मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत शासन अध्यादेशावर कोणती भूमिका घेतली!

Manoj Jarange Patil Maratha Reservation Movement Latest Decision : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मनोज जरांगे पाटील नऊ दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत. राज्य सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देत असताना जो अध्यादेश काढला आहे. त्या अध्यादेशानुसार मराठा समाजाला आरक्षण देताना कुणबी जात प्रवर्गात समवेशीत करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.परंतु त्यासाठी वंशावळ सादर करावी लागेल असा शासन अध्यादेश आहे, यावर मनोज जरांगे पाटील यांनी वंशावळ हा मुद्दा काढून सरसकट आरक्षण द्या ठोस अशी भूमिका घेतली आहे.अन्यथा तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.शासन निर्णयाचे आम्ही स्वागत करतो केवळ त्यात सरसकट हा शब्द हवाय असे मत मांडले.आमच्याकडे वंशावलीचे दस्तऐवज नाहीत त्यामुळे आम्हाला अडकवून न ठेवता सरसकट आरक्षण द्या अशी मागणी मराठा समाजाच्या आंदोलनात घेण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे लाभ मिळण्यासाठी वंशावळीचे पुरावे सादर करण्याची मागणी राज्य सरकारने आपल्या अध्यादेशात मांडलेले आहे. यावर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये या अध्यादेशात बदल झाला तरच आम्ही आपले आंदोलन मागे घेऊ अशी भूमिका घेतली आहे.जोपर्यंत तो होत नाही तोवर हा लढा सुरूच राहणार असे मत त्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत मांडले.

मनोज जरांगे पाटील यांच्या महन्यानुसार, सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणारा अध्यादेश सरकारने काढला तरच उपोषण मागे घेणार आहे अन्यथा जीव गेला तरी बेहत्तर हे उपोषण व आमचे आंदोलन असंच चालू राहील.असे प्रतिपादन आजच्या पत्रकार परिषदेत घेतले.

त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेले हे उपोषण शांततेच्या मार्गाने चालू ठेवावे, अशी देखील विनंती या पत्रकार परिषदेमध्ये मराठी समाज बांधवांना केली.

मनोज जरांगे पाटील यांची आताची मागणी curant statmaent of Manoj Jarange Patil Maratha Reservation Movement Latest Decision

थोडक्यात मनोज जरांगे पाटील यांनी आताच राज्य सरकारकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे,त्या मागणीनुसार आम्हाला अध्यादेशावर सही झालेली कागदपत्रे अर्थात जीआर मिळायला हवा आणि त्या शासन निर्णयामध्ये वंशावळीचा कोणताही मुद्दा उपस्थित न करता सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील. अशी घोषणा करावी अशी अंतिम मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, संपूर्ण मराठा समाज हा पूर्वीपासूनच शेतीशी निगडित आहे मग त्याला वंशावळीचा पुरावा देण्याची काय आवश्यकता आहे. म्हणूनच सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी आणि शासनाने आपल्या काढलेल्या अध्यादेशामध्ये सुधारणा करावी आम्ही त्यांच्या निर्णयाचे स्वागतच करू.थोडक्यात कुणबी आणि मराठा असा भेद न करता आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. सरकार आमच्यासाठी एक पाऊल पुढे चालायला तयार असेल तर आम्ही दहा पावले मागे घ्यायला तयार आहोत अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवली.

मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आरपारची लढाई final decision for Manoj Jarange Patil Maratha Reservation Movement Latest Decision

आता नाही तर कधीच नाही या न्यायानुसार मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत महाराष्ट्र शासनाचा सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याबाबतचा अध्यादेश निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशीच सुरू राहणार आहे. हे आंदोलन मागे घेतले तर पुन्हा यामध्ये आमचा वेळ जाईल.गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना, या ना त्या प्रकारे त्यामध्ये अडकाटी येत आहे. आता आम्ही जो मार्ग सांगितलेला आहे तो मार्ग अतिशय सुयोग्य आहे. यामुळे कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि जो मराठा समाज खरोखरच पिचलेला आहे त्यांच्यासाठी हा एक महत्वपूर्ण निर्णय असेल.

महाराष्ट्र शासनाने हा निर्णय तात्काळ घेऊन मराठा समाजातील तरुण मुलांचे भवितव्य उज्वल करण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी भूमिका म्हणत जरांगे पाटील यांनी घेतले आहे.

थोडक्यात जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील अशीच ठाम भूमिका घेतली आहे.

सारांश

थोडक्यात मराठा समाजाला आरक्षण ते ही सरसकट दिल्याबबत आध्यादेश निघत नाही टॉवर आंदोलन सुरू राहणार अशी भूमिका Manoj Jarange Patil Maratha Reservation Movement Latest Decision याबाबत घेतली आहे.आपण जरा विचार केला तर खरोखर मराठा समाजातील काही लोक खूप गरीब आहेत त्यांना आरक्षण मिळणे अतिशय गरजेचे आहे. या आरक्षणाच्या मुद्याकडे राजकारण म्हणून न पाहता मानवतेच्या भूमिकेतून पाहिले तर कदाचित प्रश्न आतापर्यंत सुटला असता हे नक्की.

आमची ही  माहिती आपण इतरांना देखील पाठवा.धन्यवाद! 

आमचे इतर लेख

महाराष्ट्र सरकार कडून दिल्या जाणाऱ्या 31 स्कॉलरशिप माहिती

इयत्ता पहिली ते दहावी वार्षिक नियोजन

गोपाळकाला सणाची माहिती