जागतिक योग दिन सूत्रसंचालन घोषवाक्य कविता माहिती | Jagtik Yog Din Sutra Sanchalan Ghoshvakya kavita

या विशेष लेखमालेत आपण आज जागतिक योग दिन सूत्रसंचालन, घोषणा किंवा घोषवाक्य व कविता 2023 अर्थात लेटेस्ट माहिती पाहणार आहोत. 

जागतिक योग दिन लेखमाले मध्ये आपण पहिल्या लेखात जागतिक योग दिनाबद्दल माहिती पहिली.त्याच बरोबर योगा करण्याचे कोणते फायदे कोणते आहेत? याचा देखील अभ्यास केला. जागतिक योग दिन साजरा होण्यासाठी भारत देशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेले प्रयत्न यांचादेखील आपण आढावा घेतलेला आहे. जागतिक योग दिनाच्या दुसऱ्या लेखांमध्ये आपण जागतिक योग दिन निबंध व पत्रलेखन आणि शुभेच्छा यांची माहिती पाहिल्यानंतरआजच्या या तिसऱ्या विशेष लेखांमध्ये आपण जागतिक योग दिनाचे सूत्रसंचालन कसे करायचे त्याचबरोबर जागतिक योग दिना दिवशी कोणत्या घोषणा किंवा घोषवाक्य विद्यार्थ्यांच्या गळी उतरवायची जेणेकरून त्यांना योगाचे महत्त्व कळेल याबाबतआज माहिती पाहणार आहोत.प्रथम जागतिक योग दिन सूत्रसंचालन कसे करता येईल याचा विचार करूया.

जागतिक योग दिन सूत्रसंचालन,घोषणा कविता
जागतिक योग दिन सूत्रसंचालन,घोषणा कविता

जागतिक योग दिन सूत्रसंचालन | Jagtik Yog Din Sutra Sanchalan Ghoshvakya kavita

 

  कोणताही कार्यक्रम असो त्याची यशस्वीता त्याच्या नियोजनावर अवलंबून असते. कोणत्याही कार्यक्रमाच्या नियोजनातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सूत्रसंचालन होय.कोणताही कार्यक्रम असो त्याला जिवंतपणा आणण्याचे काम निवेदक म्हणजेच सूत्रसंचालक आपल्या सूत्रसंचालन करण्यातून आणत असतो. चला तर मग जागतिक योग दिन सूत्रसंचालन कसे करता येईल ते पाहूया.

 

 

आगतम स्वागतम सुस्वागतम ! (2)

 

 सुस्वागतम सुस्वागतम! (2)

 

 

     शाळा प्रवेशोत्सव  झाल्यानंतर ज्या कार्यक्रमाची तुम्हाला प्रचंड आतुरता लागलेली असते ,असा कार्यक्रम म्हणजे जागतिक योग दिन होय. यालाच काही जण आंतरराष्ट्रीय योग दिन असे देखील म्हणतात बरे!

 

 

आजच्या आगळ्या वेगळ्या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमांमध्ये मी श्री —— इथे उपस्थित असलेले माझे विद्यार्थी ,माझे सहकारी शिक्षक व अधिकारी जन तसेच प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वांचे स्वागत मनापसून स्वागत करतो 

आज जागतिक योग दिन म्हटल्यानंतर एक वेगळीच मज्जा आणि धमाल असते नाआपल्या शाळेमध्ये. हो की नाही ? इतर कार्यक्रमांमध्ये आपल्यालाकेवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागते पण जागतिक योग दिन म्हटले की नवनवीन आसनांची केवळ माहिती नाही तर ती आसने देखील आपल्या कडून करून घेतली जातात.असो अभि दिल्ली दूर है.बरोबर ना !म्हणजेच काय तर हा कार्यक्रमाचा पुढचा भाग आहे.
 
 
देणाऱ्याने देत जावे,
घेणाऱ्याने घेत जावे.
 
 
असे सर्व काही.
 
