अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 CAP नियमित फेरी 1 वेळापत्रक जाहीर | 111th admission processn 2023 time table first round

शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2023 24 साठी CAP प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. वेळापत्रकात नियमित फेरी 1  अर्थात reguler round 1 कशा पद्धतीने म्हणजेच कोणत्या तारखेला काय करावयाचे आहे याबाबत आदेश जारी करण्यात आलेला आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 CAP प्रवेश प्रक्रिया नियमित फेरी 1 वेळापत्रक
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 CAP प्रवेश प्रक्रिया नियमित फेरी 1 वेळापत्रक

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 CAP प्रवेश प्रक्रिया नियमित फेरी 1 वेळापत्रक |11 th  Online Admission Process 2023 24 CAP Admission Process Regular Round 1 Timetable|अकरावी प्रवेश 2023 24 भाग 2 कधी भरावा याबाबत आदेश | अकरावी प्रवेश नियमित फेरी 1 चे वेळापत्रक 11th Admission Regular Round 1 Time Table

हे अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 पहिल्या फेरीचे वेळापत्रक खालील प्रमाणे असेल. 
 

1.अकरावी प्रवेश 2023 24 साठी पसंतीक्रम नोंदवणे /option फॉर्म भरणे यासाठी तारखा Dates for Filing of Option Form for 11th Admission 20232

दिनांक 8 जून 2023 पासून दिनांक 17 जून 2023 पर्यंत अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 साठी विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीसाठी आपले पसंती क्रमांक/ option form  नोंदवायचे आहेत आणि यासाठी विद्यार्थ्यांनी आपला अर्जाचा भाग दोन भरणे अतिशय गरजेचे आहे.

2.अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 साठी किती  कॉलेज निवडता येतील | 11th Online Admission 2023 24 How many colleges to choose

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 च्या पहिल्या फेरीमध्ये विद्यार्थी कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10  पसंती क्रम विद्यालय नोंदवू शकतात.

विद्यार्थ्यांनी पआपले  पसंती क्रम भरल्यानंतर दिलेल्या विहित तारखेच्या अगोदर आपल्या फॉर्मचा भाग 2 लॉक करावयाचा आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पर्यंत ऑनलाईन नोंदणी करून आपल्या अर्जाचा भाग एक भरलेला नाही ते विद्यार्थी देखील या कालावधीमध्ये आपल्या अर्जाचा भाग १ भरतील, त्याचबरोबर भाग दोन देखील भरतील परंतु भाग एक आणि दोन दोन्हीही विद्यार्थ्यांना लॉक करावे लागतील.आपण अकरावी प्रवेश ऑनलाइन रजिस्ट्रेशन आणि भाग एक भरला नसेल तर अधिक माहितीसाठी आमचा त्याबाबत असलेला लेख वाचा 

अकरावी प्रवेश 2023 24 भाग 1भरण्यासाठी अंतिम मुदत दिनांक |11th Admission 2023 24 Last Date for Filling Part 1

ज्या विद्यार्थ्यांनी आपले रजिस्ट्रेशन आणि भाग एक भरलेला  नाही त्या विद्यार्थ्यांना 15 जून 2023 रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत आपला भाग एक भरता येईल. आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत तो संबंधित केंद्रांकडून प्रमाणीत होईल.

3.अकरावी प्रवेश 2023 24  नियमित फेरी 1ची गुणवत्ता यादी कधी  जाहीर होणार |When will merit list of 11th admission 2023 24 regular round 1 be announced

17 जून 2023 या कालावधीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी भाग एक भरलेला आहे व त्यांची पडताळणी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.

4.Data processing

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी जे उमेदवार पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांची या डाटा प्रोसेसिंग अंतर्गत गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल यासाठी 18 जून 2023 ते 20 जून 2023 हा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे.

 

5.अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 कोणते कॉलेज भेटले याची यादी कधी  जाहीर होणार |  11th Online Admission 2023 24 Which College Met List When Will Be Announced

करावी प्रवेशासाठी पात्र उमेदवारांनी भरलेल्या पसंती क्रमाचा विचार करून त्यांना कोणते मिळालेले आहे ते त्यांना लॉगिन करून पाहता येईल. तेच या फेरीचे कट ऑफ देखील पोर्टलवर दाखवले जाईल. त्यांना मिळालेले महाविद्यालय त्याचे नाव sms  स्वरूपात देखील विद्यार्थ्यांना प्राप्त होईल.आपल्याला कोणते कॉलेज मिळाले हे 21 जूनला सकाळी दहा वाजता जाहीर होणार आहे.

6.प्रत्यक्ष अकरावी प्रवेश 2023 24  कॉलेजला भेटणे आणि प्रवेश घेणे| Direct 11th Admission 2023 24 College Meet and Admission

ज्या विद्यार्थ्यांचा अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नियमित फेरी एक मध्ये प्रवेश निश्चित झालेला आहे अशा विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालय भेटून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे संबंधित महाविद्यालयाला भेट देण्यापूर्वी आवश्यक ती कागदपत्रे अगोदर अपलोड करायचे आहेत. जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्याला मिळालेले महाविद्यालय याच्याशी संपर्क करायचा आहे यासाठी दिनांक 21जून 2023 ते 24 जून 2023 असा कालावधी देण्यात आलेला आहे.

