अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी बीड जिल्ह्यातील चौंडी या अगदी छोट्या खेडेगावांमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे आणि आईचे नाव सुशिलाबाई होते. अगदी लहान वयातच त्यांचा विवाह माळवा प्रांतात जहागिरी असलेल्या मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी झाला.त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या केवळ आठ वर्षांच्या होत्या. अहिल्याबाई होळकर यांचे सासरे मल्हारराव होळकर यांची मराठा दरबारी एक वेगळी ओळख होती त्या मानाने पती खंडेराव हे आयुष्य आरामात जीवन जगणारे गृहस्थ होते. त्यामुळे अनेक जबाबदऱ्या अहिल्याबाई यांच्यावर पडल्या.
अहिल्याबाई होळकर संपूर्ण माहिती ahilyabai holkar jayanti marathi information 2023
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची सामाजिक कार्ये,कामे | Ahilyabai Holkar Yanchi Karye
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर एक महिला त्यातही विधवा परंतु राज्यकारभार पाहत असताना त्या कधीच मागे हटल्या नाहीत.त्यांनी अतिशय कठोरपरिश्रम घेतले आणि आपला राज्यकारभार अतिशय चांगल्या पद्धतीने केला. तो कारभार करत असताना त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले ते पाहूया त्यातून त्या किती कर्तबगार राज्यकर्ती होत्या याची कल्पना येईल.
1. रजधानीचे ठिकाण बदलणाऱ्या अहिल्याबाई | Rajdhaniche Thikan
अहिल्याबाई होळकर यांनी इंदूर या ठिकाणी असणारी आपली राजधानी नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या महेश्वरला नेली.तिथे आपले प्रशासन नीट पाहता यावे यासाठी एक प्रशस्त असा राजवाडा बांधला. या राजवाड्यात खूप मोठे देवालय म्हणजेच देवघर बांधले.होळकर घराण्यातील कर्तबगार व्यक्तींचा आठवण म्हणून आपल्या राजधानीमध्ये त्यांच्या नावाने छत्र्या बांधल्या आपल्या पूर्वजांचा पराक्रम या माध्यमातून जीवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले.
2. नद्यांवरती घाट बांधणी करणाऱ्या अहिल्याबाई होळकर | Nadyanvr Ghat Bandhni
अहिल्याबाई होळकर यांनी पाण्याचे महत्व ओळखून ते पाणी योग्य कामासाठी वापरले जावे यासाठी त्यांनी नद्यांवर ती मोठमोठे घाट बांधले.नदीकिनारी मंदिर असेल तर भक्तजणांना या घाटावर अंघोळीची उत्तम सोय त्या निमिताने झाले. असा दुहेरी फायदा हा घाट बांधण्याचा झाला.
3. मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या अहिल्याबाई | Mandirancha Jirnodhhar
शिवकाळात किंवा त्याअगोदरच्या काळात बांधली गेलेली अनेक पुरातन मंदिरे जीर्ण झाली होती. या मंदिरांना लकाकी आणण्याचे काम अहिल्याबाई होळकर यांनी केले. अहिल्याबाई होळकर यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला विशेष सांगायचे म्हणजे आज आपण जो जेजुरी किल्ला किंवा मंदिर पाहतो याची संपूर्ण डागडुजी करण्याचे काम अहिल्याबाई होळकर यांनी केले आहे. आजही हा मल्हारगड अगदी दिमाखात उभा आहे यातून अहिल्याबाई होळकर यांची दूरदृष्टी आपल्याला दिसून येते.
4. गोरगरिबांसाठी अहिल्याबाई यांनी अन्नछत्रे | Gor gribansathi Anna Chatre
आपल्या राज्यातील गोरगरीब अनाथ लोकांना किमान दोन वेळचे खायला मिळावे यासाठी अहिल्याबाई होळकर यांनी ठिकाणी अन्नछत्रे सुरू केली व त्यात जातीने लक्ष देखील घातले.
