A स्वामी विवेकानंद जयंती मराठी माहिती | swami vivekanand jayanti marathi mahiti

नमस्कार! मित्रांनो आपण आजच्या लेखामध्ये स्वामी विवेकानंद जयंती मराठी माहिती तथा युवक दिन माहिती पाहणार आहोत.स्वामी विवेकानंद जयंती संपूर्ण भारतभर युवक दिन म्हणून साजरी केले जाते. एका अर्थाने राष्ट्रीय युवक दिन आणि स्वामी विवेकानंद जयंती याविषयीची अतिशय नाविन्यपूर्ण मराठी माहिती आपण आज पाहणार आहोत. सर्वप्रथम स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील ठळक बाबी आपण पाहूया.

स्वामी विवेकानंद यांची मराठी माहिती | swami vivekanand informataion in marathi

स्वामी विवेकानंद जयंती मराठी माहिती
स्वामी विवेकानंद जयंती मराठी माहिती
 
स्वामी विवेकानंद महत्त्वपूर्ण माहिती
मूळ नाव नरेंद्र
जन्मदिनांक 12 जानेवारी 1863
जन्मस्थळ पश्चिम बंगालमधील कोलकाता
शिक्षण बीए
स्थापन केलेल्या संस्था रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठ
स्वीकारलेले तत्त्वज्ञान अद्वैत तत्त्वज्ञान
पुस्तके ग्रंथसंपदा राजोग, प्रेमयोग,कर्मयोग
मृत्यू 4 जुलै 1902
वय 39 वर्ष
जीवनातील महत्त्वाची घटना शिकागो सर्वधर्म परिषद
समाधी बेलूर मठ पश्चिम बंगाल

स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रम तयारी |swami vivekanand jayanti karyakram tayari

स्वामी विवेकानंद जयंती साजरी करत असताना म्हणजेच स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रम साजरा करताना कोणी स्वामी विवेकानंद निबंध स्पर्धा तर कोणी स्वामी विवेकानंद वक्तृत्व स्पर्धा ,वादविवाद स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.आजच्या लेखातून विस्तृत swami vivekanand mahiti पाहून आपल्याला नक्कीच युवक दिन कार्यक्रम शोभा वाढवण्यासाठी मदत होईल.यात शंका नाही.चला तर मग स्वामी विवेकानंद यांचा एकेक पैलू उलगडूया.

स्वामी विवेकानंद माहिती | swami vivekanand mahiti

स्वामी विवेकानंद जीवन परिचय | swami vivekanand jivan Parichay

स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्म आणि हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान संपूर्ण जगाला पटवून देण्याचे काम केले. कोणत्याही राष्ट्राला आपला उद्धार करायचा असेल तर अध्यात्माला लोकसेवेची जोड दिली पाहिजे. अशी भूमिका स्वामी विवेकानंद यांची होती. विश्वबंधुत्वाची भूमिका मांडणाऱ्या विवेकानंदांचे बालपण कसे होते ? याविषयी थोडक्यात माहिती करून घेऊया.

स्वामी विवेकानंदांचे बालपण |swami vivekanand balpan

स्वामी विवेकानंद यांचा जन्म एका श्रीमंताच्या बंगाली परिवारामध्ये झाला. स्वामी विवेकानंदांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ आणि आईचे नाव भुवनेश्वरी. स्वामी विवेकानंदांचे वडील पेशाने वकील होते. स्वामी विवेकानंदांच्या वडिलांचा पिंडा हा आध्यात्मिक होता. स्वामी विवेकानंदांचे वडील अध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांच्या घरात पूजा पाठ,ग्रंथ वाचन असे धार्मिक बाबी होत होत्या.साहजिकच घरातील या वातावरणाचा स्वामी विवेकानंद यांच्यावरती देखील प्रभाव पडला. स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी बंगालमधील कोलकाता या ठिकाणी झाला. स्वामी विवेकानंदांचे वडील अध्यात्माला धरून होते तर आता भुवनेश्वरी अतिशय मनमिळाऊ,दानशूर मनाच्या होत्या. पुढे जाऊन स्वामी विवेकानंदाच्या मनावर त्यांचे वडील व आई यांच्या विचारांचे पडसाद पडले. थोडक्यात एका संस्कारी कुटुंबात स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला.

