हवामान खात्याकडून दिले जाणारे रेड, ऑरेंज,यल्लो आणि ग्रीन अलर्ट म्हणजे काय? | What are the red orange yellow green alerts

नमस्कार !आजच्या लेखामध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. टीव्ही चेनेल सुरू केला की आपल्या कानावर  सध्या अमुक ठिकाणी हवामान खात्याचा रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट अशा बातम्या कानावर पडत आहेत. हवामान खात्याकडून दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या रंगांच्या अलर्ट वरून आपण कोणता शोधबोध  घ्यायचा किंवा त्यातून हवामान खात्याला काय सूचित करायचे असते. याविषयीची माहिती पाहणार आहोत.थोडक्यात पावसा विषयी वर्तवले जाणारे रेड यलो अलर्ट म्हणजे नेमके काय(What are the red orange yellow green alerts) हे पाहणार आहोत. 

What are the red orange yellow green alerts

हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यासाठी वापरले जाणारे रंग |Colours used by the Meteorological Department to predict rainfall / What are the red orange yellow green alerts 

Imd rain alert अर्थात हवामान विभागाकडून सर्वसामान्य लोकांना पावसाविषयी काही अंदाज सांगितले जातात जेणेकरून नैसर्गिक आपत्ती पासून लोकांचा बचा व्हावा. पावसाचा अंदाज वर्तवण्यासाठी खालील चार रंगांचा उपयोग केला जातो.

  • ग्रीन अलर्ट 
  • येल्लो अलर्ट 
  • ऑरेंज अलर्ट 
  • रेड अलर्ट 

चला तर मग पावसाविषयी वर्तवल्या जाणाऱ्या एकेका अलर्ट विषयी माहिती जाणून घेऊया.

पावसाविषयी सांगितल्या जाणाऱ्या अलर्ट विषयी माहिती |Rain alert information in marathi

 

१. पावसाबाबत ग्रीन अलर्ट म्हणजे काय ? 💚 |What is a green alert about rain?

ज्यावेळी हवामान विभागाकडून एखाद्या परिसरासाठी किंवा विभागासाठी त्या ठिकाणी ग्रीन अलर्ट आहे अशी सूचित केले जाते त्यावेळी त्या परिसरात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण मर्यादित स्वरूपाचे असेल. कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती त्या ठिकाणी उद्भवणार नाही. असा अलर्ट म्हणजे हवामान खात्याकडून पावसाविषयी दिला जाणारा ग्रीन अलर्ट होय. थोडक्यात ज्या अलर्ट मुळे लोकांच्या मनातील भीती कमी होते अशा अलर्टला हवामान विभागाकडून दिला जाणारा ग्रीन अलर्ट म्हणता येईल.

2. हवामान विभागाचा पावसाविषयीचा यलो अलर्ट म्हणजे काय   💛 | What is the IMD’s yellow alert for rain?

आपण पाहिले की , ज्यावेळी कोणत्याही प्रकारचा धोका पावसापासून संभवत नाही किंवा नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता अजिबात नसते. त्यावेळी हवामान विभागाकडून ग्रीन अलर्ट दिला जातो.परंतु ज्यावेळी पावसामुळे एखादी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडक्यात आपत्ती आली तर लोकांना काही एक समस्येचा सामना करावा लागू शकतो या हवामान खात्याच्या अंदाज आला पावसाविषयीचा यलो अलर्ट असे म्हणतात.

 3. हवामान खात्याचा पावसाबाबतचा ऑरेंज अलर्ट म्हणजे काय 🧡 |What is an orange alert for rain by Met department?

ज्यावेळी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट एखाद्या भागामध्ये दिला जातो त्यावेळी त्या भागातील लोकांनी नैसर्गिक आपत्ती पासून आपला बचाव करणे किंवा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणे अतिशय गरजेचे आहे. कारण एखादी नैसर्गिक आपत्ती केव्हा उग्र स्वरूप धारण करेल हे सांगता येत नाही. अशावेळी दिला जाणारा अलर्ट म्हणजे ऑरेंज अलर्ट.

 ज्यावेळी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट दिला जातो, त्यावेळी लोकांनी आपल्या परिसरात महापूर येण्याची दाट शक्यता आहे त्या दृष्टिकोनातून उपचारात्मक तयारी करण्यासाठी हा अलर्ट अतिशय महत्त्वाचा आहे. ऑरेंज अलर्ट  प्राप्त झाल्यानंतर लोकांनी जर अतिमत्त्वाची कामे असतील तरच घरातून बाहेर पडावे अन्यथा घरातच बसून राहावे असाच या पावसाबाबतच्या ऑरेंज अलर्ट चा अर्थ आहे.

 4.हवामान खात्याचा पावसाबाबतचा रेड अलर्ट म्हणजे काय?♥️ |What is the Red Alert of Meteorological Department regarding rain?

