आजच्या लेखामध्ये आपण राणी लक्ष्मीबाई यांची माहिती पाहणार आहोत.अशी स्त्री की पती निधनानंतर हात पाय गाळत न बसता जी स्वत रणांगणात उतरून शत्रूवर तुटून पडली.आज आपण Rani Laxmibai Mahiti Bhashan Nibandh Kavita संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
भारत भूमीमध्ये अनेक शूर वीर जन्माला आले त्याचप्रमाणे अनेक शूर वीर महिला देखील होऊन गेल्या.या महिलांमध्ये एक नाव की जे सर्वांच्या परिचयाचे आहे. ते म्हणजे राणी लक्ष्मीबाई.अशी राणी की जी आपल्या लहान मुलाला पोटाला बांधून रणांगणात उतरली ती स्त्री म्हणजे झाशीच्या राणी लक्ष्मीबाई होय. राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल आपल्याला सखोल अशी माहिती मिळवायची आहे. सर्वप्रथम त्यांचा जीवन परिचय करून घेऊन घेऊयात.
राणी लक्ष्मीबाई माहिती |
राणी लक्ष्मीबाई यांचा जीवन परिचय | Rani Laxmibai Jivan Parichay
राणी लक्ष्मीबाई बालपण | Balpan
राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ मणिकर्णिका होते. त्यांच्या लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पूर्वीचे बदलून लक्ष्मीबाई ठेवले. मणिकर्णिका म्हणजेच राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1835 रोजी उत्तर प्रदेश राज्यातील काशी या पवित्र स्थळी झाला. राणी लक्ष्मीबाई यांचे वडील हे मूळचे कोकणातले असले तरी पुणे आणि सातारा या भागांमध्ये त्यांचे जास्त वास्तव्य होते.राणी लक्ष्मीबाई यांच्या आईचे नाव भागीरथीबाई होते. राणी लक्ष्मीबाई या राजघराण्यातील नव्हत्या परंतु वडील पेशव्यांच्या आश्रयाला असल्याने राजघराण्यातील व्यक्तींमध्ये त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. सहाजिकच मित्र परिवारामध्ये तलवारबाजी घोड सवारी याच बरोबर अश्व परीक्षेमध्ये त्या प्रवीण होत्या म्हणजेच काय तर घोड्या यांविषयी त्यांना सखोल अशी जाण होती. महिला असून देखील मलखांब विद्या देखील त्यांना अवगत होती.थोडक्यात राणी लक्ष्मीबाई अष्टपैलू होत्या.हे यावरून आपल्या लक्षात येते
वैवाहिक जीवन | Vaivahik Jivan
राणी लक्ष्मीबाई यांचा विवाह उत्तर प्रदेश मधील झाशी संस्थानचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी झाला. विवाहानंतर माहेरच्या मंडळींनी मणिकर्णिका हे नाव बदलून लक्ष्मी असे नाव ठेवले हे आपण वर पहिलेच. राणी लक्ष्मीबाई राजघराण्यातील व्यक्तींसोबत वाढल्यामुळे त्यांना राजदार बारा विषयी प्रशासनाविषयी चांगली जाण होती, म्हणूनच सुरुवातीला त्या पती गंगाधरराव नेवाळकर यांना राज्यकारभारात मदत करत होत्या. परंतु ही गोष्ट पती गंगाधर नेवाळकर यांना पटत नव्हती म्हणून राणी लक्ष्मीबाई यांनी यांच्या राज्यकारभारात लक्ष न घालता तलवारबाजी ,मलखांब, शारीरिक कसरती याकडे नियमित लक्ष दिले .काही कालांतराने राणी लक्ष्मीबाई आणि गंगाधर होळकर यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले.परंतु अवघ्या तीन महिन्यांमध्येच आजारपनाने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गंगाधरराव खूप दुःखी झाले.आपल्या राजगादीला कोणीतरी वारस असावे ? म्हणून राणी लक्ष्मीबाई आणि गंगाधरराव यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेतले आणि या दत्तक मुलाचे नाव दामोदर ठेवले. मुलाला दत्तक घेतल्यानंतर आणखी काही कालावधी नंतर 21 नोव्हेंबर 1853 रोजी लक्ष्मीबाई यांचे पती गंगाधरराव यांचा मृत्यू झाला.पतीच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या हाती घेतली.
