डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सुविचार मराठी 2023

dr. Babasaheb Ambedkar quotes in Marathi 2023 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, दलितांचे उद्धारक, एक थोर समाज सुधारक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वांनाच ओळख आहे. परंतु याच्या पलीकडे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक स्वतःची विचारधारा होती.ती विचारधारा किंवा त्यांची सुवचने पाहिल्यानंतर आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि त्यांनी केलेल्या कार्याची ओळख नक्कीच मिळेल. यासाठी आपण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 50 अप्रतिम सुविचार पाहणार आहोत. आंबेडकरांनी हजारो विचार मांडले आहेत परंतु त्यातील काही सुविचार असे आहेत की ते आपल्या कायम संग्रही कायम ठेवावेत असे आहेत. ते आम्ही देत आहोत. चला तर मग आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार तथा सुविचार जाणून घेऊया. आंबेडकर जयंतीला तसेच शाळा महाविद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धा ,भाषण स्पर्धा यासारख्या स्पर्धांमध्ये आपण dr. Babasaheb Ambedkar quotes in Marathi 2023 वापरून नक्कीच प्रेक्षकांकडून दाद मिळवू  शकतात. चला तर मग आंबेडकर यांचे  मराठी सुविचार पाहूया.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सुविचार मराठी 2023dr. Babasaheb Ambedkar quotes in Marathi 2023
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सुविचार मराठी 2023

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे  50 मराठी सुविचार | dr. Babasaheb Ambedkar 50 quotes in Marathi 2023 | aambedkranche marathi suvichar 

आंबेडकरांचे पन्नास प्रेरणादायी विचार किंवा सुविचार पाहत असताना ते विचार कशा संदर्भात आहेत ? यानुसार काही एक वर्गीकरण केलेले आहे. जेणेकरून आपल्याला हे सुविचार कोणत्या कार्यक्रमात वापरायचे आहेत यासाठी याची मदत होईल.

आंबेडकरांचे बौद्ध धर्म विषयक सुविचार | Ambedkar’s thoughts on Buddhism

1. बौद्ध धर्म जगातील सर्वात महान धर्म आहे कारण तो मानवतेची शिकवण देतो.

2. भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्वे कायम अजरामर राहतील.

3. सामाजिक समतेचा पुरस्कर्ता गौतम बुद्धाइतका कोणीच केला नाही.

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थ्यांविषयी असलेले  मराठी सुविचार | Doctor Babasaheb Ambedkar’s Marathi thoughts about students

4. मी आजन्म विद्यार्थीच आहे.

5. लोकशाहीने दिलेल्या मताची किंमत मीठ मिरची इतकी कमी समजू नका त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी खरी लोकशाही समजेल.

6. शूद्रांना जर शस्त्र वापरण्याचा अधिकार भारत देशामध्ये असता तर भारत कधीच पारतंत्र्यात गेला नसता.

डॉक्टर बाबासाहब आंबेडकरांचे लोकशाही विषय असलेले सुविचार | Dr. Babasaheb Ambedkar’s Thoughts on Democracy

7. देशाचा विकास करायचा असेल तर , साऱ्या देशाला एकाच भाषेत बोलायला शिकवा.

8. लोकशाहीला दोन शत्रू  आहेत एक म्हणजे माणसा माणसात भेद करणारी संस्कृती आणि दुसरी  हुकूमशाही.

9. आकाशातील ग्रह तारे जर आपले भविष्य ठरवत असतील तर, आपल्या मेंदू आणि मनगटाचा उपयोग तो काय आहे.

10. आपल्याला लाज वाटेल कमीपणा येईल असा पोशाख कधीच करू नका कारण आपला पोशाख हा आपली सुंदरता आणि इज्जत वाढवत असतो.

11. अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो.

आंबेडकरांचे मानवतावादी मराठी  विचार सुविचार  | Ambedkar’s Humanistic Marathi Thoughts

12. माणूस धर्मासाठी नसतो तर धर्म माणसासाठी असतो.

13. जर तुम्हाला तुमच्यावर अन्याय होऊ नयेत असे वाटत असेल तर तुम्ही वाघासारखे बना मग तुमच्या वाट्याला कोणी जाणार नाही.

14. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा चार दिवस सिंहासारखे जगा.

15. मंदिराकडे गर्दी करणाऱ्या रांगा जेव्हा वाचनालया जातील त्या दिवशी भारताला महासत्ता बनवण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.

16. जो मरायला तयार असतो तो कधीच मरत नसतो पण जो मरणाला भीतो तो अगोदरच मेलेला असतो.

17.  सन्मान हवा तर अगोदर स्वावलंबी बनले पाहिजे.

18. जे लोक पायाने चालत असतात ते केवळ अंतर कापतात परंतु जी माणसे बुद्धीने चालतात ती त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचतात.