5. पिण्याच्या पाण्याची सुविधा देणाऱ्या अहिल्याबाई होळकर | Panyachya Suvidha
अहिल्याबाई होळकर यांनी अनेक विहिरी आड नुसते खोदण्यास नाही तर ते खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांना पक्क्या स्वरूपात बांधून घेण्याचे काम अहिल्याबाई होळकर यांनी केले त्याचबरोबर रस्त्याने जाणारे वाटसरु त्यांच्या सोयीसाठी ठिकाणी पाणपोया सुरू केल्या.
6. ग्रंथ संकलन आणि वाचन |Granth Sanklan
7. दरोडेखोरांचा सामना | Darodekhorancha Samna
सासरे मल्हाराव होळकर यांच्या निधनानंतर राज्यात अनागोंदी निर्माण झाली होती ठिकठिकाणी चोर्या,दरोडे यासारख्या घटना घडत होत्या.आता काय करावे या प्रश्नाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चींतीत होत्या यावर उपाय म्हणून त्यांनी आपली मुलगी मुक्ताबाई तिला पणाला लावले.आणि जो कोणी मुलगा त्या दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल यासाठी स्वयंवर केला. खरोखरच माझ्या काळजाच्या तुकड्या पेक्षा माझी जनता प्यारी ही भूमिका अहिल्याबाई होळकर यांच्याजवळ होती या उदाहरणातून त्या एक उत्तम राज्यकर्ती होत्या. हे पटवून देणारी ही घटना आहे आणि त्या पुढे झालेही तसेच त्यांच्या जावयाने दरोडेखोरांचा बंदोबस्त केला.
8. दिवान गंगोबा तात्या बंदोबस्त शासन | Gangobaa Bandobasth
अहिल्याबाई होळकर यांच्या पदरी असणारा दिवान गंगोबा तात्या एक महिला राज्य चांगल्या पद्धतीने कशी काय करु शकते? याविषयी स्वार्थी भूमिकेतून सततच अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यावर आक्षेप घेत होता. एवढेच नव्हे तर राघोबादादा पेशवे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अहिल्याबाई होळकर यांना या पदावरून काढून टाकण्यात यावे अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली होती. या संकटकाळी संकटाला न घाबरता अहिल्याबाई होळकर यांनी राघोबादादा यांनाच कळवले, की मी लढाईसाठी तयार आहे. परंतु राघोबादादा पेचात पडले एका महिलेशी लढताना जर हरलो तर…………. म्हणूनच त्यांनी माघार घेतली.या प्रसंगातदेखील अहिल्याबाई होळकर कर्तबगार राज्यकर्ती कशा होत्या याची प्रचितीयेते. कठीण प्रसंगात न डगमगता त्या संकटावर स्वार होण्याची ऊर्मी अहिल्याबाई होळकर यांच्यात होती.
9. न्यायदान करण्यासाठी पंचांची नेमणूक | Panach Nemnuka
अहिल्याबाई होळकर यांना जाणीव होती की प्रत्येक वेळी सर्वसामान्य लोकांपर्यंत मी पोहोचू शकत नाही परंतु त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे. याच भूमिकेतून त्यांनी गावागावांमधून पंचांची नेमणूक केली आणि लोकांच्या समस्या दूर करण्यावर भर दिला. हे पंच आपले काम नीट पार पडत आहेत का ?याची त्या स्वत खात्री करून घेत.
10. गोर गरीब यांना औषधोपचाराची सोय | Aushdhopcharachi Soy
अहिल्याबाई होळकर यांनी जाणले की अनेक लोकवेळेवर उपचार वेळेवर घेत नसल्यामुळे मृत्युमुखी पडत आहेत.आपल्या राज्यात सर्पदंश यासारख्या घटनांमुळे किती लोक मरण पावत आहेत यावर उपाय म्हणून त्यासाठी विशेष अशा व्यक्तींची नेमणूक केली आणि अनेकांचे जीव सर्पदंशा मुळे जात होते ते थांबवले यातून किती बारीक सारिक बाबींचे त्यांचे निरीक्षण होते ते समजते.