 
जागतिक योग दिन म्हटल्यानंतर खरोखरच शाळेतील वातावरण अतिशय प्रसन्न असते कारण काय तर आज आपल्याला योगा करण्याची संधी मिळत असते. आपल्यासोबत आपले शिक्षक मित्र-मैत्रिणी सर्वजणच जागतिक योग दिनाचा आनंद घेत असतात, म्हणूनच तुमच्या चेहऱ्यावर आज एक वेगळेच तेज दिसत आहे.असं म्हणतात की योगा केल्यावर तेज येते परंतु.आज जागतिक योग दिन म्हटल्यावर तुमच्या चेहर्‍यावरील तेज पाहून खरोखरच माझा देखील उत्साह वाढला आहे.
 
 
ये साथ आखीर तक रहेगा,
तालिया ऐसी बजेगी की ,
आसमान भी क्या चल रहा है,
यह देखने हमारे योग दिन प्रोग्राम मे आयेगा.
 
 
मस्त ना ! मग होऊ द्या जोरदार टाळ्या.
 
योग म्हणजे काय? तर जोडणे. या अर्थाने शरीर आणि मन यांना जोडण्याचे काम ज्या क्रिया मधून केले जाते त्याला योग किंवा योगा म्हटले जाते. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ध्यानस्थ होण्यासाठी ,साधना करण्यासाठी व आपल्या अध्यात्मिक उन्नतीसाठी आपले शरीर व मन एकाग्र होण्यासाठी ज्या साधनेचा उपयोग करत होते ही योगसाधना म्हणजे योग होय. योग ही एक विद्या आहे.म्हणून तर असं म्हणतात की योगा कधीही स्वतःच्या मनाने करायचा नसतो.अन्यथा त्याच्या फायद्यापेक्षा होणारे साइड इफेक्ट म्हणजे नुकसान अतिशय भयानक असते. म्हणूनच आज आपण जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आपल्याला परिपूर्ण असे मार्गदर्शन व्हावे म्हणून एक सूत्रबद्ध असा कार्यक्रम आज आपल्या शाळेच्या प्रांगणामध्ये करत आहोत.तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या अतिथी जणांना मी विनंती करतो की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे.
 
 
(सन्माननीय यांचा शब्दातून गौरव तो अगदी थोडक्यात असावा. नमूना देत आहे)
 

अध्यक्ष यांची परवानगी घेणे

 
 
कार्य हीच आमची ओळख,
विद्यार्थी हेच आमचे दैवत,
शिक्षण हाच आमचा वसा.
 
 
 
अशी आमच्या शाळेची एकआगळी वेगळी आणि खास ओळख निर्माण करणारे,आमच्या शाळेचे मुख्याध्यापक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री———— यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारावेअशी मी त्यांना विनंती करतो.
 

(इतर मान्यवर याना व्यासपीठावर बोलवावे)

 

तद नंतर आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी जन सेवा हीच ईश्वर सेवा असे म्हणून आपले संपूर्ण आयुष्य लोकांच्या कल्याणासाठी वेचणारे गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी श्री.————– यांना मी विनंती करतो त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे.
 
 
योग हाच माझा श्वास,
लोकांचे उत्तम आरोग्य हाच माझा ध्यास.
 
 

या उक्तीप्रमाणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही योगसाधनेची गंगा पोहचवणारे योगा अभ्यासक व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि व मार्गदर्शक श्री ———-योग साधक——- योगा अभ्यास केंद्र यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावे.

 
 
 
या योग दिनाच्या निमिताने बोलायचे झाले तर आज मनुष्याचे संपूर्ण जीवनच खूपअस्थिर बनले आहे. काल चालता-बोलता असणार, फिरणारा माणूस आज अचानक हे जग सोडून गेला. असे ज्यावेळी कळते त्यावेळी आरोग्य म्हणजे काय ? जीवन म्हणजे काय ?शरीराची काळजी म्हणजे काय ?अशा अनेक प्रश्नांची डोक्यामध्ये चलबिचल सुरू होते. आणि हे सगळे थांबवायचा असेल तर काय करायला पाहिजे ?अशावेळी आठवतो तो प्राचीन ऋषी मुनींनी दिलेला योगसाधनेचा ठेवा. असा ठेवा की जो आपल्याला शरीर व मन यांना प्रसन्न ठेवतो.आपल्याला दीर्घायुष्य बनवण्यामध्ये प्रचंड मदत करतो. अशा योगसाधनेचे आपण बाईक बनायला पाहिजे ही काळाची गरज बनली आहे.असे मनोमन वाटू लागते.
 
