A 26 जानेवारी मराठी भाषण 2023| republic day speech in marathi 2023

जानेवारी महिना सुरू होताच शाळकरी मुलांना तसेच महाविद्यालयीन मुलांना ज्या दिवसाची प्रचंड ओढ लागलेली असते. तो दिवस म्हणजे 26 जानेवारी. 26 जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारतभर साजरा करत असतो. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची भाषणे, देशभक्तीपर गीते, सामूहिक कवायती, आर एस पी, एन सी सी परेड, स्काऊट गाईड पथक परेड अशी कितीतरी कार्यक्रमांची सरबत्ती असणारा दिवस म्हणजे 26 जानेवारी.  26 जानेवारीच्या या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये प्रत्येक विद्यार्थी तसेच पालकांची देखील इच्छा असते की आपल्या मुलाने 26 जानेवारीच्या कार्यक्रमांमध्ये भाषणाची संधी मिळावी. म्हणूनच आजच्या लेखाच्या माध्यमातून अगदी अप्रतिम असे 26 जानेवारी मराठी भाषण 2023.आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत. हे भाषण आपण republic day speech in marathi आपण व्यवस्थित तयार करा.जेणेकरून प्रजासत्ताक दिनाच्या मराठी भाषणामध्ये आपण टाळ्या घेतल्याखेरीज राहणार नाही.आमचे 26 जानेवारी छोटेसे भाषण आपल्याला नक्कीच आवडेल.चला तर मग 26 जानेवारी मराठी भाषण या आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया.
 
26 जानेवारी मराठी भाषण 2023
26 जानेवारी मराठी भाषण 2023

आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या मराठी भाषणामध्ये आम्ही आपल्याला प्रजासत्ताक दिनाविषयी अतिशय महत्वाची माहिती देणार आहोत. 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो तर प्रजासत्ताक दिन म्हणून 26 जानेवारी साजरा केला जातो. या 26 जानेवारी चे भारतीय इतिहासातील नेमके महत्त्व काय आहे? याची नक्कीच कल्पना आपल्याला 26 जानेवारीच्या मराठी भाषण यातून येईल. चला तर मग आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया.

26 जानेवारीच्या भाषणाचे वेगळेपण |republic day speech importnace

आपण शाळा महाविद्यालयामध्ये होणाऱ्या विविध भाषण स्पर्धांमध्ये भाग घेत असाल. तरी यातील 26 जानेवारी चे भाषण हे एक आगळे वेगळे भाषण हवे. संपूर्ण शैक्षणिक वर्षाचा विचार केला तर १५ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन असला तरी साधारणपणे ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाळ्याचे दिवस असतात15,ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन असला तरी, आपल्याला पावसाळ्याच्या दिवसांमुळे कार्यक्रमाची तयारी करताना अनेक मर्यादा येत असतात. 26 जानेवारी हा एकदम भरगच्च कार्यक्रम असलेला राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच आपल्याला 26 जानेवारी चे भाषण तयार करत असताना त्याची तयारी व्यवस्थित करणे अतिशय गरजेचे आहे. आम्ही आपल्याला 26 जानेवारी मराठी भाषण देत आहोत. हा एक आमचा आदर्श नमुना आहे. त्यामध्ये आपल्या पद्धतीने, आपल्या शाळेमध्ये होणारा 26 जानेवारी कार्यक्रम नेमका कसा साजरा होणार आहे? त्याचे काही एक स्वरूप पाहून आपण आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या  भाषणाची तयारी करावी.
 

26 जानेवारी मराठी भाषण 2023| republic day speech in marathi|प्रजासत्ताक दिन मराठी भाषण2023|prajasattak dinache marathi bhashan 2023 |republic day small speech in marathi 