राणी लक्ष्मी यांचे कार्य राजकीय कारकीर्द | Rani Laxmibai Karya, Rajkiy Kamgiri
राणी लक्ष्मीबाई यांनी पती गंगाधरराव नेवाळकर यांच्या निधनानंतर राज्यकारभारामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. लॉर्ड डलहौसी या इंग्रज अधिकाऱ्याने अनेक संस्थांने खालसा करण्याचे धोरण अवलंबले होते.परंतु झाशीचे संस्थान आणि ब्रिटिश अधिकारी यांच्यातील संबंध मैत्रीपूर्ण असल्याकारणाने आपले संस्थान खालसा होणार नाही. असे झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांना वाटत होते, परंतु लॉर्ड डलहौसी याने 13 मार्च 1854 ला एका पत्रकामध्ये झाशी संस्थानही खालसा होणार असा आदेश काढला. या आदेशामुळे राणी लक्ष्मीबाई यांना आपल्या राणी पदाचा त्याग करावा लागला. या घटनेमुळे झाशीची राणी लक्ष्मीबाई राजवाडा व राजगादी सोडून दुसऱ्या ठिकाणी राहू लागल्या.या ब्रिटिश सत्तेचा बदला घेतला पाहिजे असे मनोमन त्याना वाटत होते. यासाठी ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवला पाहिजे अशी भावना त्याच्या मनामध्ये तीव्र होऊ लागली
1857 चा उठाव आणि राणी लक्ष्मीबाई | 1857 Chaa uthav Ani Rani Laxmibai
इंग्रजांविरुद्धचा असंतोष म्हणजे 1857 चा उठाव होय. सर्व भारतामधून इंग्रजांच्या प्रशासनाला विरोध होत होता. याच बिथरलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी त्यांच्या काही मोजक्या सैनिकांच्या मदतीने इंग्रजी सैनिकांना झाशीच्या किल्ल्यातून पळवून लावले. आणि पुन्हा झाशीची राणी लक्ष्मीबाई स्वतःराणी म्हणून झाशीचा राज्य कारभार पाहू लागल्या. एक प्रकारे इंग्रजाना हे खूप मोठे आव्हान होते. विस्कटलेली राज्यकारभाराची घडी नीट कसे होईल? यासाठी राणी लक्ष्मीबाई स्वतः लक्ष देऊ लागल्या .विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनतेचा विश्वास संपादन करायला सुरुवात केली. राणी लक्ष्मीबाई यांनी संपूर्ण झाशीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि इंग्रजांना आपल्या राज्यातून हद्दपार करण्यासाठी तात्या टोपे यांची मदत घेतली. झाशीच्या राणीने इंग्रजांच्या सैन्यासोबत जवळजवळ नऊ ते दहा दिवस कडा संघर्ष केला. मात्र झाशीतीलच काही फितुरांनी गोपनीय बातम्या इंग्रजाना दिल्या आणि यामुळेच झाशी किल्ल्यावरील पिण्याच्या पाण्याची विहीर आणि दारूगोळ्याचे ठिकाणे यांची माहिती मिळाल्याने इंग्रजांनी तोफेच्या सहाय्याने ही दोन्ही ठिकाणे नष्ट केली.सहाजिकच राणीची ताकद कमी पडली. राणी लक्ष्मीबाई यांनी तात्या टोपे यांना तात्काळ सैनिक पाठवावेत अशी विनंती केली परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. इंग्रज अधिकाऱ्यांनी राणीच्या विश्वासू लोकांना लढाईमध्ये नेतृत्व करणाऱ्या खुदाबक्ष आणि त्याच्या साथीदारांना बंदुकीच्या गोळीने ठार मारले .अशा बिकट परिस्थितीत राणी लक्ष्मीबाई यांना झाशी सोडून ग्वाल्हेरला जावे लागले.
