बारावी बोर्ड परीक्षा 2023 उत्तरपत्रिका छायाप्रत कशी मिळवावी तसेच पुनर्मूल्यांकन कसे करावे

How to get 12th Exam 2023 Answer Sheet Xerox

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता जाहीर झाला. सर्व विद्यार्थी आणि पालक यांनी जाहीर झालेला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात बोर्ड परीक्षेचा निकाल पाहिला असेलच, परंतु हा निकाल पाहिल्यानंतर आपला पाल्य सांगत असेल की ,मी तर बोर्ड परीक्षेचा अमुक विषयाचा पेपर अतिशय छानपणे लिहिलेला आहे आणि तरी देखील मला कमी गुण मिळालेले आहेत अशावेळी अशा पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी काय करावे? या विषयाची आम्ही आज माहिती घेऊन आलेलो आहोत. बोर्डाने तरतूद केल्यानुसार बारावी बोर्ड परीक्षा असो की दहावी बोर्ड परीक्षा आपल्याला सदर परीक्षेच्या उत्तरपत्रिका झेरॉक्स स्वरूपात मिळवता येतात आणि पुन्हा त्याचे आपल्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांकडून मूल्यांकन करून म्हणजेच तपासून आपण त्या बोर्डाकडे सादर करू शकतो. म्हणूनच आजची माहिती आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.

How to get 12th Exam 2023 Answer Sheet Xerox
बारावी बोर्ड परीक्षा छायाप्रत पुनर्मूल्यांकन 

बारावी बोर्ड परीक्षा 2023 उत्तरपत्रिका छायाप्रत

बारावी असो की दहावी बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर आपण बोर्ड परीक्षेमध्ये कोणत्या प्रश्नांची नेमकी कोणती उत्तरे लिहिली आहेत.बोर्डाकडून त्यासाठी किती गुण मिळालेले आहेत याची आपल्याला स्वतः खातरजमा करावयाची असेल तर ती खातरजमा करावयासाठी आपल्याला बोर्डाकडे आपल्या ज्या विषयाची उत्तर पत्रिका हवी असेल याबाबत मागणी करता येते.त्या विषयाची छायाप्रत अर्थात xerox कॉपी बोर्डाकडे मागू शकतो.

बारावी बोर्ड उत्तर पत्रिका 2023 झेरॉक्स प्रत मिळवण्यासाठी कार्यप्रणाली

आपल्याला हव्या असलेल्या बोर्डाच्या उत्तर पत्रिकेची फोटोकॉपी अर्थात झेरॉक्स प्रत मिळवण्यासाठी बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज करावा लागतो आणि त्या संदर्भात लागणारे शुल्क ऑनलाइन भरून आपण त्या उत्तर पत्रिकेची मागणी करू शकतो.

बारावी बोर्ड परीक्षा 2023 उत्तरपत्रिका मूल्यांकन करण्यासाठी कालावधी

फेब्रुवारी मार्च 20222 23 मध्ये झालेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे आपल्याला मूल्यांकन अर्थात recheking करून घ्यावयाचे असेल अर्थात आपली उत्तर पत्रिका पुन्हा तपासून घ्यावयाची असेल तर त्यासाठी आपल्याला विहित नमुन्यात बोर्डाकडे अर्ज करावा लागतो. या गुण पडताळणीच्या अर्जासाठी आपण 26 मे 2023 ते 5 जून 2023 पर्यंत गुण पडताळणीसाठी अर्ज करू शकता.

बारावी बोर्ड परीक्षा 2023 उत्तरपत्रिका छायाप्रत / झेरॉक्स कॉपी मिळवण्यासाठी कालावधी

जर आपल्याला बारावी बोर्ड परीक्षेची उत्तर पत्रिका छायाप्रत अर्थात झेरॉक्स कॉपी हवी असेल तर आपण 26 मे 2023 ते 14 जून 2023 या नीट बोर्डाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

उत्तर पत्रिकांची गुण पडताळणी आणि उत्तर पत्रिकांची छायाप्रत शुल्क भरण्याची पद्धती

आपल्याला जर उत्तर पत्रिका पुन्हा तपासून घ्यायचे असेल तर आपण ऑनलाइन पद्धतीने त्यासाठी लागणारे फी भरू शकतो.यासाठी आपण क्रेडिट कार्ड ,डेबिट कार्ड यांचा वापर करू शकता.

उत्तर पत्रिकेचे पुनर्मूल्यांकन कधी व कोणाकडून करावे

एखाद्या विद्यार्थ्याला आपल्या उत्तरपत्रिकेची झेरॉक्स copy मिळाल्यानंतर त्याच्या असे लक्षात आले की अमुक प्रश्न छान लिहून देखील आपल्याला कमी गुण दिले गेले आहेत.अशावेळी  त्याने पुनर्मूल्यांकन करण्यासाठी पुन्हा शुल्क भरावे व त्यानंतर संबधित उत्तरपत्रिका आपल्या शाळेतील जे शिक्षक त्या विषयाचे examiner आहेत त्यांच्याकडून पुन्हा नव्याने तपासून घ्यावी.नव्याने तपासली गेलेली उत्तरपत्रिका बोर्डात जमा करावी.

उत्तरपत्रिका छायाप्रत मिळवण्यासाठी शुल्क फी 

आपल्याला बोर्डकडून उत्तरपत्रिका छायाप्रत मिळवायची असेल तर एका विषयासाठी 400 रुपये याप्रमाणे शुल्क ऑनलाइन अदा करावे लागते. 

बारावी बोर्ड परीक्षा 2023 उत्तर पत्रिकेचे पुनर्मूल्यांकन शुल्क

आपल्याला मिळालेली उत्तरपत्रिका झेरॉक्स कॉपी आपल्या शिक्षकांनी तपासल्यानंतर असे लक्षात आले की आपले गुण वाढत आहेत तर आपण या पुढील पायरीकडे म्हणजे उत्तर पत्रिकेचे पुनर्मूल्यांकन यासाठी अर्ज केला पाहिजे.यासाठी आपल्याला उत्तर पत्रिकेचे पुनर्मूल्यांकन यासाठी 300 रुपये शुल्क भरावे लागते .आणि सर्वात महत्वाचे आपण अर्ज केला आणि गुण वाढले असे होत नाही. त्यासाठी देखील एक प्रक्रिया आहे.

पुनर्मूल्यांकन दावा निकालात कसा काढला जातो ?

आपल्या शाळेतील विषय शिक्षकांनी पुन्हा तपासलेली उत्तरपत्रिका बोर्डाने घोषित केलेल्या कमिटीपुढे सादर केली जाते. ती समिती यावर पुन्हा विचार विनिमय करून जर खरोखर उत्तर छान लिहून कमी गुण दिले असतील किंवा इतर काही बाबी असतील यावर विचार करून तर तो दावा ग्राह्य धरला जातो अन्यथा गुणात कोणतीही वाढ दिली जात नाही.

उत्तरपत्रिका छायाप्रत घेण्याचे व उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकन करण्याचे तसेच फायदे

आपल्या मनात असणाऱ्या सर्व शंका निरसन होतात. आपल्याला कमी गुण का मिळाले? याची माहिती मिळते.आपण अतिशय सुंदर उत्तरपत्रिका लिहिली असतील आणि ती आठवण आपल्यापशी कायम स्वरूपी राहावी असे वाटत असेल तर जरूर अगदी नाममात्र शुल्क घेऊन बोर्ड आपल्याला देत आहे याचा जरूर लाभ घ्यावा.

आमचे इतर लेख 

Leave a Comment