आपल्याला अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत प्रवेश घ्य्यायचा नसल्यास काय करावे ?|What to do if you don’t want to take admission in the first round of 11th admission?

ज्या  विद्यार्थ्याला अमुक कॉलेज मिळालेले आहे परंतु अलॉट झालेल्या विद्यालयात विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा नसेल तर असे विद्यार्थी पुढील फेरीची वाट पाहू शकतात.

अकरावी प्रवेश 2023 24  घेण्याबाबत महत्वाच्या सूचना |Important Tips for Taking Class XI Admission 2023 24

1. एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याला जे महाविद्यालय मिळालेले आहे त्या विद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्या विद्यार्थ्याने लॉगिन करून प्रोसिड फॉर ऍडमिशन यावर क्लिक करून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून आपल्याला मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.कागदपत्रे कशी uplod करतात यासाठी देखील स्वतंत्र लेख आहे तो वाचा.

2. समजा एखाद्या विद्यार्थ्याला allot झाल्यावर विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर तो पुढच्या फेरीसाठी वाट पाहू शकतो.

अकरावी प्रवेश प्रथम लागलेले कॉलेज प्रवेशा बाबत अतिशय महत्वाचा नियम 11th admission first is a very important rule regarding college admission

 

एखाद्या विद्यार्थ्याने आपल्या पसंती क्रमामध्ये जे कॉलेज पहिल्या क्रमांकावर ती टाकलेले आहे आणि तरीदेखील विद्यार्थ्याने त्या महाविद्यालयात प्रवेश घेतला नाही. अर्थात प्रथम पसंती क्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किंवा नाकारला गेला असेल तर त्या विद्यार्थ्याला दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करता येणार नाही याची नोंद घ्यावी.

याचा अर्थ जर विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्येच  प्रथम क्रमांकांचे जे हवे ते महाविद्यालय मिळाले असेल त्या ठिकाणी आपला प्रवेश करावा अन्यथा त्यांना दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करता येणार नाही.

7.रिक्त जागा तपशील 

ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत किती विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश घेतला याबाबत त्या महाविद्यालयांनी 22 जून 2023 पर्यंत तपशील द्यायचा आहे जेणेकरून प्रवेश फेरी दोन ला सुरुवात करता येईल.

अकरावी प्रवेश 2023 24  यापुढील फेऱ्या साठी संभाव्य वेळापत्रक 11th  Admission 2023 24 Probable Schedule for Next Round

अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्यांनी तिसऱ्या फेरी कशा पद्धतीने होतील याबाबत देखील संभाव्य तारखा दिलेले आहेत.

1. अकरावी प्रवेश 2023 24 नियमित प्रवेश फेरी 2 कधी सुरू होणार 11th Admission 2023 24 Regular Admission Round 2 Start When

२३ जून 2023 ते 30 जून 2023 या कालावधीमध्ये नियमित प्रवेशाची अर्थात रेगुलर फेरी दोन पूर्ण होईल.

2.अकरावी प्रवेश 2023 24 नियमित प्रवेश फेरी 2 कधी सुरू होईल 11th Admission 2023 24 When Regular Admission Round 3 Start

१ जुलै 2023 ते 9 जुलै 2023 या कालावधीमध्ये नियमित प्रवेशाची दुसरी फेरी होण्याची शक्यता आहे.

 

3.अकरावी प्रवेश 2023 24 विशेष फेरी (यावर्षी केवळ एकच विशेष फेरी )XI Admission 2023 24 Special Round (only one special round this year)

गेल्या  ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवत असताना नियमित तीन फेऱ्या आणि विशेष तीन फेऱ्या असे आयोजन करण्यात आले होते. मात्र यावर्षी एक मोठा बदल या अकरावी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया 2023 24 साठी झालेला आहे. यावर्षी केवळ विशेष फेरी घेतली जाणार आहे ती विशेष मेरी दहा जुलै 2023 ते 18 जुलै 2023 या कालावधीमध्ये पार पडणार आहे.

 

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 नियमित फेरी 1 वेळापत्रक pdf 11th online admission process 2023 24 regular round 1 time table pdf

 

अकरावी प्रवेश पहिली फेरी वेळापत्रक  DOWNLOAD 

 

विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशा संदर्भात सर्व सूचना व्यवस्थित वाचून अकरावी रजिस्ट्रेशन भाग एक भरणे भाग दोन भरणे आपले फॉर्म लॉक करणे. आणि दिलेल्या  तारखेला आपल्याला कोणते महाविद्यालय मिळाले हे पाहणे. त्याचबरोबर प्रवेश घ्यावयाचा असल्यास प्रवेश देखील घेणे थोडक्यात विद्यार्थ्यांनी अतिशय अपडेट राहणे गरजेचे आहे.यासाठी 

 

अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.

अकरावी प्रवेश मार्गदर्शन ग्रुप लिंक  👈क्लिक 

आपल्याला अकरावी प्रवेशाच्या प्रत्येक टप्प्यावरील माहिती हवी असेल तर आमचा अकरावी मार्गदर्शन हा ग्रुप आपण तात्काळ जॉईन करा.

आमचे हे लेख वाचा 

Leave a Comment