बालिका दिन बातमी लेखन | balika din batami lekhan

भाषेचा अभ्यास करत असताना लेखन विभागात विद्यार्थ्यांच्या लेखन क्षमतांचा विकास व्हावा म्हणून विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात.जसे की पत्रलेखन,कथा लेखन,जाहिरात लेखन,बातमी लेखन व निबंध लेखन.या सर्व प्रकारात विद्यार्थ्यांना आवडणारा प्रश्न म्हणजे बातमी लेखन होय.आजच्या लेखात सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी केली जाते.आजच्या लेखात बालिका दिन बातमी लेखन /सावित्रीबाई फुले जयंती बातमी लेखन. म्हणजेच girls day news writing in marathi आपल्याला नक्की आवडेल.चला तर मग बालिका दिन बातमी लेखन/वृत्तान्त लेखन आपण पाहूया. हे पाहण्या अगोदर बातमी लेखन याबाबत काही महत्वाचे मुद्दे पाहू. जे पाहिल्यानंतर आपण कोणत्याही विषयावरील बातमी छान लिहू शकता.

बालिका दिन बातमी लेखन
बालिका दिन बातमी लेखन

बातमी लेखन महत्वाचे मुद्दे | batami lekhan mhtvachemudde

1.बातमीचा मथळा | batmicha mathla

आपल्याला बातमी लेखन करीत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बातमीचा मथळा याचाच अर्थ बातमीचे शीर्षक. हे शीर्षक तयार करत असताना आपल्याला विशिष्ट अशा शब्दांची रचना करावी लागते.की जो मथळा वाचकांचे लक्ष आकर्षित  करेल. ती बातमी सर्वांनाच वाचावीशी वाटेल. असा मथळा असावा. तसेच त्या मथळ्यामध्ये क्रियापद वापरू नये वाचकांचे लक्ष केंद्रित करणारा असा मथळा असावा.
उदा.

वरील बातमीचे शीर्षक वाचल्यानंतर ही बातमी शेतकरी आवर्जून वाचतील कारण प्रत्येकाला वाटते माझ्या मुलाने देखील असे काहीतरी वेगळे करावे, शेतकऱ्यांची मुले देखील या बातमीवर फोकस करतील जर आमच्यातीलच एक कलेक्टर झाला तर आम्ही का नाही हा प्रश्न त्यांना पडेल, शिक्षक वकील जे आपल्या पाल्याच्या शिक्षणाविषयी दक्ष असतात त्यांना देखील ही बातमी हवी हवीशी वाटेल.जर शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर झाला तर आमचा नक्कीच होऊ शकतो.ही भावना त्यांच्या मनात येईल. आणि ते देखील बातमी वाचतील म्हणूनच बातमीचे शीर्षक हे अतिशय साधे सरळ आणि वाचकांना आपल्याकडे खेचून घेणारे असावे.(batmi lekhan in marathi)

2. दिनांक व स्थळ | dinanak v sthal,thikan

या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे , दिनांक टाकत असताना विद्यार्थ्यांनी परीक्षेला आपण कोणत्या तारखेला आहोत. याचा विचार न करता आपल्याला कोणत्या विषयावर बातमी द्यायची आहे.याचा विचार करणे जास्त गरजेचे आहे बऱ्याचदा अनेक विद्यार्थी आपल्या परीक्षेचा दिनांक बातमीला देतात आणि आपले गुण गमावतात.
बातमीचा दिनांक देत असताना ती बातमी कोणत्या विषयासंदर्भात आहे ?तो दिवस कोणता आहे ? हे विचारात घेऊन बातमीचा दिनांक द्यावा.त्याचबरोबर आज घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी बातमी वर्तमानपत्रांमध्ये येत असते हे कायम लक्षात ठेवावे.

उदा.

