A केंद्रप्रमुख परीक्षेची कमी वेळात जास्त तयारी करण्यासाठी टिप्स आणि ऑनलाइन टेस्ट | Few tips to prepare for Kendra Pramukh Exam

 केंद्रप्रमुख परीक्षा ही अतिशय जवळ आलेली आहे. आपण ऑनलाइन अर्ज देखील सादर केले असतील. या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या शिक्षकांना आपले शालेय कामकाज पाहून सदर परीक्षेचा अभ्यास अर्थात तयारी करायची  आहे म्हणूनच आज आम्ही केंद्रप्रमुख परीक्षेची तयारी अगदी कमी वेळामध्ये कशी करता येईल यासाठी काही टिप्स घेऊन आलेलो आहोत.या Few tips to prepare for Kendra Pramukh Exam टिप्स आपल्या कामी येतील. 

तसेच आम्ही आपल्यासाठी ऑनलाइन टेस्ट देखील घेऊन आलो आहोत.आपल्याला आज 3 ऑनलाइन टेस्ट सोडवायला दिलेल्या आहेत.मागील सरळसेवा भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अभ्यासून त्या धर्तीवर या Test आहेत.केवळ वस्तुनिष्ठ प्रश्न न घेता आकलन &उपयोजना यावर आधारित प्रश्न आहेत.DIET मधील सरळ सेवा भरतीतून निवड झालेल्या प्राध्यापक मित्राशी देखील चर्चा करून प्रश्न निवडले आहेत.चला तर मग जरा या परीक्षेची तोंडओळख करूया.

 

Few tips to prepare for Kendra Pramukh Exam
केंद्रप्रमुख परीक्षेची कमी वेळात जास्त तयारी करण्यासाठी टिप्स आणि ऑनलाइन टेस्ट

 

केंद्रप्रमुख परीक्षा स्वरूप 

केंद्रप्रमुख परीक्षेचे स्वरूप तुम्हा सर्वांना माहीतच आहे तरीदेखील आपल्याला या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी काही करण्याची ठरवता यावी यासाठी ते थोडक्यात अभ्यासणे गरजेचे आहे. केंद्रप्रमुख पदाची परीक्षा आपल्याला 200 गुणांसाठी द्यावयाचे आहे. या परीक्षेसाठी असणारे प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असणार आहेत त्याचबरोबर या परीक्षेला दोन तासांचा कालावधी आपल्याला असणार आहे.

 केंद्रप्रमुख परीक्षेची गुण विभागणी 

केंद्रप्रमुख परीक्षेसाठी दोनशे गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे त्यामध्ये बुद्धिमत्ता व अभियोग्यता यासाठी 100 गुण देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर शिक्षण क्षेत्राशी संबंधित कायदे योजना, श्री क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था त्याचबरोबर माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर तसेच अभ्यासक्रम मूल्यमापन अध्ययन आणि अध्यापन पद्धती, विषयाचे असे ज्ञान आणि चालू घडामोडी यावर 100 गुणांचे प्रश्न असणार आहेत.अशा प्रकारे ही 200गुणांची परीक्षा असणार आहे. या परीक्षेचा अभ्यास करत असताना आपण खालील टिप्स follw केल्या तर साहजिकच आपल्याला उत्तम यश मिळू शकते.

 केंद्रप्रमुख परीक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स 

 १. वेळेचे उत्तम नियोजन 

केंद्र परीक्षेची तयारी करत असताना आपल्याकडे उपलब्ध असलेला वेळ आणि आपल्याला अभ्यासावयाचे घटक त्यांचे उत्तम नियोजन केले पाहिजे.

 2. बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकाची तयारी 

बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता या घटकाची तयारी करत असताना एकाच प्रकारची अनेक उदाहरणे सोडवत बसून आपला वेळ वाया न घालवता आपल्याला जे घटक जमत आहेत त्या घटकांची यादी बनवून जे घटक जमत नाहीत त्यांच्या वेगळ्या नोंदी घेतल्या पाहिजेत आणि तशा प्रकारची मोजकी उदाहरणे आपण सोडवले पाहिजेत. बरेच शिक्षक बुद्धिमत्ता व अभियोग्यता या घटकाची तयारी करताना जे घटक आपल्याला आवडतात त्यावर जास्त लक्ष देतात असे न करता वेगवेगळ्या प्रश्नांची तयारी यामध्ये केली पाहिजे.

 3. केंद्रप्रमुख परीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप समजावून घ्या 

केंद्रप्रमुख  परीक्षेच्या माध्यमातून आपली निवड झाल्यानंतर आपल्याला ज्या जबाबदाऱ्या पार पाडावयाच्या आहेत. त्या अनुषंगाने APPLICATION BASE प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात सर्वच प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे नसतील तर सध्याचे शिक्षण प्रवाहामध्ये नवनवीन बदल येऊ पाहत आहेत यांची माहिती घ्या.

