जागतिक योग दिन | महत्वाचे मुद्दे |
---|---|
पहिला जागतिक योग दिन | 21जून 2015 |
जागतिक योग दिन 2023 थीम | वसुधैव कुटुंबकम साठी योग |
योगाचा मुख्य फायदा | उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य |
योग दिन प्रस्ताव कोणी मांडला | पंतप्रधान नरेंद्र मोदी |
योग दिनासाठी 21 जून दिवस का? | सर्वात मोठा दिवस |
जागतिक योग दिन मराठी माहिती |
योग दिन जगभरात साजरा व्हावा यासाठी भारताची भूमिका | India’s role in making Yoga Day celebrated worldwide
संपूर्ण जगभरात योगाचे महत्त्व आज पोहोचलेले आहे.सर्वाना उत्तम आरोग्य हवे तर योगा करण्याशिवाय पर्याय नाही.हे भारतातील लोकाना माहीत होते.कारण का तर योगाचे मूळ किंवा योग हाच भारतातील ऋषि मुनि यांच्या साधनेतून आकारास आला आहे.नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी योग ही भारतीय भूमीतील अनमोल विद्या आहे आणि ही विद्या संपूर्ण विश्वाच्या कामी आली पाहिजे. यासाठी 2014 साली सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी योग हा जर मानवी जीवन सुखकारक करण्यासाठी, वेगवेगळ्या आजारांवर मात करण्यासाठी उपयोगी पडत असेल तर तो योग केवळ भारतापुरता न राहता भारताबाहेर देखील जगभरामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे अशी भूमिका घेतली.म्हणूनच जगभरामध्ये जागतिक म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा व्हावा. या विषयी विस्तृत असे विवेचन नरेंद्र मोदी यांनी आपल्या महासभेच्या भाषणात केले.भारत भूमीतील हे ज्ञान खरोखरच अगाध आहे म्हणूनच हे ज्ञान किंवा विद्या सर्वांना मिळायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले. अनेक देशांना अगोदरच योग आणि त्याचे महत्त्व ज्ञात होते त्यामुळे अनेक राष्ट्रांनी जागतिक योग दिन साजरा व्हावा याला अनुमोदन दिले होते.
संयुक्त राष्ट्र महासभेत योग दिन साजरा व्हावा या साठी किती देशांचे अनुमोदन | How many countries approved for celebrating Yoga Day in the United Nations General Assembly?
योग दिन साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेची परवानगी |Permission of the United Nations General Assembly to celebrate Yoga Day
संयुक्त राष्ट्र महासभेच्या सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या बैठकीत जागतिक योग दिनाविषयी चर्चा करण्यात आली. चर्चा केल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 11 डिसेंबर 2014 रोजी म्हणजे तब्बल तीन महिन्यांनी भारताच्या मागणीवर विचार विमर्श करून जगभरामध्ये जागतिक योग दिन साजरा व्हावा यासाठी परवानगी दिली.एक प्रकारे भारताचे योगदान हे सातासमुद्रा पल्याड जाण्याचा मार्ग महासभेने मोकळा केला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
जागतिक योग दिनासाठी 21 जून या तारखेची निवड का करण्यात आली | Why 21st June was chosen as World Yoga Day?
भारतामधील योग विद्या ही सर्व जगासाठी खुली झाली पाहिजे.सर्व जगभरातील लोकांनी याचा फायदा घेऊन आपले कल्याण केले पाहिजे.आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपले पाहिजे. याच भूमिकेतून संयुक्त राष्ट्र महासभेने जागतिक योग दिन साजरा करण्यात यावा याला परवानगी दिली. मात्र त्यासाठी कोणता दिवस निवडावा ? तर भारताने केलेल्या पाठपुराव्यामुळे योग दिनासाठी 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणजेच काय तर आंतरराष्ट्रीय योग दिन किंवा जागतिक योग दिवस म्हणून निवडण्यात आला.21 जून का निवडण्यात आला?तर यामागे देखील एक शास्त्रीय कारण सांगितले जाते. 21 जून हा दिवस सर्वात मोठा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी दिवस उगवल्या पासून मावळे पर्यंत म्हणजेच अंधार पडेपर्यंत त्याचा कालावधी हा इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. योग करण्यासाठी,शुभ काम किंवा मोठे काम मोठ्याच दिवशी झाले पाहिजे. कदाचित याच भूमिकेमुळे 21 जून हा दिवस जागतिक योग दिन यासाठी निवडण्यात आला.