 

आंबेडकरांचे संघर्षा विषयी मराठी सुविचार | Marathi Thoughts on Ambedkar’s Struggle

19. माणसाने पुस्तकावर प्रेम करायला शिकावे.

20. जसा माणूस उपासमारीने अशक्त होतो तसा तो शिक्षणाभावी जिवंतपणे दुसऱ्याचा गुलाम होतो.

21. मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष आपल्या बुद्धिमत्तेचा विकास असायला हवे.

22. नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा मनगटावर विश्वास ठेवायला शिका.

23. जो संघर्ष करतो तोच यशस्वी होतो.

24. माणसाला आपल्या गरिबी किंवा दारिद्र्याची लाज वाटता कामा नये ,जर लाज वाटून घ्यायचीच असेल तर आपल्या वाईट सवयी म्हणजे दुर्गुणांची वाटायला हवी.

25. शाळा हे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.

26. सेवा जवळून असावी आदर दुरून असावा आणि ज्ञान हे आतून असावे.

 

आंबेडकरांचे मानवी हक्काविषयी मराठी  सुविचार | Ambedkar’s Marathi Thoughts on Human Rights

27. हक्क मागून  मिळत नाही त्यासाठी संघर्ष करावा लागतो.

28. बोलताना विचार करा बोलून झाल्यावर विचार करण्यात काहीच अर्थ नाही.

29. अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर आणि भीषण आहे.

30. आपल्यावर अन्याय होऊ नये असे वाटत असेल तर वाघासारखे बना  मग तुमच्या वाट्याला कोणी जाणार नाही.

31. इतरांमधील दुर्गुण शोधत बसण्यापेक्षा त्याच्यातील सद्गुण शोधा.

32. स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा.

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण विषयक मराठी सुविचार |Dr. Babasaheb Ambedkar’s Marathi Advice / thoughts  on Education

33.शिका संघटित व्हा संघर्ष करा.

34. वाटेवरून चालताना तुम्ही किती अंतर चालला यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात याला जास्त महत्व आहे.

35. संविधान हा किंवा कागदपत्रे दस्तऐवज नाही तर ते एक जीवन जगण्याचे माध्यम आहे.

36. मी अशा धर्माला मानतो की जो स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांना महत्त्व देतो.

 

आंबेडकरांचे प्रेरणादायी मराठी सुविचार |Ambedkar’s Inspirational Marathi Thoughts

37. नशिबावर विश्वास न ठेवता आपल्या मधील शक्तीवर विश्वास ठेवा.

38. जीवन खूप मोठे म्हणजेच लांब नाही तर महान असायला हवे.

39. अस्पृश्यता आपल्या देशाला लागलेली कीड आहे.

40. अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो.

41. हक्क मागून मिळत नाहीत.

42. हिंसा वाईट आहे परंतु हिंसेपेक्षा अधिक वाईट तर गुलामी आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय सुविचार

43. कोणत्याही समाजाची उन्नती त्याच्या प्रगतीवर अवलंबून असते.

44. जो अपार मेहनत आणि संघर्ष करतो तोच यशस्वी होतो.

आंबेडकरांचे परखड विचार | amabedkranache jahal vichar 

45. मी रात्रभर यासाठी जागा असतो कारण माझा समाज झोपलेला आहे.

46. जो धर्म जन्माने एकाला श्रेष्ठ आणि कनिष्ठ ठरवतो तो धर्म नाही तर ते एक षडयंत्र आहे.

आंबेडकरांचे धर्म विषयक सुविचार

47. जर मनाने स्वतंत्र असाल तर तेच खरे स्वातंत्र्य.

48. इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत.

49. बुद्धीचा विकास हे जीवनाचे अंतिम ध्येय हवे.

50. चांगले दिसण्यासाठी नाही तर चांगले बनण्यासाठी जगा.

आंबेडकरांचे मराठी सुविचार प्रत्येकाने कायम संग्रही करून ठेवावे असे आहेत.बाबसहेबांच्या महापरिनिर्वानानंतर देखील विचाराने ते आपल्या मनामनात आहेत. आपण देखील आंबेडकरांचे हे मराठी quotes आपले मित्र ,मैत्रीणी यांना पाठवा त्यांना देखील ते खूप आवडतील.

आंबेडकरांचे विचार सुवचने विडियो ambedkar marathi quotes video 

आमचे इतर लेख

महाराष्ट्रातील सर्वात मोठी दरड दुर्घटना बातमी  

पावसाळ्यात दिले जाणारे रेड ,एलो,ऑरेंज अलर्ट आपल्याला काय सुचवतात  

लोकमान्य टिळक संपूर्ण मराठी माहिती   

Leave a Comment