दहावी नंतर पुढे काय ?

What Education After 10th dahavi Nantr Pudhe Kay Shikave ?

नमस्कार विद्यार्थी! दहावीचा निकाल कधी लागणार यापेक्षा मित्रांनो दहावी नंतर पुढे काय ? हा प्रश्न सतत मनात येत असेल, कारण का तर आपण पहिली पासून दहावी  पर्यंत मजल दर मजल करत पुढच्या वर्गांमध्ये जात असतो. कोणता विषय निवडावा वगैरे यासारखे प्रश्न जास्त उद्भवतच  नाहीत. मात्र दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर दहावी नंतर काय करावे? हा सगळ्यांनाच पडलेला एक मोठा प्रश्न असतो. तर आजच्या लेखामध्ये जास्त सविस्तर नाही पण किमान दहावीनंतर कोणकोणत्या संधी किंवा मार्ग उपलब्ध असतात त्यांची तोंडओळख व्हावी व  दहावी नंतर काय करावे ? यासाठी तुम्हाला एक दिशा किंवा मदत मिळावी. यासाठी आजच्या लेख नक्कीच मदत करेल. 

dahavi Nantr Pudhe Kay Shikave ?
दहावीनंतर पुढे काय? 

दहावी नंतर काय आहेत विविध मार्ग | Dahavi nantr Shikshnache vividh Mar

                 हे मार्ग अगदी ढोबळ मानाने केलेले आहेत पण यातून काही एक दिशा नक्की सापडेल. चला तर मग दहावी नंतर काय ? हे पाह्यला सुरुवात करूया. 

1. अकरावी बारावी महाविद्यालयीन शिक्षण | Akravi Baravi Mahavidyalyin Shikshn 

   बरेचसे विद्यार्थी दहावी पास झाल्यानंतर कॉलेज करतात.म्हणजेच अकरावी-बारावीचे शिक्षण ते पूर्ण करतात आणि त्यानंतर पदवी किंवा विविध डिप्लोमा करतात.अकरावी बारावी करत असताना आपल्याला तीन शाखांपैकी एका शाखेची निवड करावी लागते . त्या तीन शाखांमध्ये आर्ट ,कॉमर्स आणि सायन्स अशा तीन हे कल्टी पडतात त्यांची सविस्तर माहिती पुढे येणारच आहे. फक्त आपण हे लक्षात घेतले की Dahavi Nantr Kay तर आपण अकरावी-बारावी महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकतो.

2. आयटीआय क्षेत्रातील संधी | Iti Kshetratil Sandhi |

       दहावीनंतर ज्या  विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून विविध प्रशिक्षण  तसेच कोर्स करून एखाद्या कंपनीमध्ये तात्काळ नोकरी लागावी किंवा आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करावाअसे वाटत असेल तर ते विद्यार्थी Iti  अभ्यासक्रमाची निवड करतात.

       जसे की वेल्डर, फिटर ,वायरमेन या सारखी ट्रेड किंवा कोर्स आयटीआय मध्ये असतात. 

3. पॉलिटेक्निक म्हणजेच विविध डिप्लोमा | Education In Diploma Secto

          दहावी पास झाल्याबरोबरच ज्या विद्यार्थ्यांचे भविष्यमध्ये कोणत्या क्षेत्रात आपल्याला करिअर करायची आहे. निश्‍चित झालेले असते ते विद्यार्थी पॉलिटेक्निक म्हणजेच विविध डिप्लोमा कोर्सेस ला प्रवेश घेतात.