समजा आपल्याला परीक्षेमध्ये स्वातंत्र्य दिनाची बातमी तयार करायला सांगितली तर आपण स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो, म्हणून आपली बातमी वर्तमानपत्रांमध्ये 16 ऑगस्ट रोजी छापली जाणार हे पक्के. लक्षात ठेवावे त्याचबरोबर पर्यावरण दिनाची बातमी आपल्याला आली तर 5 जून हा पर्यावरण दिन आहे तर आपली बातमी वर्तमानपत्रांमध्ये 6 जूनला छापली जाणार हे पक्के लक्षात ठेवा. बरेच विद्यार्थी या ठिकाणी चुका करतात.

    समजा आपल्याला शिक्षक दिनाची बातमी तयार करायची तर ६ सप्टेंबर ही तारीख द्यावी लागेल.

3. बातमीचे ठिकाण आणि स्त्रोत | batmiche thikan ani storat

आपण मथळा लिहिल्यानंतर खालच्या ओळीला दिनांक लिहितो आणि त्या दिनांक पुढे आपल्याला बातमी कोणत्या ठिकाणी घडली ते ठिकाण लिहायचे असते.

उदा. कांदिवली

त्याचबरोबर बातमी कोण देत आहे? ही माहिती कोणी मिळवली? हे समजण्यासाठी आमच्या वार्ताहराकडून हा शब्द लिहायला विसरू नका.

आतापर्यंत आपण मथळा हा जाड ठळक अक्षरात त्याखाली दिनांक ही त्या दिवसाच्या औचित्य साधणारी आणि त्यापुढे ठिकाण आणि माहितीचा स्त्रोत इथपर्यंतचा भाग पाहिला हे लक्षात ठेवा.

4. बातमीचा शिरोभाग | batmicha shirobhag

बातमीचा शिरोभाग याचा अर्थ बातमीची सुरुवात आपल्याला बातमी लेखन करीत असताना साधारणपणे तीन परिच्छेदांमध्ये बातमी लिहायचे असते.

बातमीचे परिच्छेद

बातमीचा पहिला परिच्छेद

हा भाग बातमीचा शिरोभाग नावाने ओळखला जातो. शिरोभाग तीन ते चार ओळींचा असावा यामध्ये संपूर्ण घटना/बातमी काय आहे असे महत्त्वाचे शब्द असावेत.

बातमीचा दुसरा परिच्छेद

यामध्ये बातमी जशी घडली त्या पद्धतीने सविस्तर वर्णन करावे परंतु ते वर्णन करत असतानादेखील महत्त्वाच्या बाबीच नोंदवाव्यात साध्या साध्या गोष्टी सांगून बातमी पाल्हाळ करू नये.

बातमीचा तिसरा परिच्छेद

शक्यतो दोनच परिच्छेदात बातमीला परंतु जर तिसरा परिचित केला तर कार्यक्रम कशा पद्धतीने संपला किंवा संपन्न झाला याविषयी वाक्य असावे.

थोडक्यात बातमी लेखन करत असताना बातमीचा मथळा दिनांक ठिकाण स्त्रोत आणि सर्वात शेवटी तीन परिच्छेद अशा पद्धतीने आपण बातमी लेखन केल्यास आपल्याला बातमी लेखनामध्ये चांगले गुण मिळतील.

बालिका दिन बातमी लेखन | balika din batami lekhan 

 

बालिका  दिनाची बातमी लिहित असताना आपल्याला हे माहीत असायला हवे की सावित्रीबाई फुले यांची जयंती ही बालिका दीन म्हणून साजरी केली जाते.हा बालिका दिन ३जानेवारीला असतो म्हणून आपली बातमी ४ जानेवारीच्या वर्तमानपत्रात छापली जाणार आहे.म्हणून तो दिनांक टाकावा लागेल व त्यानंतर आपल्या वार्तहराकडून असे टाकावे लागेल.

