A स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन | swami vivekanand jayanti sutrasanchalan

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस 12जानेवारी आv युवा दिन म्हणून साजरा करतो.या युवा दिनाच्या निमित्ताने शाळा, कॉलेज,महाविद्यालये यामध्ये विविध कार्यक्रम होत असतात. जसे की वक्तृत्व स्पर्धा, भाषण स्पर्धा, वादविवाद स्पर्धा,रांगोळी स्पर्धा.अशा अनेक स्पर्धा या युवक दिनाच्या निमित्ताने होत असतात. स्वामी विवेकानंदांची जयंती म्हणजेच युवक दिन कार्यक्रम जोरदार व्हावा यासाठी सूत्रसंचालकाची जबाबदारी अतिशय महत्वाची आहे.कारण कार्यक्रमांमध्ये रंगतदारपणा आणण्याची सर्वस्वी जबाबदारी सूत्रसंचालकाची असते. आजच्या लेखात आपण स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन/ युवक दिन सूत्रसंचालन कशा पद्धतीने साजरे करता येईल.यासाठी आज आम्ही आपणास स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालनाचा एक नमुना देत आहोत. हा स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन  नमुना आपल्याला योग दिनाचे विविध कार्यक्रम साजरे करत असताना निवेदन करण्यासाठी हमखास मदत करेल. 

स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन
स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन

सूत्रसंचालन ठळक बाबी | sutrsanchalan thalak babi 

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे सूत्रसंचालन असो, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी अशा महान व्यक्तींच्या जयंतीचे सूत्रसंचालन असो. हे सूत्रसंचालन करत असताना आपल्याला आपला कार्यक्रम कशा पद्धतीने पुढे जाणार आहे हे लक्षात घेऊन सूत्रसंचालनाची स्क्रिप्ट तयार करणे अतिशय गरजेचे असते. आजचा विषय आपण जर घेतला तर आपला युवक दिन /स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रम कशा पद्धतीने साजरा होणार आहे याचे बारकावे सूत्रसंचालकाने जमवायला हवेत तसा आराखडा त्याच्याकडे हवा तरच सूत्रसंचालक स्वामी विवेकानंद जयंती  सूत्रसंचालन ,युवक युवक दिन सूत्रसंचालन छान पद्धतीने करू शकतो. कोणत्याही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असताना साधारणपणे एक आराखडा आपल्याजवळ हवा.

स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन आराखडा | swani vivekanand jayanti sutrsanchalan | yuvak divas sutrasanchlan arakhada 

आपल्याला स्वामी विवेकानंद जयंती साजरी करायचे आहे म्हटल्यानंतर,आपल्याला स्वामी विवेकानंद यांच्या विषयीची संपूर्ण माहिती सूत्रसंचालक म्हणून अगोदर गोळा करावी लागेल. केवळ भारंबर माहिती म्हणजे  सूत्रसंचालन नव्हे. तर त्यातील महत्त्वाचे आणि मोजकी माहिती आपल्याला सूत्रसंचालन करताना उपयोगात आणायचे असते. साधारणपणे स्वामी विवेकानंद जयंती चे सूत्रसंचालन करीत असताना खालील टप्पे सूत्रसंचालकाच्या डोक्यामध्ये असावेत.यात कार्यक्रम स्वरूप पाहून बदल करु शकता.

युवक दिन / स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन टप्पे | yuva din sutrsanchalan tappe  

 

सर्वांचे स्वागत 

 

अध्यक्ष स्थान विनंती  आणि कार्यक्रम सुरू करण्याची  परवानगी

 

मान्यवर मंडळींना व्यासपीठावर विराजमान (अध्यक्ष ,पाहुणे )

 

दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन 

 

पाहुणे परिचय आणि स्वागत 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक 

 

मुख्य कार्यक्रम (भाषणे,विविध स्पर्धा,मनोगते )

 

प्रमुख पाहुणे मार्गदर्शन 

 

अध्यक्ष मार्गदर्शन 

 

आभार 

 

सांगता – पसायदान / राष्ट्रगीत 

 

वर दिल्याप्रमाणे एक आराखडा सूत्रसंचालकाने आपल्या डोक्यामध्ये ठेवावा. हा आराखडा बनवत असताना आपला कार्यक्रम नेमका कशा स्वरूपाचा आहे? या सर्वांची जुळवाजुळव करून एक आराखडा डोक्यात ठेवावा. जेणेकरून स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय छानपणे करता येईल. आम्ही आपणास युवक दिन सूत्रसंचालनाचा एक नमुना देत आहोत. अगदी त्याच पद्धतीने आपण सर्व नियोजन केले पाहिजे असे काही नाही. आपण यामध्ये बदल देखील करू शकता. चला तर मग आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया आणि छान पैकी स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन प्रभावीपणे करूया.