 
 
दररोज योगा करावाअसे देखील वाटू लागते, पण आम्हा भारतीयांना असे संकल्प करण्यासाठी वेगळे दिवस लागतात. नवा काही करायचे म्हटले की नवीन वर्ष हवे अगदी त्याचप्रमाणे जागतिक योग दिन म्हटले की आज पासून आम्ही योगाला सुरुवात करणार.आणि या योगाचा वसा आयुष्यभर सांभाळणार. याच भूमिकेतून आपण आज इथे एकत्र जमलेलो आहोत.आपल्याला शरीराने सदृढ व्हायचे आहे त्याचबरोबर मनाने देखील परिपक्व बनायचे आहे. हे सगळे करण्याची ताकद या योगात आहे. आपल्याला आपले शरीर लवचिक बनवायचे आहे,आजार होऊ नयेत म्हणून खबरदारी घ्यायची आहे किंवा झालेले आजार पळवून लावायचे आहेत,त्यावर नियंत्रण मिळवायचे आहे. काहीही असो हे सर्व करण्याची ताकद प्राचीन ऋषी मुनींनी दिलेल्या योगसाधनेने मध्ये आहे. चला तर मग आज 21 जून जागतिक योग दिनापासूनच ही योगसाधना अखंडपणे करण्याचा संकल्प करूया.
 

सरस्वती पूजन | Sarswti Pujan

व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून आजच्या या जागतिक योग दिनाच्या भव्य दिव्य कार्यक्रमाला सुरुवात करावी.
 
 
दीप से दीप जलाये चलो,
प्यार की गंगा बहाये चलो.
 
(सरस्वती पूजन करत असताना एखादी छानशी प्रार्थना किंवा मंजुळ संगीत यूट्यूब च्या मदतीने लावल्यास अधिक आकर्षक वाटेल)
 

पाहुण्यांचे स्वागत

 

सरस्वती पूजनानंतर आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. आपल्या आजच्या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अध्यक्ष श्री ———— यांना पुष्पगुच्छ व शाल श्रीफल देऊन श्री ————–यांनी जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात स्वागत करावे.
 
(सर्व सन्माननीय पाहुणे व योग अभ्यासक यांचे देखील पुष्पगुच्छ तसेच इतर भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात यावे)
 

आज 21 जून जागतिक योग दिन ! बरोबर ना मग हा जागतिक योग दिन 21 जून रोजीच का साजरा केला जातो? असा कधी प्रश्न पडलाय का तुम्हाला ! पडला असेल तर त्याचे उत्तर शोधण्याचा कधी प्रयत्न केलाय का? नाही ना तर मी सांगतो ,जागतिक योग दिनासाठी 21 जून हा दिवस का निवडण्यात आला ? तर हा अनेक देशांमधील सर्वात मोठा दिवस आहे. म्हणून या तारखेची विचारपूर्वक विशेषत्वाने निवड करण्यात आली. अजून एक म्हणजे जून महिन्यामध्ये 21 तारखेच्या दरम्यान सूर्य दक्षिणेकडे सरकायला सुरुवात होते. असं सांगितलं जातं की सूर्य दक्षिणयानात असेल तर अध्यात्मिक उन्नती करण्यासाठी हा काळ पोषक मानला जातो. या सर्वांचा विचार करूनच भारताने संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्याची परवानगी मिळावी यासाठी भारताने मागणी केली होती या मागणीला सप्टेंबर 2014 मध्ये परवानगी मिळाली व 21 जून 2015 रोजी पहिलं जागतिक म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा करण्यात आला. तो आजतागायत अखंडपणे साजरा केला जात आहे.
 