स्वामी विवेकानंद शालेय जीवन | swami vivekanand shaley jivan

स्वामी विवेकानंद यांच्या शालेय जीवनाचा आढावा घेत असताना स्वामी विवेकानंद हे त्यांच्या शाळेतील अतिशय बुद्धिमान विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते.स्वामी विवेकानंद बुद्धिमान होतेच ,परंतु तितकेच खोडकर स्वभावाचे देखील होते. स्वामी विवेकानंदांचा हा खोडकरपणा कमी व्हावा यासाठी त्यांच्या वडिलांनी स्वामी विवेकानंद यांना कुस्ती, घोडे सवारी, लाठी युद्ध, वादन यासारख्या कला कौशल्य यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला.स्वामी विवेकानंद शाळेतील अभ्यास जेवढा आवडीने करत होते. तेवढ्याच आवडीने वरील खेळांमध्ये आणि इतर छंद जोपासण्यामध्ये आघाडीवर होते.

स्वामी विवेकानंद महाविद्यालयीन शिक्षण | swami vivekanand college education

स्वामी विवेकानंद यांनी 1881 मध्ये डफ कॉलेजातून बीएची पदवी घेतली. पदवी परीक्षेत त्यांना अतिशय छान गुण मिळाले होते. महाविद्यालय शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वामी विवेकानंद संन्यास घेण्याचा विचार बोलून दाखवू लागले. स्वामी विवेकानंद नोकरी, व्यवसाय यामध्ये रमले नाहीत.

स्वामी विवेकानंदांना अस्वस्थ करणारा प्रश्न |swami vivekanadana aswasth krnar prashn

स्वामी विवेकानंदांनी अनेक धर्म ग्रंथांचा अभ्यास केला.या धर्मग्रंथांच्या अभ्यासाच्या जिज्ञासातून स्वामी विवेकानंद यांच्यापुढे एकच प्रश्न उभा होता. तो म्हणजे या जगात ईश्वर आहे का? ईश्वर असेल तर तो कोणी पाहिला आहे का? असे प्रश्न स्वामी विवेकानंद यांना सतावू लागले. अनेक पंडितांना विद्वानांना त्यांनी हा प्रश्न विचारला.मला देखील ईश्वर पाहायचा आहे.आपण तो दाखवू शकता का?असा हट्ट ते धरू लागले. परंतु स्वामी विवेकानंद यांना ईश्वर आहे. तो मी दाखवतो असे म्हणणारा कोणीच न भेटल्याने एक प्रकारे ते नास्तिक वादी विचाराकडे झुकू लागले. स्वामी विवेकानंद ईश्वर आहे की नाही या प्रश्नाच्या शोधामध्ये खूप अस्वस्थ झाले. एक प्रकारचे नैराश्य त्यांच्यामध्ये आले. एके दिवशी स्वामी रामकृष्ण परमहंस यांची गाठ पडल्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक वेगळीच अध्यात्मिक उंची गाठली.

स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांची भेट | vivekanand ani ramkrushan paramhans bhet

स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांची भेट झाली. स्वामी विवेकानंद इतरांना जो प्रश्न विचारत होते, की या जगामध्ये देव आहे? का तोच प्रश्न त्यांनी स्वामी कृष्ण परमहंस यांना विचारला. रामकृष्ण परमहंस यांनी सांगितलेल्या विचारांनी ते प्रभावित झाले. गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंद साधना करू लागले . त्यांना जो संन्यासी मार्ग पत्करायचा होता. मार्गावर गेल्यानंतर कोणती साधना करावी.याविषयी रामकृष्ण परमहंस यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंद यांनी आपली उर्वरित जीवन आपण रामकृष्ण परमहंस यांनी सांगितलेल्या मार्गाने व्यथित करायचे ठरवले. 1886 साली कृष्ण परमहंस यांचे निधन झाल्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी आपल्या गुरुबंधूंचा एक गट तयार केला. या गटाच्या माध्यमातून अनेक धर्मग्रंथांचा सखोल आणि सांगोपांग अभ्यास केला. अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला जर भारतीय समाजाबद्दल माहिती हवी आहे तर त्यासाठी आपल्याला भारत भ्रमण केले पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली आणि भारत ब्रह्मणाला सुरुवात केली.

