गणपती आरती संग्रह मराठी pdf 2023 | ganpati arti sangrah marathi pdf 2023

ganpati arti sangrah marathi pdf 2023 : गणेशोत्सव परवा मध्ये आज आपण गणपती आरती संग्रह मराठी पीडीएफ पाहणार आहोत हा गणपती आरती संग्रह गणेशोत्सवा वेळी आपल्याला खूप कामी येतो घरोघरी गणपती बसत असतात किंवा काहींच्या घरी पहिल्यांदाच गणपती बाप्पा विराजमान होतात अशावेळी गणेशाचे पूजन किंवा आरती करताना आरतीचा कोणता क्रम असावा कोणत्या आरत्या बोलाव्यात असे अनेक संभ्रम मनामध्ये येत असतात म्हणूनच आजच्या या विशेष लेखांमध्ये आम्ही आपणास गणपती आरती संग्रह 2023 मराठी पीडीएफ स्वरूपात देत आहोत .

हे खूप कामाचे आहे जरूर वाचा

गाणेश विसर्जन अर्थात उत्तरपूजा कशी करावी व्हिडिओ ganpati visarjan uttrapuja kashi kravi video 2023

गणेश विसर्जन उत्तरपूजा video 2023

आरती क्रम तो देखील विशिष्ट अशा क्रमाने देत आहोत जेणेकरून आपल्याला आरती करत असताना शास्त्रशुद्ध पूजा तर होईलच परंतु या आरतीच्या माध्यमातून जे प्रसन्न वातावरण होते त्याचा देखील आनंद घेता येईल चला तर मग आपण या गणपती आरती संग्रहाला सुरुवात करूया .यासाठीच आम्ही गणपती आरती संग्रह मराठी pdf ,घरगुती गणेश आरती आपणास सविस्तर देत आहोत.

ganpati arti sangrah marathi pdf 2023
ganpati arti sangrah marathi pdf 2023

Table of Contents

गणपतीची आरती बोलताना कोणता क्रम असावा serial of ganpati arti sangrah marathi pdf 2023

आपल्याला श्री गणेशाची आरती सकाळी आणि संध्याकाळी करावयाचे असते आणि ही आरती करत असताना आपल्याला गणपती आरतीचा खालील क्रम ठेवायचा आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे सुखकर्ता दुखहर्ता ही आरती सुरुवातीला असते.नंतरच्या आरत्या प्रत्येकाच्या तोंडामध्ये ज्या पद्धतीने बसलेले आहेत त्या पद्धतीने बोलल्या जातात परंतु आम्ही आपणास एक परंपरेप्रमाणे घरगुती गणपतीच्या आरत्या बोलल्या जातात त्या पद्धतीने क्रम देत आहोत तो गणपतीच्या आरत्यांचा क्रम खालील प्रमाणे.

गणेशोत्सव / गणपतीची आरती करताना हा क्रम ठेवा

आरती बोलण्याचा क्रम आरती
1.गणपतीची आरती -सुखकर्ता दुखहर्ता
2.शंकराची आरती – लवथवती विक्राळा
3.विठ्ठलाची आरती – येई हो विठ्ठले
4.दत्ताची आरती – 
5.संत ज्ञानेश्वर आरती – आरती ज्ञानराजा
6.देवीची आरती  – दुर्गे दुर्गट  भारी
7.घालीन लोटांगण मंत्र पुष्पांजली

या क्रमात बदल देखील असू शकतो पण शक्यतो अश्याच आरत्या बोलल्या जातात .

पद्धतीने आपल्याला गणेशोत्सवामध्ये किंवा एकंदरीतच कोणताही कार्यक्रम असो या कार्यक्रमांमध्ये आरत्यांचा क्रम हा ठेवायचा आहे हा क्रम थोडा त्याच्या परिसरानुसार परंपरेनुसार आणि सवयीनुसार त्यामध्ये बदल होऊ शकतात चला तर मग आपण गणपती आरती संग्रह मराठी पायला सुरुवात करूया

गणपती आरती संग्रह pdf 2023 |ganpati arti sangrah marathi pdf 2023

आपल्याला गणेश उत्सव किंवा इतर धार्मिक पूजा विधी करताना या आरती संग्रह खूप कामी येतो चला तर मग एकेक आरती पाहूया.

1.गणपतीची आरती pdf | गणेशाची आरती | बप्पाची आरती |ganpatichi arti | सुखकर्ता दुखहर्ता आरती 

गणपतीची आरती सर्वांना सुपरिचित आहे तरी देखील यामध्ये अनेक लोक दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्यामध्ये गडबड करतात तर ती होऊ नये म्हणून ही आरती देखील देखील आपल्याला आपल्याला देत आहोत.