सध्या पण कोणताही न्यूज चॅनेल सुरु केल्यानंतर मुंबई ठाणे पालघर अशा काही जिल्ह्यांसाठी एक ऑर्डर आपल्यासमोर हवामान खात्याकडून सांगितला जात आहे तो म्हणजे पावसाबाबतचा रेड अलर्ट होय.

 हवामान खात्याकडून ज्यावेळी एखाद्या परिसरामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस नव्हे तर अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असते त्यावेळी हवामान खात्याकडून जो अलर्ट दिला जातो त्याला रेड अलर्ट म्हणतात.

 हवामान खात्याकडून एखाद्या शहरासाठी किंवा परिसरासाठी रेड अलर्ट दिला जातो त्यावेळी लोकांनी आपली काळजी घ्यावी. कदाचित खूपच मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला तर जनजीवन विस्कळीत होण्याची अवस्था म्हणजे रेड अलर्ट होय. ज्यावेळी निसर्ग अतिशय उग्र स्वरूप धारण करतो आणि खूपच जोराचा पाऊस पडणार असतो त्यावेळी जो अलर्ट हवामान खात्याकडून जाहीर केला जातो तो म्हणजे रेड अलर्ट होय.

 हवामान खात्याकडून पावसा विषयी वेगवेगळे अलर्ट का दिले जातात? |Why different rain alerts are given by Meteorological Department?आपण जर वर दिलेले वेगवेगळे अलर्ट अभ्यासले असतील तर आपल्या लक्षात आले असेल की लोकांना पावसाविषयी काही एक अनुमान करता यावे आणि लोकांनी नैसर्गिक आपत्ती पासून स्वतःचा बचाव करावा या दृष्टिकोनातून वेगवेगळे अलर्ट हे दिले जातात.

 सध्या महाराष्ट्राच्या कोणत्या शहरांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे |Red alert has been declared in which cities at present in Maharashtra state

सध्या महाराष्ट्र राज्यातील मुंबई, ठाणे,पालघर त्याचबरोबर कोल्हापूरचा काही परिसर की ज्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे अशा भागांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे.

अति मुसळधार पावसाने नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर आपला कसा बचाव करावा |How to protect yourself after a natural disaster due to heavy rains

जर आपल्या परिसरामध्ये रेड अलर्ट असेल किंवा पावसाने अतिशय उग्ररूप धारण केलेले असेल आणि महापुरासारखी अवस्था निर्माण झालेली असेल अशावेळी आपल्या घरातील महत्त्वाचे दस्तऐवज सोबत घ्यावेत बाकी बहुतेक सुख सुविधाची साधने घरामध्ये तशीच सोडून जर आपण इमारतीमध्ये राहत असाल तर आपल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आपण स्थलांतरित व्हावे. जर आपण खेडेगावांमध्ये राहत असाल आणि आपले घर जर पक्के असेल आणि भरपूरच मोठ्या प्रमाणात पाणी वाढत असेल तर अशावेळी तात्पुरत्या स्वरूपात आपण घराच्या छतावरती आधार घेऊ शकता.

 समजा तुम्ही नदीकिनारी वास्तव्य करत आहात आणि नदीचे पाणी वाढत आहे अशावेळी नदीपासून दूर उंचवट्याचा भाग आहे अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी नदीचे पाणी येऊच शकणार नाही अशा ठिकाणी आपण आसरा घेणे अतिशय गरजेचे आहे. पाणी मोठ्या प्रमाणात साचले असेल अशावेळी त्या वाहत्या पाण्यामध्ये शक्यतो जाऊ नये ही देखील दक्षता आपण अति मुसळधार पाऊस पडत असताना देऊ शकता. 

 रात्रीच्या वेळी अचानक नदीला महापूर येण्याची शक्यता असते अशावेळी खूप मोठ्या प्रमाणात बाहेर पाऊस पडत असेल तर घरातील जाणकार मंडळींनी जागता पारा देणे देखील गरजेचे आहे कारण बऱ्याच ठिकाणी अचानक पाऊस आल्यामुळे अनेक वस्त्या त्यामध्ये वाहून गेलेले आहेत. थोडक्यात गाफील न राहता आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीकडे पाहणे ही खबरदारी आपण या अति मुसळधार पाऊस पडत असताना घेऊ शकता. 

 अशा पद्धतीने आजच्या लेखांमध्ये आपण हवामान खात्याकडून जे पावसाविषयीचा अंदाज व्यक्त करण्यासाठी रेड अलर्ट,ऑरेंज अलर्ट, यलो अलर्ट आणि ग्रीन अलर्ट याविषयी माहिती पाहिली. हि महत्वपूर्ण माहिती आपण इतरांना देखील पाठवा.

आमचे हे लेख जरूर वाचा नक्की आवडतील

मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment