हा निर्णय काही समाजकंटकांना अजिबात पटला नाही. त्यांनी ती शाळा बंद केली. एवढेच नव्हे तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना त्या कालच्या पुरोगामी विचारांच्या लोकांनी बहिष्कृत देखील केले.व त्यांनी सुरू केलेली ही शाळा बंद पाडण्यात आली. यानंतर महात्मा फुले यांचे मित्र उस्मान शेख यांनी मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढावी यासाठी एक जागा दिली आणि त्या जागेमध्ये सावित्रीबाई फुले यांनी नव्याने शाळा सुरू केली.  सावित्रीबाई फुले महिलांच्या शिक्षणासाठी द्वारे खुले करून देणाऱ्या पहिल्या शिक्षिका बनल्या.
सावित्रीबाई फुले यांनी केवळ सवर्ण वर्गातील महिलांसाठीच शिक्षणाची सोय केली असे नाही तर पुढे जाऊन त्यांनी 1852 मध्ये अस्पृश्य समाजातील मुला मुलींसाठी देखील शाळा सुरू केल्या. एक एक करत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये अनेक शाळा काढल्या.
 

ब्रिटिशांकडून सावित्रीबाईंचा गौरव | birish sarkarkdun savitribainca gourav 

ब्रिटिशी पुढारलेल्या विचारांचे होते आणि भारतामध्ये असणारी जातिव्यवस्था आणि लिंगाच्या आधारावर शिक्षणामध्ये केला जाणारा भेदभाव त्यांना जाणवत होता. अशा सगळ्या नकारात्मक वातावरणामध्ये समाजाचा विरोध पत्करून सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अपार मेहनत घेतली . मुलींसाठी शिक्षणाची द्वारे खुले केली. म्हणून त्या कालच्या ब्रिटिश सरकारने सावित्रीबाई फुले यांना शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी जे काम केले त्याबद्दल त्यांना एक आदर्श शिक्षिका म्हणून त्यांचा गौरव केला.
 

महिला सेवा मंडळाची स्थापना | mahila mandlachi sthapna | savitribai phule bhashan

सावित्रीबाई फुले यांनी जाणले की महिलांना केवळ शिक्षण देऊन त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्या जोडीला त्यांना जे इतर समस्या आहेत या समस्या मिटवण्यासाठी आपल्याला एखादी संस्था स्थापन करावे लागेल. ज्या संस्थेच्या माध्यमातून महिला आपल्या समस्या खुलेपणाने मांडतील आणि त्या समस्यांवरती कशाप्रकारे काम करता येईल यासाठी काही एक रणनीती टाकता येईल. यासाठी त्यांनी महात्मा फुले यांच्या मदतीने महिला सेवा मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून महिलांचे विविध प्रश्न सावित्रीबाई फुले यांना समजले.यापुढे सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाबरोबर त्यांच्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले.
 

अनिष्ट प्रथांना विरोध | anishth prathaana virodh 

सावित्रीबाई फुले यांनी त्या काळामध्ये असणाऱ्या केशवपण म्हणजेच ज्या स्त्रीचा पती मृत्यू पावलेला आहे अशा महिलांचे मुंडन केले जात. या प्रथेला विरोध करण्यासाठी मुंबई पुणे यासारख्या शहरी भागामध्ये न्हाव्यांचा संप घडवून आणला. यापुढे आम्ही असे अनिष्ट काम करणार नाही यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी लोकांचे प्रबोधन केले.
 

बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना | balhatya prtibandhak gruhachi sthapna 

समाजामधील काही विकृत लोक महिलांचा  उपभोग घेण्याचा वृत्तीतून त्या काळामध्ये कुमारी माता याचबरोबर काही विधवा माता बनत होत्या. एक प्रकारे बलात्कार पीडित महिलांचे पुनर्वसनच सावित्रीबाई फुले यांनी केले.या काळात अशा महिलांना समाजामध्ये मोकळेपणाने वावरता येत नव्हते. अशा महिलांचा संभाळ करून त्यांची बाळंतपणे करण्याचे काम देखील सावित्रीबाई फुले यांनी केले. 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली.या संस्थेच्या माध्यमातून केले. त्यात काहीतरी केवळ महिला स्त्री शिक्षणच नव्हे तर अस्पृश्य वर्गातील महिला देखील शिकल्या पाहिजे याचबरोबर त्या काळातील महिलांच्या समोर असणाऱ्या हर एक  समस्या सोडवण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी कंबर कसली.
 