स्वामी विवेकानंद यांचे भारत भ्रमण | vivekanand Bharat bhramanti

स्वामी विवेकानंद यांनी भारतभ्रमण करत असताना अनेकांशी लोकसंपर्क आला. भारतीय समाजातील सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पैलू यांचे जवळून निरीक्षण केले.तसेच आजूबाजूचे परीक्षण स्वामी विवेकानंद यांनी केले. ते समाजाची झालेली दयनीय अवस्था, सामान्य व्यक्तींच्या जीवनात असलेली दुःखे, असेअनेक गहन प्रश्न या सर्वांची जाण स्वामी विवेकानंद यांना आली. आता आपण या भारतीय समाजाला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी पूर्णवेळ काम करणार अशी शपथ स्वामी विवेकानंद यांनी घेतली.

प्रवचन आणि व्याख्यानातून मार्गदर्शन | swami vivekanand vyakhhyane

स्वामी विवेकानंद यांनी भारत भ्रमात करत असताना हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान त्याचबरोबर हिंदू धर्माची थोरवी आपल्या प्रवचनांच्या आणि व्याख्यानांच्या माध्यमातून केवळ भारतातच नव्हे तर हिमालय, तिबेट यामध्ये देखील पसरवली. स्वामी विवेकानंदांचा हिंदू धर्माचे एक गाढे अभ्यासक म्हणून सर्व दूर ख्याती पसरत होती. यादरम्यान अमेरिकेमध्ये भरणाऱ्या शिकागो सर्व धर्म परिषदेमध्ये भारताचे  प्रतिनिधित्व करण्याची संधी स्वामी विवेकानंद यांना मिळाली.

विवेकानंद आणि शिकागो सर्व धर्म परिषद |swami vivekanand v sarvdharam parishad

अमेरिकेमध्ये 1893 साली जागतिक धर्म संसदेची सर्वधर्म परिषद भरणार होती. या धर्म परिषदेला हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खेतडीच्या महाराजांच्या आग्रहामुळे तसेच त्यांनी केलेल्या आर्थिक सहकार्यातून स्वामी विवेकानंद शिकागो धर्म परिषदेमध्ये जाणार होते.

स्वामी विवेकानंद आणि शिकागो धर्म परिषदेचा प्रवास | vuvekanandancha shikago pravas

स्वामी विवेकानंद शिकागो धर्म परिषदेला जाण्यासाठी मद्रासहून 31 मे 1893 ला बोटीने जपान मार्गे शिकागोला पोहोचले. स्वामी विवेकानंद या सर्वधर्म परिषदेला जात असताना खेतडीच्या महाराजांनीच त्यांना विवेकानंद हे नाव दिले. तेव्हापासून ते नरेंद्र दत्त न राहता त्यांची ओळख आता स्वामी विवेकानंद अशी बनली.

स्वामी विवेकानंदांचे शिकागो धर्म परिषदेतील भाषण |swami vivekanandanche shikago dharm prishetil bhashan

स्वामी विवेकानंद शिकागो धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माबद्दल आपले एक आकलन मांडणार होते. हिंदू धर्म जगामध्ये एक सर्वश्रेष्ठ धर्म आहे.हे अवघ्या जगाला पटवून देण्याची नामी संधी स्वामी विवेकानंद यांना या अमेरिकेमधील शिकागो परिषदेमुळे प्राप्त झाली. स्वामी विवेकानंद यांना या धर्म परिषदेमध्ये आपले विचार मांडण्याची संधी इतर धर्माच्या प्रवक्त्यांनी मांडल्यानंतर खूप उशिराने मिळाली. स्वामी विवेकानंद शिकागो धर्म परिषदेच्या व्यासपीठावरती गेले. व्यासपीठावर गेल्यावर स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरुवात अमेरिकेतील माझे बंधू आणि भगिनीनो अशी केली. त्यांची ही भाषणाची प्रभावी सुरुवात ऐकून शिकागो धर्म परिषदेमध्ये टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. स्वामी विवेकानंद यांनी विश्वबंधुत्वाची जी भूमिका मांडली ती खरोखरच अनेक धर्म अभ्यासक आणि विद्वान यांना आवडली. सर्व भाषणांमध्ये स्वामी विवेकानंद यांचे भाषण उजवे ठरले. संपूर्ण भारतामध्ये सर्व भारतीयांची मने जिंकणारे स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण जगाची मने जिंकली. स्वामी विवेकानंद यांचे मॅक्समुल्लर यासारख्या विद्वानांनी देखील कौतुक केले. अमेरिकेतील शिकागो धर्म परिषदेनंतर स्वामी विवेकानंद इंग्लंडला गेले. काळानंतर 1897 मध्ये पुन्हा कोलकात्याला आले. आपल्यालाही हिंदूधर्म संस्कृतीचे मोठेपण घराघरांमध्ये पोहोचवायचे असेल तर आपल्याला एखादी संस्था स्थापन करणे गरजेचे आहे. याच विचारांनी स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली.

