आजच्या लेखामध्ये आपण अकरावी प्रवेश 2023 24 मध्ये आपल्याला पहिल्या राऊंड मध्ये कोणते कॉलेज मिळाले आहे,? म्हणजे अलॉट झालेले आहे ते कसे चेक करायचे याविषयीची माहिती बघणार आहोत.
आपल्याला कोणते कॉलेज मिळाले हे पाहण्यासाठी स्टेप्स
1.आपला विभाग सिलेक्ट करणे | region select
आपण ज्या भागातून अकरावी प्रवेशासाठी फॉर्म भरला आहे तो विभाग सिलेक्ट करा.
जसे की मुंबई ,अमरावती ,नागपूर ,पुणे यापैकी आपला जो विभाग असेल तो सिलेक्ट करा.
2.अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर लॉगिन करणे |
11 वी संकेत स्थळाला भेट 11th admission website log in
अकरावी प्रवेश संकेतस्थळ click here
अकरावी प्रवेशाचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे. त्या संकेतस्थळाला भेट द्या. आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड व्यवस्थित टाका.लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्यासमोर एक स्क्रीन येईल या स्क्रीनमध्ये उजव्या बाजूला तीन डॉट आहेत.त्याच्यावरती आडव्या रेषा आहेत त्यावर क्लिक करा.
3.तीन आडव्या रेषांवर क्लिक करणे |
अकरावी प्रवेशासाठी लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्ड वर जाण्यासाठी अगोदर desktop view on करा.जर आपण फॉर्म मोबाईल वरून भरणार असाल तर उभ्या तीन टिंबांच्या वरती आडव्याच्या तीन रेषा आहेत त्यावरती क्लिक करा त्यानंतर डाव्या बाजूला कॉलेज अलॉटमेंट हा सेक्शन आपल्याला दिसेल त्यावर जा.
4.कॉलेज अलॉटमेंट | college allotment section
डाव्या बाजूला असणाऱ्या कॉलेजला allotment admission यावर क्लिक केल्यानंतर check allotment status यावर क्लिक करा. त्यांनंतर जे आपल्याला कॉलेज मिळाले आहे त्या कॉलेज विषयीची माहिती तिकडे तुम्हाला डिस्प्ले होईल.त्या कॉलेजचा पत्ता, माध्यम अशी सर्व माहिती तुम्हाला तिकडे उपलब्ध होईल त्याची प्रिंट काढून घ्या.आपल्याला 11th pravesh 2023 24 aaplyala konte college milale त्या कॉलेजला वेळेत प्रवेश घ्या.
कोणते कॉलेज भेटले इथे पहा |
विद्यार्थ्यांचे प्रवेशा बाबत काही प्रश्न
1.पहिल्या राऊंड मध्ये क्रमांक लागल्यानंतर किती दिवसात प्रवेश घ्यायचा आहे |
ज्या विद्यार्थ्यांचा पहिल्या यादीमध्ये प्रथम क्रमांक लागेल त्या विद्यार्थ्यांनी 21 जून ते 24 जून या कालावधीमध्ये संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवायची आहेत आणि आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.जर आपल्याला प्रवेश घ्यायचा नसेल, तर आपण त्या महाविद्यालयाला भेट देण्याची आवश्यकता नाही.
2.प्रथम प्राधान्य दिलेले महाविद्यालय लागून देखील प्रवेश घेतला नाही तर काय होईल.
तुम्हाला तुम्ही भरलेल्या ऑप्शन फॉर्ममध्ये जे क्रमांक एक चे महाविद्यालय आहे. त्या महाविद्यालयाला तुमचा क्रमांक लागून देखील तुम्ही प्रवेश घेतला नाही तर नंतरच्या एका फेरीला तुम्हाला अटकाव केला जाईल .परंतु तुम्ही तिसऱ्या फेरीमध्ये पुन्हा एकदा ऑप्शन फॉर्म तुम्हाला हवा तसा भरू शकता.
3. नॉन क्रिमिलेयर ची अट कोणासाठी आहे ?
अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजेच एससी आणि एसटी विद्यार्थी सोडून इतर जे विद्यार्थी आहेत.जे आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छितात जसे कीOBC, NT, OBC, इतर मागास SBC अशा आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या वर्गांना ते प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
5. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र जमा करण्यासाठी किती मुदतवाढ देण्यात आलेली आहे?
