A हिंदी दिवस कविता | hindi divas kavita

आज आपण हिंदी भाषा दिनाचे औचित्य साधून आजचा विषय घेतला आहे हिंदी दिवस कविता म्हणजेच हिंदी दिवस पर कविता आज हम देखने वाले है।

हिंदी दिवस कविता
हिंदी दिवस कविता

हिंदी दिवस कविता | hindi divas kavita

आपण त्रिभाषा सूत्राचा स्वीकार केला असून, त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषा शिक्षणामध्ये समाविष्ट केलेले आहे.या भाषेतीलच ज्या भाषेला राष्ट्रभाषेचा मान आहे,ती भाषा म्हणजे हिंदी भाषा होय आणि त्या भाषेचा गौरव म्हणून दिवस साजरा केला जातो तो दिवस म्हणजे हिंदी दिवस होय, म्हणूनच आज आपण हिंदी दिवस कविता जिच्या माध्यमातून हिंदी भाषेचे महत्व समजून घेणार आहोत.

हिंदी दिवस पर कविता | hindi diavs par kavita

आपण ज्यावेळी हिंदी दिवस याविषयी माहिती पाहतो त्यावेळी ती आपल्याला कविता पाहत असताना हिंदी दिवस पर कविता या सदराखाली पहावी लागेल म्हणूनच आपण हिंदी दिवस पर आधारित एक कविता पाहूया ज्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला हिंदी भाषेचे महत्व नक्कीच समजेल चला तर मग हिंदी दिवस,hindi day poem म्हणजे कविता पाहूया.

हिंदी भाषा  दिवस कविता | hindi bhasha divas kavita

 

हिंदी भाषा म्हणजे,

नाही केवळ भाषा,

ती धागा आहे अखंड भारताची, 

मधुर बोलीची हिंदी वाणी ।।१।।

 

तिजला नाही ठाऊक भेदाभेद ,

ओळखते ती केवळ मानवाला,

नाही रुचत तिला जाती पाती,

संस्कृतची ती आहे कन्यारत्न ।।२।।

 

साथीला देवनागरीची ढाल ,

घेऊनी आपल्या इतर भाषा भगिनींना,

आधुनिकतेची शिखरे तीही सर करते सहज,

नाही लागत तिला कुबड्या इंग्रजीच्या।।३।।

 

बागडते ती ज्ञान सागरात,

 घेऊनी भारतीय संस्कृतीची पताका,

मायभूमीबरोबरच कर तू संपूर्ण विश्वाला अचंबित,

वाढवूनी हिंदी भाषेचा सन्मान।।४।।

 

हरदिन संवाद साध आपल्या वैखरीतून,

विसरू नकोस होतो गुलाम इंग्रजीचे,

उदरात आहे तिच्या साहित्य – कलेची खाण,

तू व्यांसगाने शोधूनी काढ तिच्या अंत:करणातील मर्म विशाल ।।५।।

 

विश्वात हिंदी आहे ओळख भारताची ,

नकोस विसरू खोट्या फॅशनपायी,

स्व-त्वाला आणि माय भूमीला,

पचविते आधुनिक ज्ञान तंत्रज्ञान।।६।।

 

कोळूनी पिते साहित्य – कला –  तत्त्वज्ञान,

माथ्यावरी मिरवुनी अनेक बिरुदे – पदके महान,

उंचावली भारतभूमीची शान,

नको मला कुबड्या इंग्रजीच्या।।७।।

 

स्वतःत सामावून घेईन नवीन तंत्रज्ञान,

नाही मी राणी व्हिक्टोरियाची मिंधी,

ललाटावर आहे माझ्या भारतभूमीची बिंदी,

जन्मीले पोटी संस्कृतच्या।।८।।

 

घेऊनी देवनागरीची ढाल,

गट्टी आपल्या भाषा भगिनींची,

शिकवूनी आधुनिक ज्ञानतंत्रज्ञान,

उंचाविते अखंड भारताची शान।।९।।

 

अशा पद्धतीने आपण हिंदी भाषेविषयी असणारा अभिमान हिंदी दिवस पर कविता किंवा हिंदी दिवस कविता यांच्या माध्यमातून पाहिलेला आहे आपल्याला आमची ही हिंदी दिवस कविता कशी वाटली हे नक्की कमेंट करा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!

Leave a Comment