स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण मिशन | swami Vivekanand ani ramkrishna mission

स्वामी विवेकानंद यांनी आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या निधनानंतर त्यांच्या  स्मरणार्थ 1मे 897 ला रामकृष्ण मिशन या संस्थेची कोलकात्या जवळील बेलूर मठामध्ये स्थापना केली. रामकृष्ण मिशनच्या साह्याने देशामधील गरिबांची सेवा करणे. ज्या लोकांचा आत्मविश्वास गेलेला आहे अशा लोकांना आत्मविश्वास देणे. नडल्या अडलेल्यांना मदत करणे या भूमिकेतून रामकृष्ण मिशन काम करू लागली.

स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशनची कार्य |ramkrishna mission karya

स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन सुरू केल्यानंतर रामकृष्ण मिशन मार्फत अनेक सेवाभावी उपक्रम सुरू केले. जसे की शाळा कॉलेज स्थापन करणे, गोर गरिबांसाठी दवाखान्याची सोय करणे तसेच वेगवेगळे परिसंवाद, चर्चासत्रे यांचे देखील आयोजन या रामकृष्ण मिशन मार्फत केले जात होते. अध्यात्म आणि लोकसेवा यांची सांगड घालण्याचे अतिशय महत्त्वाचे काम स्वामी विवेकानंद यांनी केले. आम्हाला मूर्ती रूप देण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे अनेक अनुयायी रामकृष्ण मिशनमध्ये सहभागी झाले. रामकृष्ण मिशन मार्फत सुरू झालेले दवाखाने, कॉलेजेस आजही अगदी दिमाखात सुरू आहेत.

स्वामी विवेकानंद आणि अद्वैत तत्त्वज्ञान |vibekanand philosophy tatvdnyani

स्वामी विवेकानंद यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला होता. तत्त्वज्ञानाची मांडणी करत असताना निस्वार्थपणे आपण उपासना केली पाहिजे. लोकसेवा केली पाहिजे. आपल्या मनाला एक शिस्त लावली पाहिजे. आत्म्यामध्ये प्रचंड ताकद आहे त्या ताकदीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. आपले  संपूर्ण जीवन जनहितार्थ असले पाहिजे अशी भूमिका स्वामी विवेकानंद यांनी मांडली

स्वामी विवेकानंद यांची राष्ट्रवादी भूमिका |vivekanand rashtrvavadi bhumika

स्वामी विवेकानंद हे राष्ट्रवादी विचारांनी भरवलेले होते. समाजसेवेबरोबर राष्ट्रप्रेम हे देखील तितकेच गरजेचे आहे. हे त्यांनी वेळीच जाणले. आपल्या भारतवासी यांचे सर्वतोपरी कल्याण करणे.यासाठी स्वामी विवेकानंद नेहमीच आग्रही होते. स्वामी विवेकानंद यांनी या देशातील तरुणांना उठा जागे व्हा आणि आपले ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका. असा उद्देश केला.

स्वामी विवेकानंद यांचे सामाजिक कार्य |swami vivekanand samajik kary

स्वामी विवेकानंद यांनी आध्यात्मिक आणि राष्ट्रप्रेम याबाबत जशी आपल्या भूमिका मांडल्या.अगदी त्याच पद्धतीने सामाजिक कार्य देखील मोठ्या प्रमाणात केली. त्यातील बरीचशी कार्य आपण वरती रामकृष्ण मिशन या संस्थेची माहिती पाहताना पाहिलेले आहेत तरीदेखील काही ठळक बाबी आपण पाहूया.

1. बालविवाहास विरोध | bal vivah virodh

स्वामी विवेकानंद यांनी त्या काळामध्ये होत असलेले बालविवाह याचा विरोध केला. ही एक अनिष्ट प्रथा आहे. यासाठी लोकांनी ही प्रथा बंद केली पाहिजे असे विचार त्यांनी मांडले.

2. साक्षरतेचा प्रसार |shikshnacha prasar

आपल्याला आपले जीवन सुखदायी करायचा असेल तर शिक्षण हे अतिशय गरजेचे आहे. एक आनंद यांनी साक्षरतेचा पुरस्कार केला. रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून अनेक शाळा काढल्या.

