डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना 2022 | SC STUDENT SSC SCHOLARSHIP BARTI 2022

अनुसूचित जातीच्या /sc विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दीड लाख देणारी महाराष्ट्र शासनाची  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना आहे आज आपण या योजनेची  सविस्तर माहिती पाहणार आहोत.ही शिष्यवृत्ती जे विद्यार्थी 10 वी ला 90 टक्के पेक्षा जास्त गुण पडतात व SC (Sheduld cast)चे आहेत अशा sc catagory च्या लोकाना ही स्कॉलरशिप दिली जाते.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष योजना कधी सुरू करण्यात आली आहे| Sc Student Scholarship Started 

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष  अनुदान योजना गेल्या काही वर्षापासून सुरू करण्यात आली आहे.  म्हणजे 2019 पासून सुरू करण्यात आले आहे गरीब कुटुंबातील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष योजना कोणासाठी आहे |Doctor Babasaheb Ambedkar Special Yojana for someone

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दिली जाणारी ही  विशेष योजना अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजेच काय तर जे विद्यार्थी शेड्युल कास्ट म्हणजे  SC cataogry मधील आहेत म्हणजेच एस. सी. कॅटेगिरी तील आहेत त्यांच्यासाठी आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना सुरू करण्यामागे शासनाचा काय उद्देश आहे | Doctor Babasaheb Ambedkar special grant scheme was launched

1. अनुसूचित जातीतील/sc विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती अभावी शिक्षण घेता येत नाही त्या शिक्षणाला मदत होण्यासाठी. 

2. दहावीनंतर अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना इंजिनियर आणि मेडिकलला प्रवेश मिळण्यासाठी अभ्यासाची खूप मोठी तयारी करावी लागते. ही तयारी करण्यासाठी अनेक संदर्भग्रंथ विकत घ्यावे लागतात. ते खरेदी करता यावेत म्हणूनच योजना सुरू करण्यात आली आहे. गरीब कल्याण हा मुख्य हेतु आहे. 

3. विद्यार्थ्यांना केवळ आरक्षण उपयोगाचे नाही  तर त्याच्या जोडीला त्यांना अभ्यासपूरक वातावरण देखील असणे गरजेचे आहे.BARTI शिष्यवृत्तीच्या या योजनेच्या माध्यमातून तेच काम केले जात आहे.

बार्टी स्कॉलरशिप 2023 24 |BARTI SCHOLARSHIP 2023 24

जर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेचा म्हणजे BARTI SCHOLARSHIP योजनेचा लाभ घ्यायचा असेल म्हणजेच काय तर दहावीनंतर या  स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा असेल तर आपण केवळ अनुसूचित जातीतील असून उपयोगाचे नाही. तर काही इतर अटी देखील आहेत त्या आपण पूर्तता करणे गरजेचे आहे तर ते आपण थोडक्यात समजून घेऊया.

 अटी| Barti Scholarship Term And Condition 

1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिली अट आहे तुम्ही अनुसूचित जातीचे असले पाहिजे. 

2. केवळ अनुसूचित आहे म्हणून ही स्कॉलरशिप मिळणार नाही तर ज्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबाचे एकूण उत्पन्न अडीच लाखापर्यंत (२५००००)असणे बंधनकारक आहे. म्हणजेच काय तर अडीच लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न जास्त नसावे.

3. प्रामुख्याने बार्टी मार्फत दिले जाणारी  स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग यासारख्या परीक्षांमध्ये कामाला येईल या हेतूने दिले जाते. त्यामुळे इयत्ता अकरावी ला विज्ञान शाखेतून प्रवेश असणे गरजेचे आहे

4. अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती अचूक आणि खरी असणे गरजेचे आहे माहिती खोटी आणि फसवणारे असेल तर स्कॉलरशिप रद्द होऊ शकते. 

5. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे. 