11. शेतकरी यांच्यासाठी अहिल्याबाई यांनी केली करमुक्त शेती | Karmukt Sheti
अहिल्याबाई होळकर यांच्या अगोदर जे राजे होऊन गेले ते राजे शेतीवर कर गोळा करत होते तो कर बंद करण्याचे काम अहिल्याबाई होळकर यांनी केले.
12. गोर गरिबांसाठी शाळा काढणाऱ्य अहिल्याबाई होळकर
अहिल्याबाई होळकर यांना स्वतः लिहिता-वाचता येत असल्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळलेले होते आणि त्यासाठी त्यांनी शिक्षणाची सोय केली.जागोजागी छोटे छोटे वर्ग सुरू केले.
13. सती प्रथा बंद करणाऱ्या अहिल्याबाई होळकर | Sati Janyas Virodh
सासरे मल्हारराव होळकर यांचे विनंती नुसार अहिल्याबाई होळकर सती गेल्या नाहीत तर त्यांना राजकारभारायमध्ये मदत करू लागल्या. ती मदत करत असताना आपल्या राज्यातील सतीची चाल पूर्णपणे बंद झाली पाहिजे यासाठी त्यांनी हट्ट धरला आणि अखेर शेवटी सतीची चाल बंद केली.
14 सर्वधर्म समभाव | Sarvdharm Sambhav
राज्यकारभार पाहात असताना अहिल्याबाई होळकर यांनी अमुक एकच धर्म श्रेष्ठ अशी भूमिका कधीच घेतली नाही. तर सर्व धर्म हे श्रेष्ठच आहेत अशी त्यांची भूमिका होती.ज्याप्रमाणे त्यांनी जेजुरी, नाशिक,आयोध्या या ठिकाणी मंदिरे बांधली त्याच पद्धतीने अनेक मशिदी व दर्गे यांचीदेखील बांधणी केली. यातून अहिल्याबाई होळकर एक उत्तम आणि कर्तबगार राज्यकर्ती होत्या याची आपल्याला कल्पना येते.
15 सर्वांसाठी समान कायदा लागू करणाऱ्या अहिल्याबाई | Kaydyapudhe Sarv Saman
राज्यकारभार करीत असताना काही छोटी-मोठी प्रकरणे घडली,काही तक्रारी प्राप्त झाल्या तर न्याय देत असताना जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे व जो निरपराध आहे तो सहीसलामत सुटला पाहिजे अशी भूमिका अहिल्याबाई होळकर यांची होती. कायदा सर्वांना सारखा असा कारभार त्यांचा होता.
वरील कार्ये पाहिल्यांनातर पुण्यश्लोक अहिल्याबाई कर्तबगार राज्यकर्ती होत्या हे समजलेच असेल.तसेच अहिल्याबाई होळकर ही माहिती मराठीतून असल्याने समजायला देखील सोपी वाटली असेल.
अहिल्यादेवी होळकर जयंती | Ahilyadevi Holkar Jayanti
FAQ प्रश्नोतरे
१. कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्यावे अशी मागणी केली जात आहे?
सोलापूर विद्यापीठ
२. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीची तारीख सांगा?
३१ मे
३. अहिल्याबाई कोणत्या समाजाच्या होत्या?
धनगर
४. अहिल्याबाई यांनी कोणती नवी राजधानी बनवली?
महेश्वरी
5. अहिल्याबाई होळकर यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई का म्हटले जात होते?
अहिल्याबई यांनी विहिरी बांधून देणे,पाणपोई,अन्नछत्रे,नवीन मंदिरे बांधणे,काही मंदिरांचा जीर्णोद्धार यासारखी कामे केली म्हणून त्यांना पुण्यश्लोक म्हटले जात होते.
अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने अहिल्याबाई होळकर मुलीना मोफत बस पास योजना व अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना या योजना सुरू आहेत.
आमचे इतर लेख
Khup Chan Sir.
छान माहिती . आवडली .