नमस्कार! आज भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन. या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझे गुरुजन वर्ग, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो! आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी अबक आपणाला जे दोन शब्द सांगणार आहे. ते आपण शांतचित्ताने ऐकावेत. ही नम्र विनंती.
राष्ट्रीय सण उत्सव म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर दोन दिवस पटकन उभे राहतात. ते म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. ज्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन हा आपला एक राष्ट्रीय उत्सव आहे.त्याच पद्धतीने आपण 26 जानेवारी हा दिवस देखील एक राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करतो. 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतभर आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळाले खरे …….. परंतु या स्वतंत्र झालेल्या भारताला एक राष्ट्र म्हणून किंवा लोकांच्या कल्याणासाठी यापुढे देशाची राज्यव्यवस्था कशी असावी? आपला स्वतंत्र भारत देश कोणते नियमाने कायद्यांच्या चौकटीमध्ये राहून या स्वातंत्र्याचा अगदी आनंदाने उपभोग घेणार आहे?. या सर्वांसाठी काही एक नियम बनवणे आवश्यक होते. या कामासाठीच घटना समिती स्थापन करण्यात आली.
भारतीय राज्यघटना निर्माण करण्यासाठी जी घटना समिती नेमली होती. त्या घटना समितीमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. या समितीत एकूण  318सदस्य होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल 2 वर्षे 11 महिने 18 दिवस या कालावधीत इतर राष्ट्रांच्या अनेक राज्य घटनांचा अभ्यास करून, याच बरोबर भारतीय समाज रचना या सर्वांचा सांगोपांग विचार करून देशासाठी एक मजबूत संविधान बनवले.
भारतीय  संविधान म्हणजेच राज्यघटना होय.हे संविधान ज्या दिवशी संपूर्ण भारत देशामध्ये लागू करण्यात आले तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950. या दिवसाची आठवण म्हणूनच आपण 26, जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. याच दिवशी आपला भारत देश प्रजासत्ताक बनला. देशाची सर्व सत्ता प्रजेच्या हाती. तो देश म्हणजे प्रजासत्ताक होय. आज जगाच्या पाठीवर सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून भारत देशाला ओळखले जाते. त्याचबरोबर सर्वात मोठी लिखित राज्यघटना ही भारत देशाची आहे. भारतीय राज्यघटनेमुळे लोकांना आपले हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव झाली. आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीत चालत असताना त्यामध्ये जर कोणी खोडा घालत असेल किंवा एकंदरीतच जीवन जगत असताना कोणी व्यक्ती किंवा समुदाय एकमेकांना अडथळे आणत असतील मग ते कोणत्याही प्रकारच्या असो त्या व्यक्तीला कोणते शासन होणार?या सगळ्यांच्या नोंदी किंवा त्याची नियमावली ज्या ठिकाणी एकत्रित करण्यात आले आहे ते आपले भारताचे संविधान. थोडक्यात याला देश चालवण्याचे नियम म्हंटले तरी वावगे वाटणार नाही. ज्या दिवशी संविधान स्वीकारले गेले तो दिवस म्हणजे 26 जानेवारी.
15 ऑगस्ट 1947 ला आपण स्वतंत्र झालो खरे परंतु या खऱ्या स्वातंत्र्याचा आस्वाद ज्या दिवसापासून घ्यायला कायदेशीर सुरुवात झाली.तो दिवस म्हणजे 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन होय. या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संपूर्ण भारतामध्ये एक आनंदाचे वातावरण असते. आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन सोहळा भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी अतिशय दिमाखदार आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात. अनेक परदेशी पाहुण्यांना देखील या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी खास आमंत्रित केले जाते.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर भारताच्या नौदल, वायुदल व भूदल या तिन्ही लष्करांच्या परेड राजपथावर होत असतात. हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अतिशय नयनरम्य असतो. आपल्या भारत देशासाठी अनमोल असे योगदान देणाऱ्या लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस,पंडित नेहरू भगतसिंग ,राजगुरू, सुखदेव अशा अनेकांच्या त्यागातून आणि बलिदानातून आपण स्वतंत्र झालो आहोत म्हणूनच त्यांच्या कार्याला या पवित्र दिनी उजाळा देण्याचे काम केले जाते. संपूर्ण भारतातील एनसीसीचे विद्यार्थी या परेडमध्ये सहभागी असतात. 26 जानेवारी च्या मुख्य कार्यक्रमानंतर स्वतः पंतप्रधान या विद्यार्थ्यांशी संवाद साधतात हे या कार्यक्रमाचे विशेष.
दिल्ली या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा उत्साहात साजरा केला जातो. त्याच पद्धतीने शाळा ,महाविद्यालयांमध्ये, कार्य कार्यालयाचा मध्ये देखील झेंडावंदन करून तिरंग्याला सलामी दिली जाते. प्रजासत्ताक दिनाच्या घोषणा देखील दिल्या जातात. एवढे बोलून मी माझ्या आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या भाषणाला विराम देत असताना,मी एवढेच आवाहन  माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी यांना करतो, भारत देशाला मिळालेले स्वातंत्र्य अनेकांच्या त्याग आणि बलिदानातून मिळालेले आहे.अनेकांनी परिश्रम घेतले आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला.आजच्या 26 जानेवारी या दिवशी तो प्रजासत्ताक बनला. आता या भारताचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे, भारतीय संविधानाचे पालन करणे ही आपली सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे.एखादी गोष्ट मिळवणे सोपे असते परंतु ती टिकवणे अतिशय अवघड असते. हे सर्वांनी लक्षात ठेवा.
 
हा देश माझा,
 मी देशाचा.
 
ही भूमिका अखेरपर्यंत आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवूया. एवढे बोलून मी माझे प्रजासत्ताक दिनाचे भाषण थांबवतो जय हिंद! जय भारत! 
 
 

26 जानेवारी मराठी भाषण 2023 पीडीएफ| 26 जानेवारी छोटेसे भाषण republic day speech in marathi 2023 pdf

 
भाषण ही एक कला आहे. प्रत्येक व्यक्तीची भाषण करण्याची शैली ही वेगळी असते. आजचे प्रजासत्ताक दिनाचे मराठी भाषण आपल्याला पीडीएफ स्वरूपात देत आहोत.जेणेकरून आपल्याकडे ते कायमस्वरूपी संग्रही राहील.
 

26 जानेवारी भाषण मराठी pdf  

 
                DOWNLOAD
 
 
अशा पद्धतीने आपण प्रजासत्ताक दिनाचे मराठी भाषण अतिशय छानपणे सादर  करू शकता.republic day marati speech 2023 तयारी करत असताना जर आपल्याला या भाषणातील तारखा वगैरे लक्षात राहत नसतील तर आपण त्या न सांगता प्रजासत्ताक दिन याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करावा. भाषण देत असताना आपल्यामध्ये आत्मविश्वास हवा. हे देखील तितकेच गरजेचे आहे.
 
 

26 जानेवारी मराठी भाषण 2023  ७ नमुने| republic day speech in marathi seven sample 2023

आपल्याला जर या अप्रतिम प्रजासत्ताक दिनाच्या भाषणाच्या जोडीला अजून काही नमुने हवे असतील तर याचा देखील उपयोग करावा.
२६ जानेवारी अप्रतिम मराठी भाषणे | republic apratim marathi bhashane

प्रजासत्ताक दिन मराठी भाषण व्हिडिओ |26 january marathi speech vedeo 

 
 
आमचा आजचा 26 जानेवारी मराठी भाषण 2023 हा लेख कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद! 

Leave a Comment