ज्या विद्यार्थ्यांकडे जातीचा दाखला आहे आणि त्यांना नॉन क्रिमीलेअर देखील जमा करण्याची अट आहे अशा विद्यार्थ्यांना अजून तीन महिने नॉन क्रिमिलेयर साठी वेळ मिळेल.तशी जमा करण्याची सवलत देण्यात आलेली आहे.मात्र तसेच लेखी हमीपत्र त्यांना द्यावे लागेल जर त्यांनी विहित तीन महिन्यांमध्ये नॉन क्रिमीलेअर सादर केले नाही.तर त्यांचा प्रवेशा रद्द होऊ शकतो त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलेअर ची आवश्यकता आहे त्यांनी तात्काळ ते काढून घ्यावे.
6. जातीचा दाखला जमा करण्यासाठी काही मुदतवाढ दिलेली आहे का?
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश अर्ज करत असताना विद्यार्थ्यांना तसे हमीपत्र देण्याची मुभा देण्यात आली होती, मात्र आता प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी मात्र विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र हे दाखवावेच लागणार आहे कारण तसे आम्ही पत्र तुम्ही भरलेले आहे की प्रवेशाच्या वेळी आम्ही ते हमीपत्र सादर करू त्यामुळे जातीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल आणि तुम्ही आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुमचा प्रवेश नाकारला जाऊ शकतो.
7. अकरावी मध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांना काही स्कॉलरशिप मिळतात का?
दहावीनंतर तुम्ही अकरावीला गेल्यानंतर काही मॅट्रिकेत तर स्कॉलरशिप असतात त्या स्कॉलरशिप चा लाभ तुम्हाला घेता येतो त्यासाठी तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिलियर जातीचा दाखला या बाबी अर्जासोबत जोडावे लागतात ती प्रक्रिया तुम्ही एकदा प्रवेश घेतल्यानंतर साधारणपणे एक ते दोन महिन्यांमध्ये आपल्याला करावे लागते.सांगण्याचा मुद्दा असा की अकरावीला शिकत असताना तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते.
8. इयत्ता अकरावीला प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला शाखा बदलता येते का?
अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की मी विज्ञान शाखेला म्हणजे सायन्स शाखेला प्रवेश घेतलेला आहे परंतु मला ती झेपत नाही तर मी बारावीला शाखा बदलू शकतो का? तर याबाबत सांगायचे झाले तर शासनाच्या सूचनेप्रमाणे जो विद्यार्थी विज्ञान शाखेमध्ये शिकत आहे तो विद्यार्थी कॉमर्स किंवा आर्ट शाखेमध्ये येऊ शकतो,कारण विज्ञान शाखेची काठीन्य पातळी जास्त आहे परंतु कॉमर्स आणि आर्टला शिकणारा विद्यार्थी विज्ञान शाखेमध्ये जाऊ शकत नाही. त्याचबरोबर जो विद्यार्थी कॉमर्स शाखेमध्ये शिकत आहे तो देखील विद्यार्थी आर्ट शाखेमध्ये येऊ शकतो अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शाखा बदलाबाबत लवचिकता आहे पण वरील ज्या काही अटी आहेत त्या अटी पूर्ण कराव्या लागतात.
9. हायस्कूल मधील शिक्षण आणि कॉलेज मधील शिक्षण यामध्ये मोठा फरक कोणता?
विद्यार्थ्यांनी दहावी पास झाल्यानंतर हा फरक लक्षात घेऊनच सर्व तयारी करायचे आहे. बरीच मुले हवेत जातात एकतर्फी प्रेम यासारख्या घटना घडतात.कारण तुम्ही हायस्कूलमध्ये शिकत असताना शालेय विषयांची तयारी तुमच्या वर्गशिक्षक करून घेत असतात अकरावी बारावीनंतर तुमच्या जे शिक्षण सुरू होते त्या ठिकाणी शिक्षक हे केवळ मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतात.त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या नोट्स काढणे स्वतः टाईम टेबल तयार करणे अभ्यास करणे या सवय सुरुवातीपासून लावल्या तर त्यांना त्रास होत नाही.
10. बऱ्याचदा दहावीला चांगले गुण मिळालेले विद्यार्थी देखील अकरावीला खूप मागे पडतात?