 4. अद्ययावत शिक्षण क्षेत्रातील ज्ञान 

केंद्रप्रमुख परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला सध्याच्या शिक्षण प्रक्रियेतील अद्ययावत ज्ञान आपल्या जवळ असले पाहिजे आणि यासाठी या क्षेत्रात (शिक्षण)कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या आपण भेटी घेतल्या पाहिजेत. कारण का तर त्या व्यक्तींना या बदलांबाबत परिपूर्ण माहिती असते. म्हणूनच मी केंद्रप्रमुख परीक्षेच्या तयारी संदर्भात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असणारे आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच ज्यांची निवड झाली अशा माझ्या प्राध्यापक मित्रांशी  चर्चा करून नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात नेमके कोणते बदल होणार आहेत?नवीन प्रशिक्षणे ,योजना या संदर्भात बरीचशी माहिती मी मिळवलेली आहे. ऑनलाइन टेस्टच्या माध्यमातून ते प्रश्न मी आपल्याला नियमितपणे देणार आहे.

 5. प्रश्नांचे स्वरूप समजून घेणे

बऱ्याचदा स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असताना पाठांतरापेक्षा आपल्या समोर चार पर्याय असल्यानंतर यापैकी कोणते तीन पर्याय नाहीत अशा अंगाने विचार करून जर आपण प्रश्न सोडवायला सुरुवात केली तरीदेखील आपण योग्य त्या उत्तरापर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते.

 6. शिक्षण क्षेत्रातील चालू घडामोडी

शिक्षण क्षेत्रामध्ये घडणाऱ्या अलीकडील घडामोडींचा अभ्यास आपण केला पाहिजे. तो अभ्यास करत असताना महत्त्वाचे घटक आपण आपल्या डायरीमध्ये नोंदवून ठेवले पाहिजेत आणि त्याची उजळणी केली पाहिजे.

 7. विचार करण्याची पद्धत

केंद्रप्रमुख म्हणून आपली निवड होणार असेल आणि त्यासाठीच ही परीक्षा घेतली जात असेल तर आपल्याला ही परीक्षा देत असताना किंवा परीक्षेला सामोरे जात असताना आपली विचार करण्याची पद्धत ही एखाद्या केंद्रप्रमुखाप्रमाणे असायला हवी. कारण बरेचसे प्रश्न एप्लीकेशन बेस असतील.

 8. सर्व घटकांना सामान न्याय 

केंद्रप्रमुख परीक्षेची तयारी करत असताना जे जे घटक परीक्षेसाठी विचारले जाणार आहेत त्या सर्व घटकांना ओघवता तरी स्पर्श व्हायला हवा. प्रत्येक घटकातील थोडे थोडे प्रश्न या परीक्षेसाठी विचारले जातात.

 आमच्या केंद्रप्रमुख परीक्षा ऑनलाइन टेस्ट चे वेगळेपण 

आम्ही आपल्यासाठी ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून केंद्रप्रमुख परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी आपल्याला मदत करणार आहोत. या ऑनलाइन टेस्टमध्ये आम्ही केवळ वस्तूनिष्ठ प्रकारचे प्रश्न न घेता एप्लीकेशन बेस असणारे प्रश्न जास्तीत जास्त घेणार आहोत. अशा प्रश्नांमुळे परीक्षेमध्ये अमुक प्रश्न आला  तर आपण कशा अंगाने विचार करावा ? याचा आपला सराव होईल. नमुना म्हणून आम्ही आज आपल्याला 3 सराव संच घटकनिहाय देत आहोत. त्याचबरोबर आमच्याकडे असणारी लिखित स्वरूपातील माहिती देखील आम्ही आपल्याला आमच्या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शेअर करणार आहोत. त्या माहितीचा देखील आपल्याला नक्कीच या परीक्षेचा अभ्यास करत असताना उपयोग होईल.चला तर मग ऑनलाइन टेस्ट पाहूया. 

 केंद्रप्रमुख परीक्षा घटक निहाय ऑनलाइन टेस्ट |kendra pramukh exam topic wise online test 

 1. प्रमुख परीक्षा टेस्ट क्रमांक एक ( शैक्षणिक कायदे )

शिक्षण क्षेत्रातील विविध कायदे अधिनियम आणि त्यांच्या तरतुदी या संदर्भात आम्ही आपल्याला एक ऑनलाईन टेस्ट दिलेली आहे.आजच्या या पहिल्या टेस्टमध्ये शिक्षण क्षेत्रातील शिक्षण क्षेत्रातील कायद्यांची तोंड ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु यानंतरच्या टेस्टमध्ये आम्ही अतिशय डिटेल मध्ये आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या महत्त्वाच्या प्रश्नांची ऑनलाईन TEST आपल्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत.

