मुंबईमध्ये पावसाचा रेड अलर्ट शाळा महाविद्यालयांना सुट्टी? |Red alert for rain in Mumbai, holiday for schools and colleges?

नमस्कार! गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण भारतभर पावसाने थैमान घातले आहे. भारताच्या हवामान विभागाने तर महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामध्ये मुंबई ठाणे कल्याण पालघर डोंबिवली बदलापूर यासारख्या शहरांचा समावेश आहे. म्हणूनच या भागांमध्ये 27 जुलै 2023 रोजी सर्व शाळा महाविद्यालय बंद होती. परंतु 28 जुलै 2023 रोजी शाळांना सुट्टी असणार का याविषयी कोणत्याही प्रकारचे प्रसिद्ध पत्रक अथवा बातमी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. 

 

मुंबईमध्ये पावसाचा रेड अलर्ट शाळा महाविद्यालयांना सुट्टी? |
मुंबईमध्ये पावसाचा रेड अलर्ट शाळा महाविद्यालयांना सुट्टी?

 

 

मुंबई लागत असलेला ठाणे जिल्हा आणि पालघर यांच्यामार्फत मात्र 28 जुलै,2023 रोजी शाळा महाविद्यालय कॉलेजेस त्या त्या स्थानिक व प्रशासकीय यंत्रणांनी बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु मुंबई उपनगरामध्ये शाळा महाविद्यालय सुरू राहणार की बंद राहणार यासंदर्भात कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेने अथवा शिक्षण अधिकारी यांनी त्याबाबत घोषणा केलेली नाही.

 

मुंबईच्या लगतच्या भागांमध्ये अति मुसळधार पावसाच्या रेड अलर्टमुळे सुट्टी देण्यात आलेली असेल, तर मग मुंबईला सुट्टी का जाहीर केली नाही ?असा प्रश्न संस्थाचालक शिक्षक पालक विद्यार्थी अशा सर्वांनाच पडलेला आहे.

 

आज रात्री उशीर पर्यंत सर्वांना अजून नक्की समजलेले नाही की 28 जुलै 2023 रोजी मुंबईतील शाळा महाविद्यालय सुरू राहतील की बंद राहतील. परंतु साहजिकच जर ठाणे पालघर या आजूबाजूच्या जिल्ह्यांना सुट्टी असेल तर कदाचित मुंबई विभागातील शाळा महाविद्यालय देखील बंद राहण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु याबाबत कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही याबाबत जर काही अपडेट आल्या तर आम्ही आपल्याला नक्की देऊ धन्यवाद! 

 

आमचे हे लेख जरूर वाचा नक्की आवडतील 

Leave a Comment