                 जसे की एखाद्याला मेकॅनिकल इंजिनिअर व्हायच हे हे पक्के ठरलेले आहे . तर तो विद्यार्थी अकरावी बारावी न करता मेकॅनिकल इंजिनिअर च्या डिप्लोमासाठी प्रवेश घेतो व हा डिप्लोमा झाल्यानंतर त्या क्षेत्रातील पदवीचे शिक्षण चालू ठेवतो किंवा ते चालू ठेवणे शक्य नसल्यास डिप्लोमा प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवू शकतो.या तिन्ही मार्गांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे-  

अकरावी-बारावी महाविद्यालयीन शिक्षण | Akravi Baravi Mahavidyalyin Shikshan 

1. विज्ञान शाखा | Science 

                 जे विद्यार्थी अभ्यासामध्ये हुशार असतात इंग्रजी वरती ज्यांची  पकड असते किंवा विज्ञान आणि गणित या विषयांमध्ये ज्यांना आवड असते ते विद्यार्थी दहावी नंतर काय करू शकतात तर  विज्ञान शाखेची निवड करतात.अकरावी-बारावीला विज्ञान शाखेतील शिक्षण पूर्ण केल्यानंतर शास्त्रज्ञ ,डॉक्टर,इंजिनीयर यासारख्या नोकरीच्या संधी आपल्याला मिळू शकतात. मात्र हे करत असताना काही एक विषय निवड विद्यार्थी म्हणून तुम्ही केली . पाहिजे आपल्याला 11 वी 12 वी नंतर काय करायचे आहे ? यानुसार त्या विषयाची निवड आपल्याला करावी लागते.  त्या  विषयांच्या गटांचा थोडक्यात परिचय – 

1. पी सी एम | Physics ,Chemistry & Mathas 

                 PCM चा Full फॉर्म असा  फिजिक्स,केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स. ज्या विद्यार्थ्यांना अकरावी बारावी नंतर अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जायचे आहे ते विद्यार्थी हा गट घेऊन बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये प्रवेश घेऊ शकतात यामध्ये सिव्हिल इंजिनियर मेकॅनिकल इंजिनिअर या क्षेत्रांचा समावेश होतो. 

2. पी सी बी | Physics ,Chemistry &Biology 

                           फिजिक्स केमिस्ट्री व बायोलॉजी ज्यांना  दहावी नंतर  इंजिनियर क्षेत्रात रस नाही पण बारावी नंतर मेडिकल क्षेत्र म्हणजेच डॉक्टर ,फार्मसी यासारख्या क्षेत्रात आवड आहे त्यांना बायोलॉजी म्हणजेच जीवशास्त्र हा विषय घ्यावा लागतो. मॅथ्स घेण्याची आवश्यकता नसते. 

3. जनरल ग्रुप | Physics ,Chemistry,Maths  &Biology 

                          थोडक्यात वरील गट निवडत असताना भविष्यात आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे हे ठरवूनच पी सी एम की पीसीबी हे अगोदरच निश्चित असावे.  बऱ्याचदा काही विद्यार्थी यावर ठाम नसतात त्यांच्यासाठी देखील एक पर्याय उपलब्ध आहे.या पर्यायामुळे अभ्यासाचा बोजा हा थोडा वाढलेला दिसतो तो गट म्हणजे जनरल ग्रुप ध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स आणि बायोलॉजी हे 4  विषय घेऊन तुम्ही अकरावी-बारावी करू शकता व निकालानंतर अभियांत्रिकी शाखेत जायचे की मेडिकल शाखेत जायचे याविषयी काही एक निर्णय घेऊ शकता सांगण्याचा मुद्दा हा की पुढे मला काय करायचे हे अगोदरच ठरलेले असेल तर गट निवडताना आपल्याला मदत होईल. 

            वरील विवेचनातून विज्ञान शाखेतील विषय व त्यांचे गट व भविष्यातील संधी यांची काही एक  कल्पना नक्कीच आली असेल त्यानंतर आपण पुढे वळूया दुसऱ्या शाखेकडे ती म्हणजे वाणिज्य शाखा. 