 केंद्र प्रमुख परीक्षा ऑनलाइन टेस्ट 1 (विविध कायदे)

2. केंद्रप्रमुख ऑनलाइन टेस्ट 2 (शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था )
शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्था जसे की युनेस्को ,युनीसेफ त्याचबरोबर भारतामध्ये राष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या एनसीटीई तसेच राज्य स्तरावर काम करणाऱ्या एस सी आर टी त्याचबरोबर इतर शिक्षक प्रशिक्षणासाठी काम करणाऱ्या विविध संस्था आणि त्यांचा कारभार कसा चालतो ? त्या संस्थांची विविध कार्य अशा संदर्भात प्रश्नावली/ऑनलाइन टेस्ट  तयार केली जाणार आहे. या घटकावर देखील स्वतंत्रपणे टेस्ट सिरीज आपल्याला पुरवली  जाणार आहे. आज आपल्याला नमुना वाचा या घटकावर आधारित एकटीच देत आहोत अशा प्रत्येक घटकावर साधारणपणे पाच ऑनलाइन टेस्ट आपल्याला पुरवल्या जाणार आहेत.
 

💥केंद्रप्रमुख परीक्षा टेस्ट क्रमांक 2 (शैक्षणिक संस्था)

 
 
 

 

 

 

3.केंद्रप्रमुख परीक्षा ऑनलाइन टेस्ट 3(अध्ययन, अध्यापन पद्धती व मूल्यमापन)

अभ्यासक्रम अध्ययन अध्यापन पद्धती यांनी मूल्यमापन या घटकांमध्ये आपल्याला अभ्यासक्रम रचनेच्या विविध पद्धती त्यातील बारकावे यावर आधारित प्रश्न विचारले जातील.त्याबरोबरच आपल्याला नेमक्या अध्यापन पद्धती समजल्या आहेत की नाहीत? यासाठी काही उदाहरणे परीक्षेमध्ये विचारली  जाऊ शकतील. अमुक  ठिकाणी कोणत्या अध्यापन पद्धती वापरलेली आहे? असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणूनच या घटकाची तयारी करत असताना केवळ वस्तुनिष्ठ माहिती न घेता व्यावहारिक दृष्टिकोनातून या घटकावरील प्रश्नांची तयारी केलेली आहे.जेणेकरून या अध्यापन पद्धतीवर  कशाप्रकारे प्रश्न आला तरी तुम्हाला त्या घटकाचे गुण पैकीच्या पैकी मिळतील. त्याचबरोबर मूल्यमापन प्रणाली याबाबत देखील आता नव्याने शिक्षण क्षेत्रामध्ये येणाऱ्या मूल्यमापन प्रणाली त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणातील मूल्यमापन प्रणाली कशी असणार आहे ? याला अनुसरून आम्ही ऑनलाईन टेस्टमध्ये समावेश करणार आहोत. आजचा ऑनलाईन टेस्ट संदर्भातला केंद्रप्रमुख भरती मधील आमचा पहिलाच लेख असल्यामुळे नमुनावजा काही प्रश्न पाहूया.
 

💥केंद्रप्रमुख परीक्षा ऑनलाईन टेस्ट ३(अध्ययन व अध्यापन)

 
 

अशा प्रकारे आपल्याला ऑनलाइन टेस्टच्या माध्यमातून केंद्रप्रमुख परीक्षेची तयारी करता यावी यासाठी आम्ही आपल्याला ऑनलाइन टेस्ट उपलब्ध करून देणार आहोत या टेस्ट आपल्यासाठी देत असताना यामागे सरळ सेवा भरती द्वारे झालेल्या परीक्षा आणि त्यातील प्रश्नांचे स्वरूप यांचा देखील अभ्यास करून आम्ही आमच्या या पुढील ऑनलाईन टेस्टमध्ये बहुविध प्रकारचे प्रश्न समाविष्ट करणार आहोत. थोडक्यात आम्ही आपल्याला आमच्या ऑनलाईन टेस्ट सिरीज च्या माध्यमातून केंद्रप्रमुख परीक्षेसाठी माहिती उपलब्ध करून देणार आहोत.
आपल्याला या परीक्षेची तयारी करत असताना नक्की कशाप्रकारे मदत हवी आहे यासंदर्भात आम्हाला कमेंट करा किंवा आम्ही जो आपल्यासाठी व्हाट्सअप ग्रुप तयार करत आहोत त्या ग्रुपमध्ये देखील आपण संदेश पाठवू शकता आम्ही त्यानुसार आमच्या या मार्गदर्शन पर लेखांमध्ये आवश्यक ते बदल करू

केंद्रप्रमुख परीक्षा 2023 मार्गदर्शन ग्रुप

या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला आमच्याकडे उपलब्ध असलेली लिखित सामग्री, नोट्स तसेच माहिती  आपल्याला केंद्रप्रमुख परीक्षेचा अभ्यास करताना उपयोगी पडेल. त्याचबरोबर मी स्वत देखील शिक्षण क्षेत्रामध्ये एम. ए. एम.एड तसेच सेट नेट परीक्षा उत्तीर्ण असल्यामुळे शिक्षण क्षेत्रातील बरीचशी माहिती माझ्याकडे नोटस स्वरूपात उपलब्ध आहे. ती आपल्याला देखील आपल्याला आमच्या ग्रुपच्या माध्यमातून पुरवण्याचा आमचा प्रयत्न राहील.
आमचे इतर लेख

Leave a Comment