अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 नियमित फेरी 2 चे वेळापत्रक | 11th Round 2 Time Table 2023

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 मध्ये प्रवेश फेरीचा पहिला राऊंड पूर्ण झाला आहे. आता नुकतेच अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या दुसऱ्या राउंडचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकातील विहित तारखेला सर्व विद्यार्थ्यांनी आवश्यक ती कार्यवाही करून दुसऱ्या फेरीच्या प्रवेशासाठी आपले अर्ज व्यवस्थित रित्या भरून लॉक करायचे आहेत.

अकरावी ऑनलाइन प्रवेश दुसरी फेरी वेळापत्रक 2023 24
अकरावी ऑनलाइन प्रवेश दुसरी फेरी वेळापत्रक 2023 24

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 CAP केंद्रीय प्रवेश प्रक्रिया नियमित फेरी दोन वेळापत्रक  |11th Online Admission CAP Central Admission Process Regular Round Two Schedule 2023 24

 

1.भाग 1 भरणे  part 1 fill date

ज्या विद्यार्थ्यांनी अजून पर्यंत आपले रजिस्ट्रेशन करून भाग एक पूर्णपणे भरलेला नाही. त्या विद्यार्थ्यांना या दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये 29 जुन 2023 पर्यंत आपले रजिस्ट्रेशन आणि बागेत भरण्याची मुदत दिलेली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी आपले रजिस्ट्रेशन करून भाग एक दिलेल्या वेळेत भरावा आणि आवर्जून आपला फॉर्म लॉक करावा. ज्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म शाळेकडून घरी उपाय होणे गरजेचे असते कारण शाळेने फॉर्म व्हेरिफाय केल्यानंतरच आपल्याला भाग दोन भरता 

 त्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळ न गमावता पटकन आपले रजिस्ट्रेशन करून भाग एक भरून घ्या. विद्यार्थ्यांना कोणत्याही आरक्षणाचा लाभ घ्यायचा नाही अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म ऑटो व्हेरिफाय होत असतात त्यांनी शाळेशी संपर्क करण्याची आवश्यकता नाही हे देखील लक्षात घ्या. आतापर्यंत ज्यांनी भाग एक भरला नाही किंवा आपल्या रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून तात्काळ आपला भाग एक भरून तो लॉक करावा.

2. अकरावी ऑनलाइन प्रवेश  दुसऱ्या फेरीसाठी भाग  दोन भरण्यासाठी कालावधी|Period to fill part two for 11th online admission second round

अकरावी ऑनलाइन प्रवेश भाग 2 भरण्यासाठी 27 जून 2023 ते 29 जून 2023 हा कालावधी देण्यात आला आहे.ऑप्शन फॉर्म भरताना कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दहा कॉलेज निवडू शकता.ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा नाही अशी कॉलेज ऑप्शन फॉर्म मध्ये टाकू नका.ऑप्शन फॉर्म भरण्या आधी पहिल्या फेरीचे कट ऑफ पहा. ते पाहण्यासाठी खालील निळ्या अक्षरांवर क्लिक करा.

यानंतर आपला ऑप्शन फॉर्म बिनचूक भरून घा.तो कसा भरतात यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

3. अकरावी प्रवेश 2023 24 गुणवत्ता यादीतील क्रमांक  पाहण्यासाठी तारखा |11th Admission 2023 24 Dates to Check Merit List Number

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा भाग आणि भाग एक दोन भरल्यानंतर तो संबंधित डाटा संपूर्ण प्रक्रियेमध्ये save केला जातो आणि त्यानंतर त्याचे एक साधारण गुणवत्ता यादी तयार केली जाते त्या गुणवत्ता यादीमध्ये आपला क्रमांक कोणता आहे हे पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजच्या ऑप्शन मध्ये काही बदल करायची गरज आहे. का नाही हे लक्षात येत असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला भाग दोन भरल्यानंतर आपला गुणवत्ता यादीतील मेरिट नंबर आवश्यक पहा.यासाठी 30 जून 2023 ते 2 जुलै 2023 हा कालावधी देण्यात आला आहे.

4. अकरावी प्रवेश 2023 24 दुसऱ्या फेरीसाठी कॉलेजची यादी  कधी जाहीर  होणार | 11th Admission 2023 24 When will college list for second round be announced

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 दुसऱ्या फेरीतील गुणवत्ता यादी 3 जुलै 2023 रोजी जाहीर होणार आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर आपल्याला कसा मोबाईलवर एसएमएस येईल जर आपल्याला एसएमएस काही कारणास्तव आला नाही तर आपण ऑनलाइन देखील आपल्याला कोणते कॉलेज मिळाले पाहू शकतो हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि कशा पद्धतीने कॉलेज पाहतात हे आत्ताच माहीत करून घ्या.

5. अकरावी प्रवेश दुसरी फेरी 2023 24 कॉलेजला प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी कालावधी |11th ADMISSION SECOND ROUND 2023 24 DURATION TO ACTUAL ADMISSION TO COLLEGE

दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी 3 जुलै 2023 ते 5 जुलै 2023 या कालावधीमध्ये आपल्याला जे कॉलेज प्राप्त झाले आहे त्याला प्रवेश घ्या.प्रवेशाला लागणारी विविध कागदपत्रे अवश्य सोबत ठेवा.

अकरावी प्रवेश 10big mistekes 

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या भागासाठी यावरील सर्व बाबी आपण व्यवस्थित वाचले असतील समजून घेतल्या असतील तरी देखील बऱ्याच विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीच्या वेळी दहा मोठ्या चुका केलेल्या त्या मोठ्या चुका आपण टाळल्या तर मला वाटते की दुसऱ्या यादीमध्ये आपल्याला नक्कीच हवे ते कॉलेज मिळेल तर या मोठ्या दात चुका कोणत्या आहेत या एकदा वाचून घ्या आणि त्या एकदा समजून घेतले की त्या चुका दुसऱ्या फेरीमध्ये करू नका आणि आपला प्रवेशाचा मार्ग सुकर करून घ्या.

अशा पद्धतीने आज आम्ही आपल्याला अकरावी ऑनलाइन प्रश्नपत्रिका दुसऱ्या राउंड चे संपूर्ण वेळापत्रक त्याचबरोबर आपल्याला कशा पद्धतीने भाग एक आणि भाग दोन भरायचा आहे त्याचबरोबर कॉलेजचे कट ऑफ पानं आणि प्रत्यक्ष कॉलेजला प्रवेश घेणं ही संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितलेले आहे आमची माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील ही माहिती तात्काळ पाठवा.

आमचे महत्वाचे लेख 

Leave a Comment