राणी लक्ष्मीबाई आणि ब्रिटिश/इंग्रज अधिकारी स्मित संघर्ष | Rani Laxmibai Aani Biritish,Ingraj Sanghrsh
झाशीची राणी लक्ष्मीबाई ग्वाल्हेरला गेल्यानंतर ब्रिटिश आधिकारी स्मित आपले सैनिक घेऊन झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याविरुद्ध लढाईसाठी सज्ज झाला.या लढाईमध्ये राणी लक्ष्मीबाई आपल्या सैनिकांबरोबर स्वतःदेखील रणांगणात उतरल्या होत्या.परंतु लढत असताना राणी लक्ष्मीबाई प्रचंड जखमी झाल्या.
राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू कधी झाला ? Rani Laxmibai Nidhan Tarikh
लढताना जखमी झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना एका सुरक्षित स्थळी नेण्यात आले. परंतु आपण जिवंत इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून राणी लक्ष्मीबाई यांनी वीर मरण पत्करले . 18 जून 1858 ला झाशीच्या राणी लक्ष्मीबाई निधन पावल्या.
राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळा | Rani Laxmibai Sainiki School
झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांची जिद्द आणि पराक्रम पाहून ज्या मुलींना भारतीय सैन्यदलामध्ये सेवा करण्याची आवड आहे अशा मुलींसाठी पुणे जिल्ह्यातील पिरंगुट या ठिकाणी त्यांच्या नावाने एक सैनिकी शाळा सुरू करण्यात आलेले आहे शाळेत शिकणाऱ्या अनेक मुली आज भारतीय सैन्याला मध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत त्याच बरोबर राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने एक शेती विद्यापीठ एक मेडिकल महाविद्यालय तसेच आपल्या आर्मी मध्ये त्यांच्या नावाने एक रेजिमेंट लेकिन राणी दासी या नावाने बनवण्यात आलेले आहे
राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने पुरस्कार | Rani Laxmibai Yanchya Navane Purskar
भारत सरकार तर्फे धाडसी स्त्रियांना अनेक पुरस्कार दिले जातात राणी लक्ष्मीबाई यांची आठवण म्हणून स्त्रीशक्ती पुरस्कार दिला जातो तो पुरस्कार लक्ष्मीबाई यांच्या नावाने दिला जातो. तसेच कुस्ती खेळामध्ये मुलींना राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने उत्तरप्रदेश सरकार हा पुरस्कार देते.थोडक्यात काय तर अनेक पुरस्कार झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने दिले जातात.
झाशीची राणी लक्ष्मीबाई भाषण | Zashichi Rani Laxmibai Bhashan
अध्यक्ष महाशय, गुरुजन वर्ग आणि तिथे जमलेल्या बालमित्रांनो!
आज मी आपणास एका कर्तुत्ववान महिले विषयी माहिती सांगणार आहे .ती कर्तुत्ववान महिला म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. राणी लक्ष्मीबाई यांचे वर्णन करायचे म्हटले तर अशी राणी कि जी आपल्या लहानग्याला पोटाशी घेऊन रंगांमध्ये लडायला उत्तरली म्हणून तिच्याविषयी म्हणतात,
खूब लडी मर्दानी |
वह झाशीवाली राणी थी |
ब्रिटिशांशी लढता असताना अगदी पुरुषांनाही लाजवेल असे धाडस आणि तलवारबाजी राणी लक्ष्मीबाई यांनी केली. राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ नाव मणिकर्णीका होते परंतु लग्नानंतर सासरच्या लोकांनी तिचे नाव लक्ष्मी बाई ठेवले .राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1835ला काशी या ठिकाणी झाला.वडील मोरोपंत तांबे पेशव्यांच्या पदरी नोकरीस असल्यामुळे राजघराण्यातील नसताना देखील राणी लक्ष्मीबाई यांना तलवारबाजी,मलखांब,अश्वपरीक्षा अवगत होत्या. पेशवे तात्या टोपे यांनी हे सर्व राणी लक्ष्मीबाई यांनी शिकावे? यासाठी खास प्रयत्न केले होते. अगदी लहान वयात राणी लक्ष्मीबाई यांचे लग्न गंगाधरराव नेवाळकर या झाशीच्या एका राजाची झाले. सुरुवातीच्या काळामध्ये झाशीच्या राज्यकारभारात राणी लक्ष्मीबाई आपल्या पतीच्या कामांमध्ये मदत करायला सुरुवात केली. मात्र गंगाधररावांना एका स्त्रीने आपल्या कामात मदत करणे पटत नव्हते. म्हणून त्यांनी राणी लक्ष्मीबाईना विरोध केला पण काही एक कालांतराने पती गंगाधरराव यांचे निधन झाले आणि एक महिला असून देखील झाशीचे संपूर्ण नेतृत्व राणी लक्ष्मीबाई यांनी स्वीकारले व त्या झाशीच्या राणी बनल्या.