योग दिन न राहता ती एक चळवळ बनली आहे.
योगा एक चळवळ | Yoga is a movement
अवघ्या जगाला योगाचे महत्व कळले आहे. म्हणून एकच दिवस योगा करून उपयोग नाही तर तिला चळवळीचे रूप मिळाले पाहिजे. या दिवशी आपण जोरजोरात योगा दिनाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा द्यायला हव्यात लोकानी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन योगा या विषयावर चर्चा करायला हवी . म्हणजेच काय तर दररोज योगा केला गेला पाहिजे. यासाठी अनेक देशांनी योग दिनाचा आग्रह धरला आहे. ते विविध प्रसार माध्यमांच्या सहाय्याने आपल्या जनतेला आव्हान करत आहेत. योगा करा !आणि तंदुरुस्त राहा. याचा अर्थ काय तर योग दिन हा केवळ एक दिवस न राहता ती एक चळवळ बनू पाहत आहे. ऑस्ट्रेलिया अमेरिका इंग्लंड अशी कितीतरी युरोपियन देशांमध्ये आज योगा क्लासेस चालतात. लोक सकाळी सामुदायिक योगा करताना दिसतात. थोडक्यात योगा हा जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा बनत चाललेला आहे. अशा योगाचे फायदे पाहण्या अगोदर योग म्हणजे नेमके काय ? हे थोडक्यात पाहूया————-
योग म्हणजे काय | What is Yoga?
योग या शब्दाचा सरळ आणि साधा अर्थ म्हणजे जोडणे होय.
- या अर्थाने अशा क्रिया की जिच्या माध्यमातून शरीर आणि मन यांना जोडण्याचे काम केले जाते. आणि यालाच योग म्हणतात.
- शारीरिक भावनिक आणि मानसिक संतुलन राखून जीवन परिपूर्ण पणे कसे जगावे?आरोग्य उत्तम आरोग्य कसे प्राप्त करावे ?त्याचबरोबर आपली आत्म उन्नती कशी करावी?हे ज्यामुळे शक्य होते तो म्हणजे योग होय.
- योगाच्या माध्यमातून शरीराच्या उत्तम आरोग्याबरोबरच मनाचे आरोग्य आणि अध्यात्मिक प्रगती असे देखील अपेक्षित आहे.
- अजून सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शरीर आणि मन यांचा व्यायाम म्हणजे योग होय
योगा करण्याचे फायदे/महत्त्व Benefits/Importance of Yoga in marathi
1.भारताच्या प्राचीन ज्ञानाचा जगाला परिचय करुण देणे
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने भारतातील योग विद्या ही खूप प्राचीन असून त्या विद्या च्या माध्यमातून आज देखील आपण आपले आरोग्य चांगले राहू शकतो थोडक्यात काय तर ज्ञानाच्या बाबतीमध्ये आम्ही भारतीय देखील किंवा आमची संस्कृती किती श्रेष्ठ आहे समजण्यासाठी जागतिक योग दिन महत्वाचा आहे.
2.योगाने बनते निरोगी शरीर
आजार झाल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणे म्हणजे आपले शरीर निरोगी ठेवणे होय. योगाच्या माध्यमातून हेच काम केले जाते शरीराला निरोगी कसे ठेवता येईल यासाठी योगा आपल्याला मदत करतो.
3. योगा देतो स्नायूंना बळकटी
योगा केल्यामुळे आपल्या स्नायूंना बळकट येते. आपले स्नायू चिवट बनतात. योगा करत असताना आपण वेगवेगळे आसने करतो त्यामुळे आपले स्नायू ही बळकट होत असतात.
उदा. सूर्यनमस्कार भुजंगासन वक्रासन इत्यादी..