कधीकधी दहावीपर्यंत किंवा दहावीला विद्यार्थ्यांना खूप चांगले गुण मिळतात, परंतु अकरावीला गेल्यानंतर त्या गुणांमध्ये घसरण होते यामागचे मुख्य कारण म्हणजे जर विद्यार्थी विज्ञान शाखेला गेला असेल तर त्याचे माध्यमे इंग्रजी असते त्यामुळे बदल होऊ शकतो त्याचबरोबर कॉलेज विश्वातील वातावरण विद्यार्थी अभ्यासाविषयी दक्ष नसेल तर त्याला अभ्यास कर असे सांगणारे कोण नसते सर्वात महत्त्वाचे कारण आहे म्हणून विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर अतिशय सजग राहून अभ्यास करावा असे मला वाटते असे केले तरच तुमचे भावी आयुष्य हे अतिशय सजलाम आणि सुफलाम होऊ शकते.स्वतःची अभ्यास पद्धती हवी.
11. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कॉलरशिप कोणासाठी आहे?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कॉलरशिप अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीला 90% पेक्षा जास्त गुण आहेत.अशा विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप आहे अकरावीनंतर मेडिकल किंवा इंजिनिअरिंगचे मागणे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अडीच लाखाची स्कॉलरशिप दिली जाते तर विद्यार्थ्यांनी याविषयी अधिक ची माहिती मिळवायची आहे त्या संदर्भात आपल्या ज्ञानयोग्य डॉट कॉम वरती एक लेख देखील आहे विद्यार्थी तो शैक्षणिक माहिती या सदरामध्ये शोधू शकतात.
12. एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश मागे घेऊन आयटीआय किंवा डिप्लोमा कोर्सेस ला प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी काय करावे?
ज्या विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दरम्यान आयटीआय किंवा एखाद्या डिप्लोमा साठी नंबर लागला असेल किंवा निवड झालेल्या असेल किंवा त्यांना अकरावी बारावी करायचे नसेल अशा विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाबाबत काय करायचं तर त्या विद्यार्थ्यांनी विड्रॉ फॉर एप्लीकेशन यावरती क्लिक करून आपले एप्लीकेशन विड्रा करायचे आहे.
13. आपण भरलेले पसंतीक्रम समजा आपल्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचे कॉलेज मिळत असेल पण आपल्याला ते नको असल्यास काय करावे?
अशा विद्यार्थ्यांनी जर आपल्याला हवे असलेले प्रथम प्राधान्याचे म्हणजे क्रमांक एकचे कॉलेज मिळाले नाही तर अशा विद्यार्थ्यांनी जर आपल्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचे महाविद्यालय नको असल्यास आपण पुढच्या म्हणजे दुसऱ्या प्रवेशाच्या वेळी आपले पसंती क्रम बदलू शकता शक्यतो विद्यार्थ्यांनी ज्या महाविद्यालयांमध्ये आपण प्रवेश घ्यायला इच्छुक आहात अशाच महाविद्यालयांचे कोट टाकावेत अशा संकेतस्थळावर सूचना देखील आहेत.
14. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश अर्जातील चुकीमुळे प्रवेश नाकारला गेल्यास काय करावे?
बऱ्याचदा अनेक विद्यार्थ्यांच्या फॉर्म भरताना चुका होतात किंवा जातीच्या दाखल्या संदर्भात देखील काही गडबडी होतात. विद्यार्थ्यांनी हमी पत्रामध्ये जातीचा दाखला विहित वेळेत भरणार असे हमीपत्र दिलेले असते पण तो जातीचा दाखला वेळेत दिला नाही म्हणजेच प्रवेशाच्या वेळी दिला नाही तर आपला प्रवेश नाकारला जाऊ शकतो तर विद्यार्थ्यांनी काय करावे तर विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीच्या वेळी संबंधित आरक्षणाचा लाभ न घेता ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भरावा आणि पसंती क्रम टाकावेत.
15. दिलेले पसंती क्रम आता तिसऱ्या यादीच्या वेळी बदलता येतात का?
होय दुसऱ्या प्रवेशाच्या वेळी आपण दिलेले पसंती क्रम जर आपल्याला बदल करायचा असेल तर तो तिसऱ्या यादीच्यावेळी आपण करू शकता तशी सवलत आपल्याला दिलेली आहे.
16. आपल्याला प्रवेश मिळाल्याचा एसएमएस ना आल्यास काय करावे?
आपल्याला जर पहिल्या यादीमध्ये प्रवेश मिळाला असेल तर आपल्याला सर्वप्रथम आपण जो रजिस्टर केलेला नंबर आहे त्यावरती एसएमएस येईल तरी एसएमएस प्राप्त झाला नाही तर वरील प्रमाणे सर्व प्रोसिजर करून विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाशी तात्काळ संपर्क साधायचा आहे.
आमचे हे लेख वाचा
.