Hari narke : महात्मा फुले यांच्या विचारांचे प्रसारक प्राध्यापक, विचारवंत हरी नरके यांचे निधन

आम्ही आज आपल्यासाठी एक दुःखद बातमी घेऊन आलेलो आहोत. (Professor and thinker Hari Narke passed away)ती म्हणजे असा एक विचारवंत की ज्या विचारवंताने कायमच समतावादी तत्त्वाचा पुरस्कार केला आणि या समतेच्या विचारांशी बांधील असलेले महात्मा फुले यांचा जीवन प्रवास लेखनीच्या रूपाने प्रकाश झोतात आणला ते व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ विचारवंत हरी नरके होय. आज त्यांनी मुंबई या ठिकाणी एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


प्राध्यापक हरी नरके यांचे कार्य


१. महात्मा फुले यांच्या जीवनावर साहित्य


हरी नरके यांचे महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे त्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर खूप मोठ्या प्रमाणात ग्रंथसंपदा निर्माण केली.


२. ओबीसी प्रश्नांना वाचा


इतर मागासवर्ग अर्थात ओबीसी वर्गाचे जे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांनी केले. ओबीसी समूहाचे प्रश्न अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांनी मांडले त्यावरती खूप मोठ्या प्रमाणात लेखन देखील केले.


३. समता परिषदेची स्थापना


हरी नरके यांनी आपल्या समता परिषदेच्या माध्यमातून कायमच ओबीसी समूहाच्या प्रश्नांची मांडणी त्यांनी केली.


४. पुणे विद्यापीठात महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख


महात्मा फुले यांचा वैचारिक वारसा जपला जावा त्यावरती संशोधन व्हावे यासाठी पुणे विद्यापीठामार्फत एक स्वतंत्र विभाग स्थापन केला गेला होता तो म्हणजे महात्मा फुले अध्यासन या अध्यासनाचे प्रमुख म्हणून त्यांनी अनमोल असे कार्य केले.


५. विविध समित्यांमध्ये काम


शासनामार्फत विविध समित्या स्थापन केल्या जातात त्या वेगवेगळ्या समित्यांमध्ये कधी प्रमुख म्हणून तर कधी समन्वयक म्हणून प्राध्यापक हरी नरके यांनी कामकाज पाहिले.\


६. समग्र महात्मा फुले ग्रंथरचनेत मोलाचे योगदान


महाराष्ट्र शासनामार्फत महात्मा फुले यांच्या जीवनावर एक भला मोठा ग्रंथ अध्यायवत करण्यात आला आणि तो प्रकाशित करण्याचे काम त्याची जबाबदारी प्राध्यापक हरी नरके यांच्या वरती होती.


७. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समग्र साहित्य


ज्याप्रमाणे महात्मा फुले यांचे कार्य महाराष्ट्र शासनामार्फत प्रकाशित करण्यात आले त्याचप्रमाणे 26 खंडांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य देखील प्रकाशित करण्यात आले या कामाची जबाबदारी देखील महाराष्ट्र शासनाने प्राध्यापक हरी नरके यांच्यावरती सोपवलेली होती.


८. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश


शिक्षण क्षेत्रामध्ये महात्मा फुले यांनी ज्या पद्धतीने योगदान दिले अगदी त्याच पद्धतीने सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी केलेले कार्य यावर देखील खूप मोठ्या प्रमाणात.


प्राध्यापक हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली


मंत्री छगन भुजबळ


छगन भुजबळ यांनी माझा जवळचा मित्र गेला समता परिषदेचे खूप मोठे नुकसान झाले असे शब्दांमध्ये प्राध्यापक हरी नरके यांच्या विषयी श्रद्धांजली अर्पण करताना आपले विचार मांडले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


प्राध्यापक हरी नरके यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशी खंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हरी नरके यांच्या विषयी श्रद्धांजली अर्पण करत असताना सांगितली.

आमचे इतर लेख

स्वातंत्र्य दिनाच्या अप्रतिम रांगोळ्या 

स्वातंत्र्य दिनाच्या गाजलेल्या 50 घोषणा /घोषवाक्य 

स्वातंत्र्य दिनाचे भाषण निबंध 

स्वातंत्र्य दिनाचे सूत्रसंचालन