3. बहुजन वर्गाच्या शिक्षण प्रसाराचे काम | bahujan vargala shikshan

बहुजन वर्गाला जर आपली उन्नती करायची असेल तर ,या वर्गाने संघटित झाले पाहिजे आणि जोमाने आपले शिक्षण पूर्ण केले पाहिजे. व्यक्तीच्या जीवनामध्ये घडवायचा असेल तर शिक्षण अतिशय गरजेचे आहे.असे अनेक प्रवचने व व्याख्यान यातून स्वामी विवेकानंद यांनी जाहीर केले

4. हिंदू धर्मात सुधारणा |hindu dharmat sudharna

हिंदू धर्मामध्ये कर्मकांडाला महत्व देणाऱ्या अनेक बाबी सामाजिक विकासामध्ये अडसर ठरत होत्या अशा सर्व बाबी हद्दपार झाल्या पाहिजेत आणि मानवतावादी समाज निर्माण झाला पाहिजे यासाठी स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्मामध्ये काही बाबींमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे अशी भूमिका घेतली यातून समाजाचा विकास हाच त्यांचा हेतू होता.

स्वामी विवेकानंद यांचे सांस्कृतिक कार्य |swami Vivekanand  sanskrutik kary

1. हिंदू धर्माचा प्रसार | hindu dhrmacha prsar

स्वामी विवेकानंदांचे सर्वात महत्त्वाचे सांस्कृतिक कार्य म्हणजे आपला हिंदू धर्म आणि त्याचे तत्त्वज्ञान किती श्रेष्ठ आहे. हे त्यांनी सर्व भारतीयांना तर सांगितलेच परंतु शिकागो धर्म परिषदेच्या माध्यमातून सर्व जगाला त्यांनी दाखवून दिले की हिंदू संस्कृती किती श्रेष्ठ आहे.

2. विश्वबंधुत्वाची भावना |vishvbnadhutv bhavna

सर्वजण एकाच परमेश्वराची लेकरे आहोत. रंग रूप धर्म भाषा यांच्या आधारावर कोणताही भेद न करता ईश्वराने आपली निर्मिती केलेली आहे.आपण सर्व बंधू भगिनी आहोत अशी भूमिका स्वामी विवेकानंद यांनी मांडली.

3. हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास |vivekanand hindu dhrmacha abhyas

वेद, उपनिषदे यासारख्या पुराणग्रंथांचा अभ्यास स्वामी विवेकानंद यांनी केला. त्याचबरोबर पाश्चात्य तत्त्वज्ञान यांच्या देखील विचारांचा आढावा स्वामी विवेकानंद यांनी घेतला. एक सर्वसमावेशक भूमिका आपल्या विचारातून मांडली. अध्यात्मातून लोकोधार किंवा लोकांची उन्नती असा एक आगळावेगळा विचार स्वामी विवेकानंद यांनी मांडला.
स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेल्या संस्था
स्वामी विवेकानंद यांनी आपल्या कार्याला गती यावी म्हणून रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन या दोन संस्थांची स्थापना करून या संस्थांच्या माध्यमातून लोकांना आत्मिक बल देण्याचे काम केले.

लेखक स्वामी विवेकानंद लेखक | lekhak swami Vivekanand |writer swami vivekanand

मी विवेकानंद हे हिंदू धर्माचे गाढे अभ्यासक, तत्त्वज्ञ विचारवंत होते.त्याचबरोबर स्वामी विवेकानंद हे उत्तम लेखक देखील होते .स्वामी विवेकानंद यांनी प्रेमयोग धर्मयोग राज योग सारखे भव्य दिव्य ग्रंथ लेखन करून आपली वैचारिक भूमिका यातून मांडलेली आहे.

उत्तम व्याख्यानकार स्वामी विवेकानंद | vykhyate swami vivekanand

स्वामी विवेकानंद एक उत्कृष्ट व्याख्याते होते. त्यांनी भारतातच नव्हे तर युरोपातील अनेक देशांमध्ये शेकडोंच्या संख्येने व्याख्याने दिली. या व्याख्यानाच्या माध्यमातून हिंदू धर्माचे महत्त्व त्यांनी अवघ्या जगाला पटवून देण्याचे काम केले. तरुणांनी देशाच्या विकासासाठी कायम तयार असले पाहिजे. अशी भूमिका स्वामी विवेकानंदांनी घेतली. विश्वबंधुत्वाच्या भावनेने सर्वांनी राहिले पाहिजे. लोकांचा द्वेष न करता भूतदया दाखवली पाहिजे असा विचार त्यांनी आपल्या व्याख्यानातून बऱ्याचदा मांडला.