2022 बार्टी  स्कॉलरशिप चा लाभ मिळण्यासाठी अर्ज कसा करावा | SC STUDENT APPLICATION FORM

1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेचा म्हणजेच barti  स्कॉलरशिप चा लाभ घेण्यासाठी वरील अटींची पूर्तता केलेली असणे गरजेचे आहे. 

2. barti  च्या  वेबसाइटवर म्हणजे संकेतस्थळावर जाऊन या योजनेचा लाभ घेण्यासाठी जो अर्ज दिलेला आहे त्या  अर्जाची प्रिंट काढून तो संपूर्णपणे भरून ठेवायचा आहे. 

3. ज्या  महाविद्यालयामध्ये 11 वी ला आपण प्रवेश घेतलेला आहे. त्या महाविद्यालयातील प्राचार्यांचे पत्र देखील तुम्हाला सोबत जोडावे लागेल. 

 4.पालकांनी दिलेली माहिती खरी आहे यासाठी एक लेखी हमीपत्र द्यावे लागेल. 

5. सदर भरलेला अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात जमा न करता रजिस्टर पोस्टाने तो आपल्याला कार्यालयाकडे पाठवायचा आहे त्याची छाननी झाल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली जाते. 

बार्टी स्कॉलरशिप चा अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवावा | Barti Office Addres 

  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना या योजनेचा पण जर अर्ज भरला असेल तर तो आपल्याला पार्टीच्या मुख्य कार्यालयामध्ये पाठवावा लागतो.

पत्ता 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्था,

बार्टी ,पुणे411001.

   या पत्त्यावर आपल्याला हा अर्ज पोस्ट करायचा आहे

बार्टी स्कॉलरशिप प्राप्त  झाल्यानंतर | SC Scholarship Prapt Zalyanantar 

  जर आपण अनुसूचित जातीतील असाल 90 टक्के पेक्षा जास्त गुण असतील आणि आपले उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा कमी असेल व आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र झाल्यानंतर ही रक्कम आपल्याला एक रकमी मिळत नाही हे लक्षात घ्या.

1. लाभ घेणारा विद्यार्थी पात्र झाल्यानंतर पहिला टप्पा हा 50000 (पन्नास हजार) दिला जातो.

2. ज्यावेळी  टर्म एक्झाम होते त्यावेळी या टर्म एक्झाम मध्ये म्हणजे सेमिस्टर मध्ये अकरावी आणि बारावीला अनुक्रमे 75 टक्के पेक्षा जास्त गुण असतील तर 50 हजार रुपये म्हणजेच अकरावीला पन्नास हजार रुपये आणि बारावीला पन्नास हजार रुपये व शेवटी इंजिनिअरिंग मेडिकल यासारख्या परीक्षा तयारीसाठी वेगळे 50000 असे मिळून दोन लाख तुम्हाला दिले जातात हे ध्यानात असू द्या. 

 

बार्टी स्कॉलरशिप आवश्यक कागदपत्रे |  Scholarship Sathi Document , Kagadpatre 

 या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी  आवश्यक ती सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार वरून अर्ज करावा अन्यथा आपला अर्ज नाकारला जाण्याची शक्यता असते.तरी  खालील कागदपत्रे आपण तयार ठेवा ———

1. बार्टीच्या संकेतस्थळावर दिलेला स्कॉलरशिप नमुना अर्ज आपण प्रिंट काढून तो व्यवस्थित भरावा.

2. अर्जदाराचा इयत्ता दहावीचा निकालाची झेरॉक्स कॉपी काढून ठेवा. 

3. सर्वात महत्वाचे म्हणजे उत्पन्नाचा दाखला व की ज्याचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असले पाहिजे.

4. या योजनेचा जो व्यक्ती लाभ घेणार आहे त्याचा आणि त्याच्या वडिलांचा जातीचा दाखला देखील आपल्याला झेरॉक्स जोडावे लागेल

5. आपण महाराष्ट्रातील रहिवासी आहोत म्हणून सक्षम अधिकाऱ्याचा रहिवासी दाखला जोडणे बंधनकारकआहे. 