इंग्रजांनी संस्थाने खालसा करण्याचे धोरण राबवले असताना पत्रव्यवहार करून आपले संस्थान खालसा होणार नाही यासाठी राणी लक्ष्मीबाई यांनी प्रयत्न केले. तरीदेखील इंग्रजांनी दत्तक विधान नामंजूर करून झाशी संस्थान खालसा करण्याचा प्रयत्न केला. राणी लक्ष्मीबाई यांचे राणी पद काढून घेण्यात आले.इंग्रजांचे कृत्य पाहून राणी लक्ष्मीबाई यांच्या मनामध्ये प्रचंड राग धुमसत होता म्हणूनच जशी 1857 च्या उठावाला सुरुवात झाली तशी तात्या टोपे यांच्या मदतीने राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांशी लढायला सुरुवात केली. बराच काळ इंग्रजांशी त्या झुंज देत राहिल्या परंतु लढत असताना त्या प्रचंड जखमी झाल्या आणि 18 जून 1858 ला त्या गवालेयर या ठिकाणी निधन पावल्या.
आज मी आपणास जी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या विषयी अगदी थोडक्यात भाषण रूपाने माहिती सांगितली नक्कीच आपल्याला आवडली असेल आपण माझे दोन शब्द शांत चिताने एकूण घेतली म्हणून मी आपला आभारी आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.
अशी तुम्ही झाशीची राणी लक्ष्मीबाई या भाषणाची तयारी करु शकता.
झाशीची राणी लक्ष्मीबाई निबंध | Zashichi Rani Laxmibai Nibandh
ज्यांना आपण झाशीची राणी म्हणून ओळखतो यांचे संपूर्ण नाव आहे लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर. त्यांचे मूळ नाव मणिकर्णिका होते. तसेच प्रेमाने राणी लक्ष्मीबाई यांना लहानपणी मनुबाई देखील म्हटले जात होते.परंतु लग्नानंतर त्यांच्या सासरच्या लोकांनी त्यांचे नाव लक्ष्मी ठेवले.लक्ष्मीबाई यांचे लहानपण राजघराण्यातील लोकांबरोबर गेल्यामुळे त्यांना मल्लखांब, तलवारबाजी,अश्वपरीक्षा या सर्वांचे ज्ञान होते.
लहान वयातच मणिकर्णिकाचे लग्न गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाले. ते झाशीचे राजे होते. राजघराण्यातील व्यक्तींसोबत बालपण गेल्यामुळे राजकारणातील,युद्धनीती मधील बऱ्याच बाबी लक्ष्मीबाई यांना परिचित होत्या.म्हणूनच लग्न झाल्यांनातर सुरुवातीच्या काळामध्ये झाशीचे राजे म्हणजेच राणी लक्ष्मीबाई यांचे पती गंगाधरराव यांना राणी लक्ष्मीबाई मदत करत होत्या.परंतु ही गोष्ट गंगाधरराव यांना मान्य नव्हती. काही वर्षातच गंगाधरराव यांचे निधन झाले.व झाशीची ची सर्व सूत्रे राणी लक्ष्मीबाई यांच्याकडे आली.