वेद अभ्यासक स्वामी विवेकानंद | ved abhyask Swami

स्वामी विवेकानंद जयंती निमित्त स्वामी विवेकानंदांचे मोठेपण सांगत असताना, स्वामी विवेकानंद यांचा वेदांचा प्रचंड अभ्यास होता. विवेकानंदांनी वेद उपनिषदे यांचा अभ्यास करत असताना त्यातील मानवतावादी विचार तसेच माणसाला कशा पद्धतीने व्यापक करतील. अशा सर्व विचारांचे संकलन करून आपली एक स्वतःची मांडणी केली. भारतातील ते  वेदाचे गाढे अभ्यासक होते. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

स्वामी विवेकानंद यांचा तरुणांना संदेश | swami vivekanand tarunana sandesh

विवेकानंद यांनी जर आपल्या भारत देशाला एक बलाढ्य महासत्ता बनायचे असेल तर या तरुणांमध्ये आत्मविश्वास आला पाहिजे. तरुणांनी अफाट मेहनत केली पाहिजे असा विचार स्वामी विवेकानंद यांनी मांडला. संदेश देत असताना एका व्यक्तीने मध्ये स्वामी विवेकानंद म्हणतात उठा जागे व्हा! जोपर्यंत आपले ध्येय आपण गाठत नाही तोपर्यंत थांबू नका. काय तर अविश्रांत काम केले पाहिजे अशी शिकवण स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना दिली.

आध्यात्मिक गुरु विवेकानंद |adhyatmik guru Vivekanand

स्वामी विवेकानंद अगदी सुरुवातीला ईश्वर आहे की नाही? याच्या शोधात प्रचंड  वाचन करू लागले. रामकृष्ण परमहंस यांच्या मार्गदर्शनाखाली खडतर साधना करून त्यांनी एक स्वतःचे विचार मांडले.  एक प्रकारे आध्यात्मिक गुरु म्हणून स्वामी विवेकानंद यांना एक ओळख प्राप्त झाली.

स्वामी विवेकानंदांचा मृत्यू | vivekanand mrutyu

स्वामी विवेकानंद संन्यासी होते. रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून खूप मोठे मानवतावादी कार्य भारतात तसेच युरोपीय राष्ट्रात देखील त्यांनी केले. स्वामी विवेकानंद परदेशामध्ये व्याख्याने दिल्यानंतर 1900 मध्ये भारतामध्ये परत आले. भारतात परत आल्यानंतर रामकृष्ण मठाच्या माध्यमातून लोकोपयोगी कामाचा झपाटा त्यांनी लावला. स्वामी विवेकानंद यांचा कामाचा व्याप वाढत होता. परंतु त्यांना आतून जाणीव होऊ लागली की, आपले शरीर आता विकल होत चालले आहे. स्वामी विवेकानंदांची प्रकृती ढासळत होती. दिवसभर व्याख्याने , भाषणे यासारख्या अनेक बाबी विवेकानंद मराठी माहिती लिहिताना यामुळे त्यांचे शरीर आता साथ देत नव्हते. स्वामी विवेकानंद हे साधक संन्यासी होते. अंतर्मन त्यांना सांगू लागले. आपले शरीराचा फार काळ टिकणार नाही याची जाणीव त्यांना होऊ लागली. स्वामी विवेकानंद यांनी आपल्या रामकृष्णा मिशन मार्फत चालणाऱ्या कार्याची विकेंद्रीकरण पद्धतीने वाटणी केली. अनेकांना वरती महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. अखेरच्या क्षणी स्वामी विवेकानंद म्हणाले जनसेवेचे व्रत  मी हाती घेतले होते ते व्रत आपण कधी सोडू नका.यानंतर स्वामी विवेकानंद यांनी 4 जुलै 1902 साली थोर तत्त्वज्ञाने या जगाचा वयाच्या 39 व्या वर्षी निरोप घेतला.
आमचा आजचा युवक दिन ,स्वामी विवेकानंद जयंती मराठी माहिती हा विशेष लेख कसा वाटला हे नक्की कमेंट करा.

Leave a Comment