स्वागत गीत swagt Git

 
आज च्या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाला हे मान्यवर उपस्थित आहेत अशा सर्वांचे आपण स्वागत गीताच्या माध्यमातून स्वागत करूया. तर मी शाळेतील विद्यार्थिनींना विनंती करतो की त्यांनी स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत करावे———
 
स्वागत करतो ….……,/
 
स्वागतम…. सु स्वागतम…
 

(यापैकी एक किंवा इतरही एखादे छान स्वागत गीत आपण निवडू शकता.पण ते खूप लांबलचक नसावे याची काळजी घ्या.)
 
 

व्यासपीठावरील मान्यवरांची ओळख | pahunyanchi olakh

 
आज जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या पण शब्द सुमनाने स्वागत केले.परंतु या व्यासपीठावर विराजमान झालेल्या व्यक्ती या केवळ व्यक्ती नसून
 
 
हे व्यासपीठ व्यासपीठ नसून,
ज्ञानाचे आगर आहे ,
अनुभवांचा सागर आहे ,
आम्हा सर्वाना तुमचा खूप खूप,
आदर आहे.
 
 
आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा एक महासागर आहे असेच म्हणावेसे वाटते. व्यासपीठावरील मान्यवरांची ओळख करून देण्यासाठी श्री————– यांनी मान्यवर मंडळींची ओळख करून द्यावी तरी त्यांनी मंचावर यावे अशी विनंती करतो.
 
 

(मान्यवर व्यक्तीची ओळख करून देण्याची जबाबदारी कोना एकावर द्यावी परंतु ती देत असताना प्रमुख पाहुण्या बद्दल योग्य ती सर्व माहिती अगोदरच मिळवून ठेवावी)
 
 

आता आपला कार्यक्रम हळूहळू एकेक टप्पे पार करत तुम्ही ज्या क्षणांची आतुरतेने वाट पाहत आहात त्या दिशेने पुढे जात आहे.
 
 
 

मुख्य अतिथि किंवा योग अभ्यासक यांचे मार्गदर्शन व योग प्रात्यक्षिक

 

मी श्री ———-व त्यांच्या टीमला विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वाना योगाचे ज्ञान द्यावे……..
 
 
सदैव करा योग,
पळून जातील तुमचे रोग.
जी आसने शिकवली जातील त्याविषयी थोडक्यात बोला.जसे की
 
आज करूया ताडासन,
थोडे करूया भुजंगासन,
काही पोटावरची,
काही पाठीवरची,
शिकूया आसने अनमोल अशी .
 

अशा पद्धतीनं मध्ये काही कोटेशन वापरून मार्गदर्शक वेगवेगळी आसने दाखवणार आहेत त्या विषयी मध्ये मध्ये सर्वांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न करावा.

हे पण वाचा 

सोपी योगासने करा आणि आरोग्य संपन्न बना  

मान्यवरांची,प्रमुख अतिथि यांची भाषणे | Pramukh Atithi Bhashne

हवेत उडणाऱ्या विमानाला
गरज असते होकायंत्राची,
समुद्रात दूरवर जाणाऱ्या जहाजाला
गरज असते दीपस्तंभाची,
अहो कार्यक्रम कोणताही असो
गरज असते ती मान्यवरांच्या मार्गदर्शनाची.
 

थोडक्यात काय तर मार्गदर्शन अतिशय गरजेचे आहे म्हणूनच मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री —————– यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थी,शिक्षक इतर प्रेक्षक यांना जागतिक योग दिनाबद्दल मार्गदर्शन करावे.

खरोखरच आपल्या पाहुण्यांनी सांगितल्या पद्धतीने योग हा एक दिवसकरायची बाबच नाही तर अखेरच्या श्वासापर्यंत आपण तो करणार आहोत असा संकल्प करूया——-

 
अध्यक्षीय भाषण
कार्यक्रमाला शोभा नाही श्रोतेहो तुम्हा विना,
आणि कार्यक्रमाला रंग नाही अध्यक्षांच्या भाषणा विना.
 

आजच्या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ———— यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करावे.

