अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 शंका समाधान |11th Online Admission Process 2023 24 Doubts Solution in marathi

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24. या प्रक्रियेच्या अगदी सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपले रजिस्ट्रेशन केले. त्यानंतर आपण  प्रवेश प्रक्रियेचा प्राथमिक माहिती अकरावी संकेत स्थळावर  जाऊन सुरुवातीला  भाग 1 भरला आणि त्यानंतर आपल्याला कोणत्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे त्या संदर्भात ऑप्शन फॉर्म भरला.  21 जून 2023 रोजी कॉलेजचे अलॉटमेंट जाहीर झाले.अर्थात कॉलेजची यादी जाहीर झाली. खरे तर सुरुवातीपासून आम्ही आपल्याला अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिये  संदर्भात, ऑप्शन फॉर्म भरण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची घाई करू नका असे सांगत होतो तरी देखील बऱ्याच विद्यार्थ्यांनी किंवा काहींना उचित मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांच्याकडून काही चुका झाल्या आणि आता त्यांच्याकडे एकच प्रश्न आहे आता मी काय करू? म्हणूनच आजच्या या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या शंका समाधान सत्रामध्ये आपल्या सर्व प्रश्नांची आपल्याला उत्तरे मिळतील.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 शंका समाधान
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 शंका समाधान

अकरावी प्रवेश 2023 24 शंका समाधान 11th Online Admission Process 2023 24 Doubts Solution in marathi 

1. मी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या राउंड मध्ये सायन्स शाखा निवडली होती आता मी दुसऱ्या फेरीमध्ये कॉमर्स साठी अर्ज करू शकतो का?

हो. प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही फेरीमध्ये /राऊंड मध्ये आपण आपली शाखा बदलू शकता.

2. मी भरलेल्या ऑप्शन फॉर्म मधील मला पहिल्या क्रमांकाचे कॉलेज मिळाले आहे आणि मला त्या कॉलेजला प्रवेश नको आहे अशावेळी मी काय करावे?

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना भरलेल्या ऑप्शन फॉर्म मधील प्रथम क्रमांकाचे कॉलेज भेटलेले असेल तर त्या विद्यार्थ्यांना त्या कॉलेजमध्ये प्रवेश 100% घ्यायचा होता म्हणूनच त्यांनी ते प्रथम क्रमांकाला टाकले असा त्याचा अर्थ होतो. परंतु तरी देखील बरेच विद्यार्थी लिस्ट लागल्यानंतर मला प्रथम क्रमांकाचे कॉलेज मिळून देखील मला ते घ्यायचे नाही अशी भूमिका घेतात.या विद्यार्थ्यांनी हे ध्यानात घेतले पाहिजे की जर आपल्याला प्रथम क्रमांकाचे कॉलेज मिळाल्यानंतर आपण त्या कॉलेजला प्रवेश घेतला नाही तर आपल्याला अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पुढच्या एका फेरीत अटकाव केला जातो.  अकरावी प्रवेशाच्या तीन फेऱ्या होतात अर्थात तीन राऊंड होतात. यातील दुसऱ्या फेरीसाठी आपल्याला अर्ज करता येणार नाही. मात्र तिसऱ्या फेरीसाठी तुम्ही अर्ज करण्यासाठी पात्र होता. म्हणूनच विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म अतिशय काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.

3. मी भरलेल्या ऑप्शन कॉलेजमधील तिसऱ्या क्रमांकाचे कॉलेज मला मिळत आहे ,परंतु मला त्या कॉलेजमध्ये प्रवेश नको आहे अशावेळी मी काय करावे?

जर आपल्याला ते कॉलेज नको असेल तर आपण अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या राउंड मध्ये सहभागी होऊन कॉलेजचे कट ऑफ पाहून आपला option फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे.

4. मी दहावीला एटीकेटी आहे म्हणजेच माझे दोन विषय गेले आहेत. मला अकरावी ऑनलाइन प्रवेश घ्यायचा आहे घेता येईल का?

होय. दहावीला कमीत कमी दोन विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी मध्ये प्रवेश घेता येतो परंतु अकरावी प्रवेशाच्या पहिल्या तीन फेऱ्या होईपर्यंत आपल्याला या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येत नाही चौथी विशेष फेरी सुरू झाल्यानंतर मात्र आपण त्यासाठी अर्ज करू शकता.