गणपतीची आरती | ganpatichi arti

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची|

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची|

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची|

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची||

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |

कंठी झळके माळ मुक्तांफळांची||

जय देव ,जय देव 

जय मंगलमूर्ती ,हो श्री मंगलमूर्ती 

दर्शनमात्रे मन कामनापूर्ती

जय देव, जय देव…. ||१|| 

रत्नखचित  फरा तुज गौरीकुमरा |

चंदनाची उटी कुंकुम केशरा||

हिरेजडित मुकुट शोभतो बरा|

रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया||

जय देव, जय देव …..||२||

लंबोदर पितांबर फणीवर बंधना|

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना||

दास रामाचा वाट पाहे सदना|

संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवंदना ||

जय देव, जय देव…..||३||

अनेक ठिकाणी केवळ गणेशाची आरती म्हणून गणेश वंदना किंवा गणेश पूजन केले जाते परंतु बऱ्याचदा आपण मोठ्या मंदिरामध्ये किंवा गणेशोत्सवाच्या सभा मंडपामध्ये आरतीला जातो त्यावेळी इतर देखील आरत्या बोलल्या जातात चला तर मग आपल्याला या गणपतीच्या आरतीनंतर दुसऱ्या क्रमांकाला शक्यतोची आरती बोलली जाते ती म्हणजे लवथवती विक्राळा ही शंकराची आरती आपण पाहूया.

2.शंकराची आरती pdf shiv shankar aarti pdf 2023

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा|

विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा||

लावण्य सुंदर मस्तकी बाळा|

तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ||

जय देव जय देव  श्री शंकरा, स्वामी शंकरा|

आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा||ध्रु||

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा |

अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा||

विभूतीचे उधळण शितीकंठ निळा|

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ||जय देव .||२||

देवी दैत्य सागरमंथन पै केले|

त्यामाजी  जे अवचित हळाहळ उठिले ||

ते त्वा असुरपणे प्राशन केले|

नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले||जय देव.||३||

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी|

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी||

शतकोटींचे बीज वाचे उच्चारी|

रघुकुळटिळक रामदासा अंतरी||जय देव.||४||

खरोखरच ही शंकराची आरती आपल्याला एक वेगळ्या प्रकारचे समाधान देऊन जाते आणि यानंतर सर्वांची आवडती अशी आरती विठ्ठलाची आरती बोलली जाते ये ही  ओ विठ्ठले..

3.विठ्ठलाची आरती pdf खाली दिली आहे |vitthlachi arti marathi pdf

येई हो विठ्ठले माझे माउली ये

येई हो विठ्ठले माझे माउली ये

निढळावरी कर…

निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें

ठेवुनी वाट मी पाहें।

येई हो विठ्ठले माझे माउली ये

येई हो विठ्ठले माझे माउली ये

आलिया गेलिया हातीं धाडी निरोप

आलिया गेलिया हातीं धाडी निरोप

पंढरपुरी आहे…

पंढरपुरी आहे माझा मायबाप

हो माझा मायबाप

येई हो विठ्ठले माझे माउली ये

येई हो विठ्ठले माझे माउली ये। १।

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला

गरुडावरी बैसोनि…

गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला

हो माझा कैवारी आला

येई हो विठ्ठले माझे माउली ये

येई हो विठ्ठले माझे माउली ये

विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी

विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी

विष्णुदास नामा…

विष्णुदास नामा जीवे भावें ओवाळी

हो जीवे भावें ओवाळी

येई हो विठ्ठले माझे माउली ये

येई हो विठ्ठले माझे माउली ये। ३।

असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां

असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां

कृपादृष्टी पाहें…

कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया

हो माझ्या पंढरीराया

येई हो विठ्ठले माझे माउली ये

येई हो विठ्ठले माझे माउली ये। ४।

काही भक्तगण खाली दिलेली विठ्ठल आरती देखील बोलतात.आपण कोणतीही एक बोलू शकता.

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।

चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥

जय देव जय देव जय पांडुरंगा ।

रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥

तुळसीमाळा गळा कर ठेवुनि कटी ।

कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥

देव सुरवर नित्य येती भेटी ।

गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ॥

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।

सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ॥

राई-रखुमाबाई राणीया सकळा ।

ओवाळीती राजा विठोबा सावळा ॥

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती ।

चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ॥

दिंड्या पताका वैष्णव नाचती ।

पंढरीचा महिमा वर्णाचा किती ॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।

चंद्रभागेमध्ये स्नाने जे करिती ॥

दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती ।

केशवासी नामदेव भावे ओवाळीती ॥

ही पांडुरंग म्हणजे विठ्ठलाची आरती देखील बोलली जाते.चला तर आता यानंतर आरती ज्ञानराजा ही ज्ञानेशवरांची आरती पाहूया.