4. योगा ठेवतो उत्तम मानसिक आरोग्य
आज माणसाला बरेचसे आजार होतात त्याची सुरुवात ही मानसिक आजारातून झालेली असते. कोणताही आजार आगोदर हा आपण घेतलेल्या ताणतणावामुळे होत असतो, म्हणजेच काय तर माणसाचे मानसिक आरोग्य बिघडलेले असते योगाच्या माध्यमातून ही मानसिक आरोग्य आणि ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात.
5. नियंत्रित वजन तर योगाच हवा
जी व्यक्ती नियमित योगा करते त्या व्यक्तीचे वजन यावर ती आपोआपच नियंत्रण राहते व्यक्तीचे वय वाढेल तसे त्याची प्रचंड क्षमता कमी होत असते आणि साहजिकच वजन वाढत असते परंतु जर नियमित योगा केला तर आपले वजन नियंत्रणात राहते.
6.हवा संयम तर करा योग
योगा करणारी व्यक्ती ही चिडचिड करत नाही. तिच्यामध्ये एकसंयम आलेला आपल्याला दिसतो. योगा करत असताना जी ध्यानधारणा पण करतो. वेगवेगळे आसन प्रकार आपण करतो यातून संयमी पण येतो.सहाजिकच आरोग्य देखील उत्तम राहिला यामुळे मदत होते.
7.योगा देतो रोगांशी लढण्याची क्षमता
जी व्यक्ती नियमित योगा करते तिला शक्यतो कोणते रोग होत नाही. यदा कदाचित कोणताही रोग झाला तर त्या रोगाचा सामना करण्याची क्षमता किंवा त्याच्याशी लढण्याची क्षमता योगामुळे वाढत असते.
असे अनेक फायदे या योगाचे आहेत.
योगा दिनाची थीम 2023 Theme of Yoga Day 2023 in marathi
दरवर्षी योगा दिनाची आरोग्याला पूरक सणेश देणारी थीम असते जसे की,
- 2019 – ऋदया साठी योग
- 2020 – कुटुंबाच्या आरोग्यासाठी योग
- 2021 – कल्याणकारी योगा
- 2022 – मानवतेसाठी योग
- 2023 – वसुधैव कुटुंबकम यासाठी योगा
थोडक्यात जागतिक स्तरावर अखिल मानव जातीचे कल्याण म्हणजे योगा अशी थीम 2023 मध्ये घेण्यात आली आहे.
2023च्या योगा दिनासाठी संकल्प | Resolution for Yoga Day 2023
शरीर आणि मन दोन्ही पातळीवर ती व्यक्तीला तंदुरुस्त बनवण्याचे काम योगा करत असल्यामुळे इतर फिटनेस व्यायामापेक्षा योगा हा शरीराला आतून आणि स्नायूंना देखील बळकट करण्याचे काम करत असतो म्हणूनच सर्वांनी एक तास आयोगासाठी दिलाच पाहिजे.. व जी सोपी आसने आहेत ती केलीच पाहिजेत.चला तर मग यावर्षी जोरदार योगा दिन साजरा करूया. आपल्याला आमच्याकडून जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! HAPPY YOGA DAY
जागतिक योग दिन मराठी माहिती सार World Yoga Day Marathi Information Summary
आजच्या या लेखातून योग म्हणजे काय? योगा करण्याचे फायदे तसेच योगा दिन साजरा होण्यामागील इतिहास आपण पहिला.
आमची ही माहिती आपल्याला आवडल्यास इतरांना देखील नक्की पाठवा.
जागतिक योग दिन FAQ
1. जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो.
21 जून
2. 2023 ची जागतिक योग दिनाची थीम काय आहे .
वसुधैव कुटुंबकम यासाठी योगा
3.जागतिक योग दिन साजरा व्हावा असा प्रस्ताव कोणी मांडला .
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
4. पहिला जागतिक योग दिन कधी साजरा झाला.
21जून 2015
5. संयुक्त राष्ट्राच्या सभेतील किती सदस्यांनी जागतिक योग दिनाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला.
175
आमचे हे लेख वाचा
इंग्रजी विषयाची अशी भीती कमी करा