5. काही कारणास्तव माझा पार्ट 1 भरायचा लावून गेला आता मला ती संधी मिळेल का?

होय.ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन व भाग एक देखील भरला नाही.अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याच्या नि भाग 1 भरण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.

6. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा दुसरा राउंड कधी सुरू होईल?

साधारणपणे पाच ते सहा दिवसांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेचा दुसरा राउंड सुरू होईल.

7. मी पहिल्या फेरीच्या वेळी भरलेले ऑप्शन अर्थात पसंती क्रम दुसऱ्या फेरीच्या वेळी बदलू शकतो का?

बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की, मी पहिल्या राउंडला जो ऑप्शन फॉर्म भरला आहे. आता मला अमुक एका कॉलेजला प्रवेश नको आहे तर मग मला पुन्हा नव्याने ऑप्शन फॉर्म भरता येईल का? अशा विद्यार्थ्यांना पुन्हा आपला ऑप्शन फॉर्म अनलॉक करून नव्याने पसंती क्रम देता येतील.

8. दुसऱ्या फेरीच्या वेळी मी ऑप्शन फॉर्ममध्ये कोणताच बदल केला नाही तर काय होईल?

काहीही होणार नाही. आपले तेच ऑप्शन फॉर्म दुसऱ्या फेरीसाठी ग्राह्य धरले जातील.

9. अकरावी प्रवेशाच्या प्रत्येक राऊंड च्या  वेळी मी माझे पसंती क्रम बदलू शकतो का?

होय.अकरावी प्रवेशाच्या प्रत्येक फेरीच्या वेळी तुम्ही तुमचे ऑप्शन फॉर्म बदलू शकता.

10. मला पहिल्या फेरीच्या वेळी एकही कॉलेज न लागण्याची कोणती कारणे असतील?

आपण ऑप्शन फॉर्म भरत असताना त्या कॉलेजचे गेल्या वर्षीचे कट ऑफ किती आहे? ते न पाहता सरसकट कशाही पद्धतीने कॉलेज टाकलेले असतील, त्यामुळे आपल्याला पहिल्या फेरीच्या वेळी कॉलेज मिळाले नसेल.

11. अकरावी प्रवेशाच्या वेळी आपल्यासाठी योग्य असणारी कॉलेजेस कशी निवडावीत?

बऱ्याच मुलांना अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म भरत असताना आपल्यासाठी कोणती कॉलेज निवडावी ते समजत नाही.अशावेळी विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर त्या ठिकाणी know your eligibility या टॅब  वर जाऊन त्या कॉलेजला फॉर्म भरण्यासाठी आपण एलिजिबल आहोत का ते पाहायचे आहे.

 12. मला पहिल्या फेरीच्या वेळी जे कॉलेज भेटले आहेत त्याच कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे मला काय करावे लागेल?

सर्वप्रथम आपल्याला अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर जावे लागेल आणि त्या ठिकाणी प्रोसिड फॉर ऍडमिशन यावर क्लिक करावे लागेल.

13. अकरावी प्रवेशाच्या वेळी कोणती कागदपत्रे कॉलेजमध्ये जमा करावी लागतील?

अकरावी प्रवेशाच्या वेळी आपल्याला प्रवेश अर्ज आणि शाळा सोडल्याचा दाखला कॉलेजमध्ये जमा करावा लागेल. त्याचबरोबर त्या आरक्षणाचा फायदा घेत असाल तर संबंधित कागदपत्रांच्या सत्यप्रती म्हणजे झेरॉक्स वरती आपल्याला कॉलेज कडे जमा कराव्या लागतील. दहावी बोर्डाच्या निकालाची सत्य प्रत देखील आपल्याला शाळेमध्ये जमा करावे लागेल.

14. मला पहिल्या यादीतच कॉलेज मिळाले आहे परंतु मी अजून ऑनलाईन कागदपत्रे अपलोड केलेले नाहीत काय करावे?

जर आपल्याला पहिल्या फेरीतच कॉलेज मिळाले असेल आणि आपण त्या कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी दोन दिवसांमध्ये जाणार असाल तर प्रवेशाला जाण्या अगोदर अपलोड डॉक्युमेंट मध्ये सांगितलेली सर्व कागदपत्रे आपण अपलोड करावीत.

15. मी एखाद्या कॉलेजला प्रवेश मिळून पुन्हा तो रद्द केला तर काय होईल?