बालिका दिन बातमी लेखन | balika lekhan batmi lekahn | सावित्रीबाई फुले जयंती बातमी लेखन | savitribai phule jayanti batami lekhan 

आपल्याला परीक्षेमध्ये बालिका दिन बातमी तयार करा किंवा सावित्रीबाई फुले जयंती बातमी तयार करा असा कोणताही प्रश्न आला तरी आपल्याला एकच उत्तर द्यावे लागेल हे समजून घ्यावे कारण का तर सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजेच बालिका दिन होय. परीक्षेमध्ये बातमी लेखन या घटकावर ती साधारणपणे खालील प्रमाणे प्रश्न विचारला जातो तो आपण पाहूया.

 

प्रश्न. तुमच्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले जयंती /बालिका दिन उत्साहात  साजरा झाला किंवा पार पडला याची सुंदर बातमी तयार करा. 

बालिका दिन बातमी लेखन नमुना | balika din batmi lekhan namuna 

अशोकनगर मनपा माध्यमिक शाळेत बालिका दिन उत्साहात संपन्न 

4 जानेवारी :कांदिवली, मुंबई.(आमच्या वार्ताहकडून)

महाराष्ट्रामध्ये 3 जानेवारी हा दिवस थोर महिला समाज सुधारक सुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. अशोक नगर मनपा माध्यमिक शाळा,कांदिवली पूर्व या ठिकाणी ३ जानेवारी रोजी बालिका दिन /सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात पार पडला.

 

३ जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा होत असल्यामुळे, संपूर्ण कार्यक्रमाची तयारी अशोकनगर शाळेतील महिला शिक्षक व मुली यांनी केली होती. हे या कार्यक्रमाचे वेगळेपण होते.शाळेच्या प्रवेश द्वारावर मुलींनी सावित्रीबाई फुले यांची छान रांगोळी काढली होती. बालिका दिन असल्याने सावित्रीबाई फुले वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका भोर होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर होत्या.साधारणपणे सकाळी ८ च्या सुमारास बालिका दिनाचा/सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम सुरू झाला.सर्वप्रथम लेझिम पथकाने प्रवेश द्वारावर पाहुण्यांचे स्वागत झाले. सरस्वती पूजन व प्रतिमा पूजन झाले व  त्यांनतर विद्यार्थ्यांची भाषणे या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.ज्या विद्यार्थ्यांनी छान भाषने केली त्यांना बक्षीसे  व पारितोषिके देण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांनी महिलांनी शिक्षण घेऊन सर्व क्षेत्रात आघाडीवर राहणे किती गरजेचे आहे.याविषयी छान छान उदाहरणे देऊन समजावून सांगितले. यांनंतर कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षा भोर मॅडम यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात  बालिका दिनाच्या छान छान घोषणा देण्यात आल्या व शेवटी बालिका दिन प्रतिज्ञा घेण्यात आली. यानंतर पसायदान झाले व बालिका दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमामुळे सर्व मुले मुली प्रचंड खुश होते.अशा प्रकारे अतिशय हसत खेळत वातावरणात बालिका दिन/सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रम अशोकनगर शाळेत संपन्न झाला. 

आपण देखील या बालिका दिन बातमीची मदत घेऊन कोणत्याही विषयावर छान बातमी लिहू शकता. 

बालिका दिन बातमी लेखन पीडीएफ | balika din batmi lekahn pdf | सावित्रीबाई फुले जयंती बातमी लेखन पीडीएफ| savitribai phule jayanti batmi lekhan pdf 

 

 हा बालिका दिन बातमी लेखन आपल्याजवळ कायम स्वरुपी राहण्यासाठी pdf downlaod करून ठेवा.

 

            DOWNLOAD

FAQ 

१ बालिका दिन कधी साजरा केला जातो?

30 जानेवरी 

2.बालिका दिनाच्या दिवशी कोणाची जयंती असते?

सावित्रीबाई फुले

आमचे इतर लेख 

 

 

 

Leave a Comment