 

आभार प्रदर्शन | Aabhar Pradarshan

 
थेंब थेंब करत तलाव भरला,
थोडा थोडा म्हणत कार्यक्रम कसा हो पुढे सरला,
पण आज तुमच्या सर्वांच्या येण्याने तो यशस्वी ठरला.
आजच्या कार्यक्रमाला उपस्तीत सर्वांचे आभार !
 

कार्यक्रमाची सांगता Karykram Sangta

 
 
पसायदान किंवा राष्ट्रगीत घेऊन करावी—-
 
 
अशा पद्धतीने यापेक्षा आकर्षक आपण जागतिक योग दिन सूत्रसंचालन करू शकता———-
 
 

जागतिक योग दिन घोषवाक्य,घोषणा माहिती | Jagtik Yog Din Sutra Ghoshvakya,ghoshna Mahiti 

 
जागतिक योग दिन आणि घोषणा व घोषवाक्ये नाहीत असे होऊच शकत नाही चला तर मग छान छान घोषणा व घोषवाक्य यांची तयारी करून जागतिक योग दिन घोषणा देऊन सारा आसमंत दणाणून सोडूया.
 
1.जागतिक योग दिनाच्या निमिताने सर्वजण एकत्र आले,
आता रोगराई व आजार यांचे बारा वाजले .
 
 
 
2. करा की हो योग,
जातील सारे भोग.
 
 
3. योगा ही भारताची जगाला देन आहे,
याचा आम्हाला स्वाभिमान आहे.
 
 
 
4.आला आला 21 जून आला,
अवघ्या जगात योग दिनाचा डंका झाला.
 
 
 
5.आता कुणाला हवीय गोळ्या औषधांची साथ,
आम्ही धरलाय योगाचा हात,
आता होऊच शकत नाही आमचा घात.
 
 
 
6. चला चला आसने करू,
ध्यान करून जरा मनाला आवरू,
चला चला योग करू,
महामारी कोणतीही येवो,
तिला या जगातून हद्दपार करू.
 
 
 

योगदिन कविता | yogdin kavita

योगाचे महत्व कवितेतून जाणून घेऊया.
 
अशी एक मात्रा आहे,
जिचा गुण हमखास आहे,
आजार ,रोग यांना देखील
पळवून लावण्याची बिशाद आहे. 
 
 
मी योग आहे,
भोगी मने स्थिर करण्या मला ,
 सर्व उपाय ज्ञात आहे,
मी सुखाचेच गीत गात आहे. 
 
 
मी विद्या आहे ,
मी साधना आहे ,
मी तपोभूमी आहे,
मी दुसरे काही नसून,
ऋषि मुनि यांचा योग आहे. 
 
 
पाहूणी हे दुखी जन 
कळवळते माझे मन 
जगात बघून मृत्यूची दहशद 
मीच बनून आलोय औषध. 
 
 
मी योग आहे ,
भारतभूमी माझी माय आहे,
जगाला सुखी करण्या मी जात आहे,
सदैव सुखाचे गीत गात आहे. 
 
 
 
    वरील सूत्रसंचालन तसेच घोषणा व कविता माझ्या स्वरचित आहेत या आपण कार्यक्रमात वापरू शकता परंतु लिखित स्वरूपात वापर करताना माझी परवानगी घेणे आवश्यक आहे. 
 
 अशा प्रकारे आजच्या जागतिक योग दिन सूत्रसंचालन,घोषवाक्य,कविता अशी सर्व माहिती  आपणास नक्कीच आवडली असेल तर नक्की कमेन्ट करा, लेखाच्या शेवटी असलेल्या share बटनावर क्लिक करून सर्वांपर्यंत पोहोचवा ही विनंती. आणि हो यापुढे शिक्षण क्षेत्रातील कोणतीही माहिती पाहण्याआधी आमच्या dnyanyogi.com ला जरूर भेट द्या ही विनंती. धन्यवाद !
 
 
आमचे हे लेख जरूर वाचा
 
 
 
 
 

1 thought on “जागतिक योग दिन सूत्रसंचालन घोषवाक्य कविता माहिती | Jagtik Yog Din Sutra Sanchalan Ghoshvakya kavita”

Leave a Comment