समजा आपल्याला पहिल्याच राऊंडमध्ये प्रवेश मिळाला असेल आणि आपण तो कॅन्सल केला असेल तर मात्र आपल्याला त्यानंतरच्या एका फेरीसाठी प्रतिबंध घातला जाईल म्हणजे दुसऱ्या फेरीसाठी आपल्याला ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही.

16. आपल्याला भेटलेल्या कॉलेजला ऑनलाईन प्रवेश घ्यायचाच आहे अशावेळी काय करावे?

आपल्याला allot  झालेले कॉलेज आपल्याला समजल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या प्रवेश घ्यायचा असेल तर, आपण प्रोसेस फॉर ऍडमिशन यावर क्लिक करून दिलेल्या मुदतीमध्ये संबंधित महाविद्यालयाला भेट द्यायची आहे.

17. अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 मध्ये पहिल्या राउंड मध्ये लागलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला जाण्यासाठी किती कालावधी देण्यात आलेला आहे?

पहिल्या फेरीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त चार दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे या मुलांनी २१ जून ते २४ जून या कालावधीत प्रवेश घेणे बंधनकारक आहे.

18. मी अकरावी ऑनलाइन प्रवेश फॉर्म भरलेला नाही तर मला डायरेक्ट कॉलेजला प्रवेश घेता येईल का?

नाही. कारण अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये आपण सहभागी असाल तरच आपण एखाद्या महाविद्यालयाला डायरेक्ट प्रवेशासाठी जाऊ शकता याचाच अर्थ ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होणे कंपल्सरी आहे…

19. मला अकरावी प्रवेशासाठी नॉन क्रिमीलेयरची अट आहे परंतु ते निघण्याची शक्यता नाही अशावेळी मी काय करावे?

ज्या विद्यार्थ्यांना असे वाटत असेल की कोणत्याही कारणास्तव मला नॉन क्रिमीलेअर भेटणारच नसेल तर अशा मुलांनी ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भरावा. एस सी आणि एसटीआय विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमीलेअर लागत नाही.

20. माझ्याकडे नॉन क्रिमीलेयरची पावती आहे ,मला मूळ कागदपत्र जमा करण्यासाठी किती वेळ दिला जाईल?

ज्या मुलांकडे आता केवळ नॉन क्रिमिलियर ची पावती आहे मूळ प्रमाणपत्र नाही अशा विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचा कालावधी दिला जाईल जर या कालावधीत विद्यार्थ्यांनी नॉन-फ्रीमियर प्रमाणपत्र जमा केले नाही तर अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश आरोग्य केला जातो.

21. दिलेल्या विहित वेळेt जात प्रमाणपत्र मिळणे शक्य नाही काय करावे ?

अशा मुलांनी शक्यतो ओपन मधून अर्थात खुल्या गटातून आपला अर्ज नव्याने दाखल करावा.

22. अकरावी प्रवेशाच्या तीन नियमित फेऱ्या झाल्यानंतर विशेष फेरी असते तिचे वेगळेपण काय?

अकरावी प्रवेशाच्या तीन नियमित फेऱ्या असतात त्या फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांचे गुण, त्याचबरोबर आरक्षण यांचा विचार केला जातो तर विशेष फेरीमध्ये कोणत्याही आरक्षणाचा विचार न करता केवळ विद्यार्थ्यांना मिळालेले गुण यांच्या आधारे प्रवेश दिला जातो.

23. अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे का?

होय. विद्यार्थ्यांनी कॉलेजला प्रवेश घेण्यापूर्वी अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर अपलोड डॉक्युमेंट या टॅब वर जाऊन संबंधित सर्व कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.

24. महाराष्ट्र बाहेरील मुलांना आरक्षणाचा लाभ मिळतो का?

नाही. कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तो उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि त्याकडील संबंधित सर्व कागदपत्रे महाराष्ट्र शासनाच्या असावीत.

आपल्याला या व्यतिरिक्त जर काही शंका असतील तरी आपण कमेंट करा आणि त्यावरती आपल्याला नक्कीच उत्तरे देऊ किंवा आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा त्यावरती आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन मिळेल.

अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.

शैक्षणिक माहिती ग्रुप  👈क्लिक 

आमची माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करा त्याचबरोबर आपल्याला अजून कोणत्या संदर्भात मार्गदर्शन हवे आहे यासाठी देखील आपण कमेंट करू शकता पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद.
 

Leave a Comment