एक मे आपल्या राज्यात कशासाठी साजरा करतात

Ek May Aaplya Rajyat Kashasathi Sajraa Kratat : एक मे आपल्या राज्यात कशासाठी साजरा करतात ? हे आज आपण पाहणार आहोत.महाराष्ट्र राज्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा आहे कारण याच दिवशी म्हणजे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली व त्या दिवसाची आठवण व अभिमान म्हणून 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. 
1 मे आपल्या राज्यात कशासाठी साजरा करतात
1 मे आपल्या राज्यात कशासाठी साजरा करतात
महाराष्ट्र राज्य निर्मितीचा थोडक्यात इतिहास इतिहास | Maharashtra Nirmiticha Itihas 
           1मे महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो  यामागील पार्श्वभूमी पाहूया.15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले हे आपणास माहीतच आहे.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा राज्यकारभार कसा चालणार,विविध जाती धर्माचे लोक आपल्या भारतात राहतात .प्रशासकीय कारभार नीट पाहता यावा त्याच्यात  एक सुसूत्रता आण्यासाठी या विशाल भूभागाचे वेगवेगळे विभाग करणे गरजेचे होते. यासाठी काही एक नियोजन केले गेले या नियोजनाचा एक भाग म्हणजेच प्रशासकीय कारभार नीट व्हावा या उद्देशाने अखंड भारताचे भाषावार प्रांतरचना करून अखंड भारतात एक नवी लोकशाही आकारास येऊ पाहात होती. पण याच दरम्यान अनेक प्रांतातील लोक  आपापल्या भाषेनुसार स्वतंत्र प्रांत व्हावा यासाठी मागण्या करू लागली आंदोलने करू लागली. भाषा नि आपल्या भाषिकांचे स्वतंत्र राज्य असावे यासाठी सर्व भारतभर मागण्या होऊ लागल्या.एका अर्थाने जे सोयीसाठी करावयाचे होते तेच गैरसोय करते की काय अशी सगळी अवस्था अनेक प्रांतात दिसू लागल्याने त्याकाळच्या कॉँग्रेस सरकारने अशा मागण्याना विरोध दाखवायला सुरुवात केली. यातूनच संयुक्त महाराष्ट्राची मागणी जोर धरू लागली.भाषांवर प्रांत झाल्यास त्या भाषिकांना स्वतंत्र राज्य व त्याचा राज्यकारभार आपल्या भाषेतून चालणार याचा अभिमान वाढू लागला.

   संयुक्त महाराष्ट्र चळवळीची मागणी | Sanyukt Mharashtra Chlvlichi Magni 

                       मराठी भाषिकांचे एक स्वतंत्र्य राज्य असले पाहिजे याची  सर्वप्रथम मागणी कोणी केली ते जर आपण पाहायला गेलो तर 1915 साली लोकमान्य टिळकांनी मराठी भाषिक प्रांत असावा अशी मागणी केली होती त्यांच्याच विचारात ही पाळेमुळे आपल्याला पाहायला मिळतात पण कालांतराने भाषावार प्रांतरचना हा मुद्दा बाजूला पडून  अगोदर ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावणे या या स्वातंत्र्य लढ्याची मागणी पुढे आली. मराठी भाषिक राज्य हा विचार मागे पडून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला बळ दिले गेले.
                   देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर 1947 पासूनच भाषावार प्रांतरचना झाली पाहिजेअशा मागण्या जोर धरू लागल्या यामध्ये महाराष्ट्र राज्य देखील अग्रेसर होते भाषावार प्रांत रचनेचे प्रश्न सोडवण्यासाठी दार समिती गठीत करण्यात आली होती.  या समितीला भाषावार प्रांतरचनेचे  प्रश्न सोडवता आले नाहीत.

 दार समिती | Dar Samiti V Maharshtra Nirmiti 

              भाषावार प्रांतरचना कोठे करावी ?करू नये यासाठी एक त्री सदस्यीय समिति नेमण्यात आली  होती. हे काम पाहण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभ भाई पटेल पट्टाभी सीतारामय्या यांची जे वी पी समिती गठित करण्यात आली या समितीने देखील महाराष्ट्र राज्याचे निर्मितीबाबत सकारात्मकता दाखवली नाही कारण तर मुंबई हा भाग कोणत्या राज्याचा भाग असेल की स्वतंत्र असेल हा खरा पेच निर्माण करणारा भाग होता. 

  मुंबई अस्मितेचा  प्रश्न | Mumbai Asmitechaa Prashn 

              महाराष्ट्र राज्याची निर्मिती करत असताना अजून एक नवीनच पेच उभा राहिला तो म्हणजे मुंबईला प्रांताचा समावेश नक्की कोठे करण्यात यावा. यावेळी केंद्राने असा विचार केला की मुंबईला द्विभाषिक राज्य म्हणून घोषित करावे आणि बाकी प्रांत म्हणजे महाराष्ट्र थोडक्यात संयुक्त महाराष्ट्र यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भ यांचा एकत्रित समावेश असेल असा विचार पुढे येऊ लागला. 
      भाषावार प्रांतरचना रचनेमध्ये मराठी भाषिकांचे एक राज्य असले पाहिजे यापेक्षा मुंबई नक्की कोणत्या राज्यामध्ये समाविष्ट होणार असा एक पेच निर्माण झाला याच दरम्यान आचार्य अत्रे यांनी मुंबई महापालिकेत एक ठराव मांडला आणि त्या ठरावात मुंबईसह महाराष्ट्र असा प्रस्ताव त्यांनी मांडला आणि यातूनच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अतिशय बळकट बनत गेली. काही झाले तरी मुंबई महाराष्ट्राचा भाग असेल अशी मागणी प्रचंड जोर धरू लागली. 
 

  संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना | Sanyukt Mahrashtra Samitichi Sthapna

                  महाराष्ट्र मध्ये मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली पाहिजे,यासाठी लोक रस्त्यावर उतरत होते.  मुंबई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. थोडक्यात प्रचंड आग्रही बनले होते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेतृत्व सेनापती बापट करत होते . सेनापती बापट यांनी विधानसभेवर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी खूप मोठा मोर्चा काढला होता या मोर्चामध्ये हजारो लोक समाविष्ट होते हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी पोलिसांनी एकत्रित जमलेल्या जवळजवळ पन्नास हजार लोकांवर अश्रु धूरांचा वापर केला. ही चळवळ आता व्यापक बनली होती . महाराष्ट्राची चळवळ अतिशय गतिमान बनत असतानाच केंद्र सरकार मात्र मुंबई महाराष्ट्राला देण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हते याचाच परिपाक म्हणून एका आंदोलनात राज्य शासनाने जो गोळीबार केला या गोळीबारात 106 लोक महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती लढ्यामध्ये बलीदान पावले. 
 

अनेकांचे योगदान म्हणजे हा लढा | Anekanche Yogdan 

 
                       संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वी व्हावी यासाठी महाराष्ट्रातील अनेक नेते मंडळी त्याच बरोबर प्रबोधनकार शाहीर कवी यासारख्या मंडळींनी या चळवळीला पाठिंबा दिला. ही चळवळ किंवा लढा गावोगव पॉहोचत होता. कवी व शाहीर यांनी या लढ्याला आल्या रचनेतून पाठिंबा दिला.त्यामुळे राज्यं निर्मिती जवळजवळ होणार पण मुंबई चे काय ? हा अस्मितेचा प्रश्न बनला होता. 
 

महाराष्ट्र राज्य निर्मिती घोषणा | Maharastra Rajya Nirmiti Ghoshnaa 

            भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी येणार होते हे माहिती होताच संयुक्त महाराष्ट्र समितीने एक प्रचंड मोठा मोर्चा काढला आणि या मोर्चातून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुढे निदर्शने केली हा विरोध पाहून काँग्रेस सरकारला आपले मत बदलावे लागले याचाच परिपाक म्हणून त्याकाळच्या काँग्रेस अध्यक्षा म्हणून कार्य पाहणाऱ्या इंदिराजी गांधी यांनी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली जाईल असे आश्वासन दिले आश्वासन पूर्ण करण्यासाठी एक एप्रिल 1960 ला संसदेमध्ये मुंबई पुनर्रचना कायदा पारित करण्यात आला आणि याच कायद्यानुसार 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली महाराष्ट्र राज्याबरोबरच गुजरात देखील एक स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करण्यात आले या या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण होते.
 

महराष्ट्र दिन कसा होतो साजरा माहिती 2023  | maharshtara din kasa sajraa hoto 

                                              महाराष्ट्र दिन 1 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उत्साहात साजरा केला जातो.या दिवशी महाराष्ट्रभर  विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.या वर्षी 2022 मध्ये महाराष्ट्र दिन रविवारी आला आहे.तरीदेखील अनेक लोक झेंडावंदन करण्यासाठी आपल्या कार्यालयात जातील.  त्याच्या  जोडीला जागतिक कामगार दिन देखील याच दिवशी असल्याने सगळीकडे आनंदी आनंद असे वातावरण असते.या दिवशी विद्यार्थी भाषणे देतात.नेते मंडळी आवर्जून शाळा ,महाविद्यालयात हजर राहून झेंडावंदन करतात.थोडक्यात महाराष्ट्रातील जनता या दिवशी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती  दिली त्या हुतात्माना नमन करतात. 
                 स्वतंत्र्य  महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी तर संघर्ष तर झालाच पण मुंबई महाराष्ट्र राज्यात समाविष्ट असली पाहिजे यासाठी खास आग्रह आंदोलकांनी धरला.मुंबईसह महाराष्ट्र यासाठी खूप मोठा संघर्ष द्यावा लागला म्हणून मी तर म्हणेन आपण या दिवसाला अगदी एखाद्या सनाप्रमाणे साजरे केले पाहिजे.
 
                                     मी मराठी असल्याचा केवळ अभिनमान नको 
                                     मी मराठी असल्याचा सार्थ अभिमान हवा 
 
       यादिवशी आवर्जून महाराष्ट्र गीत घरोघर ऐकले गेले पाहिजे. दिवाळी दसरा सणा सारखे घराला तोरण लावले पाहिजे कारण का तर आपण जय राज्यात राहतो त्या राज्य निर्मिती दिन म्हणजे 1 मे.चला तर मग पुन्हा भेटूया नव्या विषयासह.1 मे हा कामगार दिन देखील असल्याने अगदी जोशात साजरा करूया. 

FAQ  | Kahi prashn

 1 महराष्ट्राची राजधानी कोणती आहे ? 
 मुंबई 
2. महाराष्ट्राचेसध्याचे राज्यपाल कोण आहेत ? 
 भगतसिंग कोशारी 
3. महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत ?
 36 
4.महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा  कोणता आहे 
नगर 
5.महाराष्ट्रातील पुस्तकांचे गांव म्हणून ओळखले जाते 
भिलार 
आमचे इतर लेख 

1 thought on “एक मे आपल्या राज्यात कशासाठी साजरा करतात”

  1. अतिशय महत्वाची माहिती आहे,, तुमचा लेख वाचल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वांना समजेल की संयुक्त महाराष्ट्र म्हंजे काय? Thank you sir

    Reply

Leave a Comment