शेतकरी व मजूर वर्गासाठी रात्र शाळा | night school 

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची गंगा सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. या प्रेरणेतून जो शेतकरी वर्ग आहे ज्याला दिवसभर शेतामध्ये काबाडकष्ट करावे लागते जो मजूर वर्ग आहे त्याला काम केल्याशिवाय दोन वेळचे खायला मिळणार नाही. अशा लोकांना शिक्षणाची सोय देण्यासाठी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी रात्र शाळा सुरू केल्या अलीकडच्या काळामध्ये ज्या रात्री शाळा आपल्याला दिसतात त्या रात्री शाळांची संकल्पना महात्मा ज्योतिबा फुले यांची होती आपल्याला विसरून चालणार नाही. 1855साली अशा रात्र शाळा सुरू करण्यात आल्या. मुलींची शाळेमध्ये उपस्थिती राहावी यासाठी त्यांना भत्ता देखील देण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले.
 

विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार | vidhva punrvivvah purskar 

सावित्रीबाई फुले यांनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. एखाद्या स्त्रीच्या नवऱ्याचे निधन झाल्यानंतर त्यामध्ये महिलेचा कोणताही दोष नाही म्हणून त्या महिलेने पुन्हा पुनर्विवाह करावा अशी भूमिका सावित्रीबाई फुले यांनी मांडली. त्या काळामध्ये असणाऱ्या बाल विधवांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्यासाठी देखील शिक्षणाची दारी खुली केली. सावित्रीबाई फुले यांची अशी जी आगळीवेगळी कार्य होती यासाठी नेहमीच त्यांना पुरोगामी विचारांच्या लोकांनी त्रास दिला. परंतु त्या त्रासाला त्या जुमानला नाहीत उलट एका वेगळ्या प्रेरणेने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले.
 

अस्पृश्यता निवारणासाठी कार्य | asprushyata nivaran kary 

महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यता निवारणासाठी खूप मोठी चळवळ उभी केली होती, या मुंबईमध्ये सावित्रीबाई फुले देखील अग्रस्थानी होत्या सावित्रीबाई फुले यांनी जातिववस्थेचे निर्मूलन करण्यासाठीमहात्मा फुले यांची साथ दिली. अस्पृश्य व्यक्तींची आपल्यावरती सावली पडणे देखील पाप मानले जात होते अशा अस्पृश्य लोकांसाठी आपल्या घरातील विहीर पाणी पिण्यासाठी खुली करण्याचे काम सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी केले.
 

सत्यशोधक समाजाच्या कार्यात पुढाकार | satya shodhk samajachya  karyat sahbhag 

ज्योतिबा फुले यांनी समाज सुधारण्याच्या कामाला गती यावी यासाठी 28 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. या सत्यशोधक समाजामार्फत शूद्र दलित स्त्रिया यांच्यावर होणारी शोषण थांबले पाहिजे यासाठी प्रयत्न केले. एक विशिष्ट वर्ग आपल्या फायद्यासाठी पौराहित्याच्या नावाखाली सामान्य लोकांची प्रचंड लूट करीत होता अशा कर्मकांडी वृत्तीचा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आणि विरोध केला. लग्न लावण्यासाठी पुजारी आवश्यक नसतो. लग्न हुंडा देवघेव करून करणे चुकीचे आहे. अशी भूमिका सत्यशोधक समाजामार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. महिलांच्या बाबतीमध्ये सत्यशोधक समाजाने जे काम केले ते काम पाहण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची महिला विभाग प्रमुख म्हणून नेमणूक केली होती. सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या निधनानंतर  28नोव्हेंबर 1890 रोजी सत्यशोधक समाजाच्या अध्यक्ष बनल्या. सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाचे कार्य अतिशय नेटाने पुढे नेण्याचे काम केले.