राणी लक्ष्मीबाई झाशीची राणी बनल्यानंतर त्यांनी आपल्या काही विश्वासू लोकांच्या सहाय्याने राज्यकारभार चालवायला सुरुवात केली. परंतु त्याच दरम्यान लॉर्ड डलहौसी या ब्रिटिश अधिकाऱ्याने संस्थाने खालसा करण्याचे धोरण राबवले. राणी लक्ष्मीबाई यांना वाटत होते झाशी संस्थान खालसा करणार नाहीत. तसा पत्रव्यवहार देखील त्यांनी त्यांच्याशी केला होता. परंतु राणी लक्ष्मीबाई यांनी घेतलेल्या दत्तक पुत्रावर आक्षेप नोंदवत हे संस्थान खालसा केली जाईल असे सांगण्यात आले.राणीला झाशी संस्थान सोडावे लागले.राणीच्या मनात ब्रिटिश सरकार विरुद्ध प्रचंड रंग होता याच दरम्यान संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध असंतोष सुरू झाला व1857 च्या उठावाला सुरुवात झाली. राणी लक्ष्मीबाई यांनी पेशवे तात्या टोपे यांच्या मदतीने इंग्रजांशी कडा संघर्ष केला. झाशी परत मिळवण्याचा प्रयत्न केला. काही अंशी यश देखील आले परंतु विश्वासू माणसे गमावल्यामुळे लढा एकाकी होऊ लागला. म्हणून नाईलाज म्हणून राणी लक्ष्मीबाई ग्वाल्हेरला गेल्या.तिथे गेल्यानंतर देखील इंग्रजांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही.
इंग्रज सत्ता व झाशीची राणी यांचा ग्वाल्हेरला आमने-सामने मुकाबला झाला.आपल्या सैन्याचा पराजय होतोय हे पाहून राणी लक्ष्मीबाई स्वतः युद्धामध्ये उतरल्या आणि इंग्रजांशी कडा संघर्ष केला परंतु त्यात राणी लक्ष्मीबाई यांना यश आले नाही.ब्रिटिश सैन्याशी लढत असताना त्या प्रचंड जखमी झाल्या .त्यांच्या एका सेवकाने त्यांना काही दिवस मठामध्ये उपचारासाठी ठेवले परंतु आपण जिवंत इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी प्राणत्याग केला असे सांगितले जाते
अशा स्वाभिमानी राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू 18 जून 1858 रोजी झाला.
राणी नव्हती लक्ष्मीबाई ,
तळपती तलवार होती ,
ब्रिटिश सरकारविरुद्ध पेटलेली आग होती .
या पराक्रमी राणीला म्हणजेच राणी लक्ष्मीबाई यांना निबंधातून सलाम.
झाशीची राणी कविता | Zashichi Rani Kavita
पती निधनाने ती न रडली,
इंग्रज सैन्या वीरूद्ध आमने सामने लढली.
ती स्वाभिमानाची आग होती ,
इंग्रज सरकारला विरोध करणारी मशाल होती.
वेळ येता महिला नि राणी असूनी हाती तलवार घेतली,
काय सांगू राणीची तलवार अंगार ओकली.
ती एक मर्दानी होती,
झाशी वाली राणी लक्ष्मीबाई होती.
या कवितेतून देखील झाशीच्या राणीच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज आपल्याला येतो.
अशा प्रकारे आजच्या लेखामध्ये देण्यात आलेली राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती आपल्या सर्वांनाच आवडली असेल. एका कर्तुत्ववान महिलेची ही Rani Laxmibai Information In Marathi माहिती इतरांपर्यंत जरूर पोहोचवावी ही विनंती.
FAQ | काही प्रश्न
1 राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू कोठे झाला?
राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर या ठिकाणी झाला.
2. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म कधी झाला?
राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1835 रोजी झाला.
3. झाशी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
झाशी हे ठिकाण उत्तर प्रदेश राज्यात आहे.
आमचे इतर लेख