4.दत्ताची आरती pdf खाली दिली आहे | dattachi arti pdf

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।

त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।

नेती नेती शब्द न ये अनुमाना॥

सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।

आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।

अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥

पराही परतली तेथे कैचा हेत ।

जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।

भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥

प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।

जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।

हरपले मन झाले उन्मन ॥

मी तू पणाची झाली बोळवण ।

एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४

5.ज्ञानेश्वर आरती pdf स्वतंत्रपणे खाली दिली आहे| dnyaneshvar arti

आरती ज्ञानराजा ।

महाकैवल्यतेजा ।

सेविती साधुसंत ।

मनु वेधला माझा ।

लोपलें ज्ञान जगीं ।

त नेणती कोणी ।

अवतार पांडुरंग ।

नाम ठेविलें ज्ञानी ।

कनकांचे ताट करीं ।

उभ्या गोपिका नारी ।

नारद तुंबरु हो ।

साम गायन करी ।

प्रगट गुह्य बोले ।

विश्व ब्रह्मची केलें ।

रामा जनार्दनीं ।

पायीं ठकचि ठेलें ।

ह्या ज्ञानेश्वरांच्या आरतीनंतर देवीची आरती दुर्गे दुर्गट भारी ही आरती बोलली जाते.

6.देवीची आरती pdf खाली स्वतंत्र दिली आहे | devichi arti durge durgat

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी|

अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी|

वारी वारी जन्म मरणांते वारी|

हारी पडलो आता संकट निवारी||१||

जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी

सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी || ध्रु ||

तुजविन भुवनी पाहता तुज ऐसे नाही |

चारी श्रमले परंतु न बोलवे काही|

साही श्रमले परंतु न बोलवे काही|

साही विवाद करिता पडले  प्रवाही|

ते तू भक्तालागी पावसी लवलाही||२||

प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदासा|

क्लेशांपासूनी सोडवी तोडी भवपाशा|

अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा|

नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा ||३||

7.घालीन लोटांगण आरती  pdf खाली आहे| ghalin lotangan

घालीन लोटांगण, वंदिन चरण|

डोळ्यांनी पाहिन रूप तुझे||

प्रेमे आलिंगीन आनंदे  पूजिन|

भावे ओवाळीन म्हणे नामा||

त्वमेव माता च पिता त्वमेव,

त्वमेव बंधूश्च सखा त्वमेव||

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव|

त्वमेव सर्व मम देव,देव||

कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा,

बुद्धात्मना वा प्रकृतिस्वभावात्|

करोमि यज्ञत् सकलं  परस्मै 

नारायणायेति समर्पयामि ||

अच्युतं केशवं रामनारायणं,

कृष्णदामोदरं वासुदेवं हरि |

श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं,

जानकीनायकं रामचंद्रं भजे ||

हरे राम हरे राम,

राम राम हरे हरे|

हरे कृष्ण हरे कृष्ण,

कृष्ण कृष्ण हरे हरे|

8 मंत्र पुष्पांजली pdf खाली बघा| mantra pushpanjli

गणपतीची आरती व इतर आरत्या झाल्या नंतर सर्वात शेवटी बोलली जाते ती म्हणजे मंत्र पुष्पांजली

ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवा:स्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।

तेह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संति देवाः ।। १

ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने। नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।

स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु।

कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः।।२

ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्टयं राज्यं

महाराज्यमाधिपत्यंमयम समन्त पर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुषं

आन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति ।।३।

तदप्येषः श्लोको भिगीतो मरूतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे 

अविक्षतस्य कामप्रेर्विश्वेदेवा सभासद इति।४

ओम एकदंताय विधमहे वक्रतुण्डाय धिमाहि तन्नो दंति प्रचोदयात ।

गणपती संपूर्ण आरती संग्रह मराठी pdf ganpati sampurn aarti pdf 2023

गणेशोत्सवामध्ये गणपती आरती संग्रह काहींना इमेज स्वरूपात पहिला आवडतो म्हणून आम्ही तो गणपती आरती संग्रह इमेज स्वरूपात आपल्याला देत आहोत खालील विंडोमध्ये आपल्याला संपूर्ण आरतीच्या इमेज दिसतील.या इमेज च्या माध्यमातून आपण दररोज आरती करू शकता.

https://drive.google.com/file/d/1p8KYdNa3L21nFB6T4XbEZjLoDydWm23O/preview.

गणपती आरती image हा लेख कसा वाटला हे नक्की कळवा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!

आमचे अप्रतिम लेख

हरतालिका व्रत कथा मराठी pdf 

आपण केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी या पद्धती वापरा 

वाढत्या तापमानात अशी घ्या आपली काळजी 

असे करा आपले पॅनकार्ड आधार कार्ड एकमेकांना लिंक 

Leave a Comment