 

 

स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन | swami vivekanand jayanti sutrasanchalan|युवक दिवस  sutrasanchalan |yuvak din sutrasanchalan 

 

 स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन कार्यक्रमाची सुरुवात | karaykramachi suruvat 

आगतम स्वागतम सुस्वागतम 

आगतम स्वागतम सुस्वागतम 

भारताच्या संस्कृतीचे श्रेष्ठत्व ज्यांनी अवघ्या जगाला दाखवून दिले. एवढेच नव्हे तर विश्वबंधुत्वाची शिकवण देणारा हिंदू धर्म खरोखर किती श्रेष्ठ आहे. हे अवघ्या जगाला ज्यांनी शिकागो सर्वधर्म परिषदेमध्ये ठणकावून सांगितले, ज्यांच्या अनमोल वणी आणि  वक्तृत्वाने युवा पिढीला कायमच प्रेरणा देण्याचे काम केले असे थोर व्यक्त म्हणजे स्वामी विवेकानंद होय. आज 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस.हा जन्मदिवस सर्वत्र  धुमधडाक्यात युवक दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या या स्वामी विवेकानंद जयंती तथा युवक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये मी अ ब क सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. चला तर मग आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. 

अध्यक्ष यांना विनंती| adhyaksh yana vinanti

आजच्या या स्वामी विवेकानंद  जयंती/ युवक दिनाच्या   कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे मी ——अबक  स्वागत करतो. तसेच अपार त्याग आणि मेहनत यांच्या बळावरती आपल्या शिक्षण संस्थेला उच्च शिखरावर घेऊन जाणारे श्री ———- यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे. 

मान्यवर स्थानापन्न करणे |  manyavr sthanapan karane 

अध्यक्ष स्थान ग्रहण 

 

कोशिश करे तो मंजिल जरूर मिलती है I

अगर आपके इरादे बुलंद  हो तो,

 राहे अपने आप मिलती हैI 

 

अगदी अशीच आपली कार्यशैली असणारे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री—- अबक यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. अशी मी त्यांना विनंती करतो. 

 

प्रमुख पाहुणे | pahune sthan grahan 

असं म्हणतात, 

जे न देखे  रवी I

वह देखे  कवी I 

ऐसी उनकी  छबी I 

 

अशीच काही दूरदृष्टी लाभलेले प्रचंड ज्ञानी आणि आपल्या ज्ञानाच्या जोरावर आपली किर्ती  साता समुद्रा पल्याड  घेऊन जाणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री———- यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो. 

(इतर मान्यवर असतील तर त्यांच्या देखील थोडक्यात परिचय करून व त्यांचे कार्यकर्तृत्व सांगून त्यांना स्थान आपण करावे त्यासाठी अगोदरच माहिती मिळवावी)

कार्यक्रमविषयी (थोडक्यात बोलावे) 

आज संपूर्ण जगाला हेवा वाटावा असे महापुरुष 12 जानेवारी … रोजी हिंदुस्थानामध्ये जन्माला आले. ज्या नवयुवकाने शिकागो सर्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्म आणि त्याचे तत्त्वज्ञान अवघ्या जगाला पटवून दिले. आपल्याला जर राष्ट्राचा विकास करायचा असेल तर अध्यात्माला लोकसेवेची जोड दिल्याशिवाय पर्याय नाही असे ठामपणे सांगणारे स्वामी विवेकानंद. ज्यांनी रामकृष्ण परमहंस यांना गुरु मानून आपले लोकसेवेचे काम अतिशय जोमाने केले. असे स्वामी विवेकानंद. आज त्यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण या व्यासपीठावर  एकत्र आलेलो आहोत. शिकागो येथील सर्वधर्म परिषदेमध्ये ज्यांच्या भाषणाने जगातल्या महान विद्वानांनी देखील ज्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारली असे स्वामी विवेकानंद. सर्वधर्म परिषदेमध्ये इथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो !  अशी भाषणाची प्रभावी सुरुवात करून एक प्रकारे विश्वबंधुत्वाची आणि भारताच्या सुसंस्कृत संस्कृतीची ओळख ज्यांनी जगाला करून दिली असे स्वामी विवेकानंद. संपूर्ण भारतभर प्रवास करून या भारतातल्या नवयुवकांनी काय करायला हवे? आपले राष्ट्र प्रगतीपथावर नेण्यासाठी युवकांची भूमिका किती महत्त्वाची आहे याविषयी ज्यांनी आपले ठोस असे विचार मांडले ते महान व्यक्त म्हणजे स्वामी विवेकानंद. आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आपण युवक दिन म्हणून साजरी करतो. मात्र आजच्या या भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये आपण व्यासपीठावरील मान्यवरांची ओळख करून घेऊया.