2. वाणिज्य शाखा  | Commerce 

    वाणिज्य म्हणजेच कॉमर्स शाखा अलीकडे या शाखेकडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात दिसतो.  ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखा अवघड वाटते ते विद्यार्थी या शाखेची निवड करतात. वाणिज्य शाखेची निवड केल्यानंतर बँकिंग क्षेत्रातील नोकऱ्या सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट या क्षेत्रात तुम्ही नोकरी करू शकता.  वाणिज्य शाखेमध्ये अर्थशास्त्र ,लेखा म्हणजेच अकाउंट, इंग्रजी व व्यवसाय अभ्यासक्रम यासारखे विषय निवडू शकता.  थोडक्यात बँकिंग क्षेत्रात ज्यांना आवड आहे त्यांनी कॉमर्स निवडावे .आज विद्यार्थ्यांचे आवडते क्षेत्र म्हणजे कॉमर्स आहे. 

3. कला शाखा | Arts 

     आर्ट्स म्हणजेच कला शाखा यांना विज्ञान आणि वाणिज्य शाखा अवघड वाटतात ज्यांना इंग्रजी भाषेची अकारण भीती असते ते बरेच विद्यार्थी कला शाखा निवडतात.कला शाखेच्या माध्यमातून मराठी हिंदी इतिहास, मानसशास्त्र ,राज्यशास्त्र, तर्कशास्त्र हे विषय मराठी माध्यमात घेऊन , इंग्रजी कंपल्सरी विषय  कला शाखेतून शिक्षण पूर्ण करू शकता. त्यानंतर पदवी घेतल्यानंतर विविध स्पर्धा परीक्षा, शिक्षक,अधिकारी  निवडीच्या  परीक्षा विद्यार्थ्यांना देता येतात. थोडक्यात जे साधारण बुद्धिमत्तेचे विद्यार्थी आहेत ते कला शाखेकडे वळतात  असे असले तरी या शाखेची निवड करून काही विद्यार्थी क्लासवन अधिकारी देखील होतात हे विसरून चालणार नाही. 

               या वरील तीनही शाखांमध्ये नोकरीच्या संधी आहेत गरज आहे ती आपली आवड नावड  ओळखून  आपली बौद्धिकक्षमता बघून त्यानुसार शिक्षण घेण्याची. 

2. आयटीआय क्षेत्रातील शिक्षण | Education In Iti Field 

                                      ज्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे काही व्यावसायिक कौशल्य हवीत असे वाटते ते विद्यार्थी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध कोर्सेसला प्रवेश घेतात. या कोर्सच्या माध्यमातून वायरमेन ,फिटर, टर्नर, वेल्डर ,डिझेल मेकॅनिकल या सारख्या कोर्सेस च्या माध्यमातून दोन ते तीन वर्षाचा कोर्स करून विविध कंपन्यांमध्ये किंवा स्वतःचा व्यवसाय देखील विद्यार्थी करू शकतात. 

                        थोडक्यात आयटीआय आहे उदरनिर्वाहाची तात्काळ संधी उपलब्ध करून देणारेव सहज सोपे शिक्षण आहे. या  शिक्षणात पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक कार्यावर जास्त भर असतो. 

3. पॉलिटेक्निक किंवा डिप्लोमा | Diploma

      दहावी पर्यंत शाळा शिकत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांचे भविष्यामध्ये मी कोण बनणार ?  याविषयी विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी अगोदरच निश्चित केलेले असते की मला दहावीनंतर इंजिनिअर बनायचे आहे असे विद्यार्थी अकरावी बारावी न करता ज्या क्षेत्रात इंजिनीअरिंग करायचे आहे त्या क्षेत्रात डिप्लोमा कोर्सेस साठी प्रवेश घेतात. डिप्लोमा कोर्सेस पूर्ण केल्यानंतर काही विद्यार्थी नोकरी करत करत आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करतात.