6. भरलेली माहिती अचूकव खरी आहे याबाबत पालकांचे हमीपत्र.

7. ज्या महाविद्यालयांमध्ये अकरावी-बारावी साठी शिक्षण घेत आहात त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे पत्र

8. द स्कॉलरशिप मंजूर झाले तर कोणत्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी त्यासाठी बँक डिटेल द्यावेत किंवा आपल्या पासबुकची एक झेरॉक्स तोडून द्यावी

         इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेचा लाभ म्हणजेच SSC SC student scholarship चा लाभ घेता येतो.त्याच बरोबर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी देखील Barti संस्थेमार्फत अनुदानाच्या रूपाने मदत केली जाते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच राज्यसेवा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी  BARTI तर्फे मोफत प्रशिक्षण कार्यक्रम | Barti Mpsc Study Scholarship 

  बार्टी संस्थेमार्फत अनुसूचित जातीचे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी या उद्देशाने योजना सुरू करण्यात आलेले आहे.

बार्टी एमपीएससी पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम कधीपासून राबवला जात आहे | Barti Mpsc Study Programe ,Karykram 

 साधारणपणे 2017 18 पासून एमपीएससी पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जात आहे.

Barti एमपीएससी पूर्व परीक्षा प्रशिक्षण विद्यार्थी निवड  |  Barti Mpsc Student Selection  

 हा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जातीचा असावा.त्याचबरोबर त्याची उत्पन्न मर्यादा आठ लाखांच्या पुढे असू नये.  

– एकूण जागांपैकी 30 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवलेले आहेत

– व प्रशिक्षण संपूर्ण वर्षभर दिले जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक एंट्रन्स एक्झाम घेतली जाते

–  निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला नऊ हजार रुपये आर्थिक मदत केली जाते. 

– स्पर्धा परीक्षेची पुस्तके खरेदी करता यावेत म्हणून पंचवीस हजार रुपये वेगळे मदत केली जाते. 

–  विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शक मार्फत मार्गदर्शन देखील केले जाते

– बार्टी संस्थेचा एमपीएससी करत असलेल्या450 आतापर्यंत  विद्यार्थ्यांनी घेतलेले लाभ

–  अकरा विद्यार्थी राज्यसेवा देऊन अधिकारी म्हणून नियुक्त झालेले आहेत.

  अशाप्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असून SC Student ला 90 टक्के च्या पुढे गुण व आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी अनमोल असे कार्य करीत आहे. लाभार्थी हा अनुसूचित जातीतील तर दोन्ही योजनांचा लाभ घेता येऊ शकतो. 

   अनेक गरीब विद्यार्थी पैशा अभावी शिक्षण घेत नाहीत.अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा या हेतूने हा विशेष लेख लिहिला आहे.जरी ही माहिती आपल्या कामाची नसेल तरीदेखील अनुसूचित जातीतील जे लाभार्थी आपल्या परिचयाचे असतील त्यांच्यापर्यंत हा लेख जरूर पोहोचवा ,कारण का तर शासनाच्या अनेक योजना असतात परंतु त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्या विद्यार्थ्या पर्यंत पोहोचल्या तर एका गरीब कुटुंबाला कळत-नकळतपणे ते आपण केलेले आर्थिक सहकार्य आहे. या भावनेतून आपण हा लेख गरजूंपर्यंत पोहचवा. शिक्षकानी मुलाणा या योजनेची माहिती आठवी नववीत मुले असताना द्या जेणेकरून ती अभ्यासात लक्ष देऊन याचा लाभ घेतील .धन्यवाद ! ही माहिती प्रतेक गरजू पर्यन्त पोहोचवा हीच माफक अपेक्षा. धन्यवाद !

आमचे हे लेख वाचले का ?

 

1 thought on “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना 2022 | SC STUDENT SSC SCHOLARSHIP BARTI 2022”

Leave a Comment