दीप प्रज्वलन आणि प्रतिमापूजन | dip prajvalan aani pratima pujan 

आजच्या या स्वामी विवेकानंद  जयंती तथा युवक दिन  कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की,त्यांनी दीपप्रज्वलन करून  विद्येची देवता सरस्वती तिचे पूजन करावे. स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला हार घालून वंदन करावे व आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी.

क दिवा पेटला तर ज्योत तयार होते

हजारो दिवे पेटले तर मशाल तयार होते

लाखो दिवे पेटले तर अंगार तयार होतो.

नि व्यासंग व ज्ञान एकत्र आले तर अवघ्या 

जगालाही हेवा होतो.

असेच काहीसे स्वामी विवेकानंद.आज त्यांचे यांना स्मरण करून मान्यवरांनी दीपप्रज्वलन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. दीपप्रज्वलना नंतर सरस्वती पूजन देखील करावे. 

 

( यूट्यूब च्या माध्यमातून किंवा गायक मंडळी उपस्थित असतील तर सरस्वती वंदना घ्यावी)

 

व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय आणि स्वागत manyavr parichay swagat 

स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन करताना मी आजच्या या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती विराजमान असलेले मान्यवर मंडळीचे  शब्द सुमनांनी स्वागत तर केले. आता  पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सुहास्य वदनांनी मान्यवर मंडळींचे स्वागत करूया. चला तर मग मान्यवरांसाठी होऊ द्या जोरदार टाळ्या. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वागत | adhyaksh swagat  

आजचे आपल्या स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अध्यक्ष अ ब क यांचे स्वागत आपल्या शाळेतील श्री ……यांनी करावे

प्रमुख पाहुणे यांचे स्वागत pahune swgat 

सन्मा. पाहुणे यांचे स्वागत  श्री ——— यांनी करावे. 

 

स्वामी विवेकानंद जयंती / युवक दिन  प्रास्ताविक |swami vivekanand jayanti prastvaik 

 

पुस्तकाची अनुक्रमणिका पाहिले की,

 पुस्तकात काय दडले आहे हे कळते,

आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय हे,

 प्रस्ताविकातून कळते. 

चला तर मग मी श्री अबक—- यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. 

 

प्रस्ताविकातून काय बोलावे ?  

 

ज्या ज्या महापुरुषानी  आपल्या भारत  मातेसाठी ,आपल्या संस्कृतीचा वेगळेपणा व मोठेपणा अभ्यासला तो जाणून घेतला अशा सर्व व्यक्तींविषयी आपल्याला  प्रचंड आदर आहे.यापैकीच एक म्हणजे स्वामी विवेकानंद.

मी अबक. आज आपण सर्वजण स्वामी विवेकानंद यांची जयंती/युवा दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेले आहोत.स्वामी विवेकानंद यांनी भारत भ्रमन केले.भारतातील अस्मिता गमावलेली जनता आणि युवा  वर्ग पाहून समाजात नवचेतना  निर्माण करण्याचे काम स्वामी विवेकानंद यांनी केले. स्वामी विवेकानंद यांचे बालपण अतिशय गरिबीत गेले. स्वामी विवेकानंद अतिशय हुशार होते.त्यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगितला जातो.एका प्रवासात ते कोणतेतरी पुस्तक वाचत होते परंतु एकेक पान वाचल्यानंतर ती पाने फाडून बाहेर फेकत होते हे पाहून एका प्रवाशाने त्याना विचारले, अहो आपण असे का करता? पुन्हा तुम्हाला या पुस्तकाची गरज पडली तर? यावर स्वामी विवेकानंद उद्गारले मी माझ्या मेंदूला सूचना दिलेली आहे की, हे पुस्तक तुला एकदाच वाचायला मिळणार आहे म्हणून माझा मेंदू ते कायमस्वरूपी लक्षात ठेवत आहे. या प्रसंगातून स्वामी विवेकानंद यांना स्वतः विषयी प्रचंड आत्मविश्वास होता व ते किती कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते हे समजते. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेमार्फत लोकसेवा आणि शिक्षणाच्या प्रसाराचे काम केले. अशा या महान व्यक्तीची जयंती साजरी करण्यासाठी आज आपण जमलेलो आहोत. या प्रास्ताविकानंतर विद्यार्थ्यांची भाषणे आणि मान्यवरांचे मार्गदर्शन होईल. एवढे बोलून मी माझे लांबलेले प्रास्ताविक थांबवतो.

मुख्य कार्यक्रम mukhya karykram 

आपण ज्या पद्धतीने नियोजन केले असेल त्या पद्धतीने विद्यार्थ्यांची भाषणे, शिक्षकांची भाषणे, नृत्य गाणी किंवा इतर स्पर्धा याविषयी माहिती द्यावी. ही आपापल्या नियोजनाप्रमाणे असणार आहे. 

   (कार्यक्रमाचे स्वरूप पाहून ठरवावे.)