       थोडक्यात काय मला भविष्यात काय बनायचे आहे हे जर आधीच ठरलेले असेल आपली आवड निवड ठरलेले असेल तर विद्यार्थी पॉलिटेक्निक मध्ये प्रवेश घेऊ शकतो. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर एक एंट्रन्स एक्झाम होते. त्या परीक्षेचे नाव आहे डिप्लोमा प्रवेश परीक्षा  या entrance परीक्षेच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळत असतात हुशार विद्यार्थ्यांना सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो.  कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकचे पैसे खर्च करून प्रायव्हेट डिप्लोमा कोर्सेस ला प्रवेश घ्यावा लागतो. हे कोर्सेस साधारणपणे तीन वर्षाचे असतात डिप्लोमा कोर्सेस मध्ये सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनियर ,ऑटोमोबाईल इंजिनियर, केमिकल इंजिनियर,कम्प्युटर  इंजिनिअरिंगच्या विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जाते.  जे विद्यार्थी डिप्लोमा करतात त्यांना भविष्यामध्ये त्याच विषयातील डिग्री करत असताना जास्त अडचणी येत नाहीत. ज्यांनी भविष्यात काय बनायचे निश्चित केले आहे त्यांनी अशा डिप्लोमा कोर्सेस ला प्रवेश आवर्जुन घेतला पाहिजे. 

 दहावी नंतर पुढे काय ? आजच्या लेखाचे सार 

    आजच्या दहावी नंतर काय  लेखातून तुमच्या लक्षात आले असेल जर तुम्हाला अकरावी-बारावी करायचे असेल तर तीन शाखांपैकी एक शाखा तुम्हाला निवडावी लागेल.शाखेची निवड झाल्यानंतर तुम्ही जर विज्ञान शाखेमध्ये जाणार असाल व भविष्यात तुम्हाला मेडिकल संबंधित क्षेत्रात जायचे असेल तर पीसीबी हा विषय गटनिवडावा लागेल आणि जर अभियांत्रिकी क्षेत्रात जायचे असेल तर पीसीएम हा विषयांचा गट निवडावा लागेल आणि जर कोणत्या क्षेत्रात जायचे हे निश्चितच नसेल व ते तुम्ही बारावी झाल्यानंतर ठरवणार असाल तर जनरल म्हणजेच पी सी एम बी हा गट तुम्हाला निवडावा लागेल. विद्यार्थ्यांनी हे गट विज्ञान शाखेत जाण्यापुर्वी नीट अभ्यास करून निवडावेत. 

         ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये जायचे आहे ते वाणिज्य शाखेचा म्हणजेच कॉमर्स शाखेची निवड करतील. 

         ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेची भीती आहे किंवा बुद्धिमत्तेने साधारण आहेत असे विद्यार्थी कला शाखेच्या माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण करून हे देखील विविध क्षेत्रातील अधिकारी होऊ शकतात यात तिळमात्र शंका नाही. कला शाखेतील विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून देखील शिक्षण घेऊ शकतात. 

   चला तर मग दहावीनंतर पुढे काय हे सांगत असताना कोणताही मार्ग निवडा पण ज्या मार्गावर ती तुम्ही जाणार त्या मार्गावर सर्वोत्तम राहण्याचा प्रयत्न करा. कारण जर तुम्ही सर्वोत्तम असाल तर अशा व्यक्तींना सर्व क्षेत्रामध्ये मागणी आहे.  दहावीपर्यंतचे शिक्षण तुम्ही कसे घेतले यापेक्षा दहावीनंतर तुम्ही शिक्षणाविषयी किती गंभीर आहात यावर तुमचे भविष्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे अतिशय सजग राहून दहावीनंतर अभ्यासक्रमाची निवड करा आणि हो प्रामाणिकपणे अभ्यास करा कारण दहावी नंतरची ही काही मोजकी तीन-चार वर्ष तुमचे भविष्य काय असणार हे ठरवत असतात. 

                  या  लेखाच्या माध्यमातून केवळ कोणते मार्ग उपलब्ध आहेत त्यांची तोंडओळख करून देणे एवढाच हेतु  होता कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना याविषयी माहिती नसते. तुमच्या उज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी आमच्या dnynyogi.com कडून आपणास खूप खूप शुभेच्छा!

आमचे नवीन लेख

दहावी बोर्ड निकाल कधी लागणार 

दहावी नंतर या आहेत रोजगार /नोकरीच्या संधी  

1 thought on “दहावी नंतर पुढे काय ?”

Leave a Comment