दुष्काळात अन्नछत्राची सोय | anna chatraachi soy 

सावित्रीबाई फुले यांनी 1876 मध्ये पडलेल्या मोठ्या दुष्काळामध्ये गोरगरीब लोकांची उपासमार थांबवण्यासाठी अन्नछत्राची सोय केली. हा पडलेला प्रचंड दुष्काळ याची जबाबदारी ब्रिटिश सरकारने घेऊन लोकांना मदत केली पाहिजे अशी आव्हान देखील ब्रिटिश सरकारला त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केले आणि ब्रिटिशांना देखील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणे भाग पडले.
 

कवयित्री सावित्रीबाई फुले| poet savitribai phule 

सावित्रीबाई फुले यांना साहित्याची प्रचंड जाण होती. त्यांनी जे स्वानुभव घेतले समाजाबद्दल ची जी निरीक्षणे होती ती त्यांनी आपल्या कवितांच्या रूपाने मांडली. सावित्रीबाई फुले यांचा 1934 मध्ये काव्य फुले हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर सुबोध रत्नाकर हा देखील एक त्यांच्या नावावरील गाजलेला काव्यसंग्रह आहे. सुबोध रत्नाकर या ग्रंथाचे लेखन देखील सावित्रीबाई फुले यांनी केले आहे.
 

शिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले | shikshn tadnya savitribai phule

समाजामध्ये लिंगभेदाच्या आधारावर केली जाणारी शिक्षणातली विषमता कमी केली जावी.महिलांना पुरुषांच्या बरोबरीने शिकण्याचा अधिकार आहे. अशी भूमिका मांडणे म्हणजे यातून त्यांच्यामध्ये शिक्षण तज्ञ लपलेला होता असेच म्हणावे लागेल.

सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू | savitribai yancha mrutyu

1897 मध्ये पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्लेगची साथ पसरली होती. संसर्गजन्य आजार असल्यामुळे या आजारामुळे प्रचंड दहशत लोकांमध्ये निर्माण झाली होती. सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोना महामारीमध्ये जी अवस्था होती तशीच अवस्था त्याकाळी आलेल्या प्लेगने केली होती. सावित्रीबाई फुले यांनी मात्र आपला सेवाभावाचा गुण अशा संकट काळामध्ये देखील दाखवला. प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांची सेवा करत असताना सावित्रीबाई फुले यांना प्लेगचा संसर्ग झाला. त्यांच्यावरती दवाखान्यामध्ये उपचार देखील करण्यात आले. परंतु त्या प्रयत्नांना यश मात्र मिळाले नाही. कणखर स्त्री शिक्षणासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या समाजसुधारक, एक जाणकार कवयित्री,शिक्षण तज्ञ भारतातील पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका, असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी 10 मार्च 1897 रोजी या जगाचा राम राम घेतला.
 
आज सावित्रीबाई आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांनी जे काही स्त्री शिक्षणाच्या रूपाने किंवा त्यांच्या इतर कार्याच्या रूपाने मैलाचे दगड निर्माण केले आहेत.ते कधीही मिटणार नाहीत. आजच्या या लेखाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले जयंती विशेष या निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या संपूर्ण जीवनाचा परामर्श घेण्याचे काम आम्ही केले. साहजिकच या लेखाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत असताना सावित्रीबाई फुले यांच्यावर ते एखादे छानसे भाषण देत असताना सावित्रीबाई फुले यांचा निबंध लिहीत असताना किंवा सावित्रीबाई फुले यांचे कार्य यावरती वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेत असताना आपल्याला ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल. 
 

सावित्रीबाई फुले माहितीपट | savitribai phule bhashan अप्रतिम vedeo

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आम्ही जी माहिती आपल्याला दिली ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करा आपल्याजवळ जर काही यापेक्षा नवीन माहिती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी असेल तर ती माहिती कमेंट रूपाने आपण आमच्यापर्यंत पोहोचू शकता नंतरच्या लेखामध्ये आम्ही आपल्या माहितीचा समावेश नावासह करू. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद! 

Leave a Comment