विद्यार्थ्यांच्या भाषणाचा आस्वाद घेतल्यानंतर आता आपण आतुर झाला असाल की आपल्याला कोणी थोरा मोठ्यांनी मार्गदर्शन करावे चला तर मग प्रमुख पाहुणे यांच्या  अनमोल मार्गदर्शनाचा आस्वाद घेऊया. 

प्रमुख पाहुणे यांचे मार्गदर्शन pramukh pahune yanche marg darshan 

आजच्या विवेकानंद जयंती कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे श्री अ ब क यांनी यांनी मार्गदर्शन करून मंत्रमुग्ध करावे 

स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात,

 देह झिजले अनेकांचे ,

तर काहींनी जीवाचे रान केले,

 भारताच्या संस्कृतीला  अजरामर करण्यासाठी,

आज आमचेही हात जुळत आहेत

 स्वामी  विवेकानंदांसाठी.

 

या भूतो न भविष्यती सोहळ्यासाठी  मार्गदर्शन करण्याचा मान  प्रमुख पाहुण्यांचा. 

(प्रमुख पाहूणे यांनी  मार्गदर्शन केल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनातील ठळक बाबी सूत्रसंचालन करताना बोलाव्यात.) 

स्वामी विवेकानंद जयंती अध्यक्षीय भाषण 

 

जोडण्यासाठी हात हवे,

रुसण्यासाठी मित्र हवे,

जगण्यासाठी बळ हवे,

आणि आमच्या जीवनाला,

 योग्य दिशा मिळण्यासाठी,

कार्यक्रमाच्या अध्यक्षांचे अनमोल मार्गदर्शन हवे. 

 

चला तर होऊन जाऊ द्या जोरदार टाळ्या —– 

आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष  ज्ञानाचा सागर ,नि  अनुभवाचा डोंगर असलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व श्री —– यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय  भाषण करावे.

विवेकानंद जयंती / युवक दिन आभार  |yuvak din aabhar pradrshan 

 

फुलांमुळे बागेला शोभा आली,

 श्रोत्यांमुळे आजच्या कार्यक्रमाला छान रंगत आली,

 आजच्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनामुळे,

 कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली,

 चला चला आता पाहता पाहता

 आभार प्रदर्शनाची वेळ झाली. 

 

वेळ कधी कुणासाठी थांबत नाही.बघा ना ! पाहता पाहता दोन तास कसे गेले ते कळलेच नाही. आजच्या या विवेकानंद  जयंती /युवक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे आणि इतर मान्यवरांनी जे मार्गदर्शन केले. ते निश्चितच आम्हाला जीवन जगत असताना कामी येईल. आजच्या या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपल्या विनंतीला मान दिला आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून मी अ ब क——- सर्वांचे आभार मानतो.

स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन कार्यक्रमाची सांगता | karykaram sangta 

कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम,राष्ट्रगीत किंवा पसायदान यापैकी कोणत्या एकाची निवड करावी. अध्यक्षांच्या  परवानगीने मी कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. 

सूत्रसंचालन एक कौशल्य |sutrasanchalan kaushlya 

सूत्रसंचालन हे एक कौशल्य आहे. हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपण मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भाषण आणि सूत्रसंचालन याविषयी कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारे आशिष देशपांडे सर यांचे मार्गदर्शन आपण जरूर घेऊ शकता.मी स्वतः देखील त्यांच्या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेतलेला आहे. म्हणूनच मी स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन सूत्रसंचालन स्क्रिप्ट तयार करू शकलो. चला तर मग आशिष देशपांडे सर यांनी तयार केलेली स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन नमुना देखील आपण पाहूया. या दोन्ही सूत्रसंचालन नमुन्यांचा उपयोग करून आपण अतिशय छानपणे स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन तथा युवक दिन सूत्रसंचालन अतिशय छानपणे करू शकता. 

 

सूत्रसंचालन कार्यशाळा wtp ग्रुप  आशिष देशपांडे सर 

 

स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन /युवक दिन सूत्रसंचालन नमुना 2| swami vivekanand sutra sanchalan namuna 2 

चला तर मग स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन आशिष देशपांडे लिखित एक नमुना पाहूया. 

स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन नमुना 2 स्क्रिप्ट 

 

 
 

स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन पीडीएफ| swami vivekanand sutrsanchalan pdf|युवक दिन सूत्रसंचालन पीडीएफ |yuvak din sutrasanchalan pdf  

 
                   DOWNLOAD 
 
 
आपल्याला अशाच पद्धतीने संपूर्ण वर्षभरात होणाऱ्या विविध  कार्यक्रमाचे  आशिष देशपांडे सर लिखित सूत्रसंचालन नमुने हवे असतील तर खालील लिंकवर क्लिक करा. 
 
 
आमचा आजचा हा स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन तथा युवक दिन सूत्